Best Fruit
श्रेष्ठ फळ : द्राक्षा (मनुका)
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सावलीत सुकवली जातात, तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. आसव आरिष्ट लेह अवलेह पंचाविध कषाय कल्पना इत्यादी सर्व प्रकारच्या औषधिंमध्ये अनेक ठिकाणी यांचा वापर केला जातो. मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत.
आयुर्वेदात श्रेष्ठ फळ म्हणून द्राक्षा (मनुका) सांगितली आहे.
!! श्रेष्ठफळ !!
” मृद्वीका फलांनाम श्रेष्ठ हितकर:| “
चरक सु.25
मृद्विका म्हणजे मनुका (द्राक्षा)
गुण-
शीत – नेत्राला हितकर-बल देणारी- गुरु-मधुर रसात्मक-स्वर उत्तम करणारी- सृष्ट मलमुत्राला बाहेर काढनारी-कोष्ठातील दुष्ट वात कमी करणारी-वृष्य-कफकर- अन्न खान्यासाठी रूची उत्पन्न करणारी-दुष्ट पित्ताचा नाश करणारी-तृष्णा दाह मदात्यय शोष नाशन करणारी इत्यादि गुण पक्व द्राक्षाचे वर्णले आहेत.
द्राक्षा स्वादुफला प्रोक्ता तथा मधुरसाऽपि च |
मृद्वीका हारहूरा च गोस्तनी चापि कीर्तिता॥१०९||
द्राक्षा पक्वा सरा शीता चक्षुष्या बृंहणी गुरुः |स्वादुपाकरसा स्वर्या तुवरा सृष्टमूत्रविट्॥११०||
कोष्ठमारुतकृद् वृष्या कफपुष्टिरुचिप्रदा॥१११||
हन्ति तृष्णाज्वरश्वासवातवातास्रकामलाः |
कृच्छ्रास्रपित्तसंमोहदाहशोषमदात्ययान्॥११२||
आमा स्वल्पगुणा गुर्वी सैवाम्ला रक्तपित्तकृत् | वृष्या स्याद् गोस्तनी द्राक्षा गुर्वी च कफपित्तनुत्॥११३||
अबीजाऽन्या स्वल्पतरा गोस्तनीसदृशी गुणैः |द्राक्षा पर्वतजा लघ्वी साऽम्ला श्लेष्माम्लपित्तकृत् | द्राक्षा पर्वतजा यादृक् तादृशी करमर्दिका॥११४||
– भावप्रकाश निघन्टू
मनुका मधुर, शीतल, वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहे.
दौर्बल्य –
मनुक्यांच्या नियमित सेवनाने थोड्याच दिवसात रस, रक्त, शुक्र इ. धातूंची तसेच ओजाची वृद्धी होते. अधिक परिश्रम, कुपोषण, वृद्धावस्था अथवा एखाद्या मोठ्या आजारानंतर शरीर जेव्हा क्षीण होते, तेव्हा त्वरित शक्ती मिळवण्यासाठी मनुका खूपच लाभदायी आहेत.
वृद्धावस्थेत मनुक्यांचा प्रयोग केवळ आरोग्यरक्षणच करतो असे नाही, तर आयुष्य वाढविण्यातही सहाय्यक असतो. मनुक्यातील शर्करा अतिशीघ्र पचून अंगी लागते, ज्यामुळे त्वरित शक्ती व स्फूर्ती मिळते.
शरीरात रक्ताची कमी (रक्ताल्पता), रक्तशुद्धकर….!
संध्याकाळी १० ते १२ मनुका पाण्यात भिजू घाला. सकाळी उठल्यानंतर मनुका चांगल्याप्रकारे चावून खाल्यास पाचनशक्ति उत्तम होउन शरीरातील रक्त धात्वाग्नीचे प्रमाण वाढते. यामूळे मनुका खाल्याने रक्त शुद्ध होते तसेच रक्तातिल उष्णगुण कमी होतो.
दारू पिण्याची इच्छा होईल तेव्हा दारू ऐवजी मनुका चावून-चावून खात रहावे अथवा मनुकाचे सरबत करून प्यावे.
मनुका आदी गोष्टी टाकून केलेलं खर्जुरादि मंथ नावाचे आयुर्वेदिक सरबत ह्या बेवड्यांना शुद्धीवर आणण्यास अन त्यांची मदात्यय जन्य लक्षणे कमी करण्यास मोठी मदत करते।। पिणारा थोडा संयमी असेल, पिणं सोडण्यासाठी मनापासून त्याचे प्रयत्न होत असतील तर खर्जुरादि मंथाच्या साह्याने काही आयुर्वेदिक औषधी देऊन त्याचं बेवडत्व आपल्याला घालवता येऊ शकतं।।
दारू पिल्याने ज्ञानतंतू सुस्त होतात, परंतु मनुकाच्या सेवनाने ज्ञानतंतूंना लगेच पोषण मिळाल्याने मनुष्य उत्साह, शक्ती व प्रसन्नतेचा अनुभव करु लागतो. हा प्रयोग प्रयत्नपूर्वक करीत राहिल्याने थोड्याच दिवसात दारूचे व्यसन सुटते.
मदात्याय झालेल्या व्यक्तीला देण्यात येणारा खर्जुरादी मंथ मध्ये मनुका एक महत्वपूर्ण घटक द्रव्य आहे.
काळ्या मनुकांवर रसायनाची प्रक्रिया कमी झालेली असते. मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाणही अधिक आढळते.
ज्यांना अन्न पचनाचा आणि पोटसाफ न होण्याचा त्रास आहे त्यांनी ( अति मृदु कोष्ठचे म्हणजे असे ज्यांना साध्या दुधानेही अधिक मलप्रवृत्ति होऊ लागते सोडून )सर्वांनीच अर्धी मुठ
(साधारण 10 ते 20) मनुका दररोज चांगल्या प्रकारे चाऊन खान्यास हरकत नाही.
मनुका कशा प्रकारे खाण्यात घ्याव्या….,
द्राक्षा पासून मनुका बनविन्यासाठी गंधका सारख्या रसायनांचा वापर केला जातो. म्हणून त्या खाण्यापूर्वी स्वच्छ करणे खुप महत्वाचे आहे.
प्रथम मनुका भरपूर स्वच्छ पाण्यात धुउन घ्याव्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यात अर्धा तास भिजत ठेवाव्या.त्यानंतर वाळवुन (शक्य असल्यास उन्हात वाळवणे उत्तम) नंतरच खाण्यासाठी वापराव्या.
“आरोग्यरक्षणार्थ ” या श्रेष्ठ फळाचा वापर सर्वांनीच करावा।।।
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking