।। ओळख आयुर्वेदोक्त पंचकर्माची ।।
भाग 1
Dr Saurabh B. Kadam M. D. (Ayurved)
आजकाल कुणीपन उठतो अन आयुर्वेदात बुवाबाजी चालू करतो।।।
स्वतःला आयुर्वेदातला मास्टर समजू लागतो।।
पेपरातली कात्रणं अन आज का आनंद वाचून, त्या youtube चे video बघून, कुणी निसर्गउपचार- मालिश- गोमूत्राचे वर्ष – सहा महिन्यांचे कोर्स करून गावभर आयुर्वेदाच्या बोमच्या मारत फिरतात।।
आयुर्वेद पुरता यांच्यात उतरलाय असा आव आणतात।।।
त्यात आता सोशल मीडिया मोठं मध्यम घावलंय…! ढीगभर ग्रुप झालेत।। त्यावर प्रदर्शन चालूच असतं।।
काहीही सांगतात….
म्हणे ताकावर पंचकर्म ।।।
कुणी सांगतं, 5 दिवसात 5 पंचकर्म।।
एक तर पठ्या वेगवेगळ्या जेल्या घेऊन आला होता माझ्याकडे…,
म्हणे, “ह्या खाल्ल्या की पंचकर्म होतंय।।।भस भस सगळी शरीरातली घाण बाहेर पडतीय। रशियन टेक्नॉलॉजी आहे म्हणे।।। पंचकर्म करायची।।।”
त्याला आयुर्वेद दर्शन घडवावं लागलं।।जरा ज्यास्तच प्रेमानं ।। तेव्हा चांगलाच जाग्यावर आला।।
तर्क तर लै भारी लावतात हे लोक।।
कुठुन कुठून शोध लावतात देव जाणे।।।
असल्या बाबतीत लै ट्यालेंट हो ह्यांच्याकडे..!!
यासाठीच आपण सामान्यांनी मुळ आयुर्वेद समजून घेणं खुप गरजेचं आहे ।
आयुर्वेद व पंचकर्म या ब्रँड शब्दांचा वापर करून मार्केटिंग केलं जातंय।।
जिथं जमेल तिथं हे शब्द लावले जाताहेत।।
आपणाला खरा आयुर्वेद व आयुर्वेदातील पंचकर्म समजावे आणि उमजावे म्हणूनच हा अट्टाहास करतोय।।
आयुर्वेदावर बोलणं तर चालूच असतंय, पण आता थोडं पंचकर्मावरही बोलायचंय।।
आयुर्वेदात प्रामुख्याने दोन प्रकारे उपचार केले जातात….,
1)शमन
2)शोधन
एक म्हणजे *शमन* आणि दुसरे *शोधन*।।।
*शमन म्हणजे,*
*आजारास कारण असलेले-वाढलेले – बिघडलेले दोष जागच्या जागी शांत करणे – प्राकृत (Normal) अवस्थेत आणणे।।*
*अन शोधन म्हणजे,*
*आजार निर्माण करण्याचे कारण असलेले-वाढलेले-बिघडलेले दोष शरीरातून बाहेर काढून टाकणे।।अन त्यानंतर केलेल्या संसर्जन क्रम व रसायन चिकित्सेत शरीराला मुळ शुद्ध स्वरूपात कार्यान्वित करणे।*
ज्यालाच आयुर्वेदोक्त पंचकर्म असे म्हणतात।।
उदाहरणासह समजेल अशा सोप्या भाषेत थोडक्यात सांगायचे झाले तर,
घर तिथल्या तिथं सावरा सावर करून आवरणं।। वर वरचा हाताला येईल तेवढा कचरा काढून टाकणं ।।वर वर डागडुजी करणं म्हणजे शमन।।।
अन दुसरं म्हणजे दसरा दिवाळीला जे आपण करतो … चांगले धुऊन पुसून कोणाकोपऱ्यातला कचरा जाळी काढून घराबाहेर फेकून चांगली साफसफाई करणं ।। बिघालेल्या दरवाजे – पंख्ये यांची दुरुस्ती करून त्याला तेल पाणी करणं।। मस्त पेंट करून त्यांचं आयुष्य वाढवणे म्हणजे शोधन ।।।
या दोन्ही उपचारांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे।।
*शोधन चिकित्सा (पंचकर्म) म्हणजे आमच्या आयुर्वेदातील शस्त्रकर्म म्हणलं तर वावगं ठरणार नाही।*
*याद्वारे कुठलीही चिरफाड न करता, शरीरात आजार उत्पन्न करणारे दुषित दोष – मल युक्तीने शरीराबाहेर काढले जातात.*
एवढं महत्वाचं अन Serious पणे करावयाचं कर्म आहे।। यात मुळकर्म बरोबर पथ्यापथ्य आदींचे पालन करणे अनिवार्य असते।।
मज्जा मज्जात जाऊन पंचकर्म करून आलो असं होतं नाही।।
पथ्यापथ्य न पाळता मज्जा मज्जात केलं तर ती मज्जाच होते बरं।।
तुमच्या प्राकृतीनुसार,
वर्षातून केलेलं एखादं पंचकर्म आणि साधी साधी आहार विहाराची पथ्ये तुमच तारूण्य टिकवून ठेवतं।।। जीवनशैलिच्या बदलांने उत्पन्न होणाऱ्या ढिगभर आजारांना अटकाव घालण्यासाठी पंचकर्मा सारखी दुसरी चिकित्सा नाही।।
(भाग 1 क्रमशः)
– *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking