Blog

Brack Fast

नाष्टा सकाळचा…!!

Ayurveda Health Group - Join Free

Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

सकाळी तांब्याभर पाणी, मोठा कप भरून चहा वगैरे आदी पिऊन भूक मारणं किंवा पोहे,इडली डोस वडा हे बाहेरील पदार्थ – खारी,बिस्कीट, टोस्ट यासारखा बेकरी पदार्थ , रात्रीचा परतलेला भात किंवा शिळे, पुन्हा गरम केलेले पदार्थ खाऊन नुस्ती भुक भागवनं…,
हे चांगलं नसतं आपल्या आरोग्यासाठी।।
सकाळ चा नाष्टा कसा *Like A King हवा।।*
एकदम राजा सारखा।।
थोडासाच…!  पण भरपूर Energy देणारा।।सकस।। उत्तम दर्जाचा।। रुचकर।। पाचक।।

जसं की,-गुळ पोळी तुप।। (सुरळी करून – लहान बाळा सारखं😊)- गुळ शेंगदाणे कुट टाकून बनवलेली शेंगदाना पोळी- मुठभर  काळे मनुके।।- तुपात परतलेला खजूर- हाळीवाचा लाडू।- गुळ शेंगदाण्याचा लाडू।।।- डिलिव्हरी नंतर सुतिकेला दिला जातो तसा खारीक – खोबरं- डिंक आदी टाकून केलेला 3-4 चमचे सुंठवडा साजुक तुप टाकून।।-साजूक तुपातला काजू बदाम टाकून केलेला शिरा।- दुधात केलेली भाताची खीर त्यावर साजूक तुप।।- गरम दुधात भाकरी चपाती कुसकरून केलेला दुधकाला- चपाती कुस्करून तूप साखर टाकून केलेला चुरमाआदी.
असा हवा।।। तो आरोग्यदायी आहे।।बल सांभाळणारा आहे।।।
*(तुप म्हणजे अस्सल देशीगाई चं दूध- त्यावरची साय – त्याचं दही – ते घुसळून लोणी अन ताक – ताक कढवुन त्या पासून बनणारे तुप हेच तुप आहे।।। या पद्धतीने न बनणारे बाकी सारे मिथ्या।।)*

आमच्या गावाकडचे लोक सकाळीच गरम गरम बनलेलं पोटभर जेवून बाहेर पडतात।।
आम्हीही चुली जवळ आईच्या शेजारी बसून गरम गरम चपाती किंवा भाकरीचा गरम दुधात  केलेला काला मस्त साखर टाकून खायचो।। ती चवच न्ह्यारी।।।
सकाळी पोट मारू नये।। किंवा खायचं म्हणून खाऊ नये।। 
शरीराचं पोषण उत्तम प्रकारे व्हावं ! हा उद्देश ठेऊन खावं।।
रात्रीच खाल्लेलं पचून, मल शुद्धी नंतर सकाळी प्रसन्न वातावरणात पेटलेला भुकेचा अग्नि शरीराचं पोषण करण्यास सर्वधिक सक्षम असतो।।
म्ह्णून सकाळच्या क्षुधेची जाणीव झाल्यास त्याला योग्य त्या सकस आहाराची आहुती द्या।।
बाकी इतर वेळी थोडे फार जिभेचे चोचले पुरवा।। काही प्रॉब्लेम नाही।।।
–  Dr Saurabh B. Kadam

      M.D.(Ayurved), Pune

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व  Blog ला जरूर भेट द्या…



Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!