Description
स्पिरुलीना
(निळे-हिरवे शेवाळ)
स्पिरुलीना हे एक निसर्गाने मानवाला दिलेले वरदानच आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये बदलत
चाललेल्या लोकांच्या खाण्याच्या सवई, बदलती जीवनशैली, वाढलेले प्रदूषण यामुळे विविध
आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होत आहे. अशा
वैविध्यपुर्ण परिस्थितीमध्ये स्पिरुलीना निश्चितच वरदान ठरणार आहे. स्पिरुलीनामध्ये पृथ्वीवर
आढळणाऱ्या सर्व वनस्पती, प्राण्यांपेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने आहेत. याचबरोबर शरीरवाढीसाठी
आवश्यक असणारी बहुतेक सर्व जीवनसत्वे, खनिजे यांचे भरपूर प्रमाण आहे. यामुळे एक परिपूर्ण
पौष्टिक अन्न म्हणून स्पिरुलीनाचा वापर होतो. त्याचबरोबर स्पिरुलीनामध्ये अनेक औषधी गुणधर्म
आहेत. तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. भाजीपाल्यातील अन्लाघटकांबरोबर
स्पिरुलीनाची तुलना केल्यास असे दिसून येते की 1000 किलो विविध प्रकारच्या भाजीपाल्यातील
अन्नघटक मिळवण्यासाठी केवळ 1 किलो स्पिरुलीनाचा वापर करावा लागेल.
स्पिरुलीनाचे पौष्टिक मूल्य
1.मांस, मासे, अंडी यापेक्षा 300% अधिक प्रथिने (प्रोटीन)
2.पालकपेक्षा 5000% अधिक लोह
3.गाजरापेक्षा 1000% व पपईपेक्षा 2000% अधिक बीटा कॅरोटीन
4.दुधापेक्षा 500% अधिक कॅल्शियम
* स्पिरुलीनाचे औषधी गुणधर्म *
- शरीरात असणाऱ्या फ्री-रॅडीकल्समुळे मधुमेह, संधिवात, शरीराची झीज,
मोतीबिंदू, कॅन्सर यासारखे विविध आजार होतात. स्पिरुलीनामध्ये
असणाऱ्या अँटीबायोटीक्स क्षमतेमुळे हे फ्री-रॅडीकल्स नष्ट/साफ केले
जातात. स्पिरुलीनाच्या नियमित वापरामुळे वरील आजार होण्यास प्रतिबंध
होतो.
- स्पिरुलीनामध्ये असणाऱ्या बीटा-कॅरोटीनमुळे शरीरातील रोगप्रतिकारक
शक्ती वाढते. तसेच डोळ्यांच्या विविध आजारास प्रतिबंध होतो. विशेषतः
मोतीबिंदू, रातांधळेपणा यासारखे डोळ्यांचे आजार कमी होतात.
- रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
आईच्या दुधाव्यतिरिक्त स्पिरुलीना ही एकमेव वनस्पती आहे की ज्यामध्ये
गॅमालिनोलीनीक आम्ल आहे. त्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी
साठण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण योग्य
राखले जाते.
- स्पिरुलीनामध्ये सर्वाधिक लोहाचे प्रमाण आहे. लोहाच्या कमतरतेमुळे
प्रामुख्याने गरोदर स्त्रिया, लहान मुले यांच्यामध्ये अॅनिमीया होतो.
स्पिरुलीनाच्या वापरामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढून या आजारास
प्रतिबंध होतो.
- शरीरावरील जखमा लवकर भरून येतात तसेच त्वचेवरील व्रण, डाग यांची
तीव्रता कमी होते.
- स्पिरुलीनामध्ये सुपर ऑक्साईड डीस्मूटेस (SOD) हा घटक आहे. यामुळे
त्वचेवरील सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबविला जातो. म्हणचेच
चिरतारुण्य टिकविले जाते.
- स्पिरुलीनाच्या वापरामुळे विषाणूंचे संवर्धन, पुनरूत्पादन थांबविले जाते.
यामुळे विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध करणे शक्य होईल.
- कॅन्सर या रोगावर प्रतिबंधात्मक म्हणून स्पिरुलीनाचा आहारात वापर होतो.
- शरीर काटक ठेवणे तसेच वजन कमी करण्यासाठी वापर.
- अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हटले आहे की स्पिरुलीनामध्ये
असलेले सल्फोलिपीड हे एड्स विषाणूच्या वाढीवर कार्यक्षम ठरू शकतात.
- नेहमीच्या स्पिरुलीनाच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- स्वादुपिंडाचे, फुफ्फुसाचे रोग, हृदयरोग या रोगावर औषधी उपयोग,
स्पिरुलीनाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. १00% शाकाहारी. १00% नैसर्गिक
स्पिरुलीना हे कोलेस्टेरॉल विरहीत आहे.
डोस :
प्रौढ: 1 किंवा 2 गोळ्या जेवणाच्या 1 तास आधी
व
लहान मुले: 1 गोळी जेवणाच्या 1 तास आधी
Reviews
There are no reviews yet.