!! वृक्षायुर्वेद !!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
जसे माणसांसाठी आयुर्वेदात ‘अष्टांगायुर्वेदाच्या’ रूपाने वेगवेगळया आजारांवर चिकित्सा सांगितली आहे, तशीच चिकित्सा इतर प्राण्यांवरही सांगितली आहे.त्यावर ग्रंथही आहेत.
जसे हस्त्यायुर्वेद …या मध्ये हत्तीला होणारे आजार व चिकित्सा वर्णन केली आहे. याच प्रमाणे अश्वायुर्वेद, गवायुर्वेद इत्यादि.
याच प्रमाणे वृक्षायुर्वेद नावाच्या आयुर्वेदच्या विभागात वृक्ष वनस्पतींना होणारे आजार व चिकित्सा सांगितली आहे. त्यांची वाढ पोषण आदींची माहिती वर्णली आहे. वनस्पतींवर करावयाचे विविध उपचार , विविध औषधी वर्णन केल्या आहेत.
या ‘वृक्षायुर्वेदालाच’ आज आपण ” सेंद्रिय शेती ” या रुपात पाहतो आहे.
अशाच माझ्या एका मित्रांनी सांगितलेला सेंद्रिय शेतीतिल एक फॉरर्मूला मी तुम्हाला सांगू इच्छितो…,
” दशपर्णी अर्क “
काय आहे दशपर्णी?
दशपर्णी हा नावाप्रमाणे 10 वनस्पतींच्या पानांचा अर्क आहे. पण सोबतच गोमूत्र, मिरची, लसूण हे पण आहे. या 10 वनस्पती मिळाल्या तर उत्तम, नाहीतर मिळतील तेवढ्या घेऊ शकतो. वनस्पती निवडताना काही मूलभूत गोष्टी समजल्या तर तुम्ही फॉर्म्युला बदलू पण शकता.
वनस्पती निवडताना :
1. जनावरे ज्याला तोंड लावत (खात) नाहीत.
2. ज्याला उग्र वास किंवा चव आहे.
3. ज्याचा रस / चीक जहाल आहे . विशेषत: दुधाळ चिकाच्या वनस्पती निवडाव्या.
फॉर्म्युला :
वनस्पती खालील प्रमाणे:
कडुनिंब (निम्ब), घाणेरी (टनटणी), निरगुडी (निर्गुण्डी), पपई (एरंड कर्कटी), गुळवेल(गुडूची), पांढरा धोतरा(श्वेत धत्तूर), रुई(अर्क), लाल कण्हेर (रक्त करवीर), वन एरंड (चंद्रज्योत), करंज ,सीताफळ इत्यादींची पाने.
या १० मिळत नसतील तर रानतुळस, तंबाखू या अशा वनस्पती पण वापरता येतील.
अर्क बनविण्याची पद्धत:
नीम 5 किलो आणि अन्य पाने 2 किलो प्रत्येकी घेऊन त्यात दोन किलो हिरवी मिरची ठेचा + पाव किलो लसूण ठेचा + तीन किलो गावरान गाईचे शेण + पाच लिटर गोमूत्र घ्या.
एका ड्रममध्ये १०० लिटर पाण्यात हे मिश्रण एकत्र करावे.हे मिश्रण दररोज दिवसातून दोन वेळा चांगले ढवळावे.४० दिवस सडू द्यावे, की झाला तयार दशपर्णी अर्क…!
एखादा पदार्थ सडु देऊन आपण औषधी बनवितो, याला आयुर्वेदात “संधान प्रक्रिया ” असे म्हणतात. त्याचेही पुढे आसव(मद्य) व कांजी हे प्रकार होतात. उपरोक्त ‘दशपर्णी अर्क’ हा ‘कांजी संधान’ प्रकारात येतो.
दशपर्णी अर्क तयार झाल्यानंतर यापैकी ५ लिटर द्रावण २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दशपर्णी अर्काने विविध आळ्यांचा बंदोबस्त उत्तम प्रकारे होतो. अनेक प्रकारची किड ,बुरशी, जंतु संसर्ग घालवतो. बाकीची माहिती कृषितज्ञच सांगतिल.
सर्वात महत्वाचे म्हणजे, या प्रकारे उत्पन्न पिक हे रासायनिक जन्तुनाशकांमुळे शरीरावर होणाऱ्या विषारी परिणामापासून मुक्त असते. ते रासायनिक जन्तुनाशकाप्रमाने आपल्या शरीरावर विषारी परिणाम करत नाही.
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking