Blog

Migraine Treatment In Ayurved

 मायग्रेन : आयुर्वेदवर्णित रक्तमोक्षण उपचार.!  – स्वानुभव ।।

Ayurveda Health Group - Join Free

– वैद्य मनश्री संतोष इंगळे

मी स्वतः आयुर्वेदाची विद्यार्थिनी असून मायग्रेनने त्रस्त होते. सततच्या डोकेदुखीने त्रस्त, सारखी ठणक आणि डोक्यातील शिरा फणफण करत असल्याने  त्या काढून टाकाव्या की काय अशी भावना होत होती. एवढ्या तीव्र वेदना ..!

Allopathy तील सर्व उपचार,  आधी ENT डॉक्टर, नंतर डोळ्यांचे डॉक्टर,वेगवेगळ्या  नेहमीच्या तपासण्या करून झाल्यानंतर MRI – CT Scan केला – पुढे निरॉलॉजिस्ट डॉक्टरांचे ओपिनिअन पण घेतले – फॉलोअपही दिला. परंतु दोन – तीन प्रकारच्या Painkillers, पित्ताच्या गोळ्या घेऊनही विशेष असा फरक नहूता।।

या सर्वांनी हार मानल्यावर आयुर्वेद उपचार चालू केले..!  पंचकर्म प्लॅन झालं..! विरेचन कर्मातल स्नेहन – स्वेदन  करण्याच्या दिवशी अचानकच मायग्रेनचा तीव्र अटॅक आला. एवढा की आपण कुठे आहोत – काय करतोय याचं ही भान राहिलं नाही.

त्यावेळी सरांनी केलेलं रक्तमोक्षण माझ्यासाठी जादू ठरलं..! रक्तमोक्षण पूर्ण होण्याआधीच वेदनेची तीव्रता कमी होताना दिसून आली. तीव्र शिरःशुल असताना रक्तमोक्षणाने काही सेकंदात जादू झाल्याचा मी स्वतः अनुभव घेतला.
आणि आचार्य सुश्रुतांनी रक्तमोक्षनाला अर्धी चिकित्सा का म्हंटले आहे हे मला त्या वेळी पक्के उमगले.

त्यानंतर नियमित विरेचन पंचकर्म पूर्ण केले. ठराविक काळाने रक्तमोक्षण केल्यानंतर उरलेलं दुखणं पण निघून गेलं. आज त्या दुखण्यातून मी बऱ्यापैकी बाहेर आलेय…! आणि या रक्तमोक्षण चिकित्सेची फॅन झाली आहे.

       रक्तमोक्षण  म्हणजे आपल्या शरीरातील दूषित रक्त जवळच्या मार्गाने शरीराबाहेर काढणे, ज्यास रक्तस्रुती किंवा Blood-letting असेही म्हणतात. रक्तमोक्षणास आयुर्वेदाच्या शल्य चिकित्सेमध्ये अर्धचिकित्सा मानलेले आहे.  रक्तमोक्षणाने रक्ताबरोबर फिरणारे दोष शरीराबाहेर गेल्याने रुग्णास तात्काल उपशय मिळत असतो.

चिकित्सलयात चिकित्सा देतांना रक्तमोक्षण हे अधिकतर करून सिरावेध आणि जलौकावचरण या दोन प्रकारे केले जाते.

सिरावेध म्हणजे आपल्या शरीराची रक्तवाहिनी फोडून रक्त बाहेर काढणे , आणि धबधब्याच्या वाहत्या स्वच्छ पाण्यातील निर्विष जळवा गोळा करून आणून, त्यांच्या साहाय्याने शरीरातील दूषित रक्त काढणे याला जलौकावचरण म्हणतात.
     
          रक्तमोक्षण हे दुष्ट रक्त व पित्त यांमुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधींमध्ये किंवा अशा व्याधींनी ग्रथित रुग्णांमध्ये दोष प्रकोपीत असताना केव्हाही करता येते. तर स्वस्थ (निरोगी) व्यक्तींमध्ये सप्टेंबर/ऑक्टोंबर महिन्यात करावे असे आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे.

