जसं खाल… तसे बनाला..!
– Dr Saurabh Kadam, B.A.M.S, M.D.(Ayurveda)
आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही मूलतः आयुर्वेदाच्या पर्यायानं निसर्गाच्या मुल सिद्धांतावर आधारलेली आहे.
असे सिद्धांत की, जे हजारो वर्षांच्या अनुभवातून – अभ्यासातून अन ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनांतून सिद्ध झालेले आहेत। इतके सिद्ध की हे सिद्धांतच अंतिम सत्य आहेत।।।
बाकीच्यांसारखे जर पाच – दहा वर्षाला यांचे Parameter नाहीत बदलत।।।
मागचं संशोधन खोटं होतं – आताचं खरं आहे।। आता हे फॉलो करा।। असे फसवे अन वारंवारचे वटहुकूमही इथं येत नाहीत।।
आयुर्वेदाच्या या मुलसिद्धांतांना आतापर्यंत कुणीच चॅलेंज नाही करू शकलं, एवढे पक्के आहेत हे सिद्धांत।।
या सिद्धांताला धरून केलेली आयुर्वेदाची चिकित्सा कधीच फोल जात नाही।।
आयुर्वेदाच्या मुल सिद्धांतांपैकी एक सिद्धांत,
सामान्य विशेष सिद्धांत…,
सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणम्|
ह्रासहेतुर्विशेषश्च, प्रवृत्तिरुभयस्य तु||
– (च. चि. सु. 1/44)
याचा अर्थ सोप्या भाषेत,
द्रव्य – गुण – कर्म यांनी शरीरभावांशी समानता असलेल्या आहार विहारादीचे आपल्याकडून सेवन झाले तर त्या समान शरीरभावांची शरीरात वाढ होते.
तसेच जर शरीरभावांच्या द्रव्य – गुण – कर्म यांनी विरुद्ध असलेल्या आहार विहारादीचे सेवन झाले तर त्या शरीरभावांचा नाश होतो।।।
उदा. अधिक मांस खाल्लं तर शरीरातील मांस धातूची वाढ होते, तर थंड पदार्थ खाऊन गुणांनी थंड( शीत) असलेला कफ वाढतो, उष्ण खाऊन उष्ण गुणांचे पित्त वाढते, उष्ण उपचारांनी शित गुणात्मक कफ कमी होतो इत्यादी.
संशोधनातून नुसती उत्पन्नात वाढ होणासाठी बनवलेल्या हायब्रीडीकरणातून अन्न धान्यात नुसती वाढ करवतो ।। ती वाढ प्राकृत (Normal) म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार नसते।।
सामान्य विशेष सिद्धांतानुसार, अशी हायब्रीडीकरणातून विकृत वाढवलेली अन्नधान्य फळे भाज्या खाऊन, तशीच विकृत वाढ करण्याची प्रवृत्ती आपल्या शरीरभावात किंवा Cells मध्ये निर्माण होते।। आणि त्या प्रवृत्तीतून झालेल्या विकृत वाढीलाच आपण कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो।।
प्लास्टिक – तंबाखू – गुटखा – दारु आदी कारणं शरिरातील पेशींना Irritate करून Cancerous Growth ला प्रवृत्त करणारि – मदत करणारी आहेत। कॅन्सरच मुळ कारण तर हायब्रीड अन्न धान्यच आहे।।। ।
आपण जेवढं शिळं अन सडकं खाल तशीच निर्मिती आपल्या शरीराची होते।।
रसायनांचं खाल्ले की रसायनं काम करणारच।। जेवढी रसायनं घातक व विषारी तेवढं त्यापासून बनणारे अन्न धान्य घातक व विषारी ।।।
जेवढं ताजं अन नैसर्गिक खाऊ, तेवढं आरोग्यासाठी उत्तम।।।
फ्रीज मध्ये ठेवलं, म्हणून ताजे राहतं असं नाही।। हिरवं राहते पण त्यातील पोषक द्रव्यांची गुणवत्ता मात्र नक्कीच कमी झालेली असते।।।
उलट फ्रीज च्या त्या विषारी वायूंच्या संगतीने त्या पदार्थांची गुणवत्ता चांगलीच ढसाळलेली असते।।
शिळं अन्न म्हणजे नेमकं काय?
सकाळचं संध्याकाळी चालेल, पण संध्याकाळी बनवलेलं सकाळी शिळेच बरं का..!! रात्रीचा भात पण शिळाच।।
एकदा बनवलेलं साधारण 8 ते 10 तासांनी शिळं।।
पाणी सुद्धा ..!!
पिण्यासाठी एकदा उकळून घेतलेलं पाणी 8 ते 10 तासांनी फेकून द्यावं।। पुन्हा वापरू नये।।
दूध तुप सोडलं तर ,
बाकी सारं दुसर्यांदा गरम केलेलं शिळंच।।
म्हणून दुसर्यांदा गरम करून खाऊ नये।।
मग सँडविच बर्गर वगैरे हा मसाला पण शिळाच।। ते बिस्कीट पाव पण शिळेच।।
अष्टांगसंग्रह या आयुर्वेदाच्या आद्य ग्रंथात एक उल्लेख आलाय…
फळांवर विष प्रयोग झाल्यावर फळे लौकर पिकतात….!
म्हणजे, आज फळे पिकवण्यासाठी सारी विषेच वापरली जातात.
पूर्वीच्या लोकांचे शरीर बल उत्तम होतं, पाचन शक्ती उत्तम होती।।कच्च्या दुधापासून फळे कंदमुळे असं काहीही खाऊन पचवण्याची ताकत ठेवत होते।।।
आज आपण खातो हायब्रीड ..!
अन ते शेतात पिकवताना भरभरून रसायनिक खते व किटकनाशके वापर केलेली अन्न धान्ये अन त्यानंतर ते पिकावं – टिकावं म्हणून Preservatives आदी स्वरूपात रसायनांचा वापर केलेलं अन्न।।
एक प्रकारचं विषच।। हे आरोग्यासाठी सर्वथा घातकच ।।।
ते खाऊन आरोग्य कसं लाभणार।।
एका आजाराला दुसऱ्या आजाराचं टेकन लागून महारोग बनणार।।
ही गोळी थायरॉइड ची ।।
ही बी पी ची।
ही साखरेची , ही कॅल्शिअम अन मल्टि व्हिटॅमिन ची।।
अशी अवस्था आजच्या चाळिशितल्या तरुणांची।।
तरुण नुसतं म्हणायला।। लक्षणं सगळी साठीच्या पुढंचीच ।।
आपलं हे *देखण्या अन चमक दाखवणाऱ्या पदार्थांना भुलणं* लै महागात पडनार आहे ।।।
घात होतोय मोठा..!
यातूनच पैदा होतेय ही नवं नवीन बिमारी।।
कुठं तरी मार्ग काढला पाहिजे।।
आपलं आपणच शोध घेतला पाहिजे।।।
अस्सल देशी वाणाचे…
नैसर्गिक पद्धतीने बनवलेले….
नैसर्गिक विषमुक्त पद्धतीने पिकवलेले … गुणवत्ता पुर्ण अन्नपदार्थांचा शोध घेतला पाहिजे…
उत्पादकांना तशी मागणी गेली पाहिजे… त्यांना ते उत्पादन करण्यास प्रोत्साहनही दिले पाहिजे… तरच आपलं भविष्य उत्तम असेल….
जय आयुर्वेद…!
– *Vd Saurabh B. Kadam*
*M.D. (Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म तज्ञ*
*Mob No. 9665010500*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Samadhan Shingte
खूप अभ्यासपूर्ण लेखन आहे आणि हे खरोखर लागु पडतं. डॉ. सौरभ यांचा आयुर्वेदाचा अभ्यास आणि उपचार खूपच प्रभावी आहेत. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे.
shriayurvedic01@gmail.com
Thank you for your most valuable feedback
Dr. D. G. Dipankar
Informative Blog.
shriayurvedic01@gmail.com
Thank you for your most valuable feedback
Krishna Deokar
Very useful information for all people. To live healthy life.
Thanks