Amrutdhara Drops
(अमृतधारा)
(आप्तश्री आयुर्वेद, पुणे येथून आरोग्य सेवा घेणाऱ्या व्यक्तींसाठी औषध विषयक माहितीपर लेख)
हिंदी में जाणकारी:
Amrutdhara (अमृतधारा)
कोविडच्या पहिल्या – दुसऱ्या लाटेत जोरदार बॅटिंग केलेलं आमचं आणि लोकांचंही आवडतं औषध..!
“अमृतधारा”
कोविडचा प्रतिकार करताना रोगप्रतिकारक शक्तिवर्धक “श्वासामृत काढया” बरोबर सर्वत्र अमृतधारा वापरली आम्ही..!
जसा द्वारपाल दरवाज्यावर उभारून राजवाड्याचे रक्षण करतो अगदी तसं हे औषध 1 -2 थेंब मात्रेत मास्कला लावलं की नाका तोंडाद्वारे होणारं Infection थांबवून ठेवते।।
याची मोठी प्रचिती पहिल्या दोन लाटेत आली…
कोविड काळात ज्यांना घराच्या बाहेर पडावं लागत होतं, गर्दीच्या ठिकाणी जावं लागत होतं, गर्दीत काम करावं लागत होतं आशा ज्यांनी अमृतधारा वापरली ते या अमृतधारेला अजिबात विसरले नाहीत।। मोठं जादूचे औषध आहे हे।।
या काळात मोठ मोठ्या कंपनीत काम करणारे भरपूर लोक हे औषध घेऊन जात।। सहकर्मचाऱ्याना पण थेंब – थेंब देत असत।।
Basic information:
हे औषध केवळ बाह्य उपचारासाठी आहे. ( External Use Only).
घटक द्रव्य : निर्गुंडी तेल, ओवा अर्क, भीमसेनी कापूर, तिळतेल, लसूण अर्क इत्यादी 11 घटकद्रव्य.
उपयोग:
– आजच्या महामारीत हवेतून पसरणाऱ्या व्याधींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वोत्तम औषधी असून बाहेर जाताना – गर्दीच्या ठिकाणी वावरताना आपल्या मस्कला बाहेरून दोन थेंब लावुन मास्क घालावा।।
नुकतीच झालेली सर्दी – जुनाट सर्दी – श्वसनाचे विकार यांसाठी पाण्याची वाफ घेत असताना पाण्यात 1 थेंब टाकुन त्याची वाफ घ्यावी।।
तसेच 5 मिनिटं छातीला – कपाळ – मान या ठिकाणी गरम सुती / टर्किशच्या कपड्याचा शेक देऊन त्यानंतर अर्धा वाटी कोमट तीळ तेलात (50ml) अर्धा चमचा सैंधव मीठ व 8 -10 थेंब अमृतधारा टाकून छातीला – पाठीला हलक्या हाताने तेल लावावे।। 15 मिनिटं ठेवून पुन्हा गरम कपड्याने 5 मिनिटं शेक द्यावा।।
(कापडा गरम करण्यासाठी गॅसवर तवा ठेऊन गरम करावा किंवा इस्त्रीचा वापर करूनही गरम करू शकता)
लगेचच कफ मोकळा होऊन श्वासन व्यवस्थित होते.
– डोकेदुखी – सर्दी झाल्यावर कपाळ, मान – घासा या ठिकाणी 3 – 4 थेंब अमृतधारा हलक्या हाताने बाहेरून लावावी.
– दुखणाऱ्या सांध्यांना वाळूचा किंवा गरम कपड्याचा शेक घेऊन त्यानंतर 50ml तीळ तेलात 8 – 10थेंब अमृतधारा मिसळून ते तेल हलक्या हाताने दुखणाऱ्या सांध्यांना लावावे।।
पाठदुखीमध्ये कोमट तेलात मिसळून दुखणाऱ्या जागी हलक्या हाताने लावावे।।
असे हे बहुउपयोगी आयुर्वेदिक औषध नेहमी आपल्या जवळ ठेवावे।।
दक्षता:
1) घरात डोळ्यांचे कानाचे ड्रॉप पासून अमृतधाराची बाटली दूर ठेवणे।।
बऱ्याचदा डोळ्यांचे ड्रॉप समजून चुकून अमृतधारा डोळ्यात सोडल्याचे रुग्ण सांगतात।।
2) लहान मुलांपासून दूर ठेवणे।।
वैद्यांच्या सल्ल्यानेच याचा वापर करणे।। हे औषध बाहेर मार्केट मध्ये मार्केटींगसाठी उपलब्ध नसून, केवळ आप्तश्री आयुर्वेदाच्या रुग्णासाठी आम्ही क्लिनिक मधून देतो।।
– *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune*
*आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Cont no. 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Pingback: Amrutdhara (अमृतधारा) – Aaptshri Ayurveda