Blog

नाष्टा सकाळचा…!!

डॉ सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद)

Ayurveda Health Group - Join Free

” सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पिणे त्यानंतर मोठा कप भरून चहा वगैरे आदी पिऊन भूक मारणं किंवा पोहे,इडली डोस वडा हे बाहेरील पदार्थ – खारी,बिस्कीट, टोस्ट यासारखा बेकरी पदार्थ , रात्रीचा परतलेला भात किंवा शिळे, पुन्हा गरम केलेले पदार्थ खाऊन नुस्ती भुक भागवनं…!”

हे चांगलं नसतं आपल्या आरोग्यासाठी।।

सकाळ चा नाष्टा कसा *Like A King हवा।।* एकदम राजा सारखा।।
थोडासाच…!  पण भरपूर Energy देणारा।।सकस।। उत्तम दर्जाचा।। रुचकर।। पाचक।।

जसं की,

-गुळ पोळी तुप।। (सुरळी करून – लहान बाळा सारखं😊)

– गुळ शेंगदाणे कुट टाकून बनवलेली शेंगदाना पोळी- मुठभर  काळे मनुके।।

– तुपात परतलेला खजूर- हाळीवाचा लाडू।- गुळ शेंगदाण्याचा लाडू।।।

– डिलिव्हरी नंतर सुतिकेला दिला जातो तसा खारीक- खोबरं- डिंक आदी टाकून केलेलं 3-4 चमचे सुंठवडा / सारण साजुक तुप टाकून।।

-साजूक तुपातला काजू बदाम टाकून केलेला शिरा।

– दुधात केलेली गूळ खोबरे टाकून भाताची खीर त्यावर साजूक तुप।।

– गरम दुधात भाकरी/ चपाती कुसकरून केलेला दुधकाला

– चपाती कुस्करून तूप साखर टाकून केलेला चुरमा आदी.

असा हवा।।। तो आरोग्यदायी आहे।।बल सांभाळणारा आहे।।।

सकाळच्या नाश्त्याच्या चमचाभर साजूक तुप, लोणी, दूध, गुळ, चार शेंगदाणे किंवा अगदी थोडके ड्राय फ्रुट यांचा समावेश आवर्जून असावा।।

Ayurveda Health Group - Join Free


साजूक तुप म्हणजे दूध- त्यावरची साय – त्याचं दही बनवून – ते घुसळून बनलेल्या ताकावरचे लोणी काढून – ते लोणी कढवुन – ते कढवताना त्यात तुळशीची – नागवेलीची पाने टाकून त्या पासून बनणारे तुप हेच अस्सल साजूक तुप आहे।।।

या एवढ्या संस्कारातून गेलेली मलईच “साजूक तुप” हे नाव प्राप्त करते ।। अन्यथा दुधावरची साय गरम करून बनवलेले तुप हे तुप नाही।। किंवा डेरी मध्ये मशिनद्वारे फॅट वेगळं करून ते गरम करून बनवलेले तुप नाही, डालडाच तो।।

दूध गरम करणे – त्याच्या साय मध्ये विरजण टाकून विरजवने (आंबवणे) – त्याला घुसळून त्याचे लोणी काढून ते विशिष्ठ पद्धतीने कढवणे या पद्धतीने न बनणारेच साजूक तुप ..! बाकी सारे मिथ्या।।

बाकी प्रकारची डेरीची घी खानं म्हणजे शरीरात सामता निर्माण करून अन cholestrol वाढवून आजार वाढवून घेणं आहे … हे लक्षात घ्या।।

(असो, विषयान्तर नको..!)

आमच्या गावाकडचे लोक सकाळीच गरम गरम बनलेलं पोटभर जेवून बाहेर पडतात।। म्हणूनच आरोग्याने मजबूत राहतात.

आम्हीही चुली जवळ आईच्या शेजारी बसून गरम गरम चपाती किंवा भाकरीचा गरम दुधात  केलेला काला मस्त साखर टाकून खायचो।। ती चवच न्ह्यारी।।।

सकाळी पोट मारू नये।। किंवा खायचं म्हणून खाऊ नये।। 
शरीराचं पोषण उत्तम प्रकारे व्हावं ! हा उद्देश ठेऊन खावं।।
रात्रीच खाल्लेलं पचून, मल शुद्धी नंतर सकाळी प्रसन्न वातावरणात पेटलेला भुकेचा अग्नि शरीराचं पोषण करण्यास सर्वधिक सक्षम असतो।।
म्ह्णून सकाळच्या क्षुधेची जाणीव झाल्यास त्याला योग्य त्या सकस आहाराची आहुती द्या।। जेवणावर मन ठेऊन थिऱ्या मनाने अन्न ग्रहण करा।।

बाकी इतर वेळी थोडे फार जिभेचे चोचले पुरवा।। काही प्रॉब्लेम नाही।।।


–  Dr Saurabh B. Kadam

      M.D.(Ayurved), Pune

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व  Blog ला जरूर भेट द्या…



[edgtf_button size=”” type=”” text=”Clinic Consultation Booking” custom_class=””

Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!