कसंतरी होतंय…..!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
“कसंतरी होतंय” ह्या नावाचा आजार आम्ही शाळेत असताना फारच फोफावलेला होता…. 🥺 ह्या रोगाची लक्षणे साधारणपणे शाळा भरायच्या आधी, साधारण एखादा तास अगोदर होत असत. आणि शाळा भरून एखादा तास झाला की रोगाची लक्षणे आश्चर्यकारक रित्या नाहिशी होत.. 😛
ह्या रोगात रूग्णाला कशानेच आराम पडत नसे. पालकांच्या डोळ्यात आजारासंबंधी थोडा जरी अविश्वास दिसला, 😕तरी लक्षणे भलतीच उफाळून येत.. मग रूग्ण गडागडा लोळूही लागे, मधेच पोट दुखू लागे, कधी भयंकर डोकं दुखे.. रूग्ण पोट दाबून मोठमोठ्याने विव्हळत असे..😨😰🥵🥶😤 डोकं गच्च दाबून उशीत खुपसत असे…
ताप उलट्या अशी दृष्य लक्षणे ह्या रोगात अजिबात नसत.. फक्त आतून दुखणारी लक्षणे.. बहुतेक पालकांना ह्या रोगाची कारण मिमांसा माहीत असे……🙃🙂 पण रोग्याने अजून जास्त आजारी पडू नये म्हणून ते रूग्णापुढे हात टेकत, आणि परवलीचा मंत्र म्हणत.. *”बरं, नको जाऊस शाळेत”*.. बस एवढा मंत्र कानावर पडला की रूग्णाला विंचू उतरावा तसा उतार पडायला सुरूवात होई.. आणि एखाद्या तासात रूग्ण टुणटुणीत होऊन🥳 गावभर उंडारू लागे.. 😳😌😒😞😃🤣🤣
इयत्ता तिसरीत, …….त्या👺 मास्तरच्या भितीने या दुर्धर रोगाने मीही🥺🥺🥺 ग्रस्त झालो होतो…जर शनिवारी सर्व विषयाच्या वह्या तपासनेचा अन सार्वजनिक धुलाईचा😿🏌🤺🥊🌊🌊 कार्यक्रम पार पडत असे… त्यामुळे शनिवारी आजाराचा जोर जरा ज्यास्तच असे…त्यामुळे शाळा बुडवण्याची नोबत येत असे….शनिवारी शाळा बुडवल्या बद्दल सोमवारी मास्तर 😫 कडून फटके ठरलेले असत ….म्हणून सोमवारपर्यंत हा आजार तग धरून असे….😞😔😖😣
हे मास्तर 👺लैच बडवत असत… कोंबडा करायला लावत अन पाठीवर पट्टी ठेवत …पट्टी जर का पडली तर मग अजूनच बदा बद🥊🥊😿 चालू व्हायचं… लैच टेन्शन येत असे…
विशेष राग पोरांवरती असे…वह्या तपासताना पोरगा घाबरून तत… फफ…करू लागला, की हात वरती करायला लावून छडीने पिंढऱ्या शेकल्या जात…🤺🤺😫😭
भयंकर बिकट परिस्थिती होती… 😔😣😖आता ही लिहिताना घाम🥺🥺 फुटतोय…
2 – 3 महिने कसे या😢😭😫🥵🥶 आजारात चाल ढकल करत काढले… ते त्या बाल जिवालाच माहीत….!
त्यानंतर ज्यांचं डॉक्टर👨⚕ होनं थोडक्यात हुकल,🤓 त्या आमच्या कालिदास आप्पांनी इथं मात्र बरोबर निदान केलं…बरोबर दुखती नस पकडली….
मस्तारला प्रेमानं जवळ घेऊन, शालीतून जोडे दिले…. प्रेमाचे चार शब्द सांगितले…. आम्हाला न कळणारं, असं काहीतरी बोलणं उशीर पर्यंत चालू होतं त्यांच्यात….गुरुजी 👿जरा ज्यास्तच Seriously ऐकत होते…
अन त्याच दिवसापासून बाळ सौरभ हा मास्तरांचा लाडका विद्यार्थी बनला..😌
पहिल्या बेंचवर बसून, काही न येता हा बाळ शाबासकी☺ मिळवत असे।।।
P T च्या तासाला बॅटिंग करताना आउट झालाच, तर तो बऱ्याचदा नो बॉल ठरत असे…
वहीच्या 📃📄📝चिटोऱ्या जोडून या लेकराने काय लिहिलंय, हे मास्तर वाचायचा प्रयत्न करत असत…. त्यातलं काही कळू न कळू *छान*👻👻 म्हणायला मात्र गुरुजी 👳कधीच विसरत नसत।।
” एवढं प्रेम का? ” या प्रश्नांन माझ्या सकट, बाकी पोरं बिचारी चक्रावून जात असत।।। त्याचं उत्तर मात्र त्या बालमनाला कधीच नाही मिळालं।।
यातून एक गोष्ट मात्र चांगली झाली…☺☺😊😊त्या दिवसापासून बाळ सौरभच्या या आजारानं पुन्हा कधीच तोंड वर काढलं नाही।।। आणि बाकीच्या पोरांचीही त्या धुलाईतून बऱ्या पैकी सुटका झाली ।।
लागु पडलेला उपचार मंत्र, आप्पांना अन ते मास्तर या दोघांनाच माहीत।।। ती गुप्तता, त्या दोघांनीही आज पर्यंत तशीच जपून ठेवलीय।।। 🤣
आपल्या संस्कृत मध्ये एक श्लोक आहे…,
*लालयेत पंचवर्षाणि, दशवर्षाणि ताडयेत् ।* *प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवत आचरेत् ।।*
वयाची पहिली पाच वर्ष, आपल्या लाडलीला – लाडक्याला लाडाने वाढवावं।। त्याचे ते बाल हट्ट प्रेमाने पुरवावे।। पुढे विशेषतः 7 – 8 वर्षांपासून 15 – 16 वर्ष वयापर्यंत साम – दाम – दंड – भेद या नियतीचा आवश्यकते नुसार वापर करून शिस्त – कर्तव्य – सत्य – न्याय – अन्याय – तत्परता यांची शिकवण द्यावी।। शिस्त शिकवावी।। त्यानंतर वयाची 16 वी पार झाल्यावर त्यांच्याशी मित्रावर व्यवहार चालू करावा।।
वयाची ही पहिली 15 – 16 वर्षे शरीराच्या विकासाची असतातच, पण त्या बरोबर मनाच्या – स्वभावाच्या विकासाचीही असतात।।। इथेच त्याची वृत्ती ठरत असते।।।या बाल अवस्थेतच प्रेम – माया – ममता – आदर – कृतज्ञता – क्षमाशिलता आणि सर्वात महत्वाचा आत्मविश्वास विकसित होत असतो।। त्यामुळे तसे संस्कार याच वयात करावयाचे असतात।।।
आमच्या गावच्या जवळ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मध्ये एक पिटुकलं इंग्लिश कुत्र्याचं पिल्लू आणलेलं।।। त्याला आम्ही दुध भाकरीचा काला करून खायला ठेवायचो।। आणि आधीपासून तिथ असलेली मांजर त्या इवलूश्या कुत्र्याच्या पिल्लाला खेकसून तो काला खाऊन टाकायची।।। बिचारं पिल्लू घाबरून जायचं।।। पुढं सहा महिन्यांनी त्या कुत्र्याच्या पिल्लाची लांबी – रुंदी चांगलीच वाढली।। तो कुत्रा आता रोंड्याच्या रोंड्या झाला।। येणाऱ्या जाणाऱ्याचा ताना काढू लागला।।। भो भो करून लोकांना घाबरवु लागला।।
पण आजूनही ती छोटी मांजरी दिसली, की पायात शेपूट घालून पळ काढतो….!पाक विव्हळल्या सारखा आवाज निघतो त्यावेळी त्याचा।।।
ती लहानपणीची डोक्यात भिनलेली भीती, आजूनही नाही उतरली त्याच्या डोक्यातून।।।।
आपलं ही तसंच आहे।। ते लहानपण अन संस्काराचं वय लै महत्वाचं आहे।। या वेळी भिनलेले संस्कार आयुष्यभर रहात असतात।। म्हणून हेच वय नवी पिढी घडवायला – देश घडवायला जबाबदार आहे।।।
त्या मन विकसित होण्याच्या आवस्थेत मनावर विनाकारण भीतीचं आवरण आलं तर आयुष्य उध्वस्त होऊ शकतं।।। गाडी परत रुळावर आणण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात ।।।
आपल्या पिल्याना संस्कार द्यायला वेळच नाही हो आज लोकांकडे।।। बाळांना पाळणाघरात अन म्हातार्यांना वृद्धाश्रमात ठेवतात ।।। तरुण पणात करिअर नावाच्या वलया मागे नुसतं कुत्र्यासारखे🏃♀🏃 पळतात।।।
थोडं लक्ष घातलं पाहिजे हो आपण यात।।आमच्या आप्पांसारखं असं योग्य निदान करणारे डॉक्टर प्रत्येक बाल मनाला मिळायला पाहिजेत।।। त्यांच्या कोवळ्या मनाला समजुन घ्यायला पाहिजे अन त्यांच्या आत्मविश्वासाची ओळख त्यांना करून द्यायला पाहिजे।।☺🙏🙏🙏
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking