“सुवर्णप्राश ही एतत मेधाग्निबलवर्धनम् | आयुष्यं मंगलंम पुण्यं ग्रहापहम ।।
मासात् परम् मेधावी व्याधीभिर्न च धृष्यते । षडर्भिमासे: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ।।’’
सुवर्णबिंदु प्राशन हे बल वर्धक बुद्धीवर्धक रोगप्रतिकारक शक्ती-वर्धक आयुष्यवर्धक वर्ण्यकारक परम मेधावी आहे. आकलनशक्ती वाढवणारे आहे. सुवर्णबिंदु प्राशन हे मतिमंद मुले, बोलणे, ऐकणे व दररोजच्या अॅक्टीव्हिटी मध्ये मंद असणारी मुले, वारंवार सर्दी, खोकला, ताप, किंवा इतर तक्रारींनी आजारी पडणारया मुलांना, आकलन शक्ती, बुध्दीमत्ता कमी असणारी व अंथरूणांमध्ये लघवी करणारी, अशक्त मुलांना, वजन कमी असणारया मुलांना अत्यंत उपयोगी आहे. वयाच्या 6 महिन्यापासून वय 12 वर्ष पर्यंत नियमित सुवर्णबिंदू प्राशन द्यावे॰
सुवर्णबिन्दुप्राशन संस्कारार्थ नियमित न येऊ शकणार्या बालकांसाठी सुवर्णबिंदू प्राशनाची 6 महिन्यांची औषधी घरी दिली जाते. तसेच सुवर्णबिंदु प्राशनाचा विधी व नियम यांचे मार्गदर्शन ही केले जाते.