Blog

CHYAVANPRASH

च्यवनप्राश अवलेह

Ayurveda Health Group - Join Free

Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

च्यवनप्राश बनवताना काढेल सोशल मेडियावरचे आमचे फोटो पाहून, गेल्या आठ – दहा दिवसांपूर्वी एका वयाने जेष्ठ व्यक्तीचा कॉल आला होता….,
स्वत:ची ओळख,मी हे केलं ते केलं, इथं गेलो तिथं गेलो… यांवू त्यांवू आदी मोठेपणासांगून झाल्यावर च्यवनप्राश अवलेह निर्माणा बद्दल विचारणा झाली।। त्यात वापरलेले देशी आवळे – अस्सल देशी घृत – खडीसाखर – प्रक्षेप द्रव्ये यावर, त्याची उपलब्धता, किंमत याची चर्चा करून ते मुळ मुद्यावर आले…

म्हणे…,
” डॉक्टर, मला असा च्यवनप्राश बनवून दया की, जो मला दीड – दोनशे रुपये किलोने विकता येईल.. त्यातले कन्टेन्ट कमी टाकले तरी चालतील… लोक थोडीच तपासून बघणार आहेत? स्वस्तात बनवा…खायला चवदार असावा फक्त…आवडीने खाल्ला पाहिजे… चॉकलेटचे वगैरे फ्लेवर टाकले तरी चालतील… मला ही परवडेल अन तुम्हालाही परवडेल असा बनवा।। माझ्या शब्दावर घेणारे ढीगभर लोक आहेत…!!”

वाईट वाटलं।।  असं कुणी व्यापारी विचाराचा व्यक्तीच असं बोलू शकतो ।।

आयुर्वेदाप्रती लोकांमध्ये असलेल्या गाढया विश्वासाचे भांडवल करून असल्या धंदेवाईक लोकांनी धंदा बसवायला चालू केलाय।। या असल्या स्वार्थीवृत्तीचा आयुर्वेदाला संसर्ग झाल्यापासून आयुर्वेद चिकित्सेबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागलेत।।

“बोलणाऱ्याची मातीही खपते..!” या म्हणीचा पुरेपूर वापर हे धंदेवाईक लोक करताहेत।।

कदाचित यामुळंच जुने आयुर्वेदिक वैद्य निशुल्क किंवा अत्यल्प किंमतीत औषधी उपचार देत पण औषधाबद्दल आजिबात सांगत नसत।। बरेचसे खेडोपाडी आहेत अजूनही।।

मुळात खरा आयुर्वेद शिकलेल्या लोकांपेक्षा आयुर्वेद न शिकलेली परंतु मार्केटिंग जाणणारी लोकंच आयुर्वेदाच्या जिवावर पैश्याने मोठी झाली।।

माझ्यापुढे असलेली कामाची गडबड आणि त्या व्यक्तीचं वयाने असलेल्या जेष्ठत्वाचा मान राखून, आलेला राग व मुखातले उर्मट शब्द गिळत, ज्यास्ती न बोलता, “असं नाही होऊ शकत” असं सभ्य भाषेत सांगून मी सरळ कॉल बंद केला।। मनात मात्र चक्र फिरत राहिलं।।।

च्यवनप्राश म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये…!  हे एक अद्भुत रसायन आहे रसायन…!! त्याचा धंदा करायचा विचार करतोय हा माणूस।।

खरं तर असले खुप नमुने आहेत।। गाय का देशी घी पासून अनेक बाबा -भोंदू, रिक्षावाले, तंबुवाले आहेत।।

स्वत:ची उत्पादने खपवण्यासाठी काहीही सांगून – बनवून आयुर्वेदाचा संदर्भ देतात।। त्यातलाच एक नमुना होता हा ।।। कुणा कुणाच्या तोंडाला लागायचं?
मोठा प्रश्न आहे हा।।

आवळा हे प्रधान औषधी द्रव्य असलेल्या च्यवनप्राश अवलेह नावाच्या या महा  औषधात प्रक्षेपक द्रव्यांसाहित एकूण 47 औषधी आहेत।।। विशिष्ठ प्रकारे  आवळ्याचा मावा तुपात भर्जित करून घेतला जातो , दुसरीकडे औषधी द्रव्यांचा काढा करू, त्याचा पाक करून त्यात तो भाजलेला आवळ्याचा मावा टाकला जातो।। मिश्रण व्यवस्थित एकत्र करून त्यात प्रक्षेपक द्रव्ये व मध मिसळून याची निर्मिती केली जाते।।

च्यवनप्राश अवलेहाची निर्मिती च्यवन ऋषींनी सर्वप्रथम केली।।।आपली साधना पुर्ण करण्यासाठी वृद्ध च्यवन ऋषींना आपलं वृद्धत्व अडथळा करत होतं. वृद्धत्वामुळे त्यांचे कार्य पुर्ण होत नव्हुतं।।  त्यामुळं वृद्धत्वावर मात करण्यासाठी च्यवनऋषिंनी आयुर्वेदाच्या रसायनतंत्र या शाखेचा उपयोग केला।

Ayurveda Health Group - Join Free

रसायनतंत्र नाम, वय:स्थापनमायुमेधाबलकरं रोगापहरणसमर्थं च। (सु.सू. १।७)

त्यासाठी त्यांनी एका अवलेहाची निर्मिती केली।। या अवलेहाचे विधिवत सेवन करून च्यवनऋषींनी पुन्हा तारुण्य प्राप्त केलं. आणि आपली साधना पुर्ण केली।।
पुढे च्यवनऋषींच्या नावावरून याला च्यवनप्राश अवलेह असं नाव पडलं।।

च्यवनप्राश सेवनाचे काही नियम व पथ्यापथ्य आहेत…

च्यवनप्राश अवलेह सेवन हे 2 गोष्टींसाठी प्रामुख्याने केलं जातं ,

1) रसायन चिकित्सेसाठी…!

2) श्वसन संस्थेला बळ देण्यासाठी…!!

रसायन चिकित्सेसाठी च्यवनप्राश अवलेह सेवन करताना, साधारण अठरा वर्षापुढील लोकांनी च्यवनप्राश सेवन करावा।। पंचकर्माद्वारे शरीराची शुद्धी केलेली असावी किंवा ते शक्य नसल्यास किमान शरीरिक मानसिक व्याधी नसाव्यात।।अन्नपचन – पोट साफ होणं – निद्रा या गोष्टी तरी प्राकृत असाव्यात ।। पित्ताचे, रक्तदुष्टीचे  विकार नसावेत।। कुठला विकार असल्यास त्याची चिकित्सा करून वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली च्यवनप्राश सेवन करावा।।

च्यवनप्राश सेवन करत असताना, मनाची निर्मळता असावी।। मन हे क्रोध – द्वेष – अहंकार – मद – मत्सर -ईर्षा – भय यांनी रहित असावं।।
आहार ताजा व सात्विक असावा।।  जुन्या तांदळाचा भात – साजुक तुप, मिळाल्यास देशी गाईचे दूध, ज्वारीची भाकरी – मुगडाळ वरण असा सहज पचनारा असावा।। आहारात सैंधव मिठाचाच वापर करावा तो ही अतिशय कमी प्रमाणात असावा।। बाहेरील अन्न,बिस्कीट पाव ब्रेड आदी बेकरी- मैद्याचे पदार्थ, शिळे, हिरवी मिरची आदी तिखट, साबुदाणा, दही, ताक, आंबवलेले पदार्थ,  मांसाहार आदी अपथ्य खाऊ नये।।  तहानेनुसार कोष्ण जलपान करावे।। प्रवास – ताण तणाव – ऊन वारा पाऊस प्रदूषण यांचा संसर्ग टाळावा।। मनाला आनंदी – प्रसन्न ठेवणारं वातावरण असावं।। रात्री योग्य निद्रा घ्यावी।। श्रमाची कष्टाची कामे करू नयेत।। ब्रह्मचर्या पाळावी।।

सकाळी सूर्योदयाच्या वेळी, मलमुत्र विसर्जनाच्या नंतर स्नान करून शुद्ध झाल्यानंतर उपाशीपोटी काहीही न खाता पिता (म्हणजे रसायन काळी) 1 ते 2 चमचे च्यवनप्राश अवलेह चाखून खावा।। भुक लागल्या नंतर जुन्या तांदळाचा पातेल्यात शिजवलेला मऊ भात – साजूक तुप – खडीसाखर असा आहार घ्यावा।।।नंतर भुक लागल्यावरच थोडी भूक शिल्लक ठेऊन आहार सेवन करावा।

ही पथ्ये पाळत किमान 3 महिने नियमित च्यवनप्राश अवलेहाचं सेवन करावं।। त्यासाठी थंडीचा काळ उत्तम आहे।।

च्यवनप्राश अवलेह शरीरातील सप्त धातू म्हणजे रस – रक्त – मांस – मेद – अस्थी – मज्जा – शुक्र यांच्या पेशींच्या पोषनांत येणाऱ्या अडथळ्यांना दूर करून पेशींच चांगलं पोषण करवतो।। नवीन पेशींच्या निर्मितीस चालना देतो।।

च्यवनप्राश खाण्याचा दुसरा उद्देश असतो तो म्हणजे श्वसनसंस्थेला बळ देण्यासाठी…!

च्यवनप्राश अवलेहातील, वापरण्यात येणारी प्रक्षेपक द्रव्ये विशेषतः श्वसन संस्थेला ताकत देणारी आहेत।। त्यामुळे अस्थमा, दमा किंवा तमकश्वास असणारे रुग्ण तसेच TB सारखे श्वसनसंस्थेचे आजार असणाऱ्यांना च्यवनप्राश अवलेह अमृतासारखा फलदायी आहे।।

आजच्या कोरोना सारख्या संसर्गजन्य काळात आपल्या श्वसनसंस्थेला संस्थेला बळकटी देण्याच्या व शरीराच्या धातूंचा पोषणक्रम चांगला करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या हेतुने च्यवनप्राश अवलेह सेवन करणे दीड – दोन वर्षाच्या बाळा पासून ते थोर वृद्ध सर्वांसाठीच उपयुक्त आहे।। आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार त्याचे आवश्य सेवन करावे।। आरोग्य प्राप्ती करून घ्यावी।।

च्यवनप्राशचा मुख्य घटक आवळे ग्रंथोक्त वर्णल्या प्रमाणे, ताजे आणि पक्व, डाग व कीड रहित, हाताने तोडलेले, खाल्ले असता अतिशय तुरट, 1 kg मध्ये साधारण 50 ते 60 आवळे बसतील एवढे छोटे म्हणजे देशी वाणचे असावे।। चांगल्याप्रकारे झालेल्या पोषणनाने व नवीन पेशींची चांगल्या प्रकारे निर्मिती झाल्याने शरीराच्या बल – कांती – वर्ण – ओज यांमध्ये वृद्धी होते।। यामुळे व्यक्तीमध्ये तारुण्य जाणवतं।। आजार निर्माण करणारे घटक शमन पावतात।। शरीर अंतर्गत व्यापार व्यवस्थित होतात।। रोगप्रतिकारक शक्ती वाढते।।।कार्यक्षमता वाढते।। आयुष्य वाढते।।

च्यवनप्राशचा मुख्य घटक आवळे ग्रंथोक्त वर्णल्या प्रमाणे, ताजे आणि पक्व, डाग व कीड रहित, हाताने तोडलेले, खाल्ले असता अतिशय तुरट, 1 kg मध्ये साधारण 50 ते 60आवळे बसतील एवढे छोटे म्हणजे देशी वाणचे असावे।। अशा देशी वाणाच्या आवळ्यात गर फार कमी असतो तर बिया व त्याच्या शिरा याच ज्यास्त असतात।।

अशा देशी वाणाच्या आवळ्यात गर फार कमी असतो तर बिया व त्याच्या शिरा याच ज्यास्त असतात।।

खडीसाखरेचाच वापर असतो।।
त्यात वापरलं जाणारं तुप हे देशी गायीच्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने म्हणजे गरम केलेल्या दूधांची साय- दही – ताक+ लोणी – विधिवत लोणी कढवून त्यापासून बनवलेलं साजूक तूप याक्रमाने बनवलेलं असून पुढं त्याला मूर्च्छिना संस्कार करून मग ते च्यवनप्राश बनवण्यास वापरलं जातं।।

गाई सदृश्य जर्शी नामक प्राण्यांच्या दुधापासून डेअरीमध्ये यंत्राद्वारे वेगळं केलेलं फॅट गरम करून बनलेलं आम दोषयुक्त तूप च्यवनप्राश निर्मितीस आजिबात उपयोगी नाही।।

मोठ्या मात्रेत च्यवनप्राश निर्माण करताना या गोष्टींची पुर्तता होतेच असं नाही।। बाजारात त्या वेळी सहज उपलब्ध आवळ्याचा च्यवनप्राश केला जातो।। जे 1 kg मध्ये 20 ते 25 बसतात।।  जे हायब्रीड वाणाचे मोठाले भरपूर गर असलेले आवळे त्यात असतात।।  आणि देशी गाईचे तुप वापरण्याचा प्रश्न येतच नाही।। कारणं एवढ्या मोठया मात्रेत ते उपलब्ध होतच नाही।।

आम्ही वैद्यगण मात्र योग्य वेळी आम्हाला हवे त्या प्रकारचे आवळे उपलब्ध झाल्यावरच सर्व साहित्याची उपलब्धता पाहून, मुहूर्त च्यवनप्राश निर्माणास सुरवात करतो।। आमच्यासाठी तो एक सोहळाच असतो।।

शारीरिक कष्टाने बनवलेला च्यवनप्राश अन विद्यूत यंत्रावर बनवलेला च्यवनप्राश यात तेवढाच भेद आहे, जेवढा आईने उखळीत बनवलेली शेंगदाण्याची चटणी अन कामगारांनी मिक्सरवर बारीक करून विक्रीस ठेवलेली शेंगदाणा चटणी।।

परवा तर एका कंपनीने गुळाचा च्यवनप्राश आणला बाजारात… ! च्यवनऋषींच्या काळात काय गुळ नहूता का ? त्यांनी खाडीसाखरच का सांगितली मग..! कारण तिच्यातले वैशिष्ट्यपुर्ण औषधी गुण आहेत..!

बाजारातील अनेक कंपन्या शुगर फ्री च्यवनप्राश, सोना चांदी च्यवनप्राश, वेगवेगळे फ्लेवर टाकलेले च्यवनप्राश असले आयुर्वेद शास्त्राला मान्य नसलेले उद्योग करून आपापलं मार्केटीं करत असतात।।।

भरभरून फायदे सांगताना कुणी खावं – कधी खावं  – कसं खावं हे मात्र आजिबात सांगितलं जात नाही।।

च्यवनप्राश निर्माण

अस्सल च्यवनप्राश तुरट- गोड व काहीसा तिखट असतो।।मात्र बाजारात उपलब्ध असलेला च्यवनप्राश गोडच ज्यास्त लागतो।।

एक गोष्ट मात्र इथे प्रकर्षाने जाणवते,

“अस्सल च्यवनप्राश बाजारात सहजासहजी मिळत नाही।।। आणि आम्ही वैद्यांनी ग्रंथोक्त बनवलेला अस्सल च्यवनप्राश अवलेह हा आम्हा वैद्यांनाच पुरत नाही।।।”

म्हणुन सांगण आहे…,

आपल्याला च्यवनप्राश खायचा असेल तर, वैद्यांच्या सल्ल्याने वैद्यांनी बनवलेले किंवा त्यांनी सुचवलेला अस्सल च्यवनप्राश खा।। तरच त्याचे फायदे आपल्याला मिळतील..!

जय आयुर्वेद..!!!

–  Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक

आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
https://wa.me/message/B3RZESAQBSRUE1

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

हा माहितीपर लेख कसा वाटला, त्याविषयी आपले मत आम्हाला खाली दिलेल्या लिंकवरून जरूर कळवा।।

असाच अस्सल आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमच्या website ला व आमच्या Blog ला जरूर भेट द्या…

website:www.shriayurvedic.in

असेच माहितीपर लेख whats app द्वारे मिळवण्यासाठी आम्हाला आपल्या ग्रुप मध्ये add करू शकता।।

धन्यवाद…!!!






Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!