प्यारा – डेक्सा – फेबी – रेमडी हे नाही तर गुडूचीच हानिकारक आहे म्हणे..??
*Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune*
कालियुगाचा असर चांगलाच वाढलाय सध्या।। आपला खप वाढवन्यासाठी, लोकांनमध्ये चांगलं काय? आणि वाईट काय ? यात भ्रम निर्माण करणाऱ्या टोळ्या चांगल्याच सक्रिय झाल्यात …! चांगल्या गोष्टी कशा वाईट आहेत हे समजून सांगण्यास अतोनात प्रयत्नही करताना दिसताहेत….!!! त चा म करून बोभाटा करणारे ज्यास्तच फोफावले दिसताहेत …!
काल – परवा पेपरात न्युज आली, म्हणे “गुळवेल यकृताला हानिकारक आहे..!”
आणि मागे काही महिने …नाही…. बहुतेक एक वर्ष किंवा त्याही पेक्षा ज्यास्त काळ झाला …
“गुडूचिचा काढा कोरोनाच्या तापात महागुणकारी आहे….!” म्हणून सोशल मीडियावर मॅसेज फिरतोय…. लोक त्यांचे अनुभवाचे ऑडिओ – विडिओ करून शेअर करत आहेत।।
त्या गुडूचीला, साक्षात अमृताला ह्या लोकांनी काहीही शा – निशा करायच्या आधीच घातक ठरवून टाकली…!!
यामुळे लोकांमध्ये जो भ्रम उत्पन्न झालाय तो काही मुद्यांद्वारे स्पष्टपने पाहूया…!!
1) पहिला मुद्दा : गुडूची घेताना होणारा संभ्रम।।।
आयुर्वेद औषधीत भरपूर वापरली जाणारी अमृता म्हणजे गुडूची (Tinospora cordifolia) या वनस्पतीशी काही साधर्म्य दाखवणारी आणखी एक वनस्पती आढळते, जीचे बोटॅनिकल नाव आहे Tinospora Crispa.
या दोन्हीच्या वनस्पतीच्या फॅमिली जरी एक असल्या, तरी दोन्हींच्या गुणांमध्ये मात्र फार मोठा भेद आहे. Tinospora Crispa मध्ये विषाक्तता आहे हे दाखवणारे अनेक शोधनिबंध आपल्याला Google वर सापडतील.
दोन्ही वनस्पतीच्या पान – खोड आदीमध्ये अल्पसाच भेद आहे।। त्यामुळे यातलं ज्ञान नसणाऱ्या लोकांकडून बऱ्याचदा Tinospora Crispa हिलाच गुडूची म्हणून गोळा केलं जातं।।
वनस्पती गोळा करणारे आदिवासी लोक – कंत्राटी लोक यांच्याकडून या चुका होऊ शकतात.
तसेच परसबागेत आलेली Tinospora Crispa ला आयुर्वेदोक्त गुडूचि समजून, वैद्यांचा सल्ला न घेता खाऊन तिचे त्रास सांगत येणारे रुग्णही आहेत आम्हा वैद्यांच्या opd ला.
2) दुसरा मुद्दा: गुडूची बरोबर खाल्ली जाणारी ढिगभर इंग्लिश औषधं।।
ज्या रुग्णांमध्ये गुडूची खाल्याने यकृतात विषाक्तता सापडली हे रुग्ण प्यारासॅटिमोल पासून रेमडी – फेबी सारखी ढिगभर यकृताला घात करणारी औषधी खात होतीच ना..!!
(कारण, कोविड रुग्णात केवळ गुडूचीवर शोधनिबंध करण्याएवढा आपल्या शासनाचा राजाश्रय अजूनतरी नाही आयुर्वेदाला.…!
एवढंच काय आयुर्वेदाने बरे होणारे कोविडचे रुग्ण आयुर्वेदाने बरे झाले हे ही मान्य होत नाही यांना…!! …असो …. विषयानंतर नको)
एकट्या प्यारासिटीमोलच्या यकृतावर होणाऱ्या विषक्ततेवर जवळ जवळ 200 शोधनिबंध गुगलवर सापडतील..!!
त्यांचा विचार न होता, तो केवळ गुडुचि या एकाच औषधांवर आळ आणला जातोय…. आणि केवळ 6 लोकांत सापडलेल्या या गोष्टीचा बाऊ केला जातोय हे ही विचारात घ्यावं लागेल।।
3) मुद्दा तिसरा : गुडूचीचा Dose/ मात्रा
गुडूची कोरोनावर उपयुक्त आहे असे ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांनी स्वतः हुन सेल्फ मेडीकेशन करत स्वतः च्या शरीरावर गुडूचीचा मारा चालू केला….
आयुर्वेदीय सिद्धांतानुसार कुठलीही गोष्ट योग्य मात्रेत – प्रमानात सेवन केली तर ती औषध आहे … आणि अयोग्य मात्रेत सेवन केली तर साक्षात विष आहे…!!
म्हणजेच विष जरी प्रमाणात सेवन केलं तर ते आरोग्य देणारे आहे ( बरीचशी इंग्लिस औषधी विषच आहेत – प्रमाणात शरीरात गेली तरच औषध म्हणून काम करतात)
आणि आरोग्यदायी कुठलीही गोष्ट चुकीच्या मात्रेत – प्रमाणात सेवन केली तर ती मारक ठरते।।
पाणी जीवन आहे…! जगण्यासाठी अत्यावश्यक आहे…!! पण पाण्यात बुडल्यावर जीव घेणारच ना…!! तसाच प्रकार हा..!!
म्हणजेच औषधीचे प्रमाण – त्याचा Dose खुप महत्वाचा आहे हे इथं लक्षात घ्या …
लोकांनी हू म्हणून गुडूची खाल्ली … प्रकृती – विकृती – अवस्था यांचा विचार न करता हू म्हणून दालचिनी – लवंग – मिऱ्याचे काढे करून पिले …
घातक परिणाम तर होणारच ना…!!
गुडूचीला दोषी ठरवताना हा Dose – मात्रा – प्रमानाचा मुद्दा विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे…!!
4) मुद्दा चौथा : Preservatives युक्त गुडूची।।
गुडूची कोरोनावर उपयोगी आहे म्हणल्यावर लोकांनी बाजारात मिळणारे Preservatives युक्त गुडूची रसाचे तयार काढे घ्यायला सुरवात केली।।
कुठल्याही औषधी वनस्पतीचा जर ताजा रस औषध म्हणून घ्यायचा असेल तर, हिरव्या वनस्पतीपासून काढलेला ताजा स्वरस बनवल्या पासून 4 तासाच्या आत घ्यावा असे आमच्या आयुर्वेदातली औषधी निर्माणातील भाग असलेल्या भैष्यज्यकल्पनेत सांगितले आहे।।
बऱ्याचश्या आयुर्वेद औषधी फार्मसी कंपनीनी गुडूची स्वरसात Preservatives टाकून तयार गुडूची स्वरस बाजारात आणले। काही शोधनिबंधानुसार हे केमिकल युक्त Preservatives यकृतासाठी घातक असून ते कर्करोगाचे कारण आहेत।।
5) मुद्दा पाचवा : संयोग ।।
आयुर्वेदानुसार संयोग हा देखील फार महत्वाचा असतो. जसं तुप आणि मध समान मात्रेत सेवन केलं तर ते विषयुक्त ठरतं तर भिन्न मात्रेत एकत्र केलं तर ते व्यवायी – विकासी म्हणजे औषधीला सर्व शरीरभर पसरवणारे असते।।
गुडूची सेवन करत असताना त्यावेळी सेवन केलेली इतर देशी – विदेशी औषधीही विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे।। त्यांचा संयोग विचारात घेणे गरजेचे आहे।।
हे सर्व मुद्दे विचारात घेतल्यावर तुमच्या नक्कीच लक्षात आले असेलच की एखादं औषध घातक ठरवण्यासाठी काय काय विचारात घ्यावं लागतं।।
आता आपण आयुर्वेदात वर्णलेल्या गुडूची म्हणजे साक्षात अमृते बद्दल पाहू….
गुडूची वनस्पतीच्या उत्पत्ती व उपयुक्ततेबाबत संदर्भ:
अथ लङ्केश्वरो मानी रावणो राक्षसाधिपः | रामपत्नीं बलात्सीतां जहार मदनातुरः।।१||
ततस्तं बलवान् रामो रिपुं जायाऽपहारिणम् |
वृतो वानरसैन्येन जघान रणमूर्धनि॥२||
हते तस्मिन्सुरारातौ रावणे बलगर्विते |
देवराजः सहस्राक्षः परितुष्टश्चराघवे॥३||
तत्र ये वानराः केचिद्राक्षसैर्निहता रणे |
तानिन्द्रो जीवयामास संसिच्यामृतवृष्टिभिः॥४||
ततो येषु प्रदेशेषु कपिगात्रात्परिच्युताः |
पीयूषबिन्दवः पेतुस्तेभ्यो जाता गुडूचिका॥५||
गुडूची नामानि,
गुडूची मधुपर्णी स्यादमृताऽमृतवल्लरी |
छिन्नाछिन्नरुहा छिन्नोद्भवा वत्सादनीति च॥६||
जीवन्ति तन्त्रिका सोमा सोमवल्ली च कुण्डली |चक्रलक्षणिका धीरा विशल्या च रसायनी॥७||
संग्राहिणी कषायोष्णा लघ्वी बल्याऽग्निदीपिनी |दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्॥९||
चन्द्रहासा वयस्था च मण्डली देवनिर्मिता |
गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी॥८||
कामलाकुष्ठवातास्रज्वरक्रिमिवमीन्हरेत् |
(प्रमेहश्वासकासार्शः कृच्छ्रहृद्रोगवातनुत्)॥१०||
– भावप्रकाश निघन्टू ।।
कृतयुगात प्रभु श्रीराम आणि लंकापती रावण यांचं घनागोर युद्ध झालं होतं।। त्या युद्धात राक्षस सेनेच्या हातून प्रभू श्रीरामांची बरिच वानरसेना रणभूमीवर मृत्युमुखी पडली।।
ते पाहून देवांचा राजा इंद्राने त्या वानरांना जिवंत करण्यासाठी मृत वानरांच्या मुखात समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या अमृतकलशातील अमृताची धारा सोडली आणि त्यामुळे मृत वानरांच्या शरीरात पुन्हा प्राण आले।। युद्धात झालेल्या जखमा भरून आल्या।। कापलेले शरीरावयव पुन्हा पुर्ववत झाले।।
यावेळी वानरांच्या मुखात अमृतधारा सोडत असताना, त्या धारेचे काही अमृत तुषार उडून भूमीवर पडले।। आणि तिथे एका अद्भुत अशा दिव्य वनस्पतिची उत्पत्ती झाली।।
तीच ही साक्षात अमृतरुपी अमृता.!!
