Blog

Migraine – Ayurved Treatment

मायग्रेन: आयुर्वेद पंचकर्म व रक्तमोक्षण उपचार !

Ayurveda Health Group - Join Free

      मायग्रेन हा भयंकररित्या डोके ठणकवणारा आजार..! बुद्धिजीवी प्राण्यांमध्ये या मायग्रेन चं प्रमाण जरा ज्यास्तीच पाहायला मिळतंय आज.
” कुणीतरी डोक्यावर बसलंय आणि डोक्यात हातोड्याने घाव घालतंय ….!!” असलं विचित्र फिलिंग येतं या मायग्रेन मध्ये…!

यात जाणवणारी डोकेदुखी कधी डोक्याच्या एका बाजूला तर कधी दोन्ही बाजूंना जाणवतो. मायग्रेनचा झटका आल्यावर समोरचे न दिसणे, मळमळणे, ओकारी येणे, प्रकाश – आवाज – वास – स्पर्श सहन न होणे, चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे अशी तीव्र लक्षणे असता. हा झटका 4 तासांपासून 72  तासांपर्यंत टिकून राहू शकतो. कधीकधी झटके कमी वेळासाठीही येतात. डोकेदुखी नाहीशी झाल्यावरही पेशंटला मळमळ – अशक्तपणा वाटतो. काही वेळ झोपून उठल्यावर बरे वाटते.

आजकालच्या धावत्या व स्पर्धेच्या युगात स्पर्धा – परीक्षा, निकृष्ट खाद्यपदार्थ, कम्प्युटर – स्मार्टफोन यांचा वाढता वापर अशा विविध शारीरिक व मानसिक ताण वाढवणाऱ्या  कारणांमुळे मायग्रेनचे प्रमाण वाढले आहे असे बरेच तज्ञ सांगतात. 

कार्यशील वयोगटात म्हणजे 25  ते 55 वयोगटांत जास्त प्रमाणात मायग्रेन आढळतो. याशिवाय शाळकरी मुलांमध्येही याचे प्रमाण मोठे आहे.

अर्ध्या जणांमध्ये मायग्रेनचे निदानच होत नाही. MRI – CT Scan, वेगवेगळ्या रक्ताच्या ढिगभाई तपासण्या करून काहीच कारण नाही सापडत. मग त्याचे मायग्रेन हे निदान करून भरपूर ताकतीच्या पेनकिलर चालू केल्या जातात. निरॉलॉजी च्या भेटी गाठी चालू होतात. सुरवातीला पेनकिलरला उत्तम प्रकारे दाद देणारी डोकेदुखी, पुढे त्या पेनकिलरचा डोस वाढवून, ब्रँड बदलून – प्रकार बदलून, इतर काही करून निकामी ठरू लागतात.

      मग भरपूर औषध गोळ्या घेऊन दीन झालेला रुग्ण आयुर्वेदाचा विचार करू लागतो. Youtube – Whats App चे घरगुती उपाय प्रयोग करु लागतो. जे कोणी सांगेल ते करू लागतो. आमच्या गावाकडे कडूनींबाच्या झाडाला धडका घेण्याचा प्रकारही सांगितला जातो. मी स्वतः ही केला होता पाचवीत शिकत असताना. शेवग्याच्या कोवळ्या नवत्या चेचून रस नाकात टाकला जातो. अनेक प्रकार होतात. आणि मग सगळं बिघडवुन आयुर्वेद वैद्यांच्या शोध रुग्णाकडून चालू होतो.

आयुर्वेदानुसार जेव्हा या मायग्रेनचा विचार होतो तेव्हा आयुर्वेदिक ग्रंथात वर्णन केलेले 11 शिरोरोग विचारात घ्यावे लागतात. मायग्रेन होण्यासाठी रुग्णाने केलेल्या चुकीच्या आहार – विहाराचे सेवन, त्यानंतर त्याच्या शरीरात झालेली दोषांची विकृती, त्या विकृत दोषांनी शिरोप्रदेशी केलेला स्थानसंश्रय यांचा विचार करून त्यानंतर चिकित्सा चालू केली जाते. दोष जर ज्यास्तच प्रकोपीत झालेले असतील तर त्यांचे शोधन करणे म्हणजेच त्यांना शरीराबाहेर काढून टाकणे   अधिक गरजेचे असते. या शोधनालाच आपण पंचकर्म असे म्हणतो.

    रोग्याच्या डोकेदुखीचा प्रचंड ठणका तात्काळ बरा करण्यासाठी नस्य व रक्तमोक्षण ही आत्यायिक चिकित्सा (Emargency Treatment) केली जाते. जोडीला चाटण औषधी दिली की शिरोशूल थांबुन जाते.

पुढे मुळातून व्याधी बरा करण्यासाठी औषधींच्या जोडीला पंचकर्मातील विरेचन, बस्ती ही पंचकर्मे करावी लागतात.  शरीरातील प्रकोपीत दुष्ट दोषांना बाहेर काढण्याचे प्रमुख काम या पंचकर्म उपचाराने होते .  तर मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी शिरोधारा उपयोगी पडते.

वर्षानुवर्षे मायग्रेनसाठी पॅरासॅटिमोल, इतर पेनकिलर खाणारे रुग्ण  पंचकर्म उपचार व 5 – 6 महिन्यांच्या औषधी घेऊन पूर्णतः बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

जय आयुर्वेद!!!

*Dr Saurabh B. Kadam*
     *M.D.(Ayurved), Pune*

*आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*

Ayurveda Health Group - Join Free

*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*

आपल्या नैसर्गिक पद्धतीच्या जीवनशैलीचें महत्व जाणून घेण्यासाठी आणि अस्सल आयुर्वेद जाणून घेण्यासाठी *आयुस्पर्श आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट व आप्तश्री आयुर्वेद, पुणे*  द्वारे चालवला जात असलेल्या,

*”AYURVED (आयुर्वेद)”*

Chanal Link:
https://t.me/shriayurvedic

या चॅनलला जॉईन व्हा।। तज्ञ वैद्यांकडून हा चॅनल हाताळला जातोय।

जय आयुर्वेद ।। जय आचार्य चरक ।।



Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!