Blog

तुम्ही पंचकर्म करण्याचा विचार करत आहात?

तुम्ही पंचकर्म करण्याचा विचार करत आहात?

Ayurveda Health Group - Join Free

पण पंचकर्म म्हणजे नेमकं काय? पंचकर्मामध्ये कोणकोणते उपचार असतात? आणि आपल्याला नेमका कोणता उपचार करायचा आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?

चला, आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

*1. पंचकर्म म्हणजे काय?*

आयुर्वेदामध्ये पंचकर्म ही शरीरशुद्धी आणि दोषांच्या व्यवस्थापनासाठी सांगितलेली एक महत्त्वाची चिकित्सापद्धती आहे.

पंचकर्मामध्ये पाच प्रमुख कर्मांचा समावेश होतो.

1. वमन
2. विरेचन
3. बस्ती
4. नस्य
5. रक्तमोक्षण

याशिवाय आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे विशेष उपचार आहेत.

*2. पंचकर्माशिवाय इतर कोणते उपचार असतात?*

पंचकर्म केंद्रामध्ये रुग्णाच्या गरजेनुसार अनेक प्रकारच्या उपचारपद्धती वापरल्या जातात.
शिरोधारा
जानुबस्ती
कटिबस्ती
ग्रीवाबस्ती
हृदबस्ती
अभ्यंग
स्वेदन
उद्वर्तन
षष्टिक शाली
पिंड स्वेद
पत्र पोट्टली
नेत्र तर्पण इत्यादी.

मात्र यातील प्रत्येक उपचार प्रत्येक रुग्णासाठी आवश्यक असतोच असे नाही. प्रत्येक रुग्णाच्या शरीराच्या आणि आजाराच्या स्थिती नुसार उपचार ठरवले जातात.

*3. कोणते पंचकर्म करायचे हे कसे ठरते?*

आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात.
काही रुग्णांमध्ये वातदोष वाढलेला असतो, काहींमध्ये पित्त किंवा कफ दोष वाढलेला असतो, तर काही रुग्णांमध्ये दोन किंवा तीन दोषांचा सहभाग असू शकतो.

त्यामुळे डॉक्टर सर्वप्रथम तुमची प्रकृती, विकृती, वय, अग्निबल, शारीरिक क्षमता, आजाराची अवस्था आणि इतर वैद्यकीय बाबी तपासतात.
त्यानंतर तुमच्यासाठी योग्य उपचारपद्धती निश्चित केली जाते.

Ayurveda Health Group - Join Free

*4. पंचकर्म करण्यामागे तीन प्रमुख उद्देश*

*पहिला उद्देश – आजारावर उपचार (रोगचिकित्सा)*

जर तुम्हाला सांधेदुखी, पाठदुखी, पचनाचे विकार किंवा इतर काही त्रास असेल, तर त्यामागील दोष आणि आजाराची अवस्था लक्षात घेऊन योग्य पंचकर्म किंवा इतर आयुर्वेदिक उपचार निवडले जातात.

*दुसरा उद्देश – स्वास्थ्य संरक्षण (स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्)*

आपण आपली गाडी व्यवस्थित चालण्यासाठी वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो.गाडी बंद पडायची वाट पाहत नाही.

अगदी तसेच…
शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी… योग्य आहार, दिनचर्या, ऋतुचर्या आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक पंचकर्म उपचार केले जातात आणि आयुष्य व तारुण्य टिकवण्यासाठी च्यवनप्राश सारखी रसायन औषधी उपचार दिले जातात.

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे…. Immunity चांगली रहावी..आणि व्याधी होऊच नये यासाठी उपाय योजना केल्या जातात. यात आहार, जीवनशैली ( ऋतुचर्या, दिनचर्या), वार्षिक पंचकर्म उपचार, रसायन औषधी, मानसिक व अध्यात्मिक प्रगती या विषयक सल्ला आदींचा समावेश असतो.

*तिसरा उद्देश – विश्रांती आणि आरोग्य संवर्धन (Wellness & Relaxation)*

दैनंदिन धावपळ, मानसिक ताण आणि शारीरिक थकवा यामुळे शरीराला विश्रांतीची गरज भासते.

अशावेळी अभ्यंग, शिरोधारा, स्नेहन आणि स्वेदन यांसारख्या योग्य उपचारांचा उपयोग विश्रांती आणि आरोग्य संवर्धनासाठी होऊ शकतो.

यामध्ये weekend program येतो… जसे की आठवड्यातून… पंधरा दिवसातून … महिन्यातून… या उपचारांचे शेड्युल केले जाते.

*5. पंचकर्माचा खर्च किती असतो?*

पंचकर्माचा खर्च प्रत्येक रुग्णासाठी सारखा नसतो.
कारण प्रत्येकाची प्रकृती, आजार, उपचारांची आवश्यकता आणि उपचारांचा कालावधी वेगवेगळा असतो.

उदाहरणार्थ, वातप्रधान रुग्णासाठी वापरली जाणारी औषधी तेले आणि पित्तप्रधान रुग्णासाठी वापरली जाणारी औषधी तेले वेगवेगळी असू शकतात.
त्यामुळे उपचारानुसार औषधे आणि एकूण खर्चामध्ये फरक पडू शकतो.

*6. आमचा सल्ला काय आहे?*

आमचा तुम्हाला एकच सल्ला आहे.
*पंचकर्म करण्यापूर्वी स्वतःहून कोणतीही ट्रीटमेंट निवडू नका.*

सर्वप्रथम एकदा आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला / consultation घ्या.

तुमची प्रकृती, विकृती, आरोग्याची सद्यस्थिती,तुमच्या शरीराचा इतिहास, तुमची जीवनशैली – चांगल्या वाईट सवयी आदी गोष्टी डिटेल तपासल्यानंतर

तुमच्यासाठी कोणते पंचकर्म उपचार योग्य आहेत?

किती दिवस करायचे आहेत? आणि त्यासाठी किती खर्च येईल ?

तुम्हाला पंचकर्म उपचारा शिवाय आहार – जीवनशैली यातील कोणत्या गोष्टी मध्ये बदल करायचा आहे?

पुढे औषधी उपचार घ्यायचे गरज आहे का ? याची माहिती तुम्हाला आमच्या आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांद्वारे दिली जाईल.

त्यानंतर तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता.

*Aaptashri Ayurved & Panchakarma Clinic,Pimple Saudagar, Pune 411027*

*Contact 9665010500/ 7387793189*

योग्य निदान, योग्य उपचार आणि वैयक्तिक आरोग्य नियोजन.

Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!