Fat loss
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
।। स्थौल्य : दिवसेंदिवस वाढता घेर…!!!
वाढलेला घेर आणि वजन कमी करताना मनाचा पक्का निर्धार व त्यावर काम करण्याची तत्परता ही सर्वात महत्वाची असते. तो असेल तरच आपलं वजन कमी करतं।।
या कामात चालढकलपणा, आळस अन दोन – चार दिवसापुरता उसना उत्साह कामाचा नसतो…!!
अंगाचा घेर वाढल तसे शरीर आजारांच्या वाढीला पोषक बनायला लागतं. अशा वाढलेल्या घेरात आजार सहज प्रवेश करतात।। आणि मग आजाराला आजार लागत जातात।।
आधी आळस, शरीराचा जडपणा, झोपून राहावेसे वाटणे चालू होते, पुढे शरीर दौर्गंध, थोड्याश्या कष्टाने थकवा – दम लागणे- दौर्बल्य येतं। रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते. पुढें जाऊन याचाच परिणाम म्हणून पुढे डायबेटीज, थायरॉईड, हायपर टेंशन (हृदयरोग), त्वचारोगाची पुर्वरूपे दिसाय लागतात.
अतिस्थौल्य ही आजची खुप मोठी समस्या आहे आधुनिक जीवनशैलीने जगणाऱ्या जगापुढे….!
जवळजवळ सर्वच वयोगटातील लोक या अतिस्थौल्याच्या समस्येने त्रस्त आहेत।।।
त्याची कारणेही भरपूर आहेत।।
बदलती जिवशैली, हायब्रीड व अयोग्य खाणं अन व्यायामाचा आभाव ही प्रमुख करणं यामागची।।
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कमरेचा घेर वाढलेल्या व्यक्तींन मध्ये मेद संचितीच्या कारणानुसार प्रामुख्याने दोन प्रकार पडतात,
1) मेद वाढवणारे हेतूंचे अधिक सेवन केल्याने येणारे स्थौल्य
2) दुष्ट वातामुळे मेदविकृती होऊन होणारे स्थौल्य
या दोन्ही प्रकारच्या स्थौल्याची चिकित्सा ही अतिशय भिन्न भिन्न आहे।। सगळयाचं स्थौल्याची चिकित्सा एकसारखी नसते।।
रुग्णांचा पुर्व इतिहास व्यवस्थित घेऊन,
व्याधींचं कारण व्यवस्थित शोधून त्यानुसार त्याची योग्य ती चिकित्सा करणं हे वैद्यांचं काम असतं।। व्याधींचं कारण शोधणं चुकलं तर चिकित्साही चुकत जाते।।
1) मेद वाढवणारे हेतूंचे अधिक सेवन केल्याने येणारे स्थौल्य :
सुखासिनता – आयशो आराम जीवन पद्धती – शारीरिक कष्टाच्या कामाचा तसेच व्यायामाचा आभाव – बैठे काम – दिवसा झोपायची सवय – बेकरी, पिष्टमय, गोड व मैद्याचे – तयार आट्याचे पदार्थ अधिक खाणे, दुध – तुप अधिक खाण्यात असणे याने मेदाची वाढ होते. वाढलेला मेदाने विकृत झालेला वात अधिकाधिक अग्नी (भुक) वाढवतो आणि लागलेल्या भुकेला शांत करण्यासाठी अधिकाधिक आहार घेतला जातो।। आणि त्यातून आधीच खदाड असलेला मेद धातू फोफवाय लागतो आणि अंगी स्थौल्य येते।।
आमच्या आयुर्वेदानुसार विचार करता, मेदस्वी आहार विहाराने आलेल्या स्थौल्यवर आहार विहार – व्यायाम – पंचकर्म – औषधी या चार गोष्टी समान रित्या काम करतात ।।।।।
यातल्या प्रत्येक गोष्टीला समान महत्व आहे।। या चारी मिळून निश्चितच अतिस्थौल्य कमी करतात।।
यात सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे ‘अंगी जडलेला आळस’..!
तो एकदा निघाला आणि वैद्याने सांगितलेल्या गोष्टींचं पालन काटेकोरपणे झालं तर जाडी निश्चितच कमी होते।।
या स्थौल्यावस्थेत बरेच लोक स्वतः च पुर्ण उपवास करतात किंवा खाणं फारच कमी करतात. पण त्याने शरीराला रुक्षत्व येऊन शरीरातील वात वाढून अस्थी – मज्जा (मेंदू व मज्जा पेशी) – ओज यांचा नाश व्हायला लागतो।। आणि त्यातूनच कोलायटिस (आतड्याला उल्सर होणं), कंपावात, संधीगत वात आदी भयंकर व्याधी जडायला लागतात।।
आहार ठरवताना रुग्णाच्या अग्नीचा विचार सर्वात महत्वाचा आहे. अग्निची अवस्था – लागणारी भूक यांचा विचार करून आहार ठरवावा लागतो. वेळोवेळी बदल करावा लागतो.
व्यायाम करतानाही टप्याटप्याने वाढवत जावं लागतं।। स्थौल्य असताना हृदयावर शरीरक्रियेचा विशेष ताण वाढलेला असतो. त्याचा विचार करून व्यायाम ठरवावा लागतो. या प्रमुख पथ्यांच्या जोडीला मेद फोडणारी व वात कमी करणारी आयुर्वेदातील औषधं चालू केली जातात. शरीरात थोडंस बळ आल्यानंतर शरीरातील दुष्टमेद मोकळा करण्यासाठी विशिष्ठ औषधींद्वारे पंचकर्म उपचार उपयोगी पडतात।।
या प्रकारची मेदवृद्धी करणाऱ्या कारणांनी बनलेली जाडी असेल आणि ती कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शना शिवाय कुठलेही प्रयोग करू नका।।
व्हाट्स अपला फिरणाऱ्या सोशल टिप्स वापरून आजार विकत घेणारे भरपूर लोक येतात आमच्या Consulting ला..!
गरम पाण्यात मध टाकून पिणारे..! दोनचार लिंबे पिळून खाणारे…!! कोरफड ज्यूसवाले….! कारले – दुधीभोपळा – दोडका आदींचे ज्युसवाले …!!
हे सर्व लोक सोप्या गोष्टी अवघड करता…! एकातून दुसरा आजार निर्माण करणारे उद्योग करून शरीराची हेळसांड करतात.
आयुर्वेदातील मेदधातूंचे चयापचय चांगले करणारी, मेदाची संचिती घटवणारी थोडकीच औषधं नियमित घेऊन आणि आहार – विहाराची पथ्ये पळून उत्तम प्रकारे वजन कमी होते।।
वजन कमी होताना ते हलूहळूच कमी व्हावे।। साधारण महिना 2 ते 3 kg पर्यंत ।। त्यात घाई करू नये।। अन्यथा हृदय – यकृतादी अवयव – ग्रंथी यांवर भयंकर ताण येतो।। व वेगळेच उपद्रव व्हायला लागतात।।
यात आहार – व्यायाम – औषधी – पथ्यापथ्य पालन करताना सातत्य असणे हे अत्यावश्यक आहे। नव्याचे नऊ दिवस होऊ नये।।। ही महत्त्वाची गोष्ट आहे।।
आहाराची पथ्ये पळताना, सर्वप्रथम प्रोसेस्ड फूडपासून दूर रहा. कितीही आकर्षक वेष्टनात असले तरी या पदार्थांमध्ये फॅटचे तसेच मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर जाडीस उपकारक असे अनेक घटक यात आढळतात.
– विकतचे लोणच्या सारखे, ज्यामध्ये ज्यास्त काळ पदार्थ टिकून राहण्यासाठी Preservatives टाकलेले असते असे पदार्थ 100%टाळा।।।
हे कृत्रिम रित्या अधिक काळ साठवलेले पदार्थ शरीरात जाऊन साठण्याच्या गुणाला बल देतात।।। मग शरीरात साचत साचत शरीराचा मोठा साच्या बनाय लागतो।
– जेवणात बटाटा,साबुदाणा,रताळे आणि भात पुर्णतः बंद करा. – कुकर मध्ये शिजवलेले अन्न खाणं पूर्णपणे टाळा।। उघड्यावर शिजवलेलं अन्न खा।। नवीन धान्ये टाळा।।। धान्यात एक वर्ष जुनी धान्ये आहारात घ्या, मग त्यासाठी पुढच्या वर्षी लागणारे धान्य याच वर्षी भरा ।। जुनी धान्ये नसल्यास धान्ये भाजून दळायला द्या किंवा आहारात घ्या।।
धान्यात सातू, ज्वारी, बाजरी, जोड गहू उत्तम ।।
रुक्ष – गुरु (पचायला जड़) -कमी उर्जा देणारे पदार्थ घ्या.
– हिरव्या पालेभाज्या ,फळे , मोड़ आलेली कडधान्ये ,जवसाची चटनी, कोशिंबिरी,
कढीपत्ता, कोथिम्बिरी, ताज्या दह्याचे नुकतेच घुसळून लोणी काढलेले ताक, मठ्ठा यांचा आहारात भरपूर वापर करा.
दूध व ताक सोडून इतर दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे टाळा।। हार्मोन्सच्या injaction वर पोसलेल्या बॉयलर कोंबड्यांचे मांस अंडी कटाक्षाने टाळा।।
औषधी घेत , वैद्यांच्या निगराणीत पुढील गोष्टी काटेकोरपणे पालन करा…
सकाळी 10 च्या आत, तर संध्याकाळी 8 वाजण्याच्या आत जेवण करावे।।। दिवसातुन फक्त या 2 वेळेलाच जेवणे / खाणे।। इतर वेळेला गरम पाण्याशिवाय काहीही खाऊ नये – पिऊ नये।। चहा – कॉफी असे कुठलेही पेय नकोत।। सॉफ्ट ड्रिंक्स नकोत।।
नेहमीच्या जेवणाच्या निम्मेच जेवण घ्यावे।। जेवण स्वत:च्या बोटांनी ज्यास्तीत ज्यास्त कुस्करुन व अधिक अधिक चावून चावून लाळ तोंडात जमा होई पर्यंत चावणे व नंतर गिळणे।। हा जाडी कमी करायचा महामंत्र लक्षात ठेवा।।
जाडी कमी करण्यासाठी उपवास न करता वैद्यांच्या सल्ल्याने, आठवड्यातील 2 दिवस दोन पैकी एक वेळचे जेवण वरील पद्धतीने घेऊन दुसऱ्या वेळच्या जेवणाच्या वेळी फळ, गाजर, बिट, कोशिंबिरी, मुळा, मेथी, ककडी, कलिंगड, वाळुक हे भरपूर चाऊन चाऊन खाऊ शकता।।
रात्रीचा आहार झोपण्याच्या दोन तीन तास आधी घ्या. जेवणानंतर शतपावलीच करा. तेही हलक्या पावलाने।।। जेवणानंतर भराभर चालणे – कष्टाची कामे – मानसिक श्रम आदी कमीत कमी 1 तास तरी या गोष्टी नये।।
– शारीरिक श्रम आणि वातावरण यानुसार आहार आणि मात्रा ठरवा.
व्यायामामध्ये जिमचा व्यायाम न करता ,
– न बोलता भरभर चालने
– ह्रदय विकार नसल्यास धावने
-पोहणे
– सूर्यनमस्कार
-योगासने
– दोरी उड्या आदी – badminan ,कब्बडी सारखे खेळ हे वैद्यांच्या सल्याने व्यायाम करावेत.
हे व्यायाम अर्धशक्ती म्हणजे साधारण थकवा येईपर्यंतच करावे।। उगाच हु म्हणून व्यायाम करू नये।। थकवा आल्यास व्यायाम थांबवावे।। थोडी ताकत ठेऊन व्यायाम करावे।। अतिसाहस करू नये।। कुठलीही गोष्ट अति करू नये।। कारण स्थौल्यामध्ये हृदयाचे बल हे दुर्बल असते।। ते अधिक ताण सहन करू शकत नसते।।
चिंता,जागरण, व्यवाय यांचे धारण करने, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करने , विचार करने ( मानसिक श्रम ) या गोष्टी ही वजन कमी करण्यास महत्व पूर्ण ठरतात. त्यासाठी वैद्यांचा सल्ल घेऊनच हे उपक्रम करा।।
अशा प्रकारे पहिल्या स्थौल्य प्रकारावर जय मिळवता येतो।।
2) दुष्ट वातामुळे मेदविकृती होऊन होणारे स्थौल्य :
यामध्ये स्त्रियांमध्ये डिलीव्हरी नंतर
तसेच पुरुषांमध्ये अति व्यवाय – हस्तमैथुन केल्याने, रात्री जागरण, दिवसा खाऊन लगेच झोपणे किंवा इतरही वेळी भरपेट खाऊन लगेचच झोपणे, दूषित व अयोग्य प्रमाणात केलेल्या मद्यपानाने दुष्ट झालेला वात मेदाला बिघडवतो आणि मेदाची विकृत वाढ करवतो।।
सगळं त्या वाताच्या बिघडण्यावर असतं या दुसऱ्या प्रकारात..!!
याची चिकित्सा ही वात दोषाच्या अवस्थेनुसार, हेतुनुसार व शरीरात असलेल्या इतर आजारांनुसार वेगवेगळी असते।।
पुर्वी गर्भावतीची बाईची डिलिव्हरी झाली की, पुढचा सव्वा महिना दररोज तिला पचपचित तेलानं चोपडून सकाळ संध्याकाळ मालिश केली जात असे।। आणि नंतर लोखंडी बाज किंवा कॉट खाली लालबुंद पेटते निखारे ठेऊन त्यात बाळंतशेपा, वावडिंग, मेथ्या, जिरे आदी टाकून सोसेल तसा चांगला शेक आणि धुपन दिले जाई।। याने शरीरातील वाढलेल्या वाताचे शमन होते व रक्ताभिसरण चांगलं होऊन शरीर हलकं होतं।।त्यामुळे तिला चांगली झोप येत असे ।। पोटाला पट्टबंध बांधला जात असे।।
सव्वा महिना आजिबात घरा बाहेर पडू दिले जात नसे।।बाहेरचा ऊन वारा लागू दिला जात नसे।। याशिवाय बाहेरच्या इतर गोष्टींचा विचार ही तिच्या मनात येऊ दिला जात नसे।।मानसिक व शारीरिक चांगला आराम दिला जाई।।
या काळात खाणं ही बिन मिठाचं आळणी, पौष्ठीक पण पचायला हलकं – गरम गरम अन मोजकेच दोन किंवा ज्यास्तीत ज्यास्त तीन वेळा भुकेचा अंदाज घेऊन असायचं । हे सारे उपचार शरीरात वाढलेल्या त्या वातासाठी असत।।
यामुळे पचन शक्ती चांगली कार्यक्षम होई।। तिला भुक तहान निद्रा या संवेदना चांगल्या होत।। कडकडून भूक तहान लागायची।। बाळाला सांभाळायला बाळाची आजी – पंजी – मावशी आदी दाई असायच्या त्यामुळे बाळाची आई बिनधास्त गाढ झोपू शकायची।।
अन्नाचे पचन चांगलं झाल्याने अन चांगला आराम मिळाल्याने शरीराची झालेली झीज चांगली भरून निघायची।। वाताचं शमन व्हायचं ।।
“अर्ध रोगहरि निद्रा, सर्व रोगहरि क्षुधा। “
या उक्तीनुसार, गर्भधारणे पासून प्रसुतीपर्यंत अवघडलेल्या अन ताणलेल्या शरीरातील जडत्व नाहीसं होई।। स्नेहन – स्वेदन यांनी शरीराच्या अंकुचन प्रसारण यामुळं शरीरात वाढलेला वात शांत होत असे।। स्तंभ नाहीसा होत असे।। शरीर मोकळ होत असे।।
हे गर्भावस्थेत जडलेलं जडत्व, स्तंभ अन दुष्ट वात वेळीच बाहेर नाही निघाला तर त्या बाळंतिणीला किंवा स्त्रीला भविष्यात सुतिकारोग उत्पन्न होतात।। जे तिला आयुष्यभर सोसावे लागतात।।
गर्भस्राव – गर्भपात – गर्भाशयाची पिशवी साफ करणे यानंतर ही किमान तीन आठवडे चांगला आराम करणं गरजेचं असतं।। कारण ते ही एकप्रकारची डिलिव्हरीच आहे।। त्याबरोबर वैद्यांच्या सल्ल्याने काही आयुर्वेदिक औषधी व बस्ती पंचकर्म उपचाराच्या साह्याने गर्भाशयाचे आरोग्य जपणे गरजेचं असतं।। अन्यथा यानेही सुतिकावात होऊन सुतिकारोग होऊ शकतात।।
स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर पुढच्या दोन – तीन वर्षात वाढणारी जाडी याच दुष्ट वाताने होते।। आज 10 पैकी 8 स्त्रिया याच सुतिकावाताने जाड झालेल्या असतात।।ही जाडी उपवास व्यायामाने आजिबात कमी होत नाही उलट वाढतेच।। सुतिका वाताची चिकित्सा केल्याशिवाय ती जातच नाही, हा आजवरचा अनुभव आहे।।
त्याचबरोबर रज:स्त्रावाच्या काळात (मासिक पाळीमध्ये होणाऱ्या स्त्रावाच्या काळात ) शारीरिक – मानसिक कष्ट केल्याने वाढलेला वात स्त्रियांना फुगवतो।।।। या स्त्रियांचा आहार ही फार मोजका असतो।। पण शरीराचा घेरा दिवसेंदिवस वाढत असतो।।।। या प्रकारच्या रुग्णात पंचकर्म करून त्यानंतर सूतिकावाताची चिकित्सा करावी लागते ।।
पुरुषांमध्ये ही याच पद्धतीने अतिव्यवायाने शुक्र बाहेर पडून मोकळी झालेली जागा वात घेतो अन प्रकोपीत होऊन उलट्या क्रमाने शुक्र – मज्जा – अस्थि – मेद या धातूंची दुष्टी करत स्थौल्य निर्माण करतो।।
या कारणाने वाढलेला मेद कमी करण्यासाठी पंचकर्म व औषधी उपचार महत्वाचे ठरतात।। तसेच ब्रह्मचारी राहून व्यायाम करणं, पोटाला बंध बांधनं याचीही मोठी मदत होते।।
या प्रकारात सर्व आहार विहार हा वात दोषाची अवस्था विचारात घेऊन करावयाचा असतो ।।। तो वैद्यालाच ठरवायचा असतो।। यातही रुग्णाच्या सातत्याची अन चिकित्सकाच्या ज्ञानाची अशी दोघांची चांगलीच कसोटी लागते।।
जाडी कमी करताना घरातले, नातेवाईक, शेजारपाजारी यांचे सल्ले गूगल, YouTube वरचे व्हिडीओ अन पेपर – टीव्ही वरच्या जाहिराती अन फोनवर सल्ला देऊन औषधी धाडनाऱ्या औषधी कंपन्या यांच्या नादी आजीबात लागू नका।। ।
स्थौल्य कमी करताना “मला जाडी कमी करायचीच आहे” ही जबरदस्त इच्छा शक्ती अन वैद्यांच्या सल्ल्याने त्याची 100% अंमलबजावणी या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत।।।
तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या. आणि त्यांच्या मार्गदर्शना खाली काम करा।। नाहीतर एक दोन वर्षा मागचं नांदेडच्या गौरीचं प्रकरण ऐकून असालच।।। भलतंच झालं होतं तिचं।। तसं आपलं होऊ नये म्हणून काळजी घ्यावी।।
मेद कमी करण्यासाठी पोटाचा आकार कमी करणारी सर्जरी करण्याचं फॅड आलं होतं मागे… ती सर्जरी करून आरोग्याची अन आयुष्याची वाट लावलेले भरपूर पाहिले आहेत… त्यामुळे फॅटलॉसच्या कुठलाही सर्जरीच्या नादी लागू नकात।।
हार्मोन्सवर काम करणारी केमिकलची किंवा हर्बल औषधं बाजारात किंवा बऱ्याचदा नेटवर्क मार्केटिंगवाले आज खपवताना दिसतात…. ती खाऊन महिना 4 – 5 kg वजन कमीही होतं … पण पुढे या लोकांन मध्ये हार्मोनल विकृती सापडते …. थायरॉईड – डायबेटीस लौकर होतांना दिसतात….!! आणि त्याची औषधी चालू होतात।।
म्हणून मी सांगेल, अर्धवट ज्ञान असलेल्या – याला result आला, त्याला result आला – व्हिडिओ पहा वगैरे वगैरे बाता ऐकून कुठलेही प्रयोग स्वतः च्या शरीरावर करू नका।।।
गाडीत ऑईल कुठलं टाकायचं? याबाबतीत भयंकर जागरूक असणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या शरीररूपी गाडीबरोबर मात्र हेळसांड करत असतो … नानाविध प्रयोग करत असतो…!!
ही शरीररुप गाडी कुणा आयऱ्या गैऱ्याच्या हाती देऊ नका।। अर्धवट ज्ञानाने कुठलेली प्रयोग करू नका।। योग्य पॅथी व तज्ञ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी व पथ्यापथ्य पाळून शरीराची काळजी घ्या।। अनुभवी वैद्यांकडून शरीराची पंचकर्मरुपी सर्विसिंग वेळोवेळी करत राहा।। संतुलित आहार – योग्य निद्रा – वैवाहिक ब्रह्मचर्या – योग्य व्यायाम – चांगले आचार विचार जपून आयुष्यवंत व्हा।।
जय आयुर्वेद।।
– Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking