ग्रहण आणि त्याचा गर्भावर होणारा परिणाम
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना आहेत. मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये या घटनेला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही ग्रहण काळ हा दुर्दीन म्हणवला जातो।। म्हणून या काळात पंचकर्म – शरीरशुद्धी करणं वर्ज्य आहे।।
जसं पोर्णिमा अमावस्याच्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षनाचा प्रभाव समुद्रावर पडून त्याला भरती – आहोटी येते ।। तसाच काहीसा परिणाम गर्भोदकात स्थित गर्भावरही होत असतो।।
सरकारी दवाखान्यात स्त्रीरोग – प्रसूती विभागात काम करते वेळी, इतर दिवसांच्या मानाने अमावस्या पौर्णिमेला नॉर्मल डिलिव्हरी सर्वाधिक होताना दिसतात।।
पौर्णिमेला चंद्र ग्रहणावेळी चंद्र व सूर्याच्या मध्ये पृथ्वी येऊन ते तिघे एका रेषेत आल्याने वेगळंच चुंबकीय बल तयार होतं।।
तर आमावस्येला सूर्य ग्रहणावेळी पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र येऊन वेगळंच चुंबकीय बल तयार होतं।।
या बदलेल्या चुंबकीय बलाचा परिणाम गर्भावतीच्या शरीरात विकसित होत असलेल्या नाजूक गर्भावर अधिक होत असणार कदाचित ।।।
ग्रहण काळात कोणत्या गोष्टी खाव्यात, काय खाऊ नये, कोणती पथ्ये पाळावीत, याविषयी अनेक समजुती आहेत आपल्याकडे.
विशेष करून गर्भवती महिलांनी ग्रहण काळात करावयाच्या गोष्टींविषयी आपल्याकडे अनेक धारणा आहेत.
गर्भिणीने ग्रहणकाळात नियम पथ्ये न पाळल्यामुळेच एखादी विकृती गर्भास झाली आहे ? की इतर कुठल्या कारणाने झाली आहे ? हे संशोधनाने सिद्ध करणं आजही मोठं अवघड काम आहे ।।
व्यवहारात मात्र, विकृती असलेल्या बालकांच्या आईला गर्भवती काळातला इतिहास विचारला असता, ग्रहणकाळात ग्रहणकाळाचे नियम पालन न केलल्या काही घटना त्या सांगतात।।
माझ्या स्वतःच्या नात्यातली व जवळच्या लोकांची काही उदाहरणेही आहेत।।
माझ्या आजीच्या म्हणण्यानुसार, काही करू नको असे सांगून देखील ग्रहण काळात तिने बसल्याबसल्या कणकेचे गोळे केले होते ।। तेव्हा तिच्या पोटी असलेल्या माझ्या चुलत्यांच्या कानाजवळ कर्णपाली जवळ गोल कनकेच्या गोळ्याप्रमाणे लहान आकाराचा मांसल भाग जन्मतः आहे।। आजही आहे।।
माझ्या चुलत भाऊ पोटी असताना काकी (ग्रहण चालू आहे हे माहीत नसल्याने) सरपण मोडत होती, तेव्हा एक शेवरीची काठी डोक्याने मोडली।।। तर माझ्या त्या भावाच्या डोक्यावर चांगला खड्डा पाहायला मिळतो।।
एका नातेवाईक स्त्रीने गर्भवती अवस्थेत ग्रहण काळात तवा घासला तर त्या जन्मलेल्या बाळाच्या चेहऱ्यावर तसाच मोठा काळा चट्टा आहे।।
आणखी एका स्त्रीने गर्भवती अवस्थेत ग्रहण काळात काहीतरी कापले होते तर तसाच कापल्याप्रमाणे डाग बाळाच्या ओठांवर जन्मतः आहे असं ती सांगते।।।
चित्रविचित्र जन्मखुणा – डाग – चट्टे , शरीरावर कुठेतरी एकाच जागी केसांचा झुपका, फाटलेले ओठ, दुमडलेली कर्णपाली, शरीरावर कुठेतरी कपाळ आदी भागावर खड्डा किंवा जन्मतः मांसल भाग आदी विकृती अनेक बालकांमध्ये पाहायला मिळतात।।
ग्रहणाचा आणि त्या काळात गर्भवतीने केलेल्या गोष्टींशी त्या डाग चट्ट्याचा असलेला संबंध शोधणं हे एक मोठं संशोधन आहे।।
पण अंधश्रद्धा म्हणून हा विषय आम्हा आधुनिक शिक्षित लोकांकडून जाणूनबुजून टाळला जातो।। जुनाट गावठी पारंपरिक बुद्धी असं हिणवुन सोईस्करपणे दुर्लक्षित केला जातो।।
असो।। काय असायचे ते।।
पण स्वतःहून विषाची परीक्षा का घ्यायची…?
असं म्हणून त्या पाच सहा तासांच्या काळात आपण व गर्भावति स्त्रियांनी काही नियम पाळायला काय हरकत आहे…! असं मला वाटतं।।
त्यासाठी आप्तजनांकडून ऐकीव ग्रहण काळात पाळायचे काही नियम मी इथे मांडत आहे…! शक्य त्यांनी त्याचं पालन करावं।।
गर्भवतीने ग्रहण काळ सुरू होण्यापूर्वी एक तास ते ग्रहण काळ संपल्यानंतर एक तासापर्यंतच्या काळात पुढील गोष्टी कटाक्षाने पाळाव्या…!
● ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये. घरामध्ये सूर्यप्रकाश पडतोय अशा ठिकाणीही जाऊ नये।।।
● या ग्रहण काळापूर्वीच खाऊन घ्यावे।।
ग्रहणकाळात शक्यतो काही खाऊ नये.
● ग्रहण काळात गर्भवती महिलेने गाठ मारू नये, कोणतेही कापड पिळू नये.
ग्रहण काळात गरोदर महिलेने कोणतीही वस्तू किंवा भाजी यावेळी कापू नये, चिरू नये. किंवा कोणतीही गोष्ट फाडू नये.
एकूणच, काही कापणे, किसणे,फाडणे, पिळणे, कुरतडणे, टोकरणे, रेषा ओढणे, कान टोकरणे, नखं कापणे- कुरतडणे, भांडी आदी घासणे या क्रिया गर्भवतीने कटाक्षाने टाळाव्यात।।
● ग्रहण काळात हाताच्या मुठी बंद करून बसू नयेत।। हात उघडे ठेवावे।।
● रात्रीच्या ग्रहण काळात झोपावं की नाही त्याबद्दल मतमतांतरे आहेत।।
असेही सांगितले जाते की, यावेळी आळस देऊ नये, कुस बदलू नये तसेच लोळायचं देखील नाही।।
मात्र दिवसा ग्रहण असताना झोपणे – लोळणे पूर्णतः टाळलेच पाहिजे।।
तसंही दिवस्वाप (दिवसाची झोप) आयुर्वेदाला मान्य नाहीच।।
● ग्रहण काळात गरोदर महिलेने शांत बसून नामस्मरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो.
पहिल्या तिमाही – रामरक्षा स्तोत्र
दुसरी तिमाही – विष्णुसहस्त्रनाम
तिसरी तिमाही – हनुमान चाळीसा
यांचे अधिकाधिक वेळा वाचन करावे।।
ज्ञानेश्वरी – भगवत गीतेचे वाचन करावे।।
आपल्या इष्टदेवता किंवा इच्छेनुसार इतरही अध्यात्मिक वाचन करू शकता।।
ग्रहणकाळात साधनेला अधिक महत्त्व आहे. याकाळात आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. एखादा सिद्ध मंत्र – स्तोत्र याचे वाचन करावे।। या काळात जप-जाप करावेत.
● ग्रहणकाळात घरातील पिण्याचे पाणी – लोणचे – वर्षभराचे कुरडई पापड शेवया आदी – दळून ठेवलेली पीठ आदि खाद्यपदार्थांवर तुळशीपत्र ठेवावे.
● ग्रहणकाळात शक्यतो काही खाऊ नये. मात्र, कडाक्याची भूक लागली असेल, घरात आजारी व्यक्ती असतील, महिला गरोदर असतील, काही व्याधी जडलेल्या व्यक्ती थोडेफार अन्नग्रहण करू शकता.
संपूर्ण नियमित जेवण मात्र ग्रहण सूटल्यानंतरच शुद्ध होऊन पूजा अर्चना करून त्यानंतरच करावे.
● ग्रहण संपल्यानंतर घराची स्वच्छता करून पूजा अर्चना करून पुढील कामाला लागावे।।
● ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी शक्यतो कोणतीही गोष्ट शिळी खाऊ नये !!
आजच्या आधुनिक लोकांना किती पटतं न पटतं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा अन विश्वासाचा विषय आहे।।
त्यामुळे आपापल्या सारासार बुद्धिनुसार आपल्याला पटेल त्यानुसार आपण अनुकरण व वर्तन करावे।।
– Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Pingback: गर्भिणी परिचर्या : गर्भिणीचा सामान्य आहार – विहार – Aaptshri Ayurveda