Ayurvedic Energy Drink
खरजूरादी मंथ – The Energy Drink
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
Ayurvedic Drink
मंथ म्हणजे विशिष्ट औषधी ठराविक काळापर्यंत पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्याचे रवीने मंथन (Churning) करून तयार होणारे पेय म्हणजे मंथ.
आयुर्वेदातील वेगवेगळ्या ग्रंथात मंथ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत.
तृष्णा, मद्यपान जाणित दौर्बल्य, छर्दी, उष्माघात, उष्णता वाढल्यामुळे होणारा रक्तस्राव, प्रमेही रुग्णांमधील विविध तक्रारी आदी विविध आजारांवर उपयुक्त मंथ आयुर्वेदात सांगितलेले आहेत. त्यातील
मदात्याय चिकित्सेतील ” खर्जुरादी मंथ” इथे पाहणार आहोत।। हा मंथ व्यवहारात विशेष उपयोगी पडणारा व सहजतेने बनवता येणारा आहे.
खर्जुरादी मंथ
घटक द्रव्य: साधारण अर्धा लिटर साठी
1)उत्तम पिकलेली स्वच्छ करून बिया काढलेले खजूर
– 2 खजूर
2)डाळिंबाचे दाणे – साधारण 2 चमचे
3)मनुका – 6- 8 मनुके स्वछ करून घ्याव्या
4)आवळा – आवळे ताजा मिळाल्यास बी काढुन एक आवळा खिसून घ्यावा अन्यथा आवळा पावडर 1 चमचे
5)चिंच – बिया काढून 2 बोंडे
6)फालसा किंवा कोकम (वृक्षाम्ल) : बिया काढलेले 1 फळे/ बोंड
7)सुके/ओले अंजीर – 1 अंजीर
सैंधव मीठ – चवीपुरते
मटक्यात/माठात थंड केलेले पाणी – 200 मि.ली./ एक ग्लास
(यापैकी सर्व घटक द्रव्य न मिळाल्यास उपलब्ध असतील ती किमान पाच घटक घ्यावेत. घटक द्रव्य व पाणी यांचे १ : ४ हे प्रमाण लक्षात ठेवावे.)
मुख्य उपकरणे – लाकडी रवी / मिक्सर, उभट आकाराचे भांडे, गाळणी, मठातील पाणी
कृती –
१) सर्वप्रथम सर्व घटक द्रव्य छोटे छोटे काप करून बिया काढून – किसून – चुरून निम्मे पाणी टाकून मिक्सर मध्येही बारीक करू घ्यावी किंवा उभट भांड्यात घेऊन चांगले रवीने घुसळून घ्यावीत. चांगले कुस्करून त्यातील रस पिळून काढावा।
2) उरलेले पाणी टाकून, पुन्हा एकदा हाताने व्यवस्थितपणे कुस्करून घ्यावीत. त्यानंतर मिक्सर मध्ये फिरवून किंवा रवीने घुसळून पुन्हा त्यातील रस दाबुन पिळून काढावा ।।
3) काढलेल्या रसात चवीनुसार सैंधव मीठ घालावे.
4) मंथ गाळण्याने गाळून घ्यावा. हा मंथ पिण्यास तयार झाला।
एकाच वेळी सर्व मंथ न पिता थोडे थोडे थांबून (Sip by Sip) घ्यावा. त्यामळे लालास्रावा उत्तम प्रकारे त्यात मिसळतो आणि अधिक फायदा मिळतो.
उपयोग :
आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून, श्रम-कष्ट-अतिमद्यपान-उषातेचा संपर्क-अति कर्षण-अतिलंघन यामुळे वात आणि पित्त वाढून त्यामुळे शरीरातील रसधातू कमी झाल्याने जी दौर्बल्याची लक्षणे निर्माण होतात, त्यावर शरीरातील रसधातूची कमतरता त्वरित भरून तर्पण करणारे औषध म्हणजे हा खर्जुरादी मंथ. हा मंथ शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो आणि मधुर अम्ल रसाने हृदयाला बल देऊन मनालाही प्रसन्न करतो.
कष्टाची कामे करून थकणारे, जिमचा व्यायाम करणारे, मैदानी खेळ खेळून, ऊन्हामुळे – प्रवासाने दौर्बल्या आलेल्या अवस्थेत हे मोठे Energy Drink आहे.
बाजारात मिळणाऱ्या Preservative टाकलेल्या व केमिकलचे वेगवेगळ्या फळांचे इसेन्स व फ्लेवर युक्त प्रोटीन ग्लुकोजच्या विविध Energy Drink ला हा सर्वोत्तम पर्याय आहे.
ऊन वाढायला लागल्यानंतर काही व्यक्तींना अधिक तहान लागणे, हातापायांची आग होणे, डोळ्यांची आग होणे अशी लक्षणे दिसायला लागतात त्यांच्यासाठी हा मंथ सर्वोत्तम..!
उन्हाळ्यात उन्हामुळे नाकाचा घोळणा फुटून रक्त येण्याची तक्रार असणाऱ्यांनी उन्हाळाच्या सुरवातीपासून हा मंथ घेण्यास सुरुवात करावी.
फिरतीची कामे असणाऱ्यांनी जसे की पोस्टमन, कुरियर बॉय, डिलिव्हरी बॉय यांना कामानिमित्त सतत उन्हातून फिरावे लागते. त्यांनी सकाळी हा मंथ तयार करून दिवसभर थोडा थोडा घेतल्यास उन्हाचा सामना करणे बऱ्याच प्रमाणात सोपे होते.
सततच्या बोलण्यामुळे येणारा थकवा व होणारी चिडचिड यावरही हा मंथ घेतल्याने कमी होते
आयुर्वेदानुसार शरीरातील पित्त वाढल्याने कावीळ होते. काविळीच्या रुग्णांमध्ये लिव्हरला सूज येत असल्यामुळे भूक लागत नाही, पचनक्षमता खालावते. त्यामुळे काविळी झालेल्या बऱ्याच रुग्णांचे वजन कमी होते. काविळीच्या बऱ्याच रुग्णांना सुरवातीला डार्क ब्राऊन रंगाचा मळ बाहेर पडतो. ही सुरवातीची अवस्था जाऊन मळाचा रंग सुधारल्यानंतर काविळीच्या रुग्णात हा मंथ देता येतो. त्यामुळे थकवा कमी होते व रुग्णाचे बळ टिकून राहते.
मद्यपानाचे दुष्परिणाम
जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे निर्माण होणाऱ्या मदात्यायाची लक्षणे, मद्यपान थांबवल्यानंतरची Alcohol Withdrawal Symptoms वरचे खर्जुरादी मंथ उत्कृष्ट औषध आहे. या रुग्णांमध्ये असंबद्ध बडबड करणे, खूप घाम येणे, अधिक लघवी होणे, पोटात आग होणे, मळमळणे, नाडी गती वाढणे हि लक्षणे दिसतात. आधुनिक शास्रानुसार या रुग्णांना Dextrose आणि Glucose सलाईनवाटे दिले जाते. आयुर्वेदातील मंथसुध्दा गोड चवीला गोड असल्याने त्यातून शरीराला काही प्रमाणात ग्लुकोज मिळते. तसेच मंथ पित्तशामक असल्याने पोटात आग होणे. मळमळणे हि लक्षणे कमी करण्यातही मदत करतो.
डायबेटीस असलेल्या अनेक रुग्णांनाही लवकर थकवा येणे, खूप तहान लागणे ही लक्षणे असताना मंथ देता येतो. यामध्ये खजूर आणि काळ्या मनुका हे चवीला गोड पदार्थ असले तरी खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स ४२ तर काळ्या मनुकांचा ग्लायसेमिक इंडेक्स ४९ – ६० इतका कमी असल्याने हा मंथ घेतला तरी रक्तातील साखर विशेष वाढत नाही.
– Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Emmanuel
Real great summer energy drink
This awarness require from school days