Blog

Covid -19 : विनंती वजा सतर्कतेचा इशारा…!

Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

Ayurveda Health Group - Join Free

        Covid 19 ची ही दुसरी लाट खूपच जोरदार आहे..! दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे…!! कित्येकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत…!!! खुपच दयनीय अवस्था आहे सध्या…!!!!

या महामारीच्या काळात तुम्हाला आलेला अशक्तपणा – कणकण – अंगदुखी – सर्दी – खोकला – डोकेदुखीला क्षुल्लक न समजता….. जरा ज्यास्ती विचारात घेणं गरजेचं आहे।।

काल गार पाणी पिलो… आईस्क्रीम खाल्लं…. ज्युस पिलो……दुपारी जरा कुलर समोर बसलेलो ….. जरा धावपळ ज्यास्त झाली …. कामाचा लोड… मार्च एन्डची कामं….!!
    असली कारणं शोधून स्वतःचीच समजूत काढू नकात….!

कारण होतं असं, लक्षणं दिसू लागल्यानंतर गरम पाणी घे, वाफ घे , हे खा – ते खा करत पाहिले पाच दिवस असेच “मी तो नव्हेच” असं म्हणत मज्जे मज्जेत जातात…. डेंजर हालत होते सातव्या दिवसापासून 14 व्या दिवसा मध्ये….!!

ताप – खोकला – सर्दी – दम लागणे – ओ टू कमी होऊ लागणे आदी लक्षणं जरा तिव्रतेने जाणवू लागल्यावर….!

मग सगळंच कपाळात याय लागतं … केलेला निष्काळजीपणा समोर दिसू लागतो…! भयंकर चिंता वाटू लागते…!! ‘ ह्याचं हे झालं – त्याचं ते झालं …आपलं ही तसंच होणार’ याचं टेन्शन याय लागतं…!! मग ढीगभर तपासण्या चालू होतात – रिपोर्ट येईपर्यंत देवाला साकडं…!अन रिपोर्ट आल्यावर ICU – व्हेंटिलेटर असलेल्या हॉस्पिटलची शोधाशोध चालू व्ह्यायला लागते….! तोवर इकडे मागच्या आठवड्याभरात संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणून निघतात..!!  सगळा धिंगाणा होऊन जातो….!!!

इथे वेळ खुप महत्वाची आहे…! हे समजुन घ्या….!

*कोरोनामध्ये, संसर्ग झाल्यानंतर मधमाशीच्या पोळ्या सारखं इन्फेक्शन फुफ्फुसाच्या मागच्या बाजूला वरून खाली वाढत असतं। ते भरून खाली टेकायला आल्यावर त्याची तीव्रता दाखवतं।। तोपर्यंत मला काही झालं नाही।। हे नेहमीचं आहे।। क्षुल्लक आहे ।। असं आपल्याला वाटत असतं।।*
   
या वेळी अजिबात वेळ न दडवता,
पहिल्या पाच – सात दिवसात व्यवस्थित आयुर्वेद व आधुनिक औषध उपचार व विश्रांती घेणं अत्यंत गरजेचं असतं।।

पोकळ नाही सांगत….
मागच्या मे – जुन पासून कोरोना पेशंट बघतोय…! त्याचा अनुभव बोलतोय हे…!!!

   *तुम्ही जर पहिल्या पाच दिवसात,  जवळच्या आयुर्वेद वैद्याकडून औषधी काढा, लक्षणरूप  चाटण औषधी, ठराविक पद्धतीने प्रमानयुक्त बनवलेल्या अमृतधारेची वाफ, वातावरण शुद्धीची धुपन औषधी,  आहार, विहार व पिण्याचे पाणी आदिंचे पथ्यापथ्य घेतलं….!  तर फार लौकर बरे व्हाल…!! वैद्याच्या सल्ल्याने एखादे लघु वमन घेणं पण लै फायद्याचे आहे।।।*

या बरोबर वैद्याच्या सल्ल्यानेच, गरज असेल तर एखादे ऐलोपॅथी अँटिबायोटिक्स औषध पण घेऊ शकता..!! लौकर उपशम मिळतो।।।

उगाचंच पाहिले पाच दिवस अंगावर काढून, पुढं स्वतःचाच नंगानाच करून घेऊ नका।। 

परस्थिती हाताबाहेर गेल्यावर आम्ही काय….?  कुणीच काही करू शकत नाही…!! हे पक्कं लक्षात घ्या।।

शुगर – बीपीवाल्या बाबांनी तर, आधीपासूनच रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्याच्या कामाला लागा।। सोशल डिस्टन्सिंग बरोबर, वैद्यांच्या सल्ल्याने (online Consulting नें) आहार विहाराची पथ्यापथ्य, दिनचर्या पालन, रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधींचा काढा – आयुर्वेद वैद्यांनी स्वतः बनवलेला अस्सल च्यवनप्राश आदी आधीपासूनच चालू ठेवा।।  जेणेकरून व्याधींशी लढायला व अँटिबॉडीज बनवायला शरीर आधीपासूनच तयारीत असेल…!!

Ayurveda Health Group - Join Free

Emergency साठी म्हणून, आयुर्वेदिक  “चाटण” औषधं आपल्या वैद्यांकडून घेऊन स्वतः जवळ ठेवु शकता ।।।ऐन वेळी खुप कामाला येईल।।

बाकी सावध करणं आपलं काम आहे, नाही ऐकलं तर आपले भोग आपल्यालाच भोगायचे आहे…! त्याला पळवाट नाही।।

जय आयुर्वेद..!!!

–  *Dr Saurabh B. Kadam*
      *M.D.(Ayurved), Pune*
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,पिंपळे गुरव, पुणे 411061, Contact no.9665010500*
https://wa.me/message/B3RZESAQBSRUE1

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

हा माहितीपर लेख कसा वाटला, त्याविषयी आपले मत आम्हाला खाली दिलेल्या लिंकवरून जरूर कळवा।।

असाच अस्सल आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमच्या website ला व आमच्या Blog ला जरूर भेट द्या…

website:www.shriayurvedic.in

असेच माहितीपर लेख whats app द्वारे मिळवण्यासाठी आम्हाला आपल्या ग्रुप मध्ये add करू शकता।।

धन्यवाद…!!!





Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!