Precautions During Menstruation
रज: स्वला !!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
जसं चिमणी अंड देण्याच्या आधी त्यासाठी छानसं घरटं बनवते। आणि मग त्यात अंड देते। ते ऊबऊन त्यातून पिल्लं बाहेर येऊन – जोपर्यंत त्यांच्या पंखात बळ येत नाही, तोपर्यंत त्यांचं पालन करते।।।
अगदी तसंच घरटं स्त्रीच्या गर्भाशयात तयार होत असते।। शुक्रशोणीत संयोगाने निर्माण होणाऱ्या गर्भाच्या पालन पोषणासाठी।।।
जोपर्यंत बाळ पहिला श्वास घेत नाही, तोपर्यंत हे गर्भाशयातील घरटं गर्भाची काळजी घेत असतं।। मातेच्या नाळे द्वारे त्याचे पोषण करत असतं।।
साधारणतः वयाच्या 12 ते 14 व्या वर्षी स्त्री शरीर प्रजनन करण्यायोग्य झालं की हे घरटं प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयात बनण्याची सुरवात होते ।।
पण जर स्त्रीच्या शरीरात हे घरटं बनलं आणि शुक्र (पुरुष बीज) – शोणित (स्त्री बीज) यांचा संयोग झालाच नाही।। किंवा काही कारणास्तव गर्भाची निर्मिती झालीच नाही तर,
हे गर्भ पालनासाठी बनलेलं घरटं ( बनलेल्या गर्भाला धारण करण्यासाठी बनलेली रचना) साधारण 26 ते 28 दिवसानंतर योनीद्वाराद्वारे शरीरा बाहेर टाकली जाते।।आणि ह्यालाच आपण मासिक धर्म म्हणतो।।। आणि त्या तीन ते पाच दिवस ती स्त्री ही रज:स्वला असते।।
जशी एखादी जखम झाल्यानंतर रक्तस्त्राव होतो, तसंच गर्भाशयातली ही रचना शरीरापासून अलग होऊन रक्तमिश्रित विशिष्ठ स्त्रावाबरोबर शरीराबाहेर पडत असते।।।
या स्त्रावाबरोबर स्त्री शरीरातील वाढलेले दोष ही शरीराबाहेर जातात. आणि स्त्री शरीराची शुद्धी होत असते।।
जसे नदी वाहल्याने शुद्ध होते, (नदीत पाणी साचून राहिलं तर ते दुषित होते) त्याच प्रमाणे नारीचे शरीर या मासिक स्त्रावाने शुद्ध होते।। वाढलेले दोष शरीराबाहेर पडल्याने अनेक व्याधींपासून ती दुर राहते।।
या मासिक स्रावाच्या 3 ते 5 दिवसांच्या काळात स्त्री शरीर दुर्बल झालेले असुन अंगमर्द – पाठदुखी – ओटीपोटी दुखणे – हातपाय दुखणे तसेच बऱ्याचदा ज्वर (ताप) ही लक्षणे असतात। म्हणुन या काळात पुरुषांच्याबरोबरीने धावण्यापेक्षा सक्तीची रजा स्त्री शरीराला आवश्यक असते।।।।
या काळाला रज:स्वलेने कायिक – वाचिक – मानसिक अशा तिन्ही प्रकारे विश्रांती घेणे अपेक्षित असते।।
म्हणजे कुठलेही शारीरिक श्रम कष्ट करू नये।। ऊन वारा पाऊस यापासून दूर राहावे।। प्रवास टाळावा।। शरीरालाही पचण्यास हलका असा आहार घ्यावा।। विश्रांती घ्यावी।।
कदाचित याचसाठी धर्माची अन रूढी परंपरांची जोड देऊन, रज:स्वला स्त्रीला पूर्वी स्वयंपाक आदी कार्यापासून दुर ठेवले जात असावे।। हा चार दिवसाचा मानसिक व शारीरिक आराम तिला पुढचा महिना पूर्ण उत्साहाने काम करण्यास बल देणारा ठरतो।।
परंतु, आजच्या TV वरच्या जाहिराती बघत, अन त्यानुसार,
‘दुनिया करेंगे मुठ्ठी में’ म्हणत, जर रज:स्त्राव होत असलेल्या काळात शारीरिक व मानसिक कष्ट घेतले तर शरीराचा क्षत होऊन अनेक आजारांचे कारण बनु शकते।।।
आज वाढलेले वंध्यत्व – मासिक पाळी संदर्भातील तक्रारी – PCOD किंवा PCOS, अतिस्त्राव झाल्याने होणारी शरीराची अति झीज किंवा अल्पस्त्राव झाल्याने शरीरात साचून राहिलेले टाकाऊ पदार्थ हे अनेक आजारांचे कारण बनत आहेत।। याशिवाय पुढे बनणाऱ्या गर्भावरही याचा परिणाम दिसतो ।
येणाऱ्या गर्भासाठी जर गर्भाशयात योग्य असं घरटंच नाही बनलं, तर त्या पिल्याचं पालन पोषण उत्तम कसं होईल??
मग असं अर्धवट पालन पोषण झालेली बालकं काहीतरी व्यंग घेऊन जन्मतात।।
”बाळाच्या हृदयाचे ठोके फार कमी होते किंवा लागत नहुते म्हणून खाली केलं” हे कारण बऱ्याचदा ऐकायला मिळतंय सध्या।।।
हे अर्धवट बनलेलं घरटं योग्य दिवस भरल्यानंतर त्या गर्भाला गर्भाशयाच्या बाहेर टाकण्यासही (नॉर्मल डिलिव्हरी करण्यास) सक्षम असत नाही।।
त्यामुळे सध्या बऱ्याच अंशी वाढलेल्या सिझेरियन सेक्शनचे कारण ही हेच आहे।। घरटं कमकुवत असल्यामुळं फार लौकर जन्मतात बाळं ।। अन जन्मानंतरही काहीतरी दुखणं खुपनं चालूच असतं ।।
साधारण वयाच्या चाळिशीनंतर मासिकपाळी थांबायच्या काळात ही रजस्वला परिचर्या पालन न करणाऱ्या स्त्रियांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागते।। तसेच स्तन गर्भाशयात गाठी – ग्रंथी होणं हे विकार उद्भवतात।।।
हे सर्व टाळण्यासाठी, आतापासूनच आवर्जून काळजी घ्यायला शिका।।
Manustral Cycle Date च्या 4 दिवस आधी पासून पाठीला पोटाला साध्या कोमट तेलाने हलक्या हाताने मालिश करा।।Cycle चालू झाल्यावर तेलाची मालिश थांबवावं।।
त्या काळात चांगला आराम करा।। शक्य तेवढी कामं पुढे ढकला।। धावपळ करू नका।। मानसिक व शरीरीक आराम घ्या।। गरम पाणी आणि हलका आहार घ्या।।
शक्य असल्यास, वर्षा – दोन वर्षाला तज्ञ आयुर्वेद वैद्यांच्या सल्याने व त्यांच्या मार्गदर्शना खाली विरेचन – योग बस्ती ही पंचकर्म करून शरीरशुद्धी करावी ।
रज:स्वला हा स्त्रियांच्या शरीराचा धर्म असून, त्या 3 – 4 दिवसात नेहमीच्या कामातून निवृत्त होऊन शारीरिक व मानसिक विश्रांती घेणे आणि होणाऱ्या स्त्रावाला कोणताही अडथळा न करता सुखपूर्वक तो बाहेर पडू देणं अत्यंत गरजेचे असते।।।
खरं तर ही 3 -4 दिवसांची स्त्रीची हक्काचीच रजा असते।।। या काळात तिने रजा घेणे हे तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असते।। ही हक्काची रजा प्रत्येक स्त्री ने घेतलीच पाहिजे।।।
याशिवाय, आयुर्वेद वैद्यांनी बनवलेला : शतावरीच्या मुळातील नाळ काढलेल्या शतावरीचा खाडीसाखरेत बनवलेला शतावरी कल्प अर्ध कप दुधातून आवर्जुन घ्या।। अशा प्रकारे बनवलेला शतावरी कल्प हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी साक्षात अमृत आहे।
आहार बनवताना लोखंडी तवा, लोखंडी उलताने, लोखंडी कढई, लोखंडी खलबत्ता या गोष्टींचा आवर्जून वापर करा।।
घरातील कुकरचा वापर शक्यतो टाळा।। पॅक अवस्थेत वाफेच्या प्रेशरवर अन्न वाफेने फुलते (शिजत नाही) हे पचायला अधिक जड होते, शरीरात जाऊन शरीराला अजूनच फुगवते. म्हणून उघड्या पातेल्यात शिजलेला भात – डाळ – भाजी आहारात घ्या।।
शक्य असल्यास साध्या घाण्याचे तेल, सैंधव मीठ, गुळ , दह्या पासून काढलेले लोणी कढवून बनलेल्या साजूक तुपाचा आहारात समावेश करा।।
बाकी फळे खा किंवा न खा .. परंतु काळे/पिवळे मनुके – डाळिंब – ओले/सुके अंजीर – खारीक/खजूर – आवळा या पाच फळांचे आवर्जून सेवन करत राहा।। कारण फळे vit C, लोह, calcium यांनी भरलेली आहेत. Covid लाटा सोसलेल्या आम्हाला यांचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही।।
आपल्या तक्रारी नुसार जवळच्या आयुर्वेद तज्ञांच्या सल्याने आयुर्वेद अवलंबवा।। युट्यूब – फेसबुकवर – व्हॉटस अप – इंस्टाच्या टिप्स वाचून अर्धवट ज्ञानाने स्वतः च्या शरीराची प्रयोगशाळा करू नका।।
या माहितीपूर्ण लेखाला आपली प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका।। धन्यवाद।।
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500/7387793189
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी, माहितीपर लेख मिळवण्यासाठी आमच्या
*”AYURVED (आयुर्वेद)”*
Chanal Link:
https://t.me/shriayurvedic
या टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा।। आमची Website व Blog लाही जरूर भेट द्या…!
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Vd. Dilip Gadgil
Good. Please add natural/ organic diet.
Snehal Kale
Khup chhan lihilay.
Dr.Dharini Oza
Very good information…for common people also…