साजुक तुप आणि कोलेस्टेरॉल..!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
गुगल बुवा म्हणजे आयुर्वेदोक्त शास्त्रशुद्ध माहिती नाही।।।
हे ह्या परसेंट % मध्ये बोलणाऱ्या गुगल शिष्यांना कधी कळायचं देव जाणे।।।
गूगल वरचे research वाचून स्वतःच्या शरीरावर प्रयोग करतात..!!
बघा ना…,
तुप खाल्याने रक्तातलं Cholesterol वाढतं याचा शोध Resarch लंडन मध्ये होतो।।।अन तो Googal ला टाकला जातो।।।
अन त्याचं अनुकरण करून आमची भारतीय जमात देशी गावरान तुप खाणंच बंद करते।।
अन ह्यांना महिन्याला भत्ता मिळत असल्यागत whats up वर याचा प्रचार ही नेटानं करते।।
पण ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही की,
– लंडन मध्ये देशी गाय नाय।।
– ना तिथं “देशी गाईचे दुध – दुधावरची साय – विरजन -दही – रवीने मंथन- ताकलोणी – विधिवत लोणी कढवुन त्याचं तूप बनवण्याची आमची पारंपरिक पद्धत” माहीत आहे….
तिथं कॅलरी वर मोजमाप होतं।।
तिथं जे संशोधनासाठी वापरलेलं तुप आहे ते मुळात आमचं देशी साजूक तूप नाहीच।।।
ते Cholesterol चचं रूप आहे।।।
जर्शी नामक दुग्धजन्य प्राण्यापासून किंवा इतर दुग्धजन्य प्राण्यापासून मिळवलेल्या दुधातुन यंत्रावर फॅट वेगळे केले जातात अन त्या फॅटला गरम करून बनणाऱ्या स्निग्ध पदार्थाला ते लोक घी म्हणतात।।
त्यात Preservatives टाकून बाजारात विकायला ठेवतात….
पुरण पोळीवर सोडलेली आमच्या साजुक तुपाची धार जेवणानंतर कितीतरी वेळ हाताला घृताचा मधुर गंध देते।।
अन त्या डेरीच्या मशीनवर बनवलेलं तुप एकदा का लहान लेकराला खाऊ घातलं की, त्या तुपाचा तो मळकट वास अशा प्रकारे नाकात बसतो, की ते पोरगं पुन्हा तुप नामक पदार्थाकडं पाहणंच सोडून देतं।।।
तुप म्हणलं की कोरड्या उलट्या चालू करतं।।
एखादा पदार्थ बनवताना त्यावर होणारे संस्कार (प्रोसेस) त्या पदार्थांचे गुण ठरवत असतात, असं आमचं आयुर्वेद शास्त्र सांगतं..!
काय घेऊन बसलाय त्या कॅलरीचं..? Quantity पेक्षा Quality ज्यास्त महत्वाची आहे..!
आयुर्वेदानुसार हे यंत्रावर बनवलेलं डेरीचं तुप म्हणजे अल्प संस्कारामुळे आम दोषासाहित बनलेलं तूप।।
जे शरीरातील पाचन शक्ती व्यवस्थित पचवू शकत नाही।।
हे अर्धवट पचलेलं तुप (साम) शरीरात असलेल्या पेशींना पचवता येत नाही।। अन त्यातूनच हा Cholesterol नामक पदार्थ शरिरात अधिक बनतो।।।
कोकणातला हापूस घाट सोडून इकडे आणून लावला तर चव बदलतो।।। त्याचे गुण बदलतात।।।
इथं तर देशी गाई पासून – इथल्या हवामानापासून ते त्या गाई च्या आहार – पालन पोषण या सर्व बाबीं तसेच तूप बनवायच्या पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक आहे।।
मग त्या तुपांच्या गुणात किती फरक पडत असेल विचार करा।।।
शिवाय ज्यांच्यावर प्रयोग होतो त्या तिथल्या अन हितल्या लोकांचं राहणीमान पूर्णता: भिन्न।।। कार्यपद्धती भिन्न ।।।
ते तिथं पिझ्झा बर्गरवर जगतात।।।
अन आम्हाला भाजी पोळी अन शेवटी दोन घास तरी भात जेवणात असल्याशिवाय आमचे पोटोबा तृप्त होत नाहीत।।
हा पण मोठा फरक आहे।।आणि हे एका पदार्था बाबत नाही तर सरसकट अनेक चांगले पदार्थांना या google वरच्या अर्धवट संशोधनाने विष भासवून दिलंय।।
म्हणून गुगलच्या लंडन अमेरिकेतल्या शोधाला बाजूला ठेवून साजूक तुप आमरसा बरोबर वरपायचं चालु ठेवा ।।।।
आपली पारंपरिक आहार पद्धती ही आपल्या निरोगी आरोग्यासाठीच आहे।।
एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या,
आपल्या आयुर्वेदातिल मूल सिध्दांत आधुनिक विज्ञानाच्या Parameters वर मोजण्याइतपत हे आधुनिक शास्त्र आजुनही प्रगत झालेले नाहीये..!
*आयुर्वेद Quality पहातो।।।* *तर हे आधुनिक Parameters फक्त Quantitiy पाहतात।।।* जे आकड्यात असतं।।।
आधुनिक कसोट्यावर आयुर्वेद मोजणं सोडा देवा आता।।
लंडनचे तर्क आमच्या देशी पदार्थावर लावू नका ।।।
हं…
चल वाड आमरस।।। वरप खीर।।। मार फुरक्या।।।
– Dr Saurabh B. Kadam, M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Pingback: ।। आयुर्वेदोक्त आहारात काय असावे ? ।। – Aaptshri Ayurveda
Pingback: ।। आयुर्वेदोक्त आहारात काय असावे ? ।। – Aaptshri Ayurveda