SuvarnaPrasha सुवर्णप्राशन
सुवर्णबिंदूप्राशन
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद शास्त्रानुसार, बाल्यावस्था ही वयाच्या 16 वर्ष पर्यंत असते।। म्हणजे प्रामुख्याने वयाच्या सोळा वर्षापर्यंत बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्वाची असतात।। या काळात बालकाचे शारीरिक व मानसिक पोषणाकडे विशेष लक्ष देणे, त्याच्या शरीरावर – मनावर – बुद्धीवर उत्तम संस्कार होणे गरचेचे असते।।
जन्मापासून वयाच्या सोळा वर्षांपर्यंतच्या काळात विकसित झालेली शरीरयष्टी, बुद्धिमत्ता व रोगप्रतिकारक शक्ती ही त्याचा भविष्यकाळ ठरवत असते।। त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवत असते।।
लहान बालकांमध्ये होणार्या आजारांसाठी दूषित कफ व कृमीं (जंत) हे प्रमुख कारण असतात. तसेच या काळात घेतला गेलेला चुकीचा आहार, लागलेल्या चुकीच्या सवयी या त्याला अनारोग्याकडे घेऊन जात असतात।।
बाल्यावस्थेत व्यवस्थित पोषण न झाल्याने शरीराचे विशिष्ठ अवयव आयुष्यभरासाठी कमकुवत राहिल्याची उदाहरणेही आपल्याला पाहायला मिळतात।। मासिकपाळी वा गर्भाशया संबंधी तक्रारि घेऊन जेव्हा स्त्री रुग्णा क्लिनिकला येतात, त्यावेळी त्यांच्या हिस्टरीमध्ये बऱ्याचदा बाल्यावस्थेतील कुपोषण व दुर्लक्ष झाल्याचे जाणवते।।
आयुर्वेदाच्या आठ शाखांपैकी एक शाखा असलेल्या – कौमारभृत्य चिकित्सेचे चिकित्सक म्हणजेच, आमच्या आयुर्वेदातील बालरोग चिकित्सक म्हणून ख्याती असलेल्या, आचार्य काश्यप यांच्या काश्यप संहितेत बालकाच्या जन्मापासून ते सोळा वर्षांचे होईपर्यन्त त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिकबदल, त्या काळात होणारे आजार व त्यावर देण्यायोग्य चिकित्सा यांचे सविस्तर वर्णन आहे।।
त्याच काश्यपसंहितेत लेहाध्यायामध्ये, सुवर्णप्राशनाचाही उल्लेखही सापडतो।।
” सुवर्णप्राशनं ह्यतन्मेधाऽग्निबलवर्धनम्|
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।।
“मासात् परम् मेधावी व्याधीभिर्न च धृष्यते ।
षडर्भिमासे: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ।।’’
– काश्यपसंहिता
आचार्य काश्यप म्हणतात,
स्वर्णप्राशन हे मेधा (बुद्धि), अग्नि ( पाचन अग्नि) व शरीरबल वाढवणारे आहे. हे आयुष्यप्रद, कल्याणकारक, पुण्यकारक, वर्ण्य (शरीराचा वर्ण तेजस्वी बनवणारे)आहे, आणि ग्रहपीडा दुर करनारे आहे. (योग्य त्या आहारविहाराचे पालन करत) स्वर्णप्राशनाच्या विधिवत नित्य सेवनाने, बालक एक मासामध्ये मेधायुक्त बनतो, विविध रोगांपासून त्याची रक्षा होतो, तर सहा मासपर्यंत नित्यसेवन केल्याने श्रुतधर (एकदा ऐकलेल्या गोष्टी लक्षात ठेवणारा) होतो, अर्थात त्याची स्मरणशक्त्ति खुपच चांगल्या प्रकारे वाढते.
एकूणच आयुर्वेदिक सुवर्णप्राशन औषध हे बलवर्धक, बुद्धीवर्धक, रोगप्रतिकारक शक्तीवर्धक, आयुष्यवर्धक, वर्ण्यकारक व परममेधावी आहे. आकलनशक्ती वाढवणारे आहे.
या सुवर्णप्राशन औषधांची मात्रा (Dose) बिंदू म्हणजे थेंबा (Drop) मध्ये आहे. म्हणून याला सुवर्णबिंदूप्राशन असेही म्हटले जाते.
सुवर्णबिंदुप्राशन औषध हे मतिमंद मुले, बोलणे, ऐकणे व दररोजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मंद असणारी मुले, ऊंची न वाढणारी मुले, वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा इतर तक्रारींनी आजारी पडणाऱ्या मुलांना, आकलनशक्ती, बुध्दीमत्ता कमी असणारी व अंथरूणांमध्ये लघवी करणारी, अशक्त, वजन कमी असणाऱ्या बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे।।
सुवर्णबिंदूप्राशन घटक व निर्माण पद्धती:
ब्राम्ही – मंडुकपर्णी – शंखपुष्पी – वचा इत्यादी 11 औषधी ज्या बालकांचा शारीरिक व मानसिक विकास करण्यास अत्यंत उपयुक आहेत अशा औषधी शुभमुहूर्ताला एकत्र करून, त्या औषधी द्रव्यांच्या सुक्ष्मचूर्णास त्याच्याच स्वरस – काढ्याच्या 11 भावना देऊन चूर्णाची सिद्धी केली जाते. त्यानंतर सिद्ध चूर्णास चरकोक्त चार मेद्य द्रव्यांच्या काढ्याच्या प्रत्येकी 8 – 8 भावना देऊन पुन: सिद्ध केलेले सिद्धचूर्ण, शुद्धसुवर्णभस्म, सहस्त्रपुटी अभ्रकभस्म, कुमार कल्याणक रस आदी द्रव्य एकत्रित करून धी धृती स्मृतीवर्धक सिद्धघृत व मध यांमध्ये विशिष्ठ काळ घोटून संस्कारित सिद्ध सुवर्णबिंदूप्राशन औषधी तयार केली जाते।।
*सुवर्णबिंदूप्राश हे दोन टप्प्यामध्ये दिले जाते*
1) सतत ६ महिने – सुवर्णबिंदूप्राशन Daily/ दररोज ।।
2) दर पुष्य नक्षत्राला – सुवर्णबिंदूप्राशन Monthly/प्रत्येक पुष्यनक्षत्राला।।
“सुवर्णबिंदूप्राशन” औषधी देण्यापुर्वीची तयारी व सुवर्णबिंदूप्राशन औषधी देण्याची पद्धत:
बालकांचे शरीर हे कृमी आणि कफ कारक व्याधींसाठी अधिक पोषक असते।। म्हणून सर्वप्रथम बालकाला कृमींची व दुष्ठ कफाची चिकित्सा करावी।।
त्यामध्ये विडंगारिष्ठ व कृमीकुठार रस ही महत्वाची औषधी ..! तरीही बालकाच्या तक्रारी – प्रकृती – त्याचे सात्म्य – असात्म्य यांनुसार औषधीत बदल करावा लागतो।।
बालकाच्या तक्रारी – वय व वजन यांचा विचार करून, दूषित कफ व कृमी यांचा विचार करून औषधींचा डोस ठरवून तो 7 ते 15 दिवस दिला जातो।।
पुढेही बालकांना तीन महिन्यापर्यंत ठराविक दिवसाच्या अंतराने जंतांचे एखादे औषध पुन्हा रिपीट करावे लागते।। याने कृमींचे व आंत्रात (आतड्यातील) जंतांच्या अंड्यांचे पूर्णतः पतन होते.
सुरवातीची 7 ते 15 दिवसांची कृमी व दूषित कफ यांची चिकित्सा केल्यानंतरच “सुवर्णबिंदूप्राशन “ औषधी द्यावे.
सुवर्णबिंदूप्राशन देताना,
सर्वप्रथम “सुवर्णबिंदूप्राशन Daily/ दररोज ” हे सलग 6 महिने देऊन,
त्यानंतर पुढे बालकाचे वय 12 वर्षे होई पर्यंत,
जर 27 दिवसांनी येणाऱ्या प्रत्येक पुष्यनक्षत्राच्या दिवशी, सकाळी उपाशीपोटी “सुवर्णबिंदूप्राशन Monthly/प्रत्येक पुष्य नक्षत्राला” चा बुस्टर डोस देत राहावा।।
1) सतत ६ महिने – सुवर्णबिंदूप्राशन Daily/ दररोज ।।
ही औषधी बालकाच्या आयु व शरीरभार आदी नुसार दररोज ठराविक मात्रेत (थेंबामध्ये) बालकाला सलग सहा महिनेपर्यंत दिली जाते.
बालकामध्ये काही शारीरिक व मानसिक तक्रारी असतील, तर वैद्यांच्या सल्ल्याने, सुवर्णबिन्दुप्राशन) – Daily/दररोज हे औषध एक वर्षापर्यंतही सलग दिले जाते.
सुवर्णबिन्दुप्राशन – Daily/दररोज हे वयाच्या 7 वर्षाच्या आतमध्ये देणे अधिक फायद्याचे ठरत असले तरीही, त्यात पहिल्या 3 वर्षात अधिक फलदायी असल्याचे पाहायला मिळते.
2. दर पुष्यनक्षत्राला :
सुवर्णबिंदूप्राशन Monthly / प्रत्येक पुष्यनक्षत्राला।।
सलग 6 महिने सुवर्णबिन्दुप्राशन – Daily/दररोज दिल्या नंतर तिथुन पुढे बालक 16 वर्षाचा होई पर्यंत ( किमान 12 वर्षाचा होई पर्यंततरी) जर पुष्य नक्षत्राला विधिवत सुवर्णबिंदूप्राशन Monthly द्यावे.
जर दररोज द्यावयाचे सुवर्णबिंदूप्राशन Daily हे देणे शक्य नसल्यास, कृमींची (जंत ) औषधी देऊन
दर पुष्यनक्षत्राला सुवर्णबिंदूप्राशन Monthly देत राहावे।।
पुष्य याचा अर्थ आहे पोषण. वेदिक शास्त्रात पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हणाले जाते. पुष्यनक्षत्र हे शुभता, शक्ति व ऊर्जा दायक नक्षत्र आहे. या दिवशी केलेल्या कार्यास उत्तम फलप्राप्ती होत असते. पुष्यनक्षत्र एक शुभमुहुर्तही आहे।।
जर 27 दिवसांनी पुष्यनक्षत्र येत असते.
जसे पौर्णिमा – अमावस्याच्या दिवशी जसे चंद्राच्या प्रभावाने पृथ्वीवरच्या समुद्राला भरती – आहोटी येते।। तसाच प्रभाव त्या त्या नक्षत्राच्या दिवशी त्या त्या औषधी वनस्पतींवर – प्राण्यांवरही पडत असतो।।
त्यामुळे काही विशिष्ठ औषधी आम्ही वैद्य विशिष्ठ नक्षत्राला बनवायला घेत असतो।।
विशिष्ठ नक्षत्राला गोळा करतो।।जसे की, पुष्यानुग चुर्ण पुष्य नक्षत्रालाच बनवले जाते, अश्वगंधा वनस्पती पुनर्वसू नक्षत्राला गोळा करतो इत्यादी.