वर्षा ऋतुतील दमट हवेमुळे प्रत्येकाच्या शरीरात अम्लता निर्माण होते व सप्टेंबर / ऑक्टोंबरच्या महिन्यात उन्हामुळे ती अम्लता प्रकुपित होऊन तिचे रूपांतरण उष्णतेत होते. ही उष्णता शरीरामध्ये ज्यास्त काळ राहिल्यास अम्लपित्त, कांजण्या, शीतपित्त (Urticaria), कावीळ, डोकेदुखी, केसांचे विकार, नागीण, बेंड येणे (Boils), त्वचेचे विकार उत्पन्न करते.

यासाठीच आक्टोबर हिटच्या काळात (शरद ऋतूमध्ये) ही वाढलेली उष्णता रक्तमोक्षन व विरेचन या पंचकर्म उपचाराच्या साहाय्याने शरीराबाहेर काढून टाकावी. असे जवळजवळ सर्वच आयुर्वेद आचार्यांनी आपल्या ग्रंथात सांगितले आहे.

वरती सांगितलेल्या, रक्तदुष्ट होऊन झालेल्या व्याधीतही रुग्णांना रक्तमोक्षण व विरेचन पंचकर्म केले की लगेचच उपशम मिळाल्याचे दिसून येते.

          जे व्याधी शीत – उष्ण किंवा स्निग्ध – रुक्ष उपचारांनी बरे होत नाहीत ते रक्तदुष्टिमुळे उद्भवलेले असतात. ते रक्तमोक्षणाने शांत होतात. सर्व प्रकारच्या त्वचाविकारामध्ये रक्तमोक्षणाने लक्षणीय फायदा झालेला दिसून येतो.

रक्तदुष्टी अधिक असल्यास वमन – विरेचानाच्या साहाय्याने संपूर्ण शरीराची शुद्धी करून त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने परत परत रक्तमोक्षण करावे लागते. 

Ayurveda Health Group - Join Free

रक्तमोक्षण करताना व्याधिनुरुप, रुग्णाच्या बलानुरुप व दोषांच्या दुष्टिनुसार ज्यास्तीत ज्यास्त 100ml ते 150 ml पर्यंत रक्त काढले जाते. रक्तधातूचे कार्य  जीवनम् । असे सांगितले असल्याने ज्यास्त मात्रेत रक्त बाहेर काढणे आयुर्वेदाला मान्य नाही.

      रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. परंतु  रक्तदान करते वेळी जे 350 ml रक्त घेतले जाते ते आयुर्वेदाच्या दृष्टीने फारच अधिक असल्याने शरीरातील रक्तधातूचा क्षय करणारे आहे.

       अर्धशिशी, अर्धावभेदक किंवा मायग्रेन या नावाने प्रचलित असलेला डोकेदुखीचा हा एक त्रासदायक व रुग्णाला जीवनातून नैराश्यावस्थेत नेणारा व्याधी! सकाळ उजाडली की, जसा सूर्य वर येतो, तसे रुग्ण डोकेदुखीने हैराण होऊ लागतो. दिवसभर तो त्रस्त होतो व सायंकाळनंतर थोडी डोकेदुखी कमी होते. आयुर्वेदात अर्धावभेदक व सूर्यावर्त असे नामाभिधान वेगवेगळ्या लक्षणात सांगितलेले आहे. व्हॅसोग्रेन, मायग्रेनील सारख्या वेदनाशामक गोळ्या वर्षानुवर्षे खात असलेले रुग्ण मी बघितलेत. डोक्यात घण घातल्याप्रमाणे डोके दुखत आहे, अशी तक्रार घेऊन आलेला रुग्ण रक्तमोक्षणानंतर अगदी शांत झोपतो ही अतिशयोक्ति नसून स्वानुभवलेला आयुर्वेद आहे.     

– वैद्य मनश्री संतोष इंगळे



Click here for sharing blog link on your social media

Comments

  • March 13, 2022
    reply
    Prakash Bapurao Bhakare

    We can get healthy life with ayurved only.

  • Ayurveda Health Group - Join Free

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!