।। रोगप्रतिकारक शक्तीवर्धक – गुडूची (साक्षात अमृत)।।
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
कृतयुगात प्रभु श्रीराम आणि लंकापती रावण यांचं घनागोर युद्ध झालं होतं।। त्या युद्धात राक्षस सेनेच्या हातून प्रभू श्रीरामांची बरिच वानरसेना रणभूमीवर मृत्युमुखी पडली।।
ते पाहून देवांचा राजा इंद्राने त्या वानरांना जिवंत करण्यासाठी मृत वानरांच्या मुखात समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या अमृताची धारा सोडली आणि त्यामुळे मृत वानरांच्या शरीरात पुन्हा प्राण आले।। युद्धात झालेल्या जखमा भरून आल्या।। कापलेले शरीरावयव पुन्हा पुर्ववत झाले।।
यावेळी वानरांच्या मुखात अमृतधारा सोडत असताना त्या धारेचे काही अमृत तुषार उडून भूमीवर पडले।। आणि तिथे एका अद्भुत अशा दिव्य वनस्पतिची उत्पत्ती झाली।।
तीच ही साक्षात अमृतरुपी अमृता.!!
जिला गुडूची, गुळवेल, गिलोय, चक्रलाक्षणिका, रसायनी, वयस्था, मधुपर्णी, छिन्नोद्भवा, वत्सादनी अशा अनेक नावांनी आपण ओळखतो।।।
संदर्भ:
अथ लङ्केश्वरो मानी रावणो राक्षसाधिपः | रामपत्नीं बलात्सीतां जहार मदनातुरः।।१||
ततस्तं बलवान् रामो रिपुं जायाऽपहारिणम् |
वृतो वानरसैन्येन जघान रणमूर्धनि॥२||
हते तस्मिन्सुरारातौ रावणे बलगर्विते |
देवराजः सहस्राक्षः परितुष्टश्चराघवे॥३||
तत्र ये वानराः केचिद्राक्षसैर्निहता रणे |
तानिन्द्रो जीवयामास संसिच्यामृतवृष्टिभिः॥४||
ततो येषु प्रदेशेषु कपिगात्रात्परिच्युताः |
पीयूषबिन्दवः पेतुस्तेभ्यो जाता गुडूचिका॥५||
गुडूची नामानि,
गुडूची मधुपर्णी स्यादमृताऽमृतवल्लरी |
छिन्नाछिन्नरुहा छिन्नोद्भवा वत्सादनीति च॥६||
जीवन्ति तन्त्रिका सोमा सोमवल्ली च कुण्डली |
चक्रलक्षणिका धीरा विशल्या च रसायनी॥७||
चन्द्रहासा वयस्था च मण्डली देवनिर्मिता |
गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी॥८||
संग्राहिणी कषायोष्णा लघ्वी बल्याऽग्निदीपिनी |
दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्॥९||
कामलाकुष्ठवातास्रज्वरक्रिमिवमीन्हरेत् |
(प्रमेहश्वासकासार्शः कृच्छ्रहृद्रोगवातनुत्)॥१०||
– भावप्रकाश निघन्टू ।।
संपुर्ण भारतभर सर्वत्र मुबलक प्रमाणात सापडते।। आम्हा शेतकाऱ्यांच्या बांधाला किंवा अडचणीच्या कोपऱ्यात तर हमखास सापडते।।।
सोबत जोडलेले फोटो पाहून नक्की लक्षात येईल तुमच्या की, ही कोणती वनस्पती आहे।।।
मोठ्या झाडांवर ही हिची वेल मस्त पसरलेली असते।। त्यात कडुनिंबाच्या झाडावर वाढणारी अमृता अधिक औषधी गुणांनी युक्त असते।।रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत तर सापडतेच सापडते।।
कारण आहेच तशी ही साक्षात अमृतरुपी वनस्पती।।अमर आहे ही वेल।। मरतच नाही।।तुकडे तुकडे करा।। पुर्ण चेंदा मेंदा करून फेका।। वाळू द्या।। एवढं करून थोडा गारवा मिळाला की पुन्हा फुटवे फुटू लागतात ।। आणि बहरते।।
ह्या वेलीचं कांड कापलं असत चक्रा प्रमाणे दिसतं।।त्यातली छोटी छोटी रंध्रे खुप सुंदर दिसतात।।
औषधात वापरताना ह्या वेलीचं साधारण आपल्या बोटा एवढं जाड कांड घेतात।।त्याचा ताजा ताजा स्वरस, चेचून पाण्याबरोबर काढा करून किंवा कांड सावलीत वाळवून बनवलेलं चुर्ण आम्ही औषधात भरपूर वापरतो।।
हिचं गुळवेल सत्वही काढतात।।। जे अनेक प्रकारच्या तापामध्ये, मधुमेहामध्ये, जुनाट आजारात खुप कामी येतं।।
औषधात साक्षात अमृता यासारखं काम करते।।शरीरातील पेशींच्या ( ज्यांना आम्ही सप्त धातू म्हणतो) चयापचय क्रियेत झालेल्या बिघाड होऊन उद्भवलेल्या आजारांवर दिल्या जाणाऱ्या बहुतांश औषधींमध्ये गुडूची असतेच।।।
रोगप्रतिकारक शक्तीचे काम बिघडून बनलेले आजार ज्याला आपण Autoimmune Disease म्हणतो त्यावर तर ती रामबाण आहे।।
वयस्था म्हणजे वयस्थापन करणारी, रसायनी म्हणजे आयुष्य वाढवणारी अशी ही नावे गुडीचीच्या उपयुक्त गुणांनुसार दिली आहे ।।
हिच्या पानांची भाजी करून ही खाल्ली जाते।। आपल्या मेथीच्या भाजी प्रमाणे भाजी बनवतात।। त्यात शेंगदाण्याचं कूटही टाकलं जातं ।। बनलेली भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते।। चवीला कडू असली तरी अत्यंत औषधी आहे।। गावोगावाच्या जुन्या वृद्ध वैदयांची आहार स्वरूप पाहिल्यावर लक्षात आलं की जर महिन्याला हे वैद्य या गुळवेलाच्या पानांची भाजी आपल्या आहारात ठेवतातच।। आदिवासी लोकही हीचा भाजी म्हणून वापर करतात।। जनावरांत गाईची वासरं विशेष आवडीने खातात ही वेल।।।
आजच्या या कोरोनाच्या साथीत ही अमृताच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला उत्तम करून आपला कोरोना संसर्गापासून बचाव करणारी आहे हे पक्कं ध्यानात ठेवा।।
अमरत्व देणाऱ्या अमृता पासून उत्पन्न अमृता वनस्पती योग्य मात्रेत, योग्य त्या अनुपानाबरोबर व योग्य प्रकारे घेतल्यास कुणालाच बाधत नाही।। वात पित्त कफ या तिन्ही दोषांमध्ये झालेला बिघाड नाहीसा करून, शरीरातील चयापचय उत्तम प्रकारे करवून, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी ही अमृता पृथ्वीवरचं साक्षात अमृत आहे।। प्रत्येकाने घरोघरी हिची वेल लावलीच पाहिजे अन जपलीच पाहिजे।।
आजच शोधा आस पास।। गावाकडे तर भरपूर सापडेल किंवा नर्सरीतही हिचं रोपटं सहज मिळून जाईल।।
सध्या कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सरकारच्या आयुष विभागाकडून आयुर्वेदिक औषधींचं वाटप केलं जातंय।
त्यात प्रमुख घटक हीच गुडूची आहे।।
कोरोनाला पळवून लावण्यासाठी सरकारद्वारे वाटलं जाणारं हे रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधं मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत आपल्या आसपास ताजी गुळवेल मिळत असेल तर तिच्यापासून पुढे सांगितल्या प्रमाणे घरगुती पद्धतीने काढा बनवून घेण्यास चालू करा सर्वांनी।।
काढा बनवण्याची पद्धत :
घटक द्रव्य
1) गुडूची :
ताजी असेल तर – किमान हाताच्या बोटां एवढे जाड, साधारण 5 ते 6 सेंटीमीटर लांब कांड खलबत्त्यात चेचून घ्या।।
किंवा गुडूची चुर्ण असेल तर 1 सपाट चमचा चुर्ण घ्या ।।
2)हळद
सुंठ
धने
जिरे
ओवा
सर्व चुर्ण करून एकत्र करू घ्या।।
आणि त्या सर्वांच्या चूर्णाचा अर्धा चमचा काढा बनवण्यासाठी घ्या।।
ही वरील दोन्ही चुर्ण औषधी 2 कप (साधारण 160ml) पाणी एका भांड्यात घेऊन त्यात मिसळा।।
गॅसच्या मध्यम आचेवर काढा करायला ठेवा।। आटून अर्धा कप (40ml) शिल्लक राहिल्यावर गाळुन प्या।। दिवसातून दोन वेळा।।
सकाळी उपाशीपोटी व संध्याकाळी (अगोदर दोन तास काहीही न खाल्लेल्या अवस्थेत) साधारणपणे 5 ते 6 च्या दरम्यान।।
मधुमेह किंवा रक्तशर्करा नसणाऱ्यांनी चमचाभर साखर किंवा गुळ टाकून पिऊ शकता।।
काढा घेतल्यानंतर पुढे किमान अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नका।।
गरम पाणी पिणे, पचायला हलका व ताजा गरम गरम आहार घेत, शारीरिक व मानसिकरित्या चांगली विश्रांती घेत, सोबत सोशल डिस्टन्सची पथ्ये पाळत किमान सलग 21 दिवस हा काढा घ्या।। त्यानंतर 10 दिवसाचा गॅप ठेऊन पुन्हा काढा चालू करा।।
उत्तम रोग्यप्रतिकारक शक्ती प्राप्त होईल।।
यदा कदाचित चुकून कोरोनाचा संसर्ग झालाच तर त्याविरुद्ध लढण्यास तुमचं शरीर तयारीत असेल।। अगदी सहजतेने तुम्ही त्यातून तरून जाल।।
शक्य तिथे या गुडूचीचा वेल लावा।। त्याला जपा।। पुढेही महिन्यातून एकदा तरी गुडूचीच्या पानांची आवर्जून भाजी खावा।।
या कोरोनाच्या चक्रव्यूहातून लौकरात लौकर बाहेर पडायचे आहे आपल्याला।।।
– Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
婢https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Rahul kawade
It’s awesome and everyone apply. कारण डॉक्टर कदम यांनी गेल्या सहा वर्षापूर्वी माझ्या एका नॉर्मल आजारावरती मला पुण्यावरून औषध सांगितले होते आणि त्या औषधाचा परिणाम चार दिवसात झाला त्यात मला काहीही खर्च आलेला नाही त्यावेळेपासून माझा डॉक्टर कदम यांच्या आयुर्वेदाच्या अभ्यासा वरती भरपूर विश्वास बसला आणि मी खरंच त्यांचा ऋणी आहे. मी सगळ्यांना एवढंच सांगू शकतो की तुम्ही कितीही रसायन वापरा पण आयुर्वेदात शिवाय पर्याय नाही आणि त्यातलंच एक आयुर्वेदिक औषध म्हणजे यांचं गुळवेल वरती असलेलं औषध.