Blog

Diffrence between Organic, Desi & Hybrid

देशी, हायब्रीड अन आता चं Organic (सेंद्रिय)

Ayurveda Health Group - Join Free

Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

Organic Food च्या नावे लै मोठा धंदा चालवला आहे आपल्याकडे.!

काहीही Pack करून दिखाऊगिरी करून विकतात राव।।
आणि त्या दिखाव्याला भुलतो आपण, अन आपल्यातलं आरोग्यदायित्व जागृत होतं आणि मग महागडी खरेदी होते।।

पण खरंच हे Organic आहे का? आरोग्यदायी आहे का? याचाही सखोल विचार व्हायला हवा।।। यासाठी आधी ऑरगॅनिक -देशी- हायब्रीड यातील भेद माहिती असणे गरजेचे आहे।

देशी वाण/प्रजाती म्हणजे पृथ्वीवरच्या अनेक रोगराई -प्रलय-भुकंपादी मधुन स्वतःच्या ताकतीवर स्वतःच अस्तित्व राखुन ठेवलेल्या प्रजाती।।

या देशी प्रजातींचे उत्पादन कमी मिळते मात्र कसदार, वैशिष्ट्यपुर्ण चव व उत्तम गुणवत्तेच्या असतात।।।
अशा देशी प्रजातींवर पोसले जाणारे प्राणी पण तशीच रोग प्रतिकारक शक्ती मिळवण्यास व तशीच उत्पत्ती टिकवून ठेवण्यास सक्षम असतात।। सदृढ असतात।।

मनुष्याने हव्यासापोटी हायब्रीडीकरणाच्या संशोधनातून उत्पन्नात वाढ होणासाठी बनवलेल्या हायब्रीड अन्न धान्यात नुसती वाढ करवतो आपण ।। ती हायब्रिडवाढ प्राकृत (Normal) म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार नसते।।

हायब्रीड वाणापासून उत्पादन भरघोस मिळतं, मात्र या मिळणाऱ्या भरघोस उत्पनात तेवढा कसदारपणा नसतो. आपण उत्पादित केलेल्या त्या हायब्रीड प्रजातीचं बी बियाणं पुन्हा शेतात लावल्यावर, त्याला पिक म्हणावं तसं येत नाही आणि हे रोगालाही अधिक बळी पडणारं असतं।।

आजच्या बऱ्याच हायब्रीड प्रजातींना प्रजननाद्वारे स्वतःच्या वाणाचं अस्तित्व तर राखुन ठेवता येत तर नाही, शिवाय रोगराईपासून हायब्रीड पीक वाचवन्यासाठी पिकांना विविध औषधींचे फवारे – खतं यांचा टेकू शेतकऱ्यांना वेळोवेळी द्यावा लागतो ।। 

सध्या सर्वत्र थैमान घातलेल्या प्राणघातक कर्करोगाची व्याख्या, *Uncontrolled, Abnormal and Irregular Growth of any Cells in the Body is called  as CANCER.* अशी  केली जाते।।

आणि हेच हायब्रीड संशोधनातून निर्माण झालेले हायब्रीड अन्न धान्य Cancerous Growth चे मुख्य कारण आहे, जे आयुर्वेद चिकित्सेच्या “सामान्य विशेष सिद्धांत” या मुल सिद्धान्तानुसार सिद्ध होतंय!!

आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही मूलतः आयुर्वेदाच्या पर्यायानं निसर्गाच्या मुल सिद्धांतावर आधारलेली आहे.  असे सिद्धांत की, जे हजारो वर्षांच्या अनुभवातून – अभ्यासातून अन ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनांतून सिद्ध झालेले आहेत। इतके सिद्ध की हे सिद्धांतच अंतिम सत्य आहेत।।। 
 

बाकीच्यांसारखे जर पाच – दहा वर्षाला यांचे Parameter नाहीत बदलत।।।

मागचं संशोधन खोटं होतं – आताचं खरं आहे।। आता हे फॉलो करा।। असे फसवे अन वारंवारचे वटहुकूमही इथं येत नाहीत।।

Ayurveda Health Group - Join Free

आयुर्वेदाच्या या मुलसिद्धांतांना आतापर्यंत कुणीच चॅलेंज नाही करू शकलं, आणि कुणी करणार ही नाही, एवढे पक्के आहेत हे सिद्धांत।। या सिद्धांताला धरून केलेली आयुर्वेदाची चिकित्सा कधीच फोल जात नाही।।

आयुर्वेद चिकित्सेच्या या अनेक मुल सिद्धांतांपैकी एक सिद्धांत,
सामान्य विशेष सिद्धांत…,

सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणम्| ह्रासहेतुर्विशेषश्च, प्रवृत्तिरुभयस्य तु||- (च. चि. सु. 1/44)
 

याचा अर्थ सोप्या भाषेत,
द्रव्य – गुण – कर्म यांनी शरीरभावांशी समानता असलेल्या आहार विहारादीचे आपल्याकडून सेवन झाले तर त्या समान शरीरभावांची शरीरात वाढ होते. 
तसेच जर शरीरभावांच्या द्रव्य – गुण – कर्म यांनी विरुद्ध असलेल्या आहार विहारादीचे  सेवन झाले तर त्या शरीरभावांचा नाश होतो।।।

उदा. अधिक मांस खाल्लं तर शरीरातील मांस धातूची वाढ होते, तर थंड पदार्थ खाऊन गुणांनी थंड( शीत) असलेला कफ  वाढतो, उष्ण खाऊन उष्ण गुणांचे पित्त वाढते, उष्ण उपचारांनी शित गुणात्मक कफ कमी होतो इत्यादी.

संशोधनातून उत्पन्नात वाढ करण्यासाठी बनवलेल्या हायब्रीडीकरणातून अन्न धान्याच्या संख्या आकार आदीमध्ये नुसती वाढ करवतो ।। जी विकृत असते।।

सामान्य विशेष सिद्धांतानुसार, अशी हायब्रीडीकरणातून विकृत वाढवलेली अन्नधान्य फळे भाज्या खाऊन, तशीच विकृत वाढ करण्याची प्रवृत्ती आपल्या शरीरभावात किंवा Cells मध्ये निर्माण होते।। आणि त्याच प्रवृत्तीतून शरीर पेशीत – ग्रंथीत झालेल्या विकृत वाढीलाच आपण कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो।।

प्लास्टिक – तंबाखू – गुटखा – दारु आदी कारणं शरिरातील पेशींना Irritating करून Cancerous Growth ला प्रवृत्त करणारि – मदत करणारी आहेत। पण Cancerous Growth चं मुळ कारण मात्र विकृत हायब्रीड अन्न धान्यच आहे।।। । 

Organic Food साठी लावलेल्या अन्नधान्यफळे यांच्या प्रजाती बऱ्याचदा ह्या हायब्रीड प्रजातीच असतात।। चमक असते।। आकर्षक पॅकिंग असतं।। केमिकल फ्री आहे असं वारंवार सांगितलं जातं।।

खरं तर प्रदुषित हवा पाण्यातून केमिकल मिळतच असतं शिवाय वरून टाकणारं केमिकल जरी थांबवलं तरी पुर्वीच्या पिकांवेळी मातीत टाकलेल्या केमिकल चे अंश असतातच मातीत।। 

म्हणुन 4 – 5 वर्ष ऊन वारा पाऊस खात पडीक असलेल्या जमिनीत कुठलंही केमिकल न टाकता/ न फवारता पिकवलेलं पिक हे Organic म्हणुन ग्राह्य  धरलं जातं ।। 

पण आपल्याकडे खोटी कागदं मिळवणं ही ज्यास्ती अवघड नाही।। थोड्याश्या वाम मार्गाने लगेच मिळुन जातात।। आणि त्या कागदाच्या जोरावर Organic चा धंदा तेजीत चालताना दिसतोय।। 
(प्रत्येकजण खोटा उद्योग करतो असं नाही।। प्रामाणिक पणे करणारे ही भरपुर आहेत, पण पडताळणी करणं फारच कठीण आहे।।) 
 

तर मुळविषय म्हणजे, Organic Food पेक्षा आधी “देशी वाणांचं” अन्नधान्य फळभाज्या खाणं ज्यास्ती आरोग्यदायी आहे.! ही खरी गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी।। म्हणजे Organic Food चांगल आहे पण त्याहुन अतिउत्तम, “देशी वाणाचे” अन्नधान्य आहे !!!

म्हणुन, Organic Food चा आग्रह धरण्या आधी देशी Food चा आग्रह धरा।।।

देशी आणि Organic ही असेल तर मग, *”अलभ्य लाभ..!”*

मान्य आहे, सध्या देशी वाणाची उपलब्धता खुप कमी आहे.  पण उपलब्ध देशी उत्पादनाचा योग्य मान राखला, त्या अस्सल आरोग्यदायी सोन्याला योग्य दर दिला, मागणी वाढवली तर उत्पादन केलं जाऊन पुरवठाही नक्कीच वाढेल! यात शंका नाही।।

  Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व  Blog ला जरूर भेट द्या…

https://shriayurvedic.in



Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!