Blog

।। ओळख आयुर्वेदोक्त पंचकर्माची ।।
भाग 2

Dr Saurabh B. Kadam M. D. (Ayurved)

Ayurveda Health Group - Join Free

पंचकर्म म्हणजे मालिश अन वाफ देऊन घाम काढणे नव्हे।।

लोक यालाच पंचकर्म समजतात अन स्पा शी तुलना करतात।।

ही तर आयुर्वेदोक्त पंचकर्माच्या आधी करावयाची पुर्वकर्मे आहेत।।। पण ही पूर्वकर्मेही आयुर्वेदोक्त पंचकर्मात विशिष्ट प्रकारे केली जातात।।

याला आम्ही बाह्यस्नेहन आणि स्वेदन असं म्हणतो।।

बाह्यस्नेहन म्हणजे शरीराला विशिष्ट प्रकारे संहनन करत शरीरात तेल (स्नेह) जिरवणे.
पण ही रगडी मालिश नव्हे।। जी पहीलवानाची केली जाते ।। किंवा,
त्या 2 – 3 महिन्याच्या बाळाला रडवत घरातल्या नेंन्त्या बायका घसा घसा चोळतात।  ते पण मान्य नाही आयुर्वेदाला।।।

बाळानं कसं आनंद घेतला पाहिजे त्या स्नेहनाचा।।। बाळ मालिश करताना रडलं नाही पाहिजे।।।
तशी मालिश, ते स्नेहन मान्य आहे आयुर्वेदाला।।। मोठ्यात ही तेच।।।

अतिश्रम – धावपळ – कोरडेपणा यांकारणानी वाढलेल्या वातामुळे शरीराला आलेला थकवा दुर होऊन शरीराला हलकेपणा येतो। प्रसन्नता- उत्साह येतो।।

आणि त्यानंतर शरीरातून घाम (स्वेद) येण्यासाठी व्याधी व शरीर अवस्था यानुसार वेगवेगळ्या पद्धती अवलंबविल्या जातात।।

विविध औषधी काढयांची वाफ देऊन, कधी वाळूचा शेक देऊन तर कधी काढण्यात शिजवलेला गरम गरम भाताचा शेक देऊन घाम काढला जातो।।

विविध वनस्पतींची पाने घेऊन गरम करून पत्रपोटटली केली जाते।।

जसं एखादी शस्त्रक्रिया करण्याआधी आपण रक्ताच्या तपासण्या – X Ray – सोनोग्राफी – CT/MRI करतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपाशी ठेवतो, इतर काही औषधी देतो वगैरे जी पूर्वतयारी करतो, अगदी तशीच पुर्वतयारी या स्नेहन स्वेदनाने पंचकर्मा पूर्वी केली जाते।।।

शरीराला पंचकर्माद्वारे शुद्ध होण्यासाठी तयार करण्याचे काम या स्नेहन स्वेदनाने होते।।

  कच्च्या फळातून रस काढण्याचा प्रयत्न केल्यावर जस ते फळ पण मिळत नाही आणि चांगला रस पण मिळत नाही त्या प्रमाणे ही पूर्वकर्मे न करता केलेल्या पंचकर्मामुळे शरीरातीला अपाय तर होतोच पण शरीरशुद्धी ही होत नाही।

त्यामुळे स्नेहन स्वेदन या पूर्वकर्माना पंचकर्मात विशेष महत्व आहे।।

म्हणून पूर्वकर्मे न करता ढाळ होण्याची, उलटी होण्याची औषधं जे रस्त्यावरचे भोंदू देतात त्यांच्या पासून जरा दूर रहा।।

Ayurveda Health Group - Join Free

तर पंचकर्म म्हणजे पाच कर्मे, ज्यांच्याद्वारे शरीराची शुद्धी केली जाते।।।
शरीरात साचलेले मल, आजाराचे कारण असलेले बिघडलेले दोष युक्तीने शरीरा बाहेर काढले जातात।।

जशी आपण 2-3 महिन्यातून आपल्या दुचाकी – चारचाकी गाडीची सर्व्हिसिंग करतो ना अगदी तशीच।।।

पंच (पाच) कर्मे कुठली??

वमन-विरेचन-बस्ती-रक्तमोक्षण-शिरोविरेचन हीच ती पाच कर्मे, ज्याच्याद्वारे शरीरातील वाढलेले दोष जे आजार निर्मितीला मदत करतात, ते सहजतेने शरीराबाहेर काढतो।।

मग ही पाचही कर्मे प्रत्येकावर करायची का??? तर नाही..!

त्या त्या व्यक्तीची असलेली प्रकृती – त्यांच्यामध्ये विकृत झालेले दोष – व्यक्तीला असलेले व्याधी- त्या व्याधींची अवस्था -व्यक्तीचे वय, शरीर बल व अग्नी – काळ- देश आदींचा विचार करून ठरवले जाते की,
या व्यक्तीला कोणते पंचकर्म करायचे?
पाच पैकी कुठले कुठले करायचे???
एक करायचे की दोन की पाचही।।।
कुठले नाही करावयाचे???

पंचकर्म योग्य कोण?अयोग्य कोण??
हे सारं वैद्याला ठरवावं लागतं।।।

म्हणून, डॉक्टर माझं हे हे पंचकर्म करा! असं न सांगता, डॉक्टर माझ्या प्रकृतीला योग्य पंचकर्म कोणतं? आणि मी कुठलं पंचकर्म करावं? असा सल्ला आपल्या आयुर्वेद डॉक्टरांकडून घ्या..!! तशी शुद्धी करून घ्या।।

पुढे पाचही पंचकर्माबद्दल सविस्तर पुढे पाहूच आपण..!

(भाग 2 क्रमश: )

–  *Dr Saurabh B. Kadam*
     *M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*

*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*

 

 

 

 

Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!