Second Wave of Covid 19
दुसरी लाट…!!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
*काळजी घ्या, कोरोना व्हायरस पुन्हा आपला विस्तार वाढवतोय।।*
आधी वाटलं अफवा असेल, परंतु खरंच रुग्णांची संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे।। रोज दोन चार कॉल येत आहे online Consultation साठी।।
कुठल्याही Virus विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच काम करत असते।। शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने बनवलेले AntiBodis त्या Virus चा नाश करतात।। आणि मग त्या Viral Infection पासून आपली सुटका होते।।
यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असणं गरजेचं आहे।।
अँटिबायोटिक्स(Antibiotics) औषधं डायरेक्ट Bacteria शी लढतात, बॅक्टेरीचा खातमा करतात।। त्यांच्या या लढाईत शरीर हे महाभारतातील कुरुक्षेत्राच्या रणभूमीसारखं असतं।।
आणि यात पुढे जाऊन Bacteria च्या हल्यावेळी शरीर अँटिबायोटिक्स औषधींवर विसंबून राहू लागतं।। स्वतः व्याधींशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती गमावून बसतं।।
तर *आयुर्वेदिक शास्त्रोक्त चिकित्सा पद्धतीने घेतलेले औषध उपचार हे आपल्या शरीरालाच (रोगप्रतिकारक शक्तीला) त्या बॅक्टेरीया विरुद्ध लढण्यास सक्षम करत असतात।। शरीराला औषधींवर अवलंबून ठेवत नाहीत।।*
वेगवेगळ्या आजारातून अन कोरोना – निपाह – स्वाईन फ्लू – बर्ड फ्लू असल्या हल्ल्यातून वाचन्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असणं गरजेचं असतं।। म्हणून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे।।
*शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असण्यासाठी शरीराचं Functional Unit असणाऱ्या वेगवेगळ्या Cells आणि पर्यायानं आमच्या आयुर्वेदात वर्णलेले रस – रक्त – मांस – मेद – अस्थी – मज्जा – शुक्र हे सप्तधातु सदृढ असणं गरजेचं आहे।।*
त्यासाठी उत्तम गुणवत्तेचं पौष्ठीक अन्न खाणं – व्यवस्थित पद्धतीनं खाणं अन खाल्लेलं व्यवस्थित पाचन होणे अतिशय महत्वाचे आहे।।
*त्यासाठी शरीराला तसंच पौष्टीक अन्न द्या।। रसायनांच्या खते – फवारणीच्या टेकून वाढलेलं अन्न देण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं अन्न द्या।।*
NICU मध्ये वाढवलेल्या बाळाप्रमाणे वाढवलेलं हरितगृहातलं अन्नधान्य पोषण देऊ शकतं पण रोगप्रतिकार करण्याची ताकत देण्यास खुपच कमी पडते।।।
कारण ते धान्य वाढत असताना,पक्व होत असताना त्याला कुठल्याच व्याधींचा रोगप्रतिकार करावा लागलेला नसतो।।
त्यामुळे त्यांच्यात तशी रोगप्रतिकारक क्षमता नसते।।
“आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येणार?” या न्यायाने, ते अन्न खाऊन आपल्याला रोगप्रतिकारत्व कसं मिळणार??
बर्गर पिझ्झा अन कुरकुरे वेफर्स वर पोषण होत नाही ।। बॉयलरची हाडं मांस चघळून आपली हाडं-मांस मजबूत होत नाहीत अन दही न बनवता,न घुसळता मशीनवर फॅट वेगळं करून बनवलेलं घी आमच्या शरीरात पचत नाही, ते नुसतं कोलेस्टेरॉल वाढवतं ।
असल्या चुकीच्या अन्नपदार्थ खाण्याने अन चुकीच्या खाण्याच्या पद्धतीने शरीरातल्या धातूंचे (पेशींचे)पोषन व्यवस्थित होत नाही।। आणि त्यामुळे व्याधींशी लढण्यास ते सक्षम नाहीत होत।।
*तुम्ही जसं खाल, तसं तुमचं शरीर बनतं।*
*नैसर्गिक रितीने वाढलेलं देशी वानाचं खाल्लं तर तशीच गुणवत्ता असलेलं शरीर बनतं, आणि जर रसायनांच्या खते – फवारण्यावर वाढलेलं अन्न धान्य खाल्ले तर शरीरही तसेच छोट्या छोट्या आजारांना बळी पडणारं, कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेलं रोगट बनतं, सारखं Antibiotics चा अन इतर औषधिंचा टेकू लावावा लागतो।।*
*आहार हेच महाऔषध आहे।। त्याचे सेवन करताना विचारपूर्वक व विधिपूर्वक करणे गरजेचे आहे।।*
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोना – निपाह – वेगवेगळे फ्लू यांना घाबरायची आजिबात गरज नाही।।
म्हणून *आहार – विहार – निद्रा – व्यायाम – ब्रह्मचर्या – ऋतूचर्या – दिनचर्या यांचे पालन करून रोगप्रतिकारक शक्ती सांभाळा।। आपल्या तक्रारी व प्रकृतीनुसार वर्षातुन एकदा वमन-विरेचन-बस्ती पैकी एखाद्य दुसरं पंचकर्म शरीर शुद्धीसाठी आवर्जून करून घ्या।*
याबद्दल सविस्तर माहिती देत राहिनच,
*तूर्तास सध्याच्या कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी विशेष खबरदारी घ्या।।*
*घरात बनवलेलंच सकस अन्न खा।।*
*शुद्ध साजूक तुप, सैंधव मीठ,सुंठ,आलं, जिरे, ओवा, वेलची, हळद,बडीशेप, मनुका, डाळिंब, आवळा, खजूर,अंजीर यांचा आवर्जून वापर करा।।*
*फळे भाज्या मिठाच्या पाण्यांत स्वच्छ धुवून मग वापरायला घ्या।। ताजीच वापरा।।*
*शिळं – आंबलेलं खाऊ नका।*
*मैदा – रवा – पाव – ब्रेड – बर्गर -बाहेरचं उघड्यावरचं काहीही खाऊ नका।।*
*अन त्या रोगाट, हार्मोन्सची Injection देऊन पोसलेल्या बॉयलरचं चिकन-अंडी, साठवणुकीचे मासे, शिळं मांस खाणं पुर्णपणे टाळा।। किंवा संपुर्ण मांसाहारच टाळा, तो बंद केला म्हणून काहीही फरक पडत नाही ।।*
असलं रोगाट मांस खाऊनच एक वर्षापुर्वी चिनीलोक सर्वात ज्यास्त कोरोना ग्रस्त झाले होते।।।
*पाणी उकळून गार करून प्या।।उकळवताना त्यात थोडेसे सुंठ -धणे टाका।। साधारण लिटरला अर्धा चमचा (सुंठ – धणे दोन्ही मिळून अर्धा चमचा)।।*
*एकदा उकळलेले पाणी आठ तासांनंतर वापरू नका।।*
*च्यवनप्राश अवलेहासारखी रसायन औषधी खाण्यात ठेवा।। जी रोगप्रतिकारक शक्ती सशक्त ठेवेल।।।*
* रोगप्रतिकारक शक्तीवर्धक आयुर्वेदिक काढा किमान दिवसातून एकदा तरी घ्या*
*घरात कडुनिंबाची पाने – वावडिंग – वेखंड- जिरे – ओवा – कापूर – शेणाची शेणी यापैकी उपलब्ध असेल त्या द्रव्यांनी सकाळ – संध्याकाळ धुपन करा।। त्यासाठी धुपनी शोधायची गरज नाही, गॅसवर तव्यात ठेऊन गॅस चालू करा, होईल धूप आपोआप।।*
*गर्दीत सार्वजनिक ठिकाणी जाणं – प्रवास करणं टाळा।। सार्वजनिक वस्तुंना स्पर्श करणं टाळा।। बाहेर जाताना मास्क आदी संरक्षण करणाऱ्या गोष्टी वापरा।।*
*बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घ्या।। वेळोवेळी कपडे बदला।। हात धुण्यासाठी योग्य ते साबण – हँडवॉश वापरा।। टॉलेट बाथरूम मध्ये डांबरगोळ्या ठेवा।।स्वच्छता ठेवा।।*
*कोरडे अन मोकळं वातावरण ठेवा।।*
*घराच्या आजूबाजूला तुळस – पुदिना – आजमोदा(ओवा)- वेखंड यासारख्या सुगंधी वनस्पती कुंड्यात लावून ठेवा।।*
झाडे लावायला आणखी जागा असेलच तर शोभेची झाडं लावण्यापेक्षा तुळस -निर्गुंडी – कडुनिंब – महानिंब अशी वातावरण शुद्ध करणारी झाडे लावा।।
*जर वर्षीप्रमाणे सध्याच्या ऋतुबदलामुळे सर्दी – खोकल्याची साथ काहीप्रमाणात सर्वत्र आहेच।। त्याचा उगाच बाऊ न करता, न घाबरता तसेच निष्काळजीही न राहता वेळेत वैद्याकडे जाऊन औषध घ्या।। बरे व्हा।।*
*।। काळजी घ्या ।। या दुसऱ्या लाटेच्या कोरोनालाही लवकरच पळवून लावु।।।*
– *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center,Pimpri – Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Book Suvarnbinduprashan Appointment