जिला गुडूची, गुळवेल, गिलोय, चक्रलक्षणिका, रसायनी, वयस्था, मधुपर्णी, छिन्नोद्भवा, वत्सादनी अशा अनेक नावांनी आपण ओळखतो।।।
संपुर्ण भारतभर सर्वत्र मुबलक प्रमाणात सापडते।। आम्हा शेतकाऱ्यांच्या बांधाला किंवा बांधाच्या अडचणीच्या कोपऱ्यात तर हमखास सापडते।।।
मोठ मोठ्या झाडांवर ही हिची वेल मस्त पसरलेली असते।। त्यात कडुनिंबाच्या झाडावर वाढणारी अमृता अधिक औषधी गुणांनी युक्त असते।। रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत तर सापडतेच सापडते।।
कारण आहेच तशी ही साक्षात अमृतरुपी वनस्पती।।अमर आहे ही वेल।। मरतच नाही।।तुकडे तुकडे करा।। पुर्ण चेंदा मेंदा करून फेका।। वाळू द्या।। एवढं करून थोडा गारवा मिळाला की पुन्हा फुटवे फुटू लागतात ।। आणि बहरते।।
ह्या वेलीचं कांड कापलं असत चक्रा प्रमाणे दिसतं।।त्यातली छोटी छोटी रंध्रे खुप सुंदर दिसतात।।
औषधात वापरताना ह्या वेलीचं साधारण आपल्या बोटा एवढं जाड कांड घेतात।।त्याचा ताजा ताजा स्वरस, चेचून पाण्याबरोबर काढा करून किंवा कांड सावलीत वाळवून बनवलेलं चुर्ण आम्ही औषधात भरपूर वापरतो।।
हिचं गुळवेल सत्वही काढतात।।। जे अनेक प्रकारच्या तापामध्ये, मधुमेहामध्ये, जुनाट आजारात खुप कामी येतं।।
औषधात साक्षात अमृता सारखं काम करते।।शरीरातील पेशींच्या ( ज्यांना आम्ही सप्त धातू म्हणतो) चयापचय क्रियेत झालेल्या बिघाड होऊन उद्भवलेल्या आजारांवर दिल्या जाणाऱ्या बहुतांश औषधींमध्ये गुडूची असतेच।।।
रोगप्रतिकारक शक्तीचे काम बिघडून बनलेले आजार ज्याला आपण Autoimmune Disease म्हणतो त्यावर तर ती रामबाण आहे।।
वयस्था म्हणजे वयस्थापन करणारी, रसायनी म्हणजे आयुष्य वाढवणारी अशी ही नावे गुडीचीच्या उपयुक्त गुणांनुसार दिली आहे ।।
हिच्या पानांची भाजी करून ही खाल्ली जाते।। आपल्या मेथीच्या भाजी प्रमाणे भाजी बनवतात।। त्यात शेंगदाण्याचं कूटही टाकलं जातं ।। बनलेली भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते।। चवीला कडू असली तरी अत्यंत औषधी आहे।। गावोगावाच्या जुन्या वृद्ध वैदयांची आहार स्वरूप पाहिल्यावर लक्षात आलं की जर महिन्याला हे वैद्य या गुळवेलाच्या पानांची भाजी आपल्या आहारात ठेवतातच।। आदिवासी लोकही हीचा भाजी म्हणून वापर करतात।। जनावरांत गाईची वासरं विशेष आवडीने खातात ही वेल।।।
आजच्या या कोरोनाच्या साथीत ही अमृताच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला उत्तम करून आपला कोरोना संसर्गापासून बचाव करणारी आहे हे पक्कं ध्यानात ठेवा।।
अमरत्व देणाऱ्या अमृता पासून उत्पन्न अमृता वनस्पती योग्य मात्रेत, योग्य त्या अनुपानाबरोबर व योग्य प्रकारे घेतल्यास कुणालाच बाधत नाही।। वात पित्त कफ या तिन्ही दोषांमध्ये झालेला बिघाड नाहीसा करून, शरीरातील चयापचय उत्तम प्रकारे करवून, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी ही अमृता पृथ्वीवरचं साक्षात अमृत आहे।। प्रत्येकाने घरोघरी हिची वेल लावलीच पाहिजे अन जपलीच पाहिजे।।
– *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Samadhan Shingte
खूप उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण लेख….
Dharmendra mhatre
Nice information sir.
Sharing
संजीव चंद्रकांत भाटकर
लाखों वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्व असणाऱ्या अमृता / गुळवेल या आयुर्वेदातील सत्वार्थाने संजीवनी देणाऱ्या औषधी वनस्पतींबद्दल आयुर्वेदाच्या विरोधकांनी निर्माण केलेल्या अपप्रचाराबद्दल जनजागृती करून गुळवेलीचं सविस्तर गुणवर्णन करून तुम्ही उत्तमरित्या लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकाकुशंकाचं यथोचित निरसन या लेखात केलं आहे. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद… 🙏
Namdeo Kalidas Kadam
Nice information about guduchi.