पुष्यनक्षत्राच्या दिवशी नक्षत्राच्या प्रभावाने मेद्य औषधी अधिक प्रभावी कार्य करतात। तसेच या दिवशी आपल्या शरीर व मनाची ग्रहणशक्ति ही सर्वाधिक असते. म्हणूनच बालकांच्या शारीरिक, मानसिक सर्वांगिण विकासासाठी देण्यात येणारे सुवर्णबिंदूप्राशन पुष्यनक्षत्राच्या दिवशी देण्याची रित आहे।।
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे,
प्रत्येक पुष्य नक्षत्राच्या आधी आठवड्याभरात पुष्यनक्षत्राला घ्यायचे सुवर्णबिंदूप्राशन औषधी घेण्यासाठी जेव्हा बालक वैद्यांकडे येतात. त्यावेळी त्याच्यात असणाऱ्या तक्रारी आदींची परीक्षाही होऊन जाते।
त्यानुसार एखादं औषधीही चालू करता येते।।
प्रामुख्याने लहान बालकांमध्ये होणार्या आजारांसाठी दूषित कफ व कृमीं (जंत) हे कारण असतात. त्याचा विचार करून दूषित कफ दोष कमी करणारी व जंत कमी करणारी अशी आयुर्वेदिक औषधी सुवर्णबिंदूप्राशनासाठी आलेल्या बालकांना नियमाने आम्ही देत असतो।।
यामध्ये विडंग – सुंठी – हरिद्रा – यष्टी अशी वनस्पतीजन्य व दुष्परिणाम रहित औषधी असतात.
ही आयुर्वेदिक औषधी ही शरीरातील चयापचय चांगले करून, रोगप्रतिकारक शक्तीला वाढवून, बाहेरून होणाऱ्या व्हायरल बॅक्टरील इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी शरीराला ताकत देत असतात. यामुळे वारंवार आजाराची पडणारी शेम्बडी – मेकडी बाळं सुधरायला लागतात.
आजच्या धावपळीच्या युगात पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नाही।। त्यामुळे त्याच्या पिल्याच्या छोट्या-छोट्या तक्रारी दुर्लक्षित होत राहतात।।
पुर्वी महिन्या – पंधरवड्याला आमचे आजोबा घरातल्या सगळ्यां चिल्यापिल्यांना गोळा करून जंतांची औषध पाजायचे आणि त्यानंतर जुळबाची औषध द्यायचे।।
जेवताना हे नको .. ते नको म्हणालं, ताटात अष्ट ठेवलं… की पाठीत धपाटे मिळायचे।। दूध पिल्यानंतर पेला विसळून प्यायला लावून आम्हाला त्या अन्नाचे महत्व जाणवून द्यायचे।।
या चांगल्या गोष्टी आज कुठंतरी विसरून चालल्या आहेत…!! नकळत आजची बाळं ही खुरवड्यात कोंडुन वाढलेल्या पेगुच्या कोंबडीसारखी पोसली जात आहेत. त्यातून शारीरिक मानसिक व्याधी बाळामध्ये उत्पन्न होत आहेत।। त्या व्याधींची परीक्षा होऊन, आपला बालक कुठे कमी पडतोय, हे ही या सुवर्णबिंदूप्राशनच्या निमित्ताने आम्हा वैद्यांना पाहता येतं।।
म्हणून आपल्या बालकाच्या आरोग्याची कामना करणाऱ्या पालकांनी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्याने, प्रथम सलग 6 महिने दररोज सुवर्णबिंदूप्राशन Daily देऊन, त्या पुढे बालक 16 वर्षाचा होईपर्यंत (किमान 12 वर्षाचा होईपर्यंत तरी) प्रत्येक पुष्यनक्षत्राला सुवर्णबिंदूप्राशन Monthly जरूर द्यावे.
हा माहितीपुर्ण लेख कसा वाटला याबद्दल आपली अमूल्य प्रतिक्रिया लेखाच्या खालील comment box मध्ये नक्की द्या..!
– Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक Contact No. 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Dharmendra mhatre
Great information
Sanjay dhadsul
सुवर्णप्राशन ची माहिती आणि cash ऑन डिलिव्हरी आहे का
shriayurvedic01@gmail.com
First payment then Currier
Pingback: Piles Ayurved Treatment – Aaptshri Ayurveda
Vishal dupade
Excellent and informative blog on suvarnprashan and it increase childrens immunity with physical and mental growth