*सोशल मिडियावरच्या अर्ध्या #हेल्थ टिप्स*
आज Facebook ,Instagram, YouTube, whats up आदी वेगवेगळ्या सोशल मिडियावर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या अन आयुर्वेदाचा धंदा करणाऱ्या लोकांचे वेगवेगळे आरोग्यविषयक ज्ञान प्रदर्शन चालू असते.
ह्याचा पाला खावा, याचा रस प्या।।
दात घासू नका, तसंच पाणी प्या।
नुसत्या ताकावर रहा…
वगैरे वगैरे गोष्टी सरसकट सर्वांनी करा असे सांगितलं जातं….
जमेल तिथं “असं आयुर्वेदात सांगितलं आहे, असं आयुर्वेद म्हणतो अमुक अमुक ग्रंथात हे सांगितलं आहे….” अशा शब्दांचा वापर करून वेगवेगळे अलंकार वापरून आयुर्वेदाचा धंदा केला जातो।।
हा चुकीच्या पद्धतीने आयुर्वेद सांगणाऱ्या लोकांचे उद्योग आहेत।।
यांना आरोग्यविषयक माहिती म्हणू शकता.. आयुर्वेद म्हणू शकत नाही।।।
Reals – follower वाढवण्यासाठी, advertising साठी हा खटाटोप पाहायला मिळतो….
सांगितलेल्या टिप्स नी फरक नाही पडला तर आमच्या नंबर ला कॉल करा…
भेटायला या… असा उद्योगही चालू असतो…
आणि लोक देखी ज्यास्त विचार न करता हे उपाय करत असतात ..
ज्ञान सांगणारा त्या क्षेत्रातला अभ्यासू आहे का?…. त्याचा अनुभव त्या क्षेत्रात काय आहे…?
आणि त्याने सांगितलेलं ज्ञान सारासार बुध्दीला पटते का?
याची पूर्णतः खातरजमा होणे गरजेचे असते…
पण गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजनची हवा टाकायची की साधी….. इथपासून विचार करणारे लोक… शरीराच्या गाडीत मात्र अर्धवट लोकांनी पाजळलेल्या अर्ध्या ज्ञानाने शरिराची वाट लावत असतात…
रुग्णचिकित्सा करताना असे Reals पाहून ज्यूस पिणारे, 4 -5 लिटर पाणी पिणारे, दररोज वाटी वाटी दही खानारे, रोज 7-8 अंडी फस्त करणारे, थाळीभर कच्च्या भाज्या सल्याड खानारे, वाटी वाटीने बदाम काजू खानारे असे उलटे सुलटे उद्योग करून आजार ओढून घेतलेले खुप रुग्ण येतात…
यांचे प्रयोग पाहून डोक्याला हात लावावा लागतो….
मुळात काय खावं या आधी,
कुणी खावं?
केव्हा खावं?
कसं खावं?
हे आयुर्वेद प्रत्येकाच्या प्रकृती – विकृती नुसार सांगतो..!!
सरसकट सगळ्यांनी हे खा.. ते खाऊ नका असा विषय सगळ्याच गोष्टींसाठी लागू होत नाही.
उदा- टिपिकल पित्त प्रकृतीला देशी लाल लसूण,बिब्बा नाही चालत ।। तर हाच लसूण आणि हाच बिब्बा टिपिकल कफ आणि वात प्रकृतीला रामबाण।।
बटाटा पित्त वाल्यासाठी चांगला आहे , सहज पचतो तर वात कफ दोष वाल्यांना वाल्याना त्रासदायक।।
पूर्वीची ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्लेली शेपूची भाजी बॅलन्स करणारी होती….!
आता फॉस्फेट युरिया टाकून अधिक तीक्ष्ण झालेली शेपू कुणालाच उपयोगी नाही।।
..
अशा प्रकारे व्यक्तीची प्रकृती, त्याला असलेले व्याधी, त्या व्याधीची अवस्था,दोष अवस्था, चालू असलेला काळ, ऋतू आदी सर्वांचा विचार करून औषध आणि आहार घ्यायचा असतो…
पूर्वी घरातल्या आजीला आणि नेंनत्या लोकांना याचे पारंपरिक ज्ञान असायचे…
हे ज्ञान विसरू नये म्हणून या गोष्टी परंपरेच्या रूपाने सणावारात गुंतवून ठेवल्या…
या परंपरा जपल्या जाऊ लागल्या… आणि हा आरोग्याचा ठेवा पिढ्यन्पिढ्या चालू राहिला….
पण पुढे काळानुसार जीवनशैली बदलली…. चांगल्या परंपरा मोडण्याची प्रथा चालू झाली….
पुरणाची पोळी साखरेची पोळी झाली….
तूपा लोण्याची जागा बटर आणि स्वासने घेतली….
आमची शेंगदाण्याची चटणी आता पिनट बटर झाली…..
म्हणून तर चाललेय हे सगळे शरीराचे हाल…..!
त्यामुळेच हेल्थ टिप्स आणि घरगुती उपायांना मोठा वाव आलाय…!!
आपले शरीर आहे.. आपल्यालाच काळजी घ्यायची आहे….
काय खावे.. काय ना खावे.. ठरवता आले पाहिजे…!
कुणाचे ऐकावे… कुणाचे ना ऐकावे… हे आपणच अभ्यासावे लागणार आहे….!!!
देवाचे नाव घेऊन मोठे मोठे बोलणारे… पोपटपंची करणारे …. मी हे केलं .. मी ते केलं.. असे बोलून पुढच्याला भुरळ घालणारे… दारोदारी फिरणारे छद्मचरही आपणच ओळखले पाहिजे….!!!
– *Dr Saurabh B. Kadam*
*M.D. (Ayurved), Pune* *आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सक*
*Mob No. 9665010500*
Consultant Ayurveda Speciality Doctor
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
Consultant Ayurveda Speciality Doctor ,
Healvibe Ayurved Kidney Care Unit, Pimpri Pune 411018
Consultant Ayurveda Speciality Doctor,
Moraya Multi Speciality Hospital, Dapodi pune 411012
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking