बालकांमधील बोबडे बोल..!!
बालकांमधील बोबडे बोल..!!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे, शब्द गाळून बोलणं, काही अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे न करता येणं अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात.
या समस्यांची प्रामुख्याने 3 मुख्य कारणे रुग्णचिकित्सा करताना पाहायला मिळतात,
1) आपल्या पिल्याच्या बोलणं शिकण्याच्या अवस्थेत, आपण मोठ्यांनी प्रेमाने लाडी गोडीत येऊन बोबड्या तोतऱ्या शब्दात त्याच्याशी संवाद साधणं।।
साधारणतः आपलं बाळ 3 महिने ते 3 वर्ष वयाचे होण्याच्या काळात बाळाचं बोलणं विकसित होत असते। या वेळी त्याच्या कानावर पडणारे शब्द ऐकून तसे उच्चारण त्यांच्याद्वारे होत असते।।तसाच शब्द बाहेर काढण्यासाठी त्यांची जीभ वळवण्याचा प्रयत्न होतो। आणि तसेच तोतरे बोबडे उच्चारण बालकांद्वारे होऊ लागते।।
2) बाळाच्या बोलणं शिकण्याच्या अवस्थेत त्याच्या कानी शब्दच न पडणे।। किंवा फार कमी शब्द पडणे।।
करिअर नावाच्या भोवऱ्यात अडकलेले आजची जोडपी तीन चार महिन्याच्या बाळाला दाईच्या मांडीवर ठेऊन कामावर जात असतात. कामावरून आल्यावरही घरच्या कामाच्या नादात बळाला ज्यास्ती वेळ नाही देता येत।।
आणि अधिकतम दाईचा भर त्या बाळाला खाऊ घालून झोपवण्यावर अधिक असतो।।
यांनं होतं असं ते बाळ झोपळू बनू लागतं।। संवादाचा अभाव पुढे जाऊन बाळांमध्ये बोबडेपन निर्माण करतो।।
3) पूर्वी सारखं किरकिर करणाऱ्या रडक्या बाळांना आजी अल्प मात्रेत अफू चाटवत असे ।किंवा बालगुटीत जायफळाचे दोन वेडे ज्यास्ती उगाळत असे।।
मग बाळ मस्त झोपून जाई।।
पण यामुळे जिभेला जडत्व येऊन बाळाला बोलण्यास त्रास होताना दिसतो।।
याशिवाय नवजात अवस्थेत मोठ्या आवाजाचा आघात होणं, कर्कश आवाज सतत कानी पडून श्रोतेंद्रियाला इजा झाल्यास आलेल्या काहीश्या बधिरतेचा परिणाम म्हणून ही बोलण्याच्या विषयक समस्या बालकांमध्ये दिसतात।।
गर्भाशयात गर्भाचा विकास होताना अयोग्य पद्धतीने झालेले पोषण ही कारण असू शकते।।
तसेच सकाळी दातांच्या स्वच्छतेसाठी आपण जी फेस करणारी केमिकल्स युक्त टुथपेस्ट वापरतो ती त्या रसायनांमुळे जिभेला जडत्व उत्पन्न करते।। त्यामुळेही उच्चार शुद्धीस अडथळा येतो।।
तसेच ज्याद्वारे आपल्याला अन्नपाण्याची चव कळते त्या जिभेवरच्या टेस्टबडलाही या टुथपेस्ट मधील केमिकल्स मुळे इजाही होते।। जिभेच्या रसज्ञानास बाधा येते।।
त्यामुळे दातांच्या स्वच्छतेसाठी आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेले, केमिकल रहित चुर्ण स्वरूपातील दंतमंजनच वापरावे।। त्यासाठी आयुर्वेदात खुप पर्याय वर्णले आहेत।। त्याचीही माहिती एका ब्लॉगला सविस्तर लिहिली आहे।।त्याची लिंक लेखाच्या शेवटी आहे।। आपण पाहु शकता ।।
‘स्पीच थेरपी’चा उपयोग करूनही काही फायदा होताना दिसत नसेल मग शेवटचा उपाय म्हणून लोक आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदातिल ‘वाक्शुद्धिकर’ म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे वापर केल्यास अशा रुग्णांना उत्तम लाभ होताना दिसतो.
याबरोबरच आद्य शंकराचार्य रचित ‘नर्मदाष्टक स्तोत्र’ मोठ्याने पाठणास आम्ही वैद्य सांगत असतो.
त्यातील शब्दरचना उच्चारण करताना जिभेचे व्यायाम होऊन उत्तम प्रकारे जीभ वळू लागते. उच्चारन शुद्ध होऊ लागते।।
‘नर्मदाष्टक स्तोत्र’
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् । कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥१॥
त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् । सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥
महागभीरनीरपूरपापधूतभूतलं ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् । जगल्लये महाभये मृकण्डसूनुहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥
गतं तदैव मे भवं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा । पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥
अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् । वसिष्ठसिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥
सनत्कुमारनाचिकेतकश्यपादिषट्पदैः_ धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः । रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥
अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् । विरञ्चिविष्णुशङ्करस्वकीयधामवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे । दुरन्तपापतापहारिसर्वजन्तुशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥८॥
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा । सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥
– श्रीमद् भगवत्पाद आद्य शंकराचार्य
आययुर्वेदीक औषधींसह याच संस्कृत पठण ‘स्पीच थेरपी’चा वापर कित्येक वैद्य यशस्वीपणे पुर्वी करत होते आणि आजही करताहेत.
लहानपणीची शाळेतील प्रार्थनेच्या तासाला संस्कृत मधून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रार्थना – श्लोक – सुभाषिते, जेवते वेळची प्रार्थना, सायंकाळी दिवा लावते वेळीच्या संस्कृत स्तोत्र – प्रार्थना हे बालसंस्कार आमच्या अध्यात्मिक उनत्तीबरोबर खुप मोठ्या स्पीच थेरपी आहेत।। ज्या आमच्या वाणीचे शुद्धिकरण करतात।।
तसेच रामदास स्वामींचे नृसिंहपंचक ही पठण करण्याचा सल्ला अनेक वैद्यांच्या द्वारे केला जातो
श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळेंप्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळेंखवळत रिपुकाळें काळकाळें कळाळेंतट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।
झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळीलळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळीहळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळीकळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।
कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडींघडघडित घडाडीं घडघडाटें घडाडींतडतडित तडाडीं तडतडाटें तडाडींधडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।
भरभरित भरारी भर्भराटे भरारीथरथरित थरारी थर्रथराटे थरारीतरतरित तरारी तर्तराटे तरारीचर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।
रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।न धरित जन मानें लोक गेलें निदानें।हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।
याशिवाय प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठणही उपयुक्त ठरते।।
अशा या जिभेचा व्यायाम करणाऱ्या स्तोत्र आदी आध्यात्मिक साहित्याच्या अभ्यासाने आपन आपल्या बालकांचे उच्चारण शुद्ध करू शकता।।
सोबतच शुद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्यांच्या साहाय्याने काही ठराविक औषध उपचारही यात उपयुक्त आहेत।। अनेक बालकांना याचा फायदा झाला आहे।।
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking