Blog

Healthy Fast…

“आयुर्वेदानुसार आरोग्यदायी उपवास ”

Ayurveda Health Group - Join Free

Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune

सर्वप्रथम इथं स्पष्ट करतो की,काही लोकांचा उपवास हे विशिष्ठ प्रकारचे व्रत असते। साधना असते ।।आपल्या इष्टदेवतेवरची श्रद्धा – भक्ती असते।। त्यांच्या भावनेचा अन श्रद्धेचा मला खुप आदर आहे ।। मी त्यांच्या व्रताबद्दल इथे बोलत नाही ।।तर मी इथे बोलतोय, “आरोग्यासाठी उपवास चांगला असतो” असं म्हणून, उपवास करणाऱ्यांबद्दल…!उपवास…!”एकादशी अन दुप्पट खाशी” या म्हणी सारखं झालंय बऱ्याच जणांचं।।आम्ही डबल खातो त्या उपवासाच्या दिवशी, ही बऱ्याच अंशी सत्य परिस्थिती आहे….!!साबुदाणा खिचडी- दही – हिरवी मिरची – शेंगदाणा चिक्की – गुळशेंगदाणे लाडू – केळी – वेगवेगळी फळे – दूध – बटाटा वेफर्स – केळी वेफर्स – चिप्स – भगर – साबुदाणा वडे ….अजून चहा … कॉफी.. लस्सी..ताक… मिल्कशेक..!!!खुप मोठी लिस्ट आहे आजच्या उपवासाच्या पदार्थांची ।।आम्ही लहानपणी दही, तळलेली मिरची आणि मस्त शेंगदाणा कुट टाकून केलेली साबुदाण्याची खिचडी खायला मिळतेय, म्हणून उपवास करण्यासाठी हट्ट करून उपवास करायचो।।तीच साबुदाणा खिचडी, आरोग्याला किती घातक आहे हे चांगलं उमगतंय आता..!!!खरं तर, आपण आरोग्यासाठी उपवास करताना, त्याच्या मागचा उद्देशच विसरून जातो। तो लक्षात ठेवून जर आपण उपवास केला, तर तो आरोग्यदायक आहे।। आजारांपासून दुर ठेवणारा आहे।।आयुर्वेद चिकित्सा शास्त्रानुसार, उपवास ही खुप आरोग्यदायी चिकित्सा आहे।। मोठी ट्रीटमेंट आहे।। ज्याला आम्ही लंघन चिकित्सा म्हणतो ।।उपवास कसा असावा?

कायिक – वाचिक – मानसिक विश्रांती देणारा हवा..!! तरच तो आरोग्यदायी आहे।।

कायिक विश्रांती म्हणजे शरीराला विश्रांती देणारा।।।

पचन संस्थेला आराम देणं हा प्रमुख उद्देश उपवासातुन साध्य होण गरजेचं आहे।। यासाठी गरम – गरम अन पचायला हलका असा थोडा थोडा आहार घ्यावा।। जो चांगली कडकडून भुक लागल्यावर घेणं अपेक्षित असतं।।मग त्यात हेच खा – तेच खा अस मी सांगत नाही।। पचनासाठी हलके असे खुप पदार्थ आहेत।। विविध भागानुसार वेगवेगळे आहेत।। त्यानुसार सहज सुद्धा त्यातलं काही कळत नसेल, तर पातेल्यात भरपूर शिजवून केलेलं मुगडाळ वरण व अन पातेल्यात उघड्यावर केलेला भरपूर शिजून मऊ झालेला भात हा सर्वात सोप्पा पदार्थ आहे आरोग्यदायी उपवासासाठी।।।।उघड्या पातेल्यात शिजवलेला, भगर – वरईचा भात ही उत्तम ठरतो।। हलका असतो पचायला।।।उपवासाच्या दिवशी, साधं मीठ न खाता सैंधव मीठ खावं।। तसं ते नेहमीच खाणं अधिक उत्तम ।।। सैंधव मीठ हे रोचक – पाचक असून पोटातला वायूगोळा बाहेर काढणारं आहे।।। नेत्रांसाठी चांगलं आहे।। शरीरात वाढलेल्या दोषांना कमी करणारं आहे।।समुद्राचं मीठ मात्र याच्या उलटं आहे।। त्रिदोष वाढवणारं आहे।। शरीरातला मल शरीरात चिटकवुन ठेवणारे आहे।। आणि आजार वाढवणारं आहे।।। आयुर्वेदानुसार, समुद्राचं मीठ खाणं योग्य नाही।।।त्याच समुद्राच्या मीठावर आजचं रिफाईंड आयोडीन युक्त मीठ तयार केलं जातं।। हे तर, नियमित खाण्यासाठी वर्ज्य अशा तीक्ष्ण क्षाराचे गुणधर्म दाखवते।।आजचं, खुप मोठ्या प्रमाणावर वाढलेले केसांचं पालित्य (पांढरे होणं) हे याच आयोडीन युक्त मीठाची देण असावी असं अनेकदा जाणवतं।।मिरची सारखे तीक्ष्ण व तिखट पदार्थ उपवासाला नसावेत।। त्याजागी अगदी थोडीशी मिरेपूड टाकू शकता आपण।।

उपवासाचा आहार हा सात्विक असावा।। रज – तम गुण वाढवणारा नसावा।। म्हणजे, कांदा – लसूण नसलेला, शुद्ध शाकाहारी असा असावा. तिखट -तीक्ष्ण – उष्ण – गुरू (पचायला जड) नसावा।।

मनुके – डाळिंब – आवळा- अंजीर – खजूर – खारीक – चिकू – सीताफळ – बोरं – संत्रा – मोसंबी आदी सिझनल फळे योग्य प्रमाणात खाऊ शकता ।।।त्याच बरोबर, ताज्या दह्यापासून नुकतंच बनवलेलं ताजे गोडसर ताक ही उपवासासाठी उत्तम।।बनवल्या पासून 4 -5 तासा नंतरचे, शिळ्या -आंबट दह्याचे अन 20 दिवसाची एक्सपायरी असलेले पिशवीतलं ताक महारोगदायी आहे ।। ते घेऊ नका।।।साबुदाणा हा अत्यंत जड व चिकट पदार्थ आहे।। तो आजार निर्मितीस सर्वोतोपरी काम करतो।। बटाटा ही त्याच्याच जवळचा आहे।।। पचायला जड आहे।।रताळे खाऊ शकता पण चांगल्या प्रकारे अग्निसंस्कार झालेले असावेत।।चहा – कॉफी, तो तासाला काळा टी, गोरा टी, हिरवा टी ही भुक मारायची औषधं आहेत सगळी ।। याने शरीराच्या नैसर्गिकरित्या लागणाऱ्या भुकेस बाधा येते।। आणि फुकटचे आजार गोळा होतात।। त्यामुळे उपवासाच्या दिवशी तरी हे टाळा।।उपवासाच्या दिवशी, भूक लागू नये म्हणून जड व भूक मारणारे पदार्थ खाणं हा उपवास नसून रोगउत्पादक हेतू आहे. हे लक्षात घ्या।।गरम पाणी किंवा उकळून गार केलेलं पाणी पिण्यात ठेवा।।इथं पाणीही पचायला हलकं व्हावं या उद्देशाने उष्णतेचा संस्कार करून पाणी पिण्यासाठी वापरलं जातं।।
जसं निखारे पेटवताना, त्यातल्या एखाद्या पेटलेल्या निखाऱ्यावर आपण न पेटलेला निखारा टाऊन हळूहळू फुंकर मारून तो अग्नी पेटवत असतो। अगदी तसंच,
उपवासाच्या दिवशी आपण कडकडून भूक लागल्यावर, आपल्या पाचन शक्तीला पचायला हलके हलके पदार्थ पचवायला देऊन आपला पाचक अग्नी उत्तम करवून घेत असतो।।।
हा उत्तम झालेला पाचक अग्नी आपल्या शरीरातील पचन व्यापार व्यवस्थित करून आरोग्यदायी ठरतो।।
“अर्ध रोगहारी निद्रा।। सर्व रोगहरी क्षुधा ।।” या उक्तीनुसार, आरोग्यप्राप्ती होत असते आपल्याला याने।।उपवासाचा दिवशी कष्टाची – शरीरातून घाम काढणारी कामे करू नका।।शारीरिक – मानसिक ब्रम्हचर्या पालन करा।। जी नेहमीची कमी कष्टाची कामे आहेत, ती ही शांतित आरामशीर करा।।।

पुढची विश्रांती – वाचिक विश्रांती।।

वाचिक म्हणजे वाचेला – आपल्या बोलण्याला विश्रांती द्या।। बोलण्यात खुप शक्ती खर्च होत असते।। म्हणुन उपवासाच्या दिवशी कमीत कमी बोला।। अपशब्द सर्वथा टाळा ।। आपल्या शब्दातली ताकत सांभाळून ठेवा।।तिसरी विश्रांती खुप महत्वाची आहे…

मानसिक विश्रांती..!

मनाला विश्रांती द्या।। ध्यान करणे – नामस्मरण करणे या गोष्टी करा।। मन व बुद्धी यावर ताण येईल अशा सर्व गोष्टी उपवासाच्या दिवशी टाळा।।आजची मनाला विश्रांती देणारी गोष्ट म्हणजे, उपवासाच्या दिवशी TV, सोशल मिडिया आणि मोबाईल पासून दूर राहणं।। या सारखी मानसिक विश्रांती आज नाही।।रोजच्या अपथ्यकर आहाराने – विहाराने शरीरात अर्धवट पचलेल्या आहार व आडून बसलेले मल मोकळं करण्यासाठी असा उपवास खूप उपयोगी आहे।। त्याच बरोबर पाचन शक्तीबरोबर मनालाही विश्रांती ही मिळून जाते यात ।। कडकडून भूक – तहान लागायला लागते।। शरीरातील इतर नैसर्गिक क्रियाही उत्तम व्हायला लागतात।।आठवड्यातून राहिलं, पंधरवाड्यातुन – महिन्यातून एक जरी असा उपवास केला तरीदेखील निश्चितच तो उत्तम प्रकारे आरोग्यदायी असेल ।।।

Dr Shalaka S. Kadam*
B.A.M.S. (आयुर्वेदाचार्य)
आप्तश्री आयुर्वेद, पुणे

Contact details

Aptashri Ayurved & Panchakarma Clinic

Contact : +919665010500 / +917387793189

1st floor, Above SBI ATM, Shivdatta Nagar, Dapodi – Pimple Gurav Road, Pimple Gurav, Pune 411061.

Ayurveda Health Group - Join Free
Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!