आयुर्वेदिक बटवा (भाग 1): शतधौत घृत
(नेहमीच्या वापरातली आयुर्वेदिक औषधी)
शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात घोटून घोटून धुतलेले देशी गाईचे साजूक तुप म्हणजे शतधौत घृत।।
तांब्याचा संस्कार या देशी साजूक तुपावर होत असतो।। एवढ संस्करण केलं जातं की हे तुप आहे हे ओळखताच येत नाही।। पिवळसर साजूक तुपाचं पांढरे शुभ्र मलम तयार होते..!
3 ते 4 आठवडे लागतात हे औषध पुर्ण बनायला ।। गुण वाढवण्यासाठी आणखी ज्यास्त वेळही धावन केलं जातं..!
मोठ मोठ्या आयुर्वेदिक औषधी कंपन्यात आधुनिक यंत्रावर झटपट बनलं जातं, परंतु समांतर वेगानं फिरत राहिल्याने उत्पन्न झालेल्या उष्णतेने याचा शीतगुण तर कमी होतोच पण इतरही औषधी गुणधर्म कमी होतात।।
तांबे धातूची भांडी असणं ही मुख्य बाब असते।। त्यासाठी यंत्रात तांब्याची भांडी करावी लागतात. एवढं कष्ट घेतलेली कोणती औषधी कंपनी माझ्या तरी पाहण्यात नाही…!
शिवाय यासाठी शुद्ध देशी गाईच्या साजूक तुपाची गरज असते. एवढ्या अधिक मात्रेत ते उपलब्ध नाही होत..!
त्यामुळे मनुष्य बळाचा वापर करून हाताने, तांब्याची परात व तांब्याचा तांब्या यांनी पाण्यामध्ये साजूक गाईचे तुप घोटून घोटून 100 वेळा धुतलेलं शतधौत घृत अधिक उत्तम असते।।
शुद्ध आयुर्वेद वैद्यांकडे नेहमी उपलब्ध होतं….
ते गुणांनीही अधिक उत्कृष्ठ असतं।। जादू सारखे result दिसतात त्याचे..।
थंडीत चांगल्या प्रकारे बनतं ।। हा आजवरचा अनुभव आहे।।
काहीही भाजल्यावर,
जळलेलं – पोळलेलं, त्याच्या जखमावर
छान Result आहेत याचे….
स्वयंपाक करताना घरच्या अन्नपूर्णेला काहीतरी पोळनं – भाजनं – चटका बसनं चालू असतं नेहमी….!
कधी तवा पोळतो… तर कधी बोटांना पातेलं भाजतं…. कधी मिक्सर मध्ये गरम गर्गट्टा बारीक करताना अंगावर पडतो…
गरम पाणी पोळतं… कुकरची वाफ लागते…..
या सर्वांना प्रथमोपचार म्हणून शतधौत घृत उत्तम आहे….! मलम लावल्या प्रमाणे याचा वापर करावा…! लौकर बरं होतं…आणि डागही राहत नाही…!
थंडीत त्वचा कोरडी पडणे, रुक्षतेन फाटनं, उलनं, ओठ फुटणे, टाच उलनं…भेगा पडणे यावर कुठल्याही लोशन पेक्षा उत्तमच आहे….!
फिशर, गुद द्वारात आग पडणे/दाह होणं, जळजळणे यासाठी मलमा सारखं लावलं जातं ।।
याच्यात मूळव्याधीवरची औषधी टाकून आम्ही याचे छान मलमही बनवतो…!
नवीन खरचटलेली स्वच्छ जखम असेल तरी ती याच्या वापराने छान भरून येते….
खपली येऊन जखम भरत असताना ती तट तट करते… बाजूलाही खाज उटते …या वेळीही या औषधीचा चांगला उपयोग होतो…!
तसेच न भरणाऱ्या जुनाट जखमांसाठी याच्यापासून मलम बनवला जातो।।
मोठं औषध आहे हे शतधौत घृत।। आयुर्वेदाची देण आहे ही…!
नेहमी घरातल्या औषधी बटव्यात याला स्थान असावं…!
याला expiry नाही…. उलट जेवढं जुने होईल तेवढं याचे गुण वाढतात…. मात्र जुनं झालं की याला वास येतो…यावेळी एक दोन वेळा तांब्याच्या ताम्हणात पुन्हा धावणं करून ठेऊन द्यावं… वास येऊ नये म्हणून सुगंधी अत्तर आदी द्रव्ये देखील यात टाकू शकतो आपण…!
https://shriayurvedic.in/blog/
जय आयुर्वेद..!!!
*Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking