पंचसुत्री आयुर्वेदाच्या नवपर्वाची
*!! पंचसुत्री आयुर्वेदाच्या नवपर्वाची !!*
– Vd Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved)
*आयुर्वेदाची महती आज जगाला उमगली आहे. आधुनिक औषधींचे दुष्परिणाम आजची मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे जग वेगाने आयुर्वेदाकड़े धावत आहे. लोक स्वत: हुन आयुर्वेदिक उपचाराची मागणी करत आहे.*
गेले ते दिवस, जेव्हा आयुर्वेदीक वैद्य झाड-पाला वाले वैदु म्हंणवले जात होते. आता *” आयुर्वेदाच्या नवपर्वाचा उदय झाला आहे । सुरवात झालीय आयुर्वेदाच्या सुवर्णयुगाची।।”*
या कोविड लाटेत आयुर्वेदाचे झटपट रिझल्ट अनुभवलेत भरपूर लोकांनी।। आणि हे लोक आता आयुर्वेदाचे पक्के फॅन झालेत..!!
आयुर्वेदाला Pseudo Science म्हणणाऱ्या त्या शंतनू भयंकरने भोंगा लावून कितीही टाळ्या वाजवल्या तरी जनाधार आयुर्वेदकडे वळतोय हे आजचं वास्तव आहे..!
*या बदलत्या युगात आपण आयुर्वेदिक वैद्यांनीही काही बदल स्वत: मध्ये करून घेणे ही काळाची नितांत गरज आहे.*
असे अनेक भयंकर उद्या उठून शिंतोडे उडवायचा प्रयत्न करतील, त्यांच्या तोंडात बोळे घालन्यासाठी आपण सिद्ध होणं ही काळाची गरज आहे।।
*बदलत्या वातावरणात टिकण्यासाठी त्या त्या वेळेनुसार स्वत:मध्ये बदल करून घेणे, याला अनुकूलन म्हणतात.*
हे अनुकूलन वेळीच आयुर्वेदात झालं नाही. आणि त्याचाच परिणाम म्हणून उत्तुंग शिखरावर असलेला आयुर्वेद लोप होतोय की काय? या स्थितीत आला होता. हे अनुकूलन न झाल्यामुळेच स्वयंभू असलेल्या आयुर्वेदच्या प्रसाराचा हा उठाठेव आज आपल्याला करावा लागत आहे.
ज्यांचा आयुर्वेदाशी काडीमात्र संबंध नाही, असे लोक आयुर्वेदात आले अन आयुर्वेदाचा व्यापार करून गलेलठ्ठ झाले.
या लोकांनी Allopathy चं ज्ञान घेवुन किंवा आयुर्वेद काय, आरोग्य विभागाशी काहीही संबंध नसलेले लोकही “आयुर्वेदिक चिकित्सा युनिट” काढतात…! पैसे कमावण्याच्या नादात काहीही थापा लावतात, स्पा मसाज थेरपीचा मोठा उद्योग करतात.
हाताखाली आपलेच B.A.M.S Degree धारक कामाला ठेवून कायद्याच्या कचाट्यातून स्वतः ला वाचवतात ….!
अन आमचे B.A.M.S. डिगरी धारक 30:70% वर याची *फ्रेंचाई घेतात…!*
कुठलं औषध आहे ? काय आहे यात? यांना काही माहित नसतं..!
हे असं असलं की हे द्यायच, ते तसं असलं की ते द्यायचं । बस्स्स।।
मग पेशेंट आला की,
हे तुमचं एक महिन्याचे प्याकेज…!
ही तुमची औषध।। अन हे तुमचे बिल ।।
योग वाले असोत किंवा आणखी ही भरपूर आहेत म्हणा…!
*काहीही खोट्या बाता मारून आयुर्वेदाला चुकीच्या पद्धतीने जगासमोर प्रेजेंट केलं.*
फक्त मार्केटिंग केलं।।। आणि धंदा केला यांनी आयुर्वेदाचा।। आयुर्वेदिक बिस्कीट – फिस्किट काहीही केलं…!!
हे *नॉन आयुर्वेदिक लोक आयुर्वेद क्षेत्रात आल्यामुळं खरे *आयुर्वेद शास्त्र* जनमाणसात पोहचलाच नाही. आयुर्वेदाबद्दल चुकीच्या समजुती लोकांमध्ये निर्माण झाल्या. आणि यामुळं आयुर्वेदाचे कधीही भरुन न येणारं असं खुप मोठं नुकसान झालं आहे.*
स्वतःची पॅथोफर्माकोलॉजी असलेलं सिद्ध अशा आयुर्वेद शास्त्राला ह्या फेकू लोकांनी त्याच्या सोयीनुसार जगासमोर मांडलं।।
कुणी आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी…, कुणी स्पा आदी रिलॅक्ससेशन्ससाठी तर कुणी आयुर्वेदाचं पर्यटन करण्यासाठी…!!
आता ही लाचारी आयुर्वेदाचार्यांनी बंद केली पाहिजे।। अन आपलं ज्ञान जगासमोर मांडण्यात आपण संशोधन रुपी चष्मा घालून सिद्ध झालं पाहिजे।।
जिथं आयुर्वेदाबद्दल चुकीचं घडतंय तिथं विरोध केलाच पाहिजे।।
2000 वर्षापुर्वीच शास्त्र आज कुठं आहे…?
अन आपलं 5000 वर्ष किंवा त्याही पूर्वीचं शास्त्र कुठं आहे ???
बरं शास्त्रात दोष असेल, तर ठीक आहे हो…,
पण *अनादी- अनंत असे आयुर्वेदिक शास्त्र कण मात्र नव्हे, अणु मात्रही दोष नसलेलं आहे..! हजारो वर्षापूर्वीचे सिद्धांत आज ही जसेच्या तसे लागु होतात.*
मग असं हे महान वैदक शास्त्र मागं का राहिलं???
कारण तेच, आपण वैद्यांनी वेळीच अनुकूलन न केल्यामूळं…!
अमेरिकेत ठीक आहे हो, आयुर्वेदाला ते Alternetive मेडिसिन म्हणतात..,
पण *जिथं आयुर्वेदाचा उगम झाला, विकास झाला, विद्यापीठं स्थापन झाली, एक काळ तर असा होता की जगभरातील लोक आयुर्वेद व दर्शनशास्त्र शिकण्यासाठी भारतातील तक्षशीला – काशी(वाराणसी)-नालंदा या विद्यापिठात येत होते.*
*मागची शे – दीडशे वर्ष सोडली तर आता पर्यन्त ज्या देशाची संपूर्ण आरोग्यव्यवस्था फ़क्त अणि फ़क्त आयुर्वेदावर अवलंबुन होती..! त्याच भारत देशात आयुर्वेदाला Alternetive मेडिसिन म्हनावं???*
चिकित्सेत ही दुय्यम स्थान द्यावं..?
हे कशा मुळ….???
फ़क्त आणि फ़क्त आपण वैद्यगणांनी अनुकूलन न केल्यामूळं…!
स्वत: मध्ये परस्थिति नुसार बदल न केल्यामूळं…!!
आज जर आपण वैद्यांच्या नव्या पिढीने बदलत्या परस्थितिनुसार स्वत:च्या मानसिकते मध्ये बदल करून घेतला नाही, तर आयुर्वेदाच्या चुकीच्या प्रसिद्धिला आपण जबाबदार ठरणार आहोत. आयुर्वेद पतनालाही आपणच कारण ठरणार आहोत.
जर आपण *आप्तवचन* या प्रमाणा इतकेच महत्व *प्रत्यक्ष युक्ति आणि अनुमान* या प्रमाणांना देवून आयुर्वेदात Resarch केले असते, तर आयुर्वेद आजही उत्तुंग शिखरावर विराजमान असला असता.
*शल्यचिकित्सेत जर Anasthesia चा शोध आयुर्वेदातील वैद्याने लावला असता, तर आज शल्यचिकित्सा ही आयुर्वेदाची ओळख बनली असती.*
आपण कुठं कमी पडलो… संशोधनात..!! आणि जगासमोर ते मांडण्यात…!!
फक्त Anasthesia एवढ्या एकाच गोष्टी मुळे आपले शल्यतंत्र मागे पडलं आहे. बाकि शल्यतंत्र आणि Surgery यात फरक तो काय आहे???
*तंजावर येथील संग्रहालयात नेत्राच्या शल्यकर्मानंतरच्या Post -Opration च्या Nots आजही पहायला मिळतात.त्यावरुन आयुर्वेदाच्या प्रगत आवस्थेचा अंदाज येतो.*
*ज्या आयुर्वेद शास्त्रातील शल्यचिकित्सक “Father Of Surgery” आणि “Father Of Plastic Surgery” आहेत, ज्या शास्त्रात प्लास्टिक सर्जरी होत होती, नेत्र या नाजुक अवयवाची शल्यकर्म होत होती, आज त्याच शास्त्रातील पदवी धारकाला इतर शास्त्राच्या (प्याथीच्या) चिकित्सकाच्या हाताखाली शिकावं लागतंय..!! त्याचा Backup घेतल्या शिवाय Surgery करता येत नाहीत. या सारखी वाईट परस्थिति नाही.*
यावरून लक्षात येतं की,
“काय होतो आपण..? आणि काय झालोत आपण…?’
संभाषा परिषदेला जे महत्व आज देतोय ते थोडं पूर्वीपासून दिलं असतं तर आज खुप वेगळ चित्र असतं.
*आयुर्वेदातिल एक एक गोष्ट उचलून आज इतर वैद्यकीय शास्रे स्वत:ला परिपूर्ण करत आहेत.*
उदाहरणासहित हवं असेल तर सांगतो,
*जे सुवर्ण आपण हजारो वर्षापासून चिकित्सेत वापरतो आहोत, आज सुवर्ण अंश असलेली टेबलेट आधुनिक शास्त्राच्या औषधी भांडारात दाखल झाली आहे…!*
*Physio- Theropy नावाने आपल्या स्नेहन स्वेदनाचं पिल्लू हळूहळू प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.*
*Lesar theropy काय आहे?? अग्निकर्माचेच ऍडव्हान्स रूप ना..!*
*हरिद्रेचा extract काढून as a Antibiotics म्हणून वापर केव्हाच चालू झाला आहे.*
एक ना अनेक उदहारण सापडतील,
*आयुर्वेदातील एखादा सिद्धांत किंवा मूळ वाक्य as A Hypothesis घ्यायचे…, त्यावर रिसर्च करायचा…, अन त्यात थोड़ेफार बदल करून, किंवा व्यवहारिक रित्या आणखी सोपे करून त्याला आम्ही लावलेला शोध म्हणून त्यांच्या शास्त्राच्या नावे प्रसिद्ध करायचं…!*
असे उद्योगही काही प्रमाणात चालू आहे..!
*आम* या तत्वाच्या जवळपास ते आले आहेत..!
*मन – मनाचे इन्द्रियत्व आणि आत्मा* आजुन तरी यांना सापडलेला नाही.
पण जेव्हा यांचाही शोध लावतील तेव्हा आयुर्वेदातील बराचसा भाग यांच्याकडे असेल. आणि याला यांच नामकरण असेल. त्यांच्या शास्त्राचा तो भाग असेल. आयुर्वेदाचा नाही.
*प्याथी कुठली आहे? हा चिकित्सेचा भाग कोणी कुठून उचलला आहे? याच्याशी रुग्नाला काही घेणं देणं नसतं. या गोष्टिचा लोकांवर काही फरक पडत नाही..!*
*लोकांना त्यांच्या व्याधित उपशम हवा असतो. आराम हवा असतो.*
आपले आयुर्वेदिक शास्त्र या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. हरेक प्रकारे आरोग्यदायी आहे. हितकर आहे. पण लोकांना त्याची अजुन सवय लागलेली नाही.
सर्वत्र फिरून सर्वात शेवटी Report च्या file चा गठ्ठा घेवुन लोक आपल्याकड़े येतात. चमत्काराची आपेक्षा करतात. आणि चमत्कार अनुभवतात ही…!
*आज आयुर्वेदाची ही चांगली सवय लोकांना लावनं गरजेचे आहे. आपले शास्र लोकांमध्ये रुजवने गरजेचे आहे. आपला आयुर्वेद लोकांच्या “अंगवळणी ” पाडनं गरजेच आहे.*
आयुर्वेद विकासासाठी आणि प्रगतीसाठी एक *पंचसुत्री* आपण सर्व वैद्यांनी अवलंबन आज नितांत गरजेची आहे. ती मी आज इथे मांडत आहे।।
*1)”सर्वात पहिलं म्हणजे आपण B.A.M.S. वैद्य आहोत.” याचा आभिमान बाळगायला शिका.*
*जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्राचा आणि जगातील सर्वात कठीण शैक्षणिक कोर्स पैकी एक असा, B.A.M.S. हा जागतिक मान्यता असलेला डिग्री कौर्स आहे.*
अशी मान्यता कुठल्याही इतर वैद्यक शास्त्राच्या डिग्री कोर्सला नाही.
हे असं असताना *आपना सीना 56 इंच का होनी चाहिए।।*
*उर भरुन यायला पाहिजे आपलं….!*
पण जेव्हा थोबाडावर लाचारी दाखवत “BAMS झालय…!” असं ही नविन पोरं सांगतात, तेव्हा तळपायाची आग मस्तकी जाते..!
याचं कारण दुसरं काहीही नसून आपल आज्ञान आहे. या आज्ञानातून आपण वेळीच बाहेर पडलं पाहिजे.
*आभिमानाने सांगीतल पाहिजे, मी BAMS डॉक्टर आहे..! वैद्य आहे..!! जगातील सर्वात प्राचीन – अनादी – अनंत आशा आयुर्वेद शास्त्राचा ज्ञाता आहे. उपासक आहे…!!आणि हा आभिमान चेहऱ्यावर झळकलाही पाहिजे.*
मग बघा, कशी रांग लागते तुमच्याकड़े..!!
*2)संशोधनाचा चष्मा घालून स्वत:वर आणि आयुर्वेदावर पूर्ण विश्वास ठेवून वाट्टेल ते कष्ट करायची आपली तयारी असली पाहिजे.*
लोकांना शास्त्र माहित नसतं, ते तुमचा आत्मविश्वास पहात असतात. तुमच्या आत्मविश्वासावरून तुमच्या शास्त्राची परीक्षा करत असतात.
*आत्मविश्वास येण्यासाठी आपल्या शास्त्राचे सखोल आध्ययन खुप महत्वाचे आहे.कर्माभ्यास महत्वाचा आहे. यासाठी आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे.*
फ़ॉर्मूला प्रैक्टिस आयुर्वेदात चालत नाही. दोषदुष्य समुर्च्छना – संप्राप्ति भंग या गोष्टी महत्वाच्या असतात. चिकित्सेमागचा विचार महत्वाचा आहे. आणि तो आध्ययना शिवाय येत नाही. यासाठी उठता बसता आयुर्वेद दिसला पाहिजे.
आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे,
*आयुर्वेदातील मूल सिध्दांत आधुनिक विज्ञानाच्या Parameters वर मोजण्याइतपत हे आधुनिक शास्त्र आजुनही प्रगत झालेले नाही..!* ही खरी गोष्ट आहे।।
आयुर्वेदात आपण मुख्यतः Quality पाहतो आणि आधुनिक शास्त्रात ज्यास्तिकरून Quantity मोजण्यावर भर असतो।।
त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आधुनिक शास्त्राच्या कसोट्या आपण आज तरी लावू शकत नाही।।
परंतु जागतिक स्तरावर आयुर्वेदाला सिद्ध करायचं असेल तर आधुनिक जगाला मान्य असलेल्या कसोट्या वापरूनच आज तरी सिद्ध करावं लागते आहे।। आणि त्यासाठी त्यांना Data लागतो।।
ती गोळा करायची पद्धतीचे सखोल ज्ञान नसल्याने आम्ही केलेली संशोधने आज फोल ठरवली जात आहेत।।
म्हणून तर भयंकर सारखे किडे वळवळ करत आहेत।।
त्यामुळे नाण्याची दुसरी बाजू विचारात घेऊन आपण कामाला लागन्याची गरज आहे।। सखोल संशोधन करण्याची गरज आहे।। आयुर्वेदिक प्रमाणाच्या पद्धतीने संशोधनाच्या पद्धती व Parameter यावर अभ्यास होण्याची खुप गरज आहे।।
*आयुर्वेदिक मुल सिद्धांतावर पूर्णत: विश्वास ठेवून कामाला लागल पाहिजे.* यश तुमच्याकड़े धावत येइल.
*3)इतर वैद्यांना नावे ठेवणे बंद करा.*
*आपल्या भागातील इतर वैद्यांना आपला स्पर्धक समजुन त्याची जमेल तेव्हा खेचनं..!* हे बंद केले पाहिजे.
कारण, आपण एकमेकांना खेचत नसून आयुर्वेदाला खाली खेचत आहोत, ही गोष्ट ध्यानात घ्या.
कारण, जेव्हा एखाद्या रुग्नाला मॉडर्न मेडिसिनने Result येत नाही, किंवा डॉक्टरांकडून गुण येत नाही, तेव्हा तो रुग्न Docter बदलतो, पैथी नाही..!
कारण त्याचा त्या प्याथीवर तेवढा विश्वास आहे.
अन जेव्हा एखादया आपल्या आयुर्वेदिक वैद्याकडून निदान होत नाही, व्याधिला उपशम मिळत नाही, तेव्हा तो रुग्न आयुर्वेदाला नावे ठेवत प्याथी बदलतो. वैद्य नाही.
हे आजचे वास्तव आहे.
कारण जनमाणसात आयुर्वेदाबद्दल तेवढा विश्ववास आजुन आलेला नाही.
याचाच अर्थ असा होतो की, *आपला प्रत्येक वैद्य जगासमोर आयुर्वेद प्रेजेंट करतोय. तो चुकला तर आयुर्वेद चुकीचा ठरवला जातोय.*
म्हणजे,
*मोठे होण्यासाठी आयुर्वेद मोठा होणं गरजेचं आहे..!*
एकमेकांची खेचून कोणी मोठं होत नाही.
एकमेकांच्या चूका पाठीशी घालून त्याला त्याच्या चूका लक्षात आणून द्यायला हव्या. एकमेंकांचे आज्ञान दूर करून आयुर्वेदाला पुढं नेणें आजची गरज आहे.
*एकमेकां सहाय्य करू। अवघे धरु सुपंथ।।*
हे आपलं ब्रिदवाक्य असलं पाहिजे.
पण हां, येथे पाठीशी घालणे याचा अर्थ असा होत नाही की, चुकीच्या पद्धतीने Practice करणाऱ्यालाही पाठीशी घालावे…!
नाहीतर *पाच दिवसात पाच कर्म* करणारे नमुनेही आहेत आपल्याकड़े…!
यांना वेळीच लगाम घालणेही तितकेच गरजेचे आहे.
त्यासाठी *सर्ववैद्यांना एकत्र बांधणारी देशपातळीवरचे कार्यक्षम व मजबूत संघटन आणणं आज नितांत गरजेचं आहे।।*
*4)स्वत: चे अनुभव – ज्ञान इतर वैद्यांना द्यायला शिका.*
*आधुनिक वैदकाची व त्यांच्या परंपरेची एक प्रशंसनीय बाब म्हणजे आपल्या जवळचे ज्ञान आपल्या बरोबरच्याला देणे.*
आधुनिक वैद्यकाचे Case Discussion चे Group पाहिले की लक्षात येतं की ज्ञानाची – अनुभवाची किती देवान- घेवाण करतात हे लोक.
आपण B.A.M.S.लोक जरी यांच्या पदरी *सरदारकी* करत असलो, तरी *आपल्याला हाताला धरून हे लोक शिकवता.*
पण तेच आपल्य आयुर्वेदात *आपलं ठेवायचं झाकून, अन दुसऱ्याचं पहायचं वाकून..!* ही म्हण जशीच्या तशी लागु पड़ते.
विचार करा, *जर आपल्या चरक – सुश्रुत – वाग्भट आदि आचार्यांचा ग्रंथरूपी ज्ञानाचा खजिना आपल्यासाठी उपलब्ध केलाच नसता तर…?*
खूपच अवघड झालं असतं…!!
आपल्या अनुभवांची एकमेकांत देवान घेवान होणं गरजेच आहे.
