Blog

छंद औषध निर्माणाचा।।

Vd Saurabh B Kadam. M.D. (Ayurved)

Ayurveda Health Group - Join Free

    असेच एके ठिकाणी डोंगर – दऱ्यातून वाट निघून पुढे पर्वतावर घनदाट जंगलात एक प्राचीन तीर्थस्थळ असते…..!

काही मोजकेच भाविक भक्तिभावाने तिथे येत असतात….  आजू बाजूच्या जंगलात माकडं – वानरं वास करत असतात।। राना वनातलं शोधून खात असतात।। नैसर्गिकपणे जगत असतात।।

पुढं हेच तीर्थस्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ लागतं….. वाढती गर्दी आणि आलेल्या पर्यटकांकडून मिळणारं आयतं खाद्य यामुळं माकड-वानराचे कळप मंदिराकडे जमा होऊ लागतात।।

दररोजचं मिळणारं आयतं खाऊन, त्या वानरांची रानावनात फिरून शोधून खायची सवय हळूहळू मोडायल लागते आणि आयतं खायची सवय चांगलीच जडते।।। अशीच वर्षे दशके निघुन जातात।।

आयतं खायची सवय लागलेली ही माकडं आता आयतखाऊ बनलेली असतात।। रानावनात फिरून शोधून खायची कला कधीच विसरून गेलेली असतात।।।

पुढं मोठा दुष्काळ पडतो, कुठंतरी बाजूला नवीन पर्यटन स्थळ विकसित होतं।।

अनेक कारणांनी मंदिराकडची गर्दी ओसरते।।।

यामुळे आता माकडांची चांगलीच उपासमार चालू झालेली असते।। कुणी पर्यटक आले तर ती भांडणं करतात।। हिंसक बनतात।। ओरबाडून खातात।।। त्यांची हिंसक वृत्ती पाहून येणारे थोडेफार पर्यटक ही आजुन कमी होतात।।

पुढे जाऊन करोना सारखी जागतिक महामारी येते…आणि परस्थिती आणखीनच बिकट होते….

अशा परिस्थितीत जो माकड – वानर तरायच जाणतो, तो धडपड करून तरतो।। उरलेली माकडं कुणीतरी पर्यटक येईल, अन आयतं खाऊ घालेल या आशेवर वाट पाहत बसतात।।। भुकेनं व्याकुळ होऊन खंगतात अन पुढे जीव ही सोडतात।।।।

हल्ली आपल्या आयुर्वेदिक वैद्यकिय व्यवसायाला ही अशीच आयती औषधी घ्यायची सवय जडताना दिसतेय…!
हळूहळू या कंपन्यांवर आपण अवलंबून राहायला लागलो आहे.

मार्केिंग करणाऱ्या औषधी कंपन्या कुठल्या थराला जातील … हे वेगळं सांगायला नको…

“शुगर फ्री च्यवनप्राश – सोनाचांदी च्यवनप्राश” हे त्याचं जितं जागतं उदाहरण ……

Ayurveda Health Group - Join Free

त्याहून विशेष बाब म्हणजे, बाजारात मिळणारा एवढा स्वस्त च्यवनप्राश…

कंपनी ….होलसेलर… डीलर …. किरकोळ विक्रेते यांचा नफा….विचारत घेता …. च्यवनप्राशच्या निर्माण खर्चा बद्दल कधीच गणिते जुळत नाहीत…

शतावरी कल्प बनवताना ही साखरेवर शतावरी काढयाचा स्प्रे देतात म्हणे बऱ्याच कंपन्या…! आणि तो कल्प पाहिल्यावर जाणवते ही ..!

असं बऱ्याच औषधी बाबत आहे….!

कंपनीची आयती औषधं घेण्याची सवय जडली की Result मध्ये पण हळूहळू Error यायला लागतात ।। पुढं आपल्या औषध बनवायच्या आळसापायी   आपणही जाणूनबुजून दुर्लक्ष करायला लागतो।। 

पुढे अर्धवट Research करून, ग्रंथातले तीन – चार फॉर्म्युला एकत्र करून कंपन्या आपले आपले फॉर्म्युला करून, त्याचे Proprietary medicine बनवतात…..

हद्द तर तेव्हा होते जेव्हा B.A… M.A. झालेले, आयुर्वेदाचे काहीही ज्ञान नसलेले कंपनीचे M.R आपल्या त्यांच्या Proprietary medicine चे पाठांतर समजावून सांगायला लागतात….!

मग आपणही आसले कंपनीचे Proprietary medicine वापरायला लागतो.

आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने ही गोष्ट ज्यास्ताच केविलवानी आहे….! आणि हे पुढे जाऊन आयुर्वेद चिकित्सेच्या अपयशाचे कारणही होऊ शकते.

म्हणून आपण प्रत्येक वैद्याने,
विविध औषधी वनस्पतींची ओळख……, स्नेहसिद्धी – गुटी – वटी -औषधी कल्प निर्माणाची कला, त्यातील नवनवीन गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे…
नेहमी लागणारी काही ठराविक औषधी तरी निर्माण करत राहिलं पाहिजे।।।

औषधी निर्माणाचा छंद जोपासाला पाहिजे….

त्यातले ” रस भैषज्यच्या संस्कारांचे (process)” बारकावे विचारात घेतले पाहिजे…!

उखळीत बनवलेले शेंगदाण्याची चटणी आणि मिक्सर मध्ये बनवलेली शेंगदाण्याची चटणी…!

घटक तेच … चवीत मात्र खुप मोठा फरक…!!

कारण ते बनवत असताना, त्याच्यावर केलेल्या संस्कारा मधला फरक आहे..! त्यानुसार त्यांच्या गुणांमध्येही फरक पडतो।।

संस्कारो हि गुणांतरधनमुच्यते ll
ही आयुर्वेद औषध निर्मानातील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे…

औषध निर्मितीचा असा साधारण गंध असणारा आयुर्वेद वैद्य हा भेसळ सहज ओळखू शकतो…!

येणारा काळ खुप भेसळयुक्त अन बनवाबनवीचा असणार आहे।।

त्यातून आपल्याला तर तरायचं आहेच…सोबतच आयुर्वेदाच्या साहाय्याने विश्वालाही तारायचे आहे।।

म्हणून नव्या वैद्यांच्या पिढीला आयुर्वेद औषध निर्मितीचा छंद लावायचा आहे…! औषध निर्मितीचा छंद जोपासायचा आहे…!

जय आयुर्वेद..!!!

– *Dr Saurabh B. Kadam*
    *M.D.(Ayurved), Pune*
*Assistant Professor*
*आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सक*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Contact no 9665010500*

#Ayurved #ayurveda #Ayush #AyurvedicMedicine #ayurvedalifestyle #ayurvedalife

Consultant Ayurveda Speciality Doctor
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

Consultant Ayurveda Speciality Doctor ,
Healvibe Ayurved Kidney Care Unit, Pimpri Pune 411018

Consultant Ayurveda Speciality Doctor,
Moraya Multi Speciality Hospital, Dapodi pune  411012



Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!