Blog

“सुवर्णबिंदूप्राशन ” औषधी निर्माण..!

सुवर्णबिंदूप्राशन घटक व निर्माण पद्धती:

Ayurveda Health Group - Join Free

ब्राम्ही – मंडुकपर्णी – शंखपुष्पी – वचा इत्यादी 11 औषधी ज्या बालकांचा शारीरिक व मानसिक विकास करण्यास अत्यंत उपयुक आहेत अशा औषधी शुभमुहूर्ताला एकत्र करून, त्या औषधी द्रव्यांच्या सुक्ष्मचूर्णास त्यांच्याच स्वरस – काढ्याच्या 11 भावना देऊन चूर्णाची सिद्धी केली जाते. त्यानंतर सिद्ध चूर्णास चरकोक्त चार मेद्य द्रव्यांच्या काढ्याच्या प्रत्येकी 8 – 8 भावना देऊन पुन्हा: ते चुर्ण सिद्ध केले केले जाते।। या चुर्ण सिद्ध करण्याच्या प्रक्रियेला किमान दीड महिना जातो.

SuvarnaPrasha

पुन्हा पुन्हा सिद्ध केलेले सुक्ष्म चुर्णात, शुद्धसुवर्णभस्म, रजतभस्म, सहस्त्रपुटी अभ्रकभस्म, कुमार कल्याणक रस आदी द्रव्य एकत्रित करून  धी – धृती – स्मृतीवर्धक सिद्धघृतात (मुर्च्छित देशी गाईच्या घृतात सिद्धी) व मध यांमध्ये विशिष्ठ काळ घोटून संस्कारीत सिद्ध सुवर्णबिंदूप्राशन औषधी तयार केली जाते।।

हे सुवर्णबिंदूप्राशन दोन प्रकारे दिले जाते।।

A) दररोज किमान 6 महिने।।।

याला सुवर्णबिंदूप्राशन Daily असं म्हणतात।


B)जर 27 दिवसाला येणाऱ्या प्रत्येक पुष्य नक्षत्राला !!

याला सुवर्णबिंदूप्राशन Monthly/ प्रत्येक पुष्यनक्षत्राला असे म्हणतात।

SuvarnabinduPrashan

सुवर्णबिंदूप्राशन” औषधी देण्याची पद्धत:

बालकांचे शरीर हे कृमी आणि कफ कारक व्याधींसाठी अधिक पोषक असते।। म्हणून सर्वप्रथम बालकाला कृमींची व दुष्ठ कफाची चिकित्सा करावी।।

बालकाच्या तक्रारी – वय व वजन यांचा विचार करून विडंगारिष्ठ व कृमीकुठार रस यांचा डोस ठरवून तो 7 ते 15 दिवस दिला जातो।।

ही औषध कृमी आणि कफ यांवर उत्तम प्रकारे काम करताना दिसतात।।

सुवर्णबिंदुप्राशन निर्मान

पुढेही तीन महिन्यापर्यंत एक –  एक  महिन्याच्या अंतराने 5 ते 7 दिवस विडंगारिष्ठ पुन्हा रिपीट करावे लागते।। याने कृमींचे व आंत्रातल्या(आतड्यातील) कृमींच्या अंड्यांचे पूर्णतः पतन होते.

सुरवातीची 7 ते 15 दिवसांची कृमी व दूषित कफ यांची चिकित्सा केल्यानंतरच “सुवर्णबिंदूप्राशन ” औषधी द्यावे.

सुवर्णबिंदूप्राशन देताना,
“सुवर्णबिंदूप्राशन Daily” हे सलग 6 महिने देऊन,

Ayurveda Health Group - Join Free

त्यानंतर पुढे बालकाचे वय 12 वर्षे होई पर्यंत,जर 27 दिवसांनी येणाऱ्या प्रत्येक पुष्यनक्षत्राच्या दिवशी, सकाळी उपाशीपोटी “सुवर्णबिंदूप्राशन Monthly” चा बुस्टर डोस देत राहावा।।

A) *सुवर्णबिंदूप्राशन Daily/ दररोज* ।। 

– दररोज बिंदू मध्ये द्यावयाच्या या 150gm औषधीमध्ये 100mg सुवर्णभस्म टाकलेले असून उपरोक्त विधीने सुवर्णबिंदूप्राशन Daily/ दररोज बनवले जाते ।।

बाळाच्या वजनानुसार, Daily सुवर्णबिंदूचा Dose ठरवला जातो।।
सोबतच्या महितीपत्रकात सर्व Details दिल्या जातात।। साधारणपणे 12 kg च्या आतल्या बालकांना Daily सुवर्णबिंदूप्राशन औषध 6 महिने पुरते।।

दररोज दिल्या जाणाऱ्या या सुवर्णबिंदूप्राशन औषधीचे Result खुप उत्तम प्रकारे दिसतात।।।

नियमित किमान 6 महिने हे सुवर्णबिंदूप्राशन Daily देऊन त्यानंतर पुढे बालक किमान 12 वर्षाचे होईपर्यंत प्रत्येक पुष्यनक्षत्राला याचा Booster Dose देत राहावा।।

जर एखाद्या बालकाचा शारीरिक व मानसिक विकास व्यवस्थित झाला नसुन त्याच्यात Milestone Deley, अपंगत्व – बधिर्य आदी तक्रारी असल्यास वैद्यकीय सल्ल्याने इतर औषधींबरोबर सलग 2 वर्ष पर्यंत सुवर्णबिंदूप्राशन Daily देता येते।।

B) दर पुष्य नक्षत्राला – सुवर्णबिंदूप्राशन Monthly/प्रत्येक पुष्यनक्षत्राला।

सलग 6 महिने सुवर्णबिंदूप्राशन Daily
पुर्ण झाल्यानंतर पुढे बालक 12 वर्षांचा होईपर्यंत प्रत्येक पुष्यनक्षत्राला सुवर्णबिंदूप्राशन Monthly चा बूस्टरडोस दिला जातो।।

बऱ्याचदा रुग्णांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती किंवा इतर काही कारणामुळे *सुवर्णबिंदूप्राशन Daily/ दररोज* देता येत नाही ।। त्यांना प्रत्येक पुष्यनक्षत्राला
सुवर्णबिंदूप्राशन Monthly आपण देत असतो।।

हा सुवर्णबिंदूप्राशनाचा बुस्टरडोस बालकाच्या शारीरिक – मानसिक विकासाला, रोगप्रतिकारकशक्तीला बुस्ट करणारा असतो। शिवाय याच्या निमित्ताने बालक प्रत्येक पुष्यनक्षत्राला वैद्यांच्या नजरेखालून जातो. त्यामुळे त्याच्या वाढीवर विशेष लक्ष राहते, वाढीच्या या अवस्थेतील छोट्या मोठ्या तक्रारी लक्षात येऊन त्यांचे निराकरण करता येते ।।

*सिद्ध सुवर्णबिंदूप्राशन औषधांची 5gm मात्रा छोट्या डबीमध्ये Pack करून दिली जाते* जी आपल्या पुष्यनक्षत्राच्या सुवर्णबिंदूप्राशन OPD ला सहजतेने रुग्णाला क्लिनिक मध्ये किंवा घरी देता येते.
  याच्या प्रत्येक मात्रेत (Dose): 2mg सुवर्णभस्म असते.  औषधी सोबत औषधी देण्याविषयक माहितीपत्रक दिले जाते।।

( “आप्तश्री आयुर्वेदची ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली गुणवत्तापूर्ण औषधी” मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.)

*(पोस्ट / कुरिअरचा खर्च वेगळा असेल)* 

*Contact:*
*आप्तश्री आयुर्वेद, पुणे*

Conect on Call or Whats App:

*9665010500*
*7387793189*

Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!