Title Image

Blog

Viral Infection पासून वाचण्यासाठी।।।।

Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

Ayurveda Health Group - Join Free

काळजी घ्या।।।कोरोना व्हायरस आपला विस्तार पुन्हा वाढवतोय।।

कुठल्याही Virus विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच काम करत असते।। शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने बनवलेले AntiBodis त्या Virus चा नाश करतात।। आणि मग त्या Viral Infection पासून आपली सुटका होते।।
यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असणं गरजेचं आहे।।

आजच्या स्थितीला भरपूर प्रमाणात वापरली जाणारी अँटिबायोटिक्स(Antibiotics -Antivirus/Antibacterial/Antifangal etc medicine) ही औषधं शरीरात जाऊन, शरीराला इन्फेक्ट केलेल्या व्हायरस, Bacteria शी डायरेक्ट लढतात. त्या व्हायरस बॅक्टेरीचा नाश करून त्या इन्फेक्शन पासून आपली सुटका करतात।।

त्यांच्या या लढाईत शरीरातील अवयवांच्या चांगल्या पेशींनाही काही प्रमाणात इजा होते।। या अँटिबायोटिक औषधी व शरीराला Infection केलेले बायोटिक्स यांच्यातल्या युद्धात, आपलं शरीर हे महाभारतातील कुरुक्षेत्राच्या रणभूमीसारखं असतं।। त्याचा त्या युद्धात विशेष असा हातभार पडत नाही।।

यामुळे यात पुढे जाऊन भविष्यात पुन्हा व्हायरस Bacteria चा संसर्ग झाला, तर त्या वेळी शरीर अँटिबायोटिक्स औषधींवर विसंबून राहू लागतं।। असाच अँटिबायोटिक्सचा मारा शरीरावर पुन्हा पुन्हा होत राहिला तर शरीर स्वतः व्याधींशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती गमावून बसतं।। त्या इन्फेक्शनशी लढण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या अँटिबायोटिक्सची वाट पाहात बसतं।।

मग औषधाशिवाय बरंच वाटतं नाही ।। अशी स्थिती येते।। जर वेळी हाय्यर हाय्यर अँटीबीओटिक्स वापरावे लागतात।।

आयुर्वेद चिकित्सा घेतल्यावर मात्र अशी स्थिती येत नाही।।

कारण, आयुर्वेदिक शास्त्रोक्त चिकित्सा पद्धतीने, आजाराची संप्राप्ती भेदनारे घेतलेले औषध उपचार हे आपल्या शरीरालाच (रोगप्रतिकारक शक्तीला) त्या व्हायरस – बॅक्टेरीया विरुद्ध लढण्यास सक्षम करत असतात।। शरीराला औषधींवर अवलंबून ठेवत नाहीत।।

शास्त्रोक्त आयुर्वेदीय उपचार शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीला एवढे स्ट्रॉग करतात की, पुढच्या वेळी जेव्हा संसर्ग होतो तेव्हा शरीरस्वतःहुनच त्याचा प्रतिकार करते ।।

शास्त्रोक्त व तज्ञ वैद्याकडून घेतलेले आयुर्वेदिक उपचार हे आजाराच्या मुळावर घात करणारे असतात।। शरीराच्या व्याधीक्षमत्वाला बळ देणारे असतात।।।

वेगवेगळ्या आजारातून, अन कोरोना – निपाह – स्वाईन फ्लू – बर्ड फ्लू असल्या हल्ल्यातून वाचन्यासाठी, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असणं अत्यंत गरजेचं असतं।। म्हणून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील याकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे।।

मग ही रोगप्रतिकारक शक्ती किंवा व्याधीक्षमत्व येतं कशाने ….? ते आता पाहूया…

रोगप्रतिकारक शक्ती ही प्रोटीनचे डबे – काजूबदाम – वाटीने तुप खाऊन – घशाला येई पर्यंत जेवणकरून – तासंतास जिम करून किंवा ह्याचा पाला – त्याचा पाला – लिंबूपाणी – ह्याचं मूत्र – त्याचं मूत्र पिऊन येत नसते।।

तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असण्यासाठी शरीरातील वात – पित्त – कफ हे दोष सम मात्रेत म्हणजे योग्य प्रमाणात असावे लागतात।। (कमी किंवा ज्यास्त असून चालत नाही) तेव्हा शरीरात उत्तम व्याधीक्षमत्व निर्माण होऊ लागतं।

Ayurveda Health Group - Join Free

सोबतच शरीराचं Functional Unit असणाऱ्या वेगवेगळ्या Cells आणि पर्यायानं आमच्या आयुर्वेदात वर्णलेले रस – रक्त – मांस – मेद – अस्थी – मज्जा – शुक्र हे सप्तधातु सदृढ असणं गरजेचं असतं।। शरीरातल्या चयापचयक्रियेत उत्पन्न होणारे पुरीष (संडास), मुत्र , स्वेद (घाम) आदी मल व्यवस्थित उत्पन्न होऊन त्यांचा निचरा प्रमाणबद्ध होणं गरजेचं असतं।। तरच शरीरात रोगप्रतिकारक शक्ती उत्पन्न होत असते।।

Immunity Booster चहा – कॉफी – टूथपेस्ट – साबण – हँडवॉश हे व्यापारी धंदे आहेत ।। त्याला बळी नाही पडायचं।। त्यासाठी सर्वात महत्वाचे असते शरीराची पचन शक्ती उत्तम असणे।। शरीराच्या पाचकाग्निने उत्तम प्रकारे अन्नाचे पचन करणे महत्वाचे असते।।

पचन चांगले आहे का तपासण्याच्या काही Qualitative आयुर्वेदिक परीक्षा आहेत…

जसं की,

– योग्यवेळेवर कडकडून तहान – भूक लागणं।।

– रात्री व्यवस्थित झोप लागणं ।।

– पोटसाफ झाल्याचं समाधान होणं ।। मल – मूत्राची प्राकृत शुद्धी होणं।। मलाला सामतायुक्त दौर्गंध्य नसणं।।

– जिभेचा प्राकृत गुलाबी वर्ण असणं।। जिभेला पांढरा थर नसणं।। मुखदौर्गंध्य नसणं ।।

– स्वतःच शरीर स्वतःला जड न वाटणं।। उत्साही असणं।। इत्यादी।।

हे सारं होण्यासाठी आवश्यक असतं,

दिनचर्या – ऋतूचर्या – आचाररसायन या स्वस्थवृत्ताचे पालन करणं।। आणि त्याबरोबर आहार – निद्रा – ब्रम्हचर्य या आरोग्याच्या त्रयोपस्तंभाचे रक्षण करणं।।।

आहार – निद्रा – ब्रम्हचर्य हे स्तंभ एवढे महत्वाचे आहेत की, यातला एक जरी स्तंभ कोलमाडला तर अक्खा शरीरमहाल ढासळून जातो।।

शरीराला तसंच पौष्टीक अन्न द्या।। रसायनांच्या खते – फवारणीच्या टेकून वाढलेलं अन्न देण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं अन्न देण्याकडे भर द्या।।

NICU मध्ये वाढवलेल्या बाळाप्रमाणे  वाढवलेलं, हरितगृहातलं अन्नधान्य पोषण देऊ शकतं पण रोगप्रतिकार करण्याची ताकत देण्यास खुपच कमी पडते।।। कारण ते धान्य वाढत असताना,पक्व होत असताना, त्याला कुठल्याच व्याधींचा रोगप्रतिकार करावा लागलेला नसतो।। त्यामुळे त्यांच्यात तसे व्याधीक्षमत्व निर्माण झालेले नसतं।।

“आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येणार?”  या न्यायाने, ते अन्न खाऊन आपल्याला रोगप्रतिकारत्व कसं मिळणार??

बर्गर पिझ्झा अन कुरकुरे वेफर्स वर पोषण होत नाही ।। बॉयलरची हाडं मांस चघळून आपली हाडं-मांस मजबूत होत नाहीत अन दही न बनवता,न घुसळता मशीनवर फॅट वेगळं करून बनवलेलं घी आमच्या शरीरात पचत नाही, ते नुसतं कोलेस्टेरॉल वाढवतं ।

असल्या चुकीच्या अन्नपदार्थ खाण्याने अन चुकीच्या खाण्याच्या पद्धतीने शरीरातल्या धातूंचे (पेशींचे)पोषन व्यवस्थित होत नाही।। आणि त्यामुळे व्याधींशी लढण्यास ते सक्षम नाहीत होत।।

तुम्ही जसं खाल, तसं तुमचं शरीर बनतं।

म्हणून उत्तम गुणवत्तेचं पौष्ठीक अन्न खाणं – व्यवस्थित पद्धतीनं खाणं अन खाल्लेलं व्यवस्थित पाचन होणे अतिशय महत्वाचे असते।।

आहार हेच महाऔषध आहे।। त्याचे सेवन करताना विचारपूर्वक व विधिपूर्वक करणे गरजेचे आहे।।

त्यानंतर विचार येतो निद्रेचा व ब्रह्मचर्यचा…!

“अर्धरोगहरी निद्रा । सर्वरोगहरी क्षुधा ।।”

असं वचन आहे आयुर्वेदात।। या वचनानुसार योग्य मात्रेत व योग्य पद्धतीने घेतलेली, रात्रीची निद्रा निश्चीतच आरोग्यप्राप्ती करून देते।।

रस – रक्त – मांस – मेद – अस्थी – मज्जा – शुक्र या सप्तधातुतला सर्वात शेवटचा धातू – शुक्र – ज्याला आपन “आहाराचा परम धाम” असंही म्हणतो ! तो उत्तम असणं हे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असण्यासाठी गरजेचा असतो।।

या शुक्रधातुपासूनच दोन गोष्टी उत्पन्न होतात… एक म्हणजे आपलं बीज उत्पन्न होतं ।। स्त्रियांमध्ये स्त्रीबीज – पुरुषांमध्ये पुरुषबीज।।।

दुसरं उत्पन्न होतं ते म्हणजे ” ओज “

या ओजावरच आपलं आयुष्य – आरोग्य – धी – धृती – स्मृती – कांती – तेज अवलंबून असतं ।। आपल्या शरीराचं निरोगत्व अवलंबून असतं ।।म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते।।

मनुष्य जर अधिक व्यवायी – कामुक असेल – काम वासनेच्या अधिन असेल – तर त्याचं शुक्र हे बीज / विर्याच्या मार्गे नाश होतं राहतं।। त्यामुळे ओजाची निर्मिती खुंटते।। व पुढे जाऊन आयु – आरोग्य – स्मृती – कांती यांचा नाश होऊ लागतो।।।

त्यासाठी ब्रह्मचर्या पालन महत्वाचे आहे ।। परंतु इथे पुर्णत: ब्रम्हचर्या पालन अपेक्षित नसून, विवाहाच्यानंतर स्वपत्नीशी ऋतुकाळा सोडून(मासिक पाळीचा काळ सोडून),पौर्णिमा – आमावस्या सोडून, शितऋतूत (थंडीत) आठवड्यातुन 2 वेळा , उन्हाळ्यात महिन्यातून एक वेळा, तर पावसाळ्या मध्ये 2 ते 3 आठवड्यातून एक वेळा शुक्रवर्धक आहार व औषध सेवन करून संतती प्राप्ती व रती सुखासाठी मैथुन करू शकता।।

याबद्दल सविस्तर माहिती देत राहिनच,
*तूर्तास सध्याच्या वाढत्या कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी विशेष खबरदारी घ्या।।*

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोना – निपाह – वेगवेगळे फ्लू यांना घाबरायची आजिबात गरज नाही।।

म्हणून,

आहार – विहार – निद्रा – व्यायाम – ब्रह्मचर्या – ऋतूचर्या – दिनचर्या यांचे पालन करून रोगप्रतिकारक शक्ती सांभाळा।। आपल्या तक्रारी व प्रकृतीनुसार वर्षातुन एकदा वमन-विरेचन-बस्ती पैकी एखाद्य दुसरं पंचकर्म शरीर शुद्धीसाठी आवर्जून करून घ्या।

वैद्यांच्या सल्ल्याने, रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी एखादं रसायन औषध नियमित सेवणात ठेवा।।

लहान मुलांना आहाराच्या चांगल्या सवयी लावावा।। त्यांच्यातील जंतांसाठी – कफाच्या तक्रारीसाठी आयुर्वेद तज्ञ वैद्यकडून वेळोवेळी आयुर्वेदिक औषधी द्या।। सुवर्णबिंदूप्राशन औषधी नियमित द्या।।

घरात बनवलेलंच सकस अन्न खा।।
शुद्ध साजूक तुप, सैंधव मीठ,सुंठ,आलं, जिरे, ओवा, वेलची, हळद,बडीशेप, मनुका, डाळिंब, आवळा, खजूर,अंजीर यांचा आवर्जून वापर करा।।

फळे भाज्या मिठाच्या पाण्यांत स्वच्छ धुवून मग वापरायला घ्या।। ताजीच वापरा।।

शिळं – आंबलेलं खाऊ नका।
मैदा – रवा – पाव – ब्रेड – बर्गर -बाहेरचं उघड्यावरचं काहीही खाऊ नका।।

अन त्या रोगाट, हार्मोन्सची Injection देऊन पोसलेल्या बॉयलरचं चिकन-अंडी, साठवणुकीचे मासे, शिळं मांस खाणं पुर्णपणे टाळा।।

पाणी उकळून गार करून प्या।।उकळवताना त्यात थोडेसे सुंठ -धणे टाका।। साधारण लिटरला अर्धा चमचा (सुंठ – धणे दोन्ही मिळून अर्धा चमचा)।।एकदा उकळलेले पाणी आठ तासांनंतर वापरू नका।।

घरात निर्गुंडी कडुनिंबाची पाने – वावडिंग – वेखंड- जिरे – ओवा – कापूर – तीळ – तांदूळ – शेणाची शेणी यापैकी उपलब्ध असेल त्या द्रव्यांनी सकाळ – संध्याकाळ किंवा किमान दिवसातून एकावेळी तरी धुपन करा।। त्यासाठी धुपनी शोधायची गरज नाही, गॅसवर तव्यात ठेऊन गॅस चालू करा, होईल धूप आपोआप।।*

संसर्गासाठी खालिल वर्णलेली विशेष कारण आहेत….

प्रसंगात् गात्र संस्पर्शान्िश्वासात्सहभाजनम्। सहशरुया सताच्चापि वस्त्रमाल्यानुलेपनम्।

मुष्ठं ज्वरस्य शोश्रि नेत्राभिष्यन्द एवं च। औपसर्गिक रोगाश्च संक्रामन्ति नरान्तरम्॥

– सुश्रुत कुष्ठ निदान

अर्थात्

मैथुन, अंगस्पर्श, निःश्वास, सहभोजन, एकत्र शयन किंवा बसणे, एकमेकांचे वस्त्र – माला (दागिणे – अलंकार आदी) परिधान करणे यांनी कुष्ठ, ज्वर, शोथ, नेत्राभिष्यंद आणि औपसर्गिक साथीचे रोग मनुष्याकडून मनुष्याकडे संक्रमित होतात, प्रसारीत होतात.

ही विशेष काळजी आपण घेणे गरजेचे आहे।।

“लस टोचून घेतली म्हणजे आपण सुटलो” या भ्रमात राहू नका।।।

डेल्टा – गॅमा असले व्हेरियंट येतच राहनार आहेत…. कोरोनाशिवाय स्वाइन फ्लू – निपाह आजून काय काय येतच राहणार आहे… हे आपल्या डोक्यात राहू द्या।।

गर्दीत सार्वजनिक ठिकाणी जाणं – प्रवास करणं टाळा।। सार्वजनिक वस्तुंना स्पर्श करणं टाळा।। बाहेर जाताना मास्क आदी संरक्षण करणाऱ्या गोष्टी वापरा।।

बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घ्या।। वेळोवेळी कपडे बदला।। हात धुण्यासाठी योग्य ते साबण – हँडवॉश वापरा।। टॉलेट बाथरूम मध्ये डांबरगोळ्या ठेवा।।स्वच्छता ठेवा।।
कोरडे अन मोकळं वातावरण ठेवा।।

घराच्या आजूबाजूला तुळस – पुदिना – आजमोदा(ओवा)- वेखंड यासारख्या जंतुघ्न वनस्पती कुंड्यात लावून ठेवा।।

झाडे लावायला आणखी जागा असेलच तर शोभेची झाडं लावण्यापेक्षा तुळस -निर्गुंडी – कडुनिंब – महानिंब अशी वातावरण शुद्ध करणारी झाडे लावा।।

जर वर्षीप्रमाणे सध्याच्या ऋतुबदलामुळे  सर्दी – खोकल्याची साथ काहीप्रमाणात सर्वत्र आहेच।। त्याचा उगाच बाऊ न करता, न घाबरता तसेच निष्काळजीही न राहता वेळेत तज्ञ आयुर्वेद वैद्याकडे जाऊन औषध घ्या।।

।। लक्षणं जाणवु लागल्यानंतरच्या पहिल्या 3 ते 4 दिवसाच्या आत, आयुर्वेद तज्ञाकडून घेतलेली आयुर्वेद औषधी तुम्हाला ओटू (O2) – व्हेंटि – बायपॅपकडे जाऊ देत नाहीत ।। – हे पक्कं ध्यानात घ्या ।।।

–    Dr Saurabh B. Kadam

M.D.(Ayurved), Pune

     

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व  Blog ला जरूर भेट द्या…

https://shriayurvedic.in



Click here for sharing blog link on your social media

Comments

  • July 10, 2021
    reply
    मीनाक्षी पाटील

    खूपच माहितीपूर्ण लेख !

  • July 16, 2021
    reply
    Yogesh Joshi Charak Pharma

    Very Nice & Precise Information.

  • Ayurveda Health Group - Join Free

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!