संभाषा विधिचे महत्व ओळखून वेळोवेळी वेगवेगळया विषयावर सखोल चर्चासत्रे होणं गरजेची आहेत.
सध्या अशा चर्चेसाठी *Whats up, Webinar, Facebook Live, Youtube ही प्रभावी माध्यमं बनली आहे*, ही खुपच समाधानाची बाब आहे.
ज्ञानाची देवाणघेवाण ही खुप मस्त होते आहे।।
*5)आयुर्वेदाचा प्रसार* –
आजच्या घडीला आयुर्वेदिक चिकित्सेबरोबर खरा आयुर्वेद लोकांपुढं आणणं हे आपल्या प्रत्येकाचे कर्त्तव्य आहे.
*केरळीन मसाज सेंटर मध्ये दाखवला जाणारा आयुर्वेद म्हणजे आयुर्वेद नव्हे….!*
किंवा *रस्त्याकडेचे तंबू म्हणजे आयुर्वेद नव्हे…!*
*दाढ़ीवाले बाबा म्हणजे आयुर्वेद नव्हे…!*
किंवा *TV वर दिसणाऱ्या “पोट करी टका-टक च्या गोळ्या” म्हणजे आयुर्वेद नव्हे…!”*
हे लोकांना समजणे गरजेचे आहे.
आज *जेष्ठ वैद्यांबरोबरच खुप मोठी युवावैद्यांची टीम Social Media च्या सहाय्याने अस्सल आयुर्वेद जनमाणसार रुजवत आहे. या सारखी दूसरी गौरवाची बाब नाही.*
*अहं भाव, हेवे-देवे बाजूला ठेवून हे कार्य असच उत्साहाने चालू राहिलं पाहिजे.*
सगळ्यात महत्वाचं,
*इतर लोकांच्या “चाकऱ्या करणं”अन त्यांना “मोठं करणं” सोडा आता…! चाकऱ्याकरून इतर शास्त्रं मोठी करण्यापेक्षा स्वशास्त्राची आयुर्वेदाची विस्तृत चिकित्सालयं स्थापन करणं आजच्या विस्कळीत आरोग्य व्यवस्थेसाठी गरजेचे आहे*.
आम्ही लहान असताना, आमच्या आजोबा बरोबर गावच्या बाजारात भाजी विकायल जायचो, तेव्हा आमचे आजोबा आम्हाला “ताजी भाजी – हिरवी भाजी” म्हणून ओरडायलाही सांगायचे..!
पुढं एक मोलाची गोष्टही सांगायचे,
*”बोलणाऱ्याची माती ही खपते, अन न बोलनाऱ्याचं सोनं सुद्धा खपत नाही”*
आज आपल्याला खरा आयुर्वेद लोकांना समजेल-उमजेल अशा भाषेत जगासमोर मांडण गरजेच आहे.
आजच्या घडीला आयुर्वेदाला *”अच्छे दिन येतील”* अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पण या वेळी जर आपण वैद्यलोक स्वत: मध्ये बदल न करता प्रवाहाच्या दिशेने गेलो नाही, तर पुढे खुप कठीण परस्थिति उत्पन्न होऊ शकते. म्हणून आपण हे बदलकरून घेणं, आणि प्रत्येक वैद्याने संशोधक बनणं आजची खरी गरज आहे.
*बुडत असताना सावरणं…! त्या मानाने सोपं असतं, पण सावरत असताना जर बुडाय लागलो, तर वाचणं फारच कठीण असतं…!!* म्हणून आत्ताच आयुर्वेदासाठी झटनं गरजेच आहे.
*आपल्याला आपला आयुर्वेद जनमाणसात एवढा रुजवायचा आहे की, समाजातील सर्वात दुर्बल घटकापासून ते गजश्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्वांनी साध्या सर्दी – खोकला ते ह्रदरोग – कैन्सर सारख्या भयानक आजारासाठी आयुर्वेद अवलंबला पाहिजे.* हे ध्येय ठेवून आपण प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे…!
– *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, रामकृष्ण मंगल कार्यालया जवळ, दापोडी – पिंपळे गुरव रोड, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Contact no 9665010500*
*Ayurved Consultant & Assistant Professor in Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*