वैद्यासमुहो निःसंशयकारणाम् ..!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved)
Mob No. 9665010500
आयुर्वेद हे स्वतः एक स्वयंसिद्ध आहे. तो सिद्ध करण्यासाठी कुठल्या टेकणाची गरज नाही.
तसेच तो पुर्णच्या पुर्ण समजुन घेणं ही एकट्या दुकट्याच काम नाही..!
आयुर्वेदाचे ज्ञान हे अनंत आहे। अपार आहे।।
काही ग्रंथातुन मिळतं….!
काही गुरूंकडुन…..!
तर खुप सारं अनुभवानं मिळतं…!
चिंतन – मनन – सतत अभ्यास करून मिळतं..!
अध्यात्माच्या साथीनं मिळतं ।।
..
.
तरीही पुर्ण ज्ञान मिळवण्यासाठी
*’हा जन्म अपुरा…!’*
आयुर्वेदाच ज्ञान कस आहे, याचं एक साधसोपं उदाहरण सांगतो,
काही आंधळे लोक असतात,
.
त्या सर्वांना सांगितलं जातं की तुमच्या पुढे एक हत्ती आहे,
स्पर्शाने हत्ती ओळखा आणि वर्णन करा।।
सर्वजण पुढे येऊन स्पर्श करतात,
– कुणाला शेपटीचा स्पर्श लागतो,
कुणाला सोंडेचा …!
कुणाला पाय लागतो,
तर कुणाला पोट…!
जो तो त्या त्या प्रमाणे वर्णन करतो….,
कुणी म्हणे,
हत्ती सोंडे सारखा लांब आहे…
कुणी म्हणे शेपटी सारखा छोटा….
कुणी म्हणे पायासारखा गोल आणि लांब…!
कुणी म्हणे, पोटा सारखा सपाट गोल…!
आपापल्या अल्पाधिक बुद्धीने आणि कमजोरीमुळे कुणीच पूर्ण हत्ती जाणून घेऊ शकत नाही.
ज्याला जसा स्पर्श लागला तसा तो हत्तीला समजतो…!
तर काही जण आपल्याला समजलेला हत्ती पूर्ण समजला याही अहंभावत असतात।
आपला आयुर्वेद हि असाच अथांग अनंत आहे…..,
.
.
प्रत्यक्षम अल्पम् । अप्रत्यक्षम बहुलम् ।।
या सूत्रानुसार आहे.
एक दोघांच्या हाती नाही लागत तो…
.
त्यामुळं सर्वांना आयुर्वेद वेगवेगळा समजतोय…,
.
.
वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळा दिसतोय…,
कुणाला अग्नी दिसतो…!
कुणाला आम…!
कुणी ‘जठराग्नी देवो भवत..!’ म्हणतं, तर कुणी धात्वाग्नी – पांचभौतिक अग्नीपर्यंत विचार करेल।
कुणाला बिघडलेले दोष दिसतात,
कुणाला धातूंची क्षय – वृद्धी…!
तर कुणाला अवरोधित मला…!
कुणाला शरीर प्रकृती …!
तर कुणाला मानस प्रकृती…!
कुणी नाडीपरिक्षेवर भर देतं…,
तर कुणी मलपरिक्षेवर…!
कुणी हेतूवर…!
कुणाला संप्राप्ती भेदनासाठी शोधन उत्तम वाटते…!
तर कुणाचा शमनावर भर…!
कुणाची अर्धी चिकित्सा बस्ती आहे…!
तर कुणाची रक्तमोक्षम…!
कुणाला काष्ट औषधीवर विश्वास तर कुणास रस औषधीवर…!
तर कुणी आहारा – विहारावर भर देतं.!
अल्पबुद्धीवंतांसाठी ‘अष्टांगहृदय’ पुरेसे।।
अन बुद्धिवंतांसाठी अथांग सागर आहे ग्रंथ संपत्तीचा।।।
सर्व बाजूने आयुर्वेदच ।।।।
प्रत्येकाला समजलेला आयुर्वेद वेगळा।।
प्रत्येकाची आयुर्वेद समजून घेण्याची पद्धत वेगळी।।।।
“वैद्यासमुहोनिःसंशयकारणाम्।।”
हे सुत्र आपल्याला आयुर्वेद ज्ञानार्जनात मोलाचे आहे.
मी म्हणेल तोच ।। अन मला समजला तोच ।।
किंवा याला हेच त्याला फक्त तेच ।।
असे नही हो माझ्या आयुर्वेदात।।
एकाच आजाराला, एकाच लक्षणाला बघायचे निरनिराळे View आहेत।।
तो आजार होण्याचे हेतु जसे अनेक
तसे संप्राप्ती भंगाचे मार्गही अनेक।।
कुणी हेतुनिग्रह करुन संप्राप्ती फोडेल,
तर कुणी आहाराला औषध स्वरूप देऊन..!
कुणी औषधीने संप्राप्ती भेद करेल तर कुणी पंचकर्माने…!
अपना अपना $tyle होता हे…!!!
वैद्य समूहांमध्ये होणाऱ्या या संभाषाच भविष्यातील आयुर्वेदाचे जागतिक स्वरूप ठरवतिल।।।
जय चरक । जय आयुर्वेद।।।
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved)
Mob No. 9665010500
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved)
Mob No. 9665010500
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Book Suvarnbinduprashan Appointment