Eating Methods – As per Ayurveda
आयुर्वेदोक्त जेवणाची स्टाईल ।।।
– Dr Shalaka S. Kadam*
B.A.M.S. (आयुर्वेदाचार्य), C. C. Garbhasanskar
एका हातात मोबाईल – कानात हेडफोन अन बाजूला ताट वाटी त्यात खाणं चालू असतं।। ही आजची आमची जेवणाची पद्धत होऊन बसली आहे।।
चहा पित पीत जेवण चालू असतं।। कोण टीव्ही पुढं तर कोण रोल करून चालत चालत खात आपल्या कामाच्या ठिकाणी जाता जाता खाताना दिसतो।। मेट्रो – लोकल ट्रेन पकडण्याची धावपळ खात – खात चालू असते।।
आज काल अशा जेवणाच्या खुप साऱ्या स्टाईल पाहायला मिळतात।।
पण हे अशा स्टाईल ने खाल्लेलं चांगल्या प्रकारे पचते का? याचा विचार मात्र आपण कोणी करत नाही।।
आहार – निद्रा – ब्रह्मचर्या या तीन खांबावर आपलं आरोग्य उभं आहे।। यातला एक जरी खांब मोडला की आरोग्य ढासळायला चालू होतं।।
आयुर्वेदात आहार सेवनाला खुप महत्व दिले आहे।। म्हणून तर आयुर्वेद चिकित्सा घ्यायची म्हणलं की आम्हाला “काय खावं? काय खाऊ नये?” याची पथ्यापथ्य आधी दिसतात।।
अगदी औषधा एवढं महत्त्व आहाराला आयुर्वेदात आहे।।
आहारात काय खावं?, कसं खावं?, कुणी खावं?, केव्हा खावं? आणि का खावं? अशा साऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आयुर्वेदाच्या मुळ ग्रंथात आहेत।।
त्याबद्दलच आपण आज थोडं पाहू…
आपण खाल्लेल्या अन्नात तोंडातली लाळ आणि इतर पाचक रस व्यवस्थित मिसळले, तरच अन्नाचे पाचन योग्य प्रकारे होते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते अन्नावर मन असणे।। म्हणजेच, जेवताना जेवणावर पूर्णपणे लक्ष देऊन लक्षपूर्वक अन्न ग्रहण करणे।।
मन जेवणावर असेल तरच अन्नपचन करनारे स्त्राव नियमित होतात…! या स्रावांच्या स्रावण्यावरच अन्नाचे पचन अवलंबून असते।।
लहानपणी शाळेत – घरी “अन्न हे पुर्णब्रम्ह ” म्हणून बिंबवलं जायचं आमच्या मनावर।।।,
“वदनी कवळ घेता नम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे |
जीवन करि जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह | उदारभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||”
या श्लोक म्हणून अन्नाला नमन करून आपण अन्न ग्रहण करायचो…!
इतरत्र गेलेलं मन त्या अन्नावर एकाग्र करायचो…! आणि मग आनंदाने – श्रीहरीच्या नावे शुद्ध मनाने अन्न ग्रहण करायचो।।।
ही मनाची एकाग्रता आणि शुद्धी शरीरातरले लाळ – जठरातील स्त्राव – यकृतातील पित्त आदी वेगवेगळे स्त्राव सुरळीत करत असते।। आणि त्यामुळे अन्न सहजतेने पचते आणि सहजतेने शरिरात ग्रहण केले जाते।।
अन्न व्यवस्थित चाऊन खाणे आणि ‘मुख- अन्ननलिका – जठर – ग्रहणी – लहान आतडे – मोठे आतडे – मलाशय ‘ या ठिकाणी ठराविक कालापर्यंत अन्न थाम्बुन रहाणे महत्वाचे असते. तरच तेथील स्राव व्यवस्थित स्त्रावतील आणि अन्नात मिसळतील.
जेवणावर मन नसेल तर तोंडात लाळ जमा होत नाही ।। मग बळजबरीने अन्न पोटात ढकलावे लागते।।
आपण जर जेवण करताना अधिक पाणी पिलो, तर अन्न अर्धवट पाचकरसाबरोबर मिसळून वेगाने पुढे जाते. अन्न ओले झाल्यामुले पाचकरस स्त्रावनाऱ्या ग्रंथी स्त्राव करणे कमी करतात किंवा थाम्बवतात. तसेच पाणी मिश्रित झाल्याने पाचकरसही Dilute होतो. आणि त्याची पाचन करण्याची ताकत त्या मानाने कमी होते .
प्रक्टिकली बघायचे असेल तर, कोरडा भाकरीचा तुकडा चघळला , ज्यास्त वेळ चावला तर किती लाळ येते. “रुची ” ही उत्पन्न होते आणि त्याचे पाचनही उत्तम होते.
” बत्तीस वेळा घास चाऊन खावा ! ” हे मोठ्यांचे बोल बहुदा यासाठीच असावेत.
म्हणून, अन्नं व्यवस्थित चावून खाणे.
कडकडून भूक लागल्यावरच जेवण करणे.
थोडी भूक शिल्लक ठेऊन जेवणे. अन्न ठेवलेल्या कढई – पातेल्यातलं संपवायचंय।। या उद्देशाने न जेवता भुकेचा विचार करून जेवावे।।
जेवनापूर्वी आणि जेवनानंतर अर्धा ते पाऊनतास झाल्यानंतरच पाणी पिणेे.
सकस, हलका आणि पौष्टिक आहार घेणे. षड्रसात्मक (सर्व समावेशक) आहार घेणे.
या गोष्टी पथ्य आहेत म्हणजे या गोष्टी आरोग्यासाठी हितकर असून त्या कराव्यात.
तर, भूक मारणे , अधिक उपवास करणे किंवा अति खाणे, अवेळी खाणे, अयोग्य अन्न खाणे (शिळे बुरशीयुक्त आम्बलेले असे), अयोग्य प्रकारे खाणे (विरुद्ध पदार्थ मिसळुन खाणे), पूर्वीची खाल्लेले पचन्यापुर्वीच पुन्हा पुढचा आहार ग्रहण करणे. या गोष्टी अपथ्य आहेत म्हणजे या गोष्टी आरोग्याला अहितकर आहेत, म्हणून त्या करू नये.
– *Dr Shalaka S. Kadam*
B.A.M.S. (आयुर्वेदाचार्य), C. C. Garbhsanskar.
– *Dr Saurabh B. Kadam*
M.D.(Ayurved), Pune
*आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
*Contact no 9665010500/7387793189*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking