Blog

Couse of Low Immunity

  टेकू – शरीराच्या रोगप्रतिकाराला..!

Ayurveda Health Group - Join Free

Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

धावत्या युगात आधुनिकतेकडे जाताना, पश्चिमात्यांचे अनुकरण करताना आम्ही भारतीयांनी 10,000 किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षाच्या अभ्यासातून बनलेलं   आपलं आरोग्यशास्त्र –  आयुर्वेदशास्त्र बाजूला ठेऊन Modern Medical Science ला जवळ केलं।।
एवढं जवळ केलं की, त्या औषधींचं जणू व्यसनच लागलंय आम्हाला।।

“त्या गोळ्या नाही खाल्या की भट्टीच बिघडते आमच्या शरीराची।।” असं होऊन बसलंय।।

पित्ताची गोळी तर महाप्रिय।।।
त्यानंतर,
ही बी पी ची, 
ही शुगरची, 
ही थायरॉईडची,
ही कॅल्शियमची,
ही मल्टिव्हिटॅमिनची,

आणि हो ही झोपेची।।
याच्या शिवाय झोपच येत नाही हो।।

आरे काय हे??
कश्यावर जगताय…?

अन्नावर का ह्या गोळ्यांवर???

नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला, आईचं दूध सोडून Supplement  चे डबे चालू केले जातात…!

हे डबे बनवणाऱ्या कंपन्या पण ते पोषक अन्न वेगवेगळे इसेन्स टाकून एवढं स्वदिष्ठ करतात की, त्या बाळाला आईच्या दुधा पेक्षा तेच Supplement ज्यास्ती आवडू लागतं।।

मग बाळ ह्या डब्यावरच मोठं होऊ लागतं।।

“Side Effects ची भलीमोठी लिस्ट पाठ असून नियमित गोळ्या खाणं भाग असतं”

असं आमच्या आतल्या मेंदवावर कोरलेलं असतं।।

भारत शासनाद्वारे, Modern Medical Science च्या चिकित्सापद्धतीला राजाश्रय देऊन आजून 1 शतक ही पूर्ण झालेलं नाही, त्याच्या आतच, आधुनिक औषधांचे दुष्परिणाम पाहून पुन्हा आपण तेवढ्या गतीने आयुर्वेदाकडे वळलो आहे।।।

आपणच काय पूर्ण जग या आयुर्वेदाकडे येत आहे ही खूप समाधानाची अन माझ्या सारख्या आयुर्वेद उपासकासाठी अभिमानाची बाब आहे।।।

आयुर्वेद हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे।
एक Lifestyel आहे।।। जी आपल्या हिंदु संस्कृतीशी एकरूप होऊन गेली आहे।।।आजार झाल्यावर उपचार कारण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून काय करायचं।।। हे शिकवतो आयुर्वेद।।।।

Ayurveda Health Group - Join Free

स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम।। विकारस्य धातू प्रशनं।।
हे आमच्या आयुर्वेदाचे ब्रीद आहे।।

दिनचर्या – ऋतूचर्या – स्वस्थवृत्त – आचार रसायन या ज्या गोष्टी आयुर्वेदात वर्णिला आहेत त्या आपलं आरोग्य टिकवण्यासाठी लाख मोलाच्या आहेत।।।

एकदा का टेकनाची (support) सवय लागली की, व्यक्ती कमकुवत बनाय लागतो।। स्वतःचे कौशल्य, गुणवत्ता विसरून त्या टेकनाच्या आधारावर विसंबून राहायला लागतो।।

भिकाऱ्याला गरजेपुर्ती भीक देऊन स्वावलंबनाचा मार्ग दाखवणं योग्य ..!!पण दररोजच भीक वाढलं, की त्याची ती नेहमीचीच सवय अन लाचारी होऊन बसते।।।

आरोग्याचं , म्हनजे आपल्या शरिराचे ही तेच आहे।।।

जेव्हा आपण शरीराद्वारे जे कार्य होते, ते बाहेरील औषधी देऊन, हार्मोन्स देऊन पुर्ण करू लागतो, तेव्हा त्या बाहेरील औषधींचा आधारावर – त्या टेकणावर शरीर विसंबून राहायला लागतं।।। पुढं पुढं तर त्याची विसंबून राहण्याची सवय एवढी बळावते की, साध्या सर्दी खोकल्याला पण प्रतिकार शरीर करू शकत नाही।।। ‘कधी ते बाहेरील  antibiotics चं औषधी येईल आणि त्याचा प्रतिकार करेल …!’ याची वाट पाहत बसते।।

मी असं बिल्कुल म्हणत नाही की, Antibiotics – हार्मोनल Theorapy वाईट आहेत..! त्या अति गरजेच्या वेळी पाहिजेच पाहिजे. पण त्यांच्या इतकं आहारी जाऊन आपली प्राकृत रोग प्रतिकार क्षमता गमावणे..!!  खुपच भयानक आहे।।।

आयुर्वेदिक औषधी, पंचकर्म उपचार पद्धती, जीवनपद्धती हे डायरेक्ट आजाराशी कधीच लढत नाही, तर शरीरालाच त्या आजाराशी लढण्यासाठी शक्तिशाली बनवतात..!!! त्या उच्चपातळी पर्यंत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात..! शरीराला आजाराशी लढायला तालमीतल्या पहिलवानासारखं तयार करतात..!!

–  Dr Saurabh B. Kadam

      M.D.(Ayurved), Pune

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व  Blog ला जरूर भेट द्या…

https://shriayurvedic.in



Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!