।। शतधौत घृत ।।
शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात घोटून घोटून धुतलेले देशी गाईचे तुप।।
तांब्याचा संस्कार यावर होत असतो।।
एवढा संस्करण होतं की हे तुप आहे हे ओळखताच येत नाही।।
3 ते 4 आठवडे लागतात पूर्ण औषध बनायला ।।
यंत्रावरही बनलं जातं, परंतु समांतर वेगानं फिरत राहिल्याने उत्पन्न झालेल्या उष्णतेने याचे गुण फारच कमी होतात।।
शिवाय तांबे धातूची भांडी असणं ही मुख्य बाब असते।।
त्यासाठी यंत्रात तांब्याची भांडी करावी लागतात।
त्यामुळे हाताने तांब्याची परात व तांब्याचा तांब्या यांनी पाण्यामध्ये साजूक गाईचे तुपघोटून बनवनं अधिक उत्तम असते।।
ते गुणांनीही अधिक उत्कृष्ठ असतं।। जादू सारखे result दिसतात।।
थंडीत चांगल्या प्रकारे बनतं ।। हा अनुभव आहे।।
जळलेलं – पोळलेलं, त्याच्या जखमा, त्वचा कोरडी पडणे, रुक्षतेन फाटनं, उलनं, ओठ फुटणे
फिशर,
आग पडणे/दाह होणं, जळजळणे
यासाठी मलमा सारखं लावलं जातं ।।
मोठं औषध आहे हे।।
मूळव्याधीचा मलम पण याच्यापासून बनवला जातो।।
तसेच न भरणाऱ्या जुनाट जखमांसाठी मलम ही बनतो।।
अस्सल देशी गाईचे घृत शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन घोटून घोटून धुतले जाते।।
म्हणून याला “शतधौत घृत” असे म्हणतात।।
जय आयुर्वेद..!!!
*Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking