Hybridization (Hybrid Food) is Couse Of Cancer…!
* हायब्रीडायझेशन अन महाप्रलय *
*”शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।”*
बीज उत्तम दर्जाचे असेल तर येणारा वृक्ष ही उत्तम असेल।। त्याची फळे ही रसाळ असतील ।
*संस्कार – पोषण आदी महत्वाचे पण त्याही आधी शुद्ध बीज महत्वाचे।* सुसंस्कृत कर्तृत्ववाण आई बापाचा पोरगा, त्यांच्या संस्कारात छत्रछाये खाली सुसंस्कृत कर्तृत्ववानच होणारच।।
*उत्तम पोषित झालेला, उत्तम वाढलेला वृक्षच योग्य ऋतु काळात उत्तम बीज निर्मिती करू शकतो।* हा सृष्टीचा साधा सोपा नियम आहे ।।
.
सध्या आपलं पोषण करतं कोण हो?
आपण खातो काय ???
तर *हरितक्रांतीच देणं ।। हायब्रीड अन्न…! संकरित जर्शीच दूध।।। अन चाळीस दिवसाची कोंबडी।।।*
प्रत्येक ठिकाणी हायब्रीडायझेशन झालं आहे आज ।। फळं – भाज्या – धान्य…!
एवढं काय दुग्धजन्य प्राण्यात पण संकर करून आपण दुधा-मांसाच उत्पन्न वाढवलं आहे।।
या हायब्रीड खाण्यानं आज आपण मनुष्याचे बीजही दुषित होतं चाललं आहे।।
जरा विचार करा..,
*आजची ही हायब्रीड जमात,त्यांच्या बी पासुन नवीन रोप तयार करण्यास ही सक्षम नसते।।*
खोटं वाटत असेल, तर बाजारातल्या हायब्रीड कलिंगड्याची बीया लावुन बघा।।
किती रोपं येतात.. किती टिकतात ..अन टिकलीच तर टिकलेली कसली फळं देतात हेही बघा ।।।
यांना यांची उत्पत्ती नाही सांभाळता येत ।। ही आमची काय सांभाळणार।।।
हायब्रीडायझेशन मध्ये आपण करतो काय???
– झाडाचा आकार (size) कमी करतो अन फळाचा आकार वाढवतो।।।
फळांची संख्या वाढवतो।।
Quality कमी करून Quantity वाढवतो…!
– झाडाच्या पूर्ण वाढीकडे लक्ष न देता फक्त त्याच्या फलोत्पादन वाढीचा विकास अधिक करतो।।
म्हणजे 4 वर्षांनी फळं देणारा हापूस पाहिल्याचं वर्षी मोहोर देतो।।।
जेव्हा त्याला त्या फळाचं ओझं ही झेपावत नसतं।।।
आम्ही नुसतेच म्हणतो बाल विवाह नको ।। वय वर्ष 18 ते 21 नंतर विवाह योग्य।।
पण आपण जी हायब्रीड फळे अन्न धान्य आदी आहार खातो त्यांचा परिणाम म्हणून मुलं मुली फार लौकर वयात येत आहेत।।
मुलींमध्ये वयाच्या नवव्या वर्षीच मासिक धर्म सुरू होत आहे।।
सामान्य विशेष न्यायानुसार,
*समानाने समानाची वृद्धी होते।।*
जसे आपण खाऊ तसे आपण बनु।।
या न्यायाने,
*शरीर पक्व होण्या आधी फळे देणाऱ्या वृक्षाची फळे खाऊन बनलेली मनुष्य शरीरे वेळे आधीच गर्भधारणे योग्य होत आहेत।।।*
अप्रत्येक्षपणे आपण त्यांची फक्त प्रजनन क्षमता फार विकसित करत आहोत.
शारीरिक भार थोड्या युक्तीने आपण टाळू शकतो पण,
*”कसा झेपतील हो हा मानसिक भार या नाजूक कळ्या???”*
विचार करा, इतक्या कमी वयात या अपक्व मनात कित्ती कल्ला माजत असेल।।
मग हा भार सोसता सोसता आमच्या आयुष्यारेषा ही खालावत चालल्या आहेत।।
नवव्या वर्षी जवानी ।। अन पस्तीस चाळीशीत म्हातारपण।। अन 55-60च्या पुढंच आयुष्य म्हणजे बोनस Life।।
हार्मोन्स वर वाढवलेलं दुध अन मांस खाऊन आमच्यात किती हार्मोन्स बिघडलेत हे वेगळं सांगायची गरज नाही।।
हे आमच्या Lab Test च्या फायली दाखवत असतात।।
TFT- T3, T4, TSH
FSH
LH
ACTH
आदी ढिगभर आहेत….,
आज पुरुषांमध्ये दिसणारा Gynecomastia (म्हणजे पुरुषांच्या स्तनाची रचना स्त्री स्तनांप्रमाणे होणे) हे या हार्मोन्स युक्त दुधा – मांसाचीच देणगी आहे।
स्त्री मध्ये वाढलेलं PCOD चं प्रमाण।।
हे ही याचंच एक उदाहरण।।
पशुपक्षांच्या शरीरावर तर हायब्रीड अन्नधान्याचा परिणाम केव्हांचाच दिसु लागला आहे।
हायब्रीड धान्य खाऊन पक्षांच्या अंड्याची कवच अतिशय पातळ तयार होत आहे।। त्यामुळे अंडी पूर्ण उबण्यापूर्वीच तडकतात। अकाली जन्म झालेल्या या पिल्लाला N. I. C. U. नाही हो मिळत….! आणि ती दगावतात.
यानेच पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे।।।
पण आम्हाला कुठं त्यांच पडलंय???
आजकाल वाढलेल्या सिझेरियन सेक्शन(L.S.C.S.) चं देखील हेच कारण आहे. ते गर्भात वाढलेलं बाळ स्वतः हुन बाहेर येण्यास अन त्या आईचं गर्भाशय त्या गर्भाला बाहेरची वाट देण्यास असक्षम बनत चालंल आहे।।
त्यामुळं सातव्या आठव्यातच सिझर करावं लागतंय।।
हायब्रीड करताना आजून काय करतो आपण…?
*नुसती वाढ करतो।।*
जी प्रमाणबद्ध नसते।।
वाकडी- तिकडी , उभी – आडवी।।
नुसती वाढ।।
पण ही वाढ विकृत दिसते।।।
जुडवा केळी- मक्याच्या दाण्यावर दाणा वाढलेलं कणीस- धब्बू मिरचीच्या आकाराचे टोमॅटो – लांबसडक वांगी,गाजर आदी
आता Cancer म्हणजे काय ते पाहू???
*Normal cell division (mitosis) in our body is a highly regulated mechanism, controlled by genes (made up of DNA) through growth regulatory pathways. A prolonged exposure to carcinogens damages the DNA and induces mutations in growth regulatory genes including oncogenes and tumour suppressor genes and pathways leading to loss of control over normal cell division. The mutated cells go haywire and proliferate indiscriminately (pathological mitosis), usually forming a mass, known as a neoplasm or a malignant tumour or in simple words, a CANCER.*
बरं अजुन एक सोप्पी व्याख्या….
*Uncontrolled, Abnormal and Irregular Growth of Cells in the Body is called CANCER.*
आपल्या हायब्रीडायझेशन च ध्येय काय??
तर फक्त वाढ।।।
उत्पन्नात वाढ।।
वजनात वाढ।।
Quantity मध्ये वाढ।।
मग यासाठी आपण त्या वनस्पतीच्या पेशींच्या DNA च्या मुळ रचनेतच बदल घडवतो।।
या केलेल्या बदलातून निर्माण झालेल्या हायब्रीड अन्न – धान्य – फल यावर पोसलेल्या जिवांमध्ये, त्यांच्यातल्या पेशीमध्ये (cells मध्ये) ही हा बदल होऊ लागतो।। त्यांची वाढ ही झपाट्याने होऊ लागते।।
आणि मग हा
*”वाढता वाढता वाढे, भेदीले मनुष्य जिवना।।।।”*
अशी गोष्ट होऊन बसली आहे।।
हे हायब्रीड अन्नच Cancer च मुळ कारण आहे।।
तंबाखु – गुटखा – धूम्रपान – Radiation आदी कारणे ही फक्त as a stimulation किंवा Irritant आहेत।
शुद्ध भाषेत बोलायचं झालं तर,
*” हे सर्व निमित्त मात्र आहेत”*
जे एखाद्या पेशीला छेडून तिला Irregular – Abnormal – Uncantrolled वाढ होण्यास प्रवृत्त करतात।।
Cancer चे मुळ कारण तर हायब्रीड अन्नच आहे।। याच्या सेवनाने पुढील काही दशकात cancer का सामान्य होऊन जाणार।।
आणखी एक गोष्ट म्हणजे या हायब्रीड जमाती रासायनिक खते अन रासायनिक किटकनाशके यांशिवाय वाढत ही नाहीत व्यवस्थित।।।
जसं N.I.C.U. मध्ये काचेच्या पेटित एखादं बाळ जगवल जातं।।
तसं जपावं लागतं यांना।।
आणि आपण ही त्या झाडाला/पिकाला स्वतः हुन वाढायच चान्सच देत नाही।।
साधं गावखत, सेंद्रिय खत यातून अन्न शोधण्याचे कष्ट देखील आपण पिकाच्या/ झाडाच्या मुळाला होऊ देत नाही।।
सगळं एकदम रेडीमेड त्याच्या मुळाशी आणून ठेवतो।।
युरिया – फॉस्फेट – नत्र
10:26:26
18:46
0:0:52
0:0:61
34:0:52
कृषिधन
महाधन
किसान
अजून काय काय।।..!
हे खा अन फुग।।। असच।।
प्रोटीन पावडर वर वाढलेल्या बॉडीबिल्डर प्रमाणे वाढवतो आपण त्याला।।
*फक्त प्रदर्शन ।। आणि उपयोगापेक्षा अपायच अधिक।।।*
*” वृक्ष ज्या तत्वावर पोसला जातो, ती तत्वेच त्या वृक्षापासून मिळणाऱ्या फलाच्या सार भागात असणारच…!”*
अतिउत्पन्न घेण्यासाठी केलेले Hybridization असो,
भरमसाठ दिलेली रासायनिक खते असोत।।
किंवा गाई म्हशीला दुधवाढीसाठी दिलेले oxitocin चे injection असो।।
नाहीतर बॉयलर कोंबडीला वजन वाढीसाठी दिलेली विविध हार्मोन्सची injection असोत।।
त्या फलात येणारच।।।।
ते फल खाणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावेच लागणार।।
आणि त्याचा दुष्परिणाम खुप भयावह आहे।। हेच पुढे जीवसृष्टीच्या नाशाचे कारण आहे।।
ही हरितक्रांती – दुग्धक्रांती वरदानापेक्षा शापच ठरत आहे।।
कारण त्याचे परिणाम आज जगासमोर दिसत आहेत।।
वाढलेलं आजार, नवनवीन रोग, दवाखान्यात दिसणारी भरपूर गर्दी, दररोज येणारी नवनवीन औषधी – लसीकरण – तपासण्या यामुळे ही आरोग्य मिळेना झालंय।।
पूर्ण बरं करणं सोडा आटोक्यात पण राहिना झालंय।।
हरितक्रांती – दुग्धक्रांतीने पोटात काहीतरी जाऊन *भुक जरी भागत असली तरी तृप्ती काही अजुन मिळाली नाही।।।*
अन हीच अतृप्ती आजार निर्माण करत आहे।।।
सृष्टी उत्पत्ती पासून आजवर आलेल्या असंख्य महामारी व रोगराईला तोंड देत स्वतः च अस्तित्व टिकवून ठेवलेल्या देशी वाणावर भर देणे आज अत्यंत गरजेचे आहे।
– देशी वाण शरीराची बांधणी उत्तम करण्यास सर्वोत्तम आहेत।
– देशी वाण हे निसर्गातील बदलाला तोंड देऊन सक्षम पणे वाढलेले असतात।
– देशी वाण स्वतः च्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यावरच फल धारणा करतात।
– परिपक्व अशा शरीराने केलेल्या फल धारणेतून मिळणारे फल हे परिपक्वच मिळते।।तशीच परिपक्व ताकत ते आपल्या शारीराला देतात। पर्यायाने आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्यास मदत करतात।।
म्हणून या देशी वाणाचे रक्षण करणे। त्यांची जपवणुक करणे।। त्यांचाच अवलंब करणे ही काळाची नितांत गरज आहे।।
पण या देशी वाणाची किंमतच नाही कळत आपल्याला।।
म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना मी नेहमी सांगत असतो,
“तुम्ही बाजारात काहीही विका।। पण घरात देशी पद्धतीने पिकवलेला देशी वानच खावा।।”
डेरीला जर्शी च दूध विका, पण घरासाठी पांढरी खिलारच।।
अन गावच्या जत्रेत लाल तुर्याचा देशी कोंबडाच।।।
बॉयलर आजिबात नाही।।।
ना अंडे ना तिचे Injection वर फुगलेले मांस।।।
आपण म्हणाल असं का ???
असे चुकीचे सल्ले लोकांना का देता।।
कारण *या लुकलुकत्या जगाला किंमत नाही करता येत हो आपल्या देशी वाणाची..!*
मातीमोलाने देशी वाण बाजारात विकत घेतला जातो।।। तो विक्रीसाठी पिकवल्यास काहीही केल्या, कसाच परवडत नाही शेतकऱ्याला।।
देशी वाणाकडे
*”सवतीच्या लेकराकडे बघितल्यागत नजर टाकली जाते हो बाजारात…!”*
भाव पाडून माल मागितला जातो…!
काळ्या मनुक्या निकृष्ट म्हणून बेदाणे मार्केटला सौदयात सर्वात स्वस्त खरेदी होते आमच्या कडून ।।
अगदी 20-30रुपये किलो पासून 100पर्यंत ।।
अन मार्केट मध्ये लोहयुक्त म्हणून 300- 400रु किलोने विक्री होते।।
*”या देशी वाणाचं मोल अन त्याची चव खाणाऱ्यालाच कळणार।।।”*
या कलियुगात कुठला प्रलय फिलय नाही येणार।।। ना कुठलं तिसरं महायुद्ध होऊन पृथ्वीचा नाश होणार आहे।।
तर या *मनुष्याच्याच विपरीत अन लोभी बुद्धीने काढलेला हा हायब्रीड शोध त्याच्या सकट इतर प्राण्यांच्या बिजाचीही वाट लावणार आहे।। अन आशा निकृष्ट बिजा पासुन निर्माण होणारी “बांडगुळे” या पृथ्वीतलावर ज्यास्त काळ तग धरण्यास सक्षम नसतील।।*
आज आणि भविष्यातही कोरोना सारख्या महामारी येऊन त्याला सहजासहजी बळी पडतील ही हायब्रीड अन्नावर पोसलेली निपुशी शरीरे..!
*आणि यातुनच जीवसृष्टीचा नाश होणार आहे।।।*
*आणि हाच तो महाप्रलय असेल..!!!*
– Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक
Consultant Ayurveda Speciality Doctor
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
Consultant Ayurveda Speciality Doctor ,
Healvibe Ayurved Kidney Care Unit, Pimpri Pune 411018
Consultant Ayurveda Speciality Doctor,
Moraya Multi Speciality Hospital, Dapodi pune 411012
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking