Blog

Kidney Stone – Renal Calculi – औषध मुतखडयाचं..!

मुतखड्याचे शुद्ध आयुर्वेदिक उपचार।।।

Ayurveda Health Group - Join Free

Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*

मुतखड्याच्या रात्री अपरात्री होणाऱ्या वेदनेची तुलना गर्भिणीला प्रसूतीवेळी सोसाव्या लागणाऱ्या कळांशी केली जाते…! एवढं भयंकर दुखणं असतं या मुतखड्यात …! वेदनेने रोगी अगदी व्याकुळ होऊन जातो… !

वाहत्या नदीत कधी गाळ साचत नाही..! गाळ साचतो त्या नदीला बंधारा बांधून किंवा धरण बांधून पाणी आडवल्यावर….!! साचलेल्या पाण्यातील क्षार – माती खाली बसते .. आणि गाळ साचायला लागतो…!

मुतखडयाचे ही असेच आहे…. लघवी अडवून ठेवायची सवय असलेल्या लोकांमध्ये मुतखडा प्रकर्षांने सापडतो…!

   पहाटे साखर झोपेत आलेला मूत्रवेग बलपूर्वक अडवून तसेच झोपुन राहणारी अनेक मुले असतात.

लहानपणी मूत्रवेगावर नियंत्रण यायच्या वयात (साधारणतः 1 ते 3 वर्ष दरम्यान) बालकाला जर लघवीला बसवणे…. शी करायला बसवणे पालकांनी केले नसेल, त्याला त्याबद्दल प्रशिक्षण दिले नसेल तर अशी बालकेही खुप वेळ मल – मूत्र अडवून ठेवतात…!

याशिवाय कामाच्या Meeting, शैक्षणिक Class, प्रवास, कामाची गडबड इथपासून टीव्हीचे प्रोग्रॅम्स, अंगी असलेला भरभरून आळस अशा अनेक कारणांनी मल – मुत्र यांचे वेग बलपूर्वक आडवले जातात।।।

कळत किंवा न कळत लघवीचा वेग आडवणे हे खुप मोठे कारण आहे मुतखड्याचे।।

वेफर्स-कुरकुरे-पापड सारखे कोरडे(रुक्ष), तसेच पचायला जड कफकर पदार्थ आणि अति मीठ असलेले पदार्थ आहारात सातत्याने असतील,
शरीराला आवश्यक आहे त्या पेक्षा कमी पाणी पिले जात असेल तर शरीरात लघवी कमी प्रमाणात तयार झाल्याने किडनीत रक्तातून वेगळी केली जाणारी विषारे (धातुगत मल) किडनी व मूत्रवाहिनी मधून पूर्णतः बाहेर पडत नाहीत….

ती विषारे तिथेच अडकून किडनी व मूत्रमार्गात जखमा उत्पन्न करतात, तसेच जनन अवयवांची स्वच्छता न ठेवल्याने – दुषित टॉयलेट वापरल्याने मूत्रमार्गात जंतू संसर्ग होतो, जखमा होतात, ज्याला आपण Urinary Track Infection (UTI) असे म्हणतो.

झालेल्या जखमांवर मूत्रातील टाकाऊ घटक , विषारे -क्षार आदी बसून तिथे अश्मरी (मुतखडा) तयार होतो।

याशिवाय अवेळी – अयोग्य निद्रा (जागरण, रात्रपाळी, दिवसा झोपणे) याही गोष्टी किडनीचे काम बिघडवून तिथे मुतखडयाचे कारण ठरतात.

  अधिक क्षारयुक्त जल पिण्यात असेल तरीही मूतखड्याचा त्रास होताना दिसतो.
आधुनिक शास्त्रात,Vit – A ची कमतरता याचं कारण सांगितलं आहे.

अशा वेगवेगळ्या कारणांनी हा मुतखड्याचा आजार होतो. व्यक्ती तितक्या प्रकृती नुसार त्या त्या व्यक्तीच्या बनणाऱ्या मुतखडयाचे स्वरूप ही वेगवेगळे आढळते. आणि यामुळेच मुतखडा बरा करताना एकच औषध सर्वांना लागू पडत नाही.

Ayurveda Health Group - Join Free
Kidney stone

प्रकृती, हेतू अन मुतखड्याच्या दुखण्याचे स्वरूप, मुतखड्याचा आकार व स्थान इत्यादी बघून वेगवेगळे उपचार ठरवावे लागतात.कुणाचा 4 दिवसातही खडा पडतो तर कुणी 6 महिनेही घेतं ।।

साधारणतः 10mm पर्यंतचे खडे सहजतेने पडताना दिसतात।। जर का खड्याचा आकार वाकडा – तिकडा असेल, खडा खूपच टणक असेल जो औषधांनी फुटत नसेल किंवा खुप वर्षे एकाच जागी राहून तिथल्या मांस पेशीत अडकून बसला असेल तरच खडा पडायला अडचण होते।।

Renal Calculi

मुतखड्याच्या उपचारात आयुर्वेद शास्त्रात वर्णालेले वेगवेगळे “क्षार” हे औषध खुप महत्वाचं औषध आहे. मात्र ते फार जपून योग्य मात्रेत – मोजक्या कालावधीसाठी वापरावे लागते।। त्याचे प्रमाण अधिक झाल्यास शुक्राणूंचा नाश होणं – षंढत्व येणं – अकाली म्हातारेपणा येणं – केस पांढरे होणं यासारखी तीव्र लक्षणे दिसतात।।

म्हणून कुणाकडूनही मुतखड्याचे औषध घेऊ नका।। त्यातल्या जाणकार व तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध घ्यावे।।

पथ्यं-
मुतखडा झाला की भरपूर पाणी प्यायचा सल्ला मिळतो..
5 -6-7 -8 बाटल्या पाणी संपवण्याचे टार्गेट घेतलं जातं।

पण अधिक पाणी पिल्याने पचन संस्थेतील स्रावांचे संतुलन बिघडून अजीर्ण – आम्लपित्त – गॅसेस – मलावष्टंभ – मुळव्याध आदी पचनाचे अनेक विकार चालू होतात। 

म्हनून आशा वेळी अधिक पाणी न पिता आहारातील द्रव द्रव्याचे प्रमाण वाढवावे. जसे की वरण , पातळ भाजी, हुलग्यांचे माडगे, उसाचा रस, ताजे ताक, फळे इत्यादी द्रव गोष्टी आहारात ज्यास्त घ्याव्या।।  कुळथाचं वरण / माडगे वारंवार घेतल्यास अश्मरी भेदनासाठी चांगला उपयोग होतो.

तहाने नुसार उकळून गार केलेले पाणीच प्यावे।। थंड – फ्रीजचे – पॅकिंग चे पाणी पिऊ नये।।

अश्मरी एकदा होऊन गेल्यावर काही दिवस पथ्यं पाळणं आवश्यक असतं.
अन्यथा पुन: पुन्हा होण्याची शक्यता असते. यामध्ये चहा, मिरची, शिमला मिरची, टोमॅटो, वांगे, कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्या वर्ज्य कराव्या लागतात।। इतरही पथ्याचे पालन करावे लागते।।।

मुतखडा पूर्णतः पडल्यानंतरही काही काळ साधारणपणे 2 ते 3 महिने औषध उपचार चालू ठेवणं गरजेचं असतं आणि पुढील 1 वर्ष पथ्यपालन करणे गरजेचे असते।।

कारण, मुतखडा शरीराबाहेर पडताना किडनी मूत्रमार्ग मूत्राशय या अवयवांत अनेक जखमा झालेल्या असतात।।। लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकले युरिया आदी पदार्थ पुन्हा या जखमांवर साचू लागतात आणि पुन्हा मुतखडे बनायला चालू होतात।। आणि पुढे ती सवय होऊन जाते।।

अशा वारंवार मुतखडा होण्याची खोड असलेल्या लोकांमध्ये किडनी व मूत्राशयातल्या जखमा भरण्यासाठी औषधोपचार करणं अत्यंत गरजेचं आहे।।। पुढील 2 -3 वर्ष प्रत्येक वर्षी पंचकर्म उपचारातील योग बस्ती पंचकर्म  करून घेणे उपयोगी पडते।।

खडा पडल्यानंतर 3 ते 6 महिने औषध आणि वर्षभर पथ्य पाळून जर पुन्हा खडा उद्भवला नाही तर तुम्ही त्यातून सुटलात।। तरीही पुढील 2 वर्ष जर सहा महिन्यांनी सोनोग्राफी तपासणी करून पडताळणी करत राहावी लागते।।।

Urethral & Kidney Stone

मुतखड्याने जागा सोडली की भयंकर वेदना होतात।।  डिलव्हरीच्या वेळच्या कळा सोसल्यागत मुतखडा झालेला रुग्ण वेदना सोसत असतो।।। ज्यास्त करून या वेदना मध्यरात्री नंतरच होतात।।

हे दुखणं चालू झाल्यास ओव्याच्या काढा एक कप घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून प्यावं.

आणि टब किंवा मोठ्या पाटीत गरम पाणी घेऊन त्यात असं बसावं जेणेकरून त्या गरम पाण्याचा शेक दुखऱ्या भागाला मिळेल।। यामुळे १५-२० मिनिटांत वेदना उत्तम प्रकारे थांबते याचा मोठा अनुभव पाठीशी आहे.

यातल्या 10% रुग्णांमध्ये मात्र वेदनाशामक गोळ्या – injection घेण्याची गरज पडतेच।। पण त्याची action संपली की पुन्हा दुखणं चालू झाल्याचं ही बऱ्याच जणांमध्ये दिसतं।।

अशा तीव्र वेदना असताना आम्ही बऱ्याच रुग्णांमध्ये अश्मरीहर तेलाचा मात्रा बस्ती वापरला आहे।।। 15 मिनिटात दुखणं तर गायब होतंच उलट अश्मरीहर तेलाच्या मात्रा बस्तीने स्नेहन झाल्याने वात अनुलोमीत होऊ मुतखडा ही सटकून बाहेर येतो।।

Renal calculi

तज्ञ वैद्यांचा सल्याने औषधी घेत पथ्यं सांभाळली, पंचकर्म उपचार केले की या आजारात उत्तम प्रकारे आराम पडून वारंवार होणाऱ्या मुतखड्याच्या आजारातून कायमची मुक्ती मिळते हे शेकडो रुग्णांमध्ये अनुभवास आले आहे.

जय आयुर्वेद!!

*Dr Saurabh B. Kadam*
     *M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*

*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*

आपल्या नैसर्गिक पद्धतीच्या जीवनशैलीचें महत्व जाणून घेण्यासाठी आणि अस्सल आयुर्वेद जाणून घेण्यासाठी *आयुस्पर्श आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट व आप्तश्री आयुर्वेद, पुणे*  द्वारे चालवला जात असलेल्या,

*”AYURVED (आयुर्वेद)”*

Chanal Link:
https://t.me/shriayurvedic

या चॅनलला जॉईन व्हा।। तज्ञ वैद्यांकडून हा चॅनल हाताळला जातोय।

जय आयुर्वेद ।। जय आचार्य चरक ।।




Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!