Covid 19 As Per AYURVEDA
मला उमगलेला कोविड…!
– वैद्य सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद)
कोरोना महामारी म्हणजे वायू दूषित होऊन उद्भवलेला जनपदध्वंसच म्हणावा लागेल । त्यानुसार, कोविड हा आगंतुज व्याधीच वाटतो….!
कारण आधी त्या Covid 19 विषाणूचा संसर्ग शरीराला होतो व त्यानंतर त्या शरीरात दोष उत्क्लेश होतो।। आणि मग ज्वरादी लक्षणं उत्पन्न होतात।।
साधारणपणे, ज्यांच्यात ज्यास्तच सामता आहे (जे शरीर साम आहे), मल संचिती अधिक आहे असे लोकच Covid संसर्गाच्या लक्षणांनी ज्यास्त ग्रथित होताना दिसतात।।
निराम शरीराचे तसेच उष्ण तिक्ष्णत्वाचे अधिक सेवन ज्यांना सात्म्य आहे अशा लोकांना Covid संसर्ग होऊनही त्यांच्यात त्या मानाने कमी प्रमाणात लक्षणे दिसतात।।
तसेच जे लोक नियमित शरीरशोधन करून घेतात, आहार – निद्रा – ब्रह्मचर्या या त्रिस्तंभांचे पालन करतात त्यांच्यातही कोरोना संसर्गजन्य लक्षणे फार कमीच जाणवतात।।
म्हणजेच शरीरातली सामता व मल संचिती ही त्या Covid विषाणूला ज्यास्त पोषक आहे असं जाणवतं।। आणि असं पोषक वातावरण मिळालं की covid विषाणूची वाढ भरपूर होते।। व्हायरल लोड ज्यास्त होतो आणि लक्षणेही अधिक अधिक दिसतात।।
चिकित्सा करताना मात्र बहुतकरून लोकांमध्ये कफ उत्क्लेश विचारात घेऊन कफज ज्वराची चिकित्सा उत्तम प्रकारे लागू होते।।
यातलं दोष उत्क्लेश विचारात घेऊन युक्तिपूर्वक केलेले सदयोवमन हे उत्क्लेशित दोषांना बाहेर काढण्यासाठी खुप महत्वपूर्ण ठरतेय।। त्यासाठी लवण युक्त कोष्ण जल उत्तम काम करतंय।।
सदयोवमन देऊन तद् नंतर,
लंघन – स्वेदन – कालो – यवागू – तिक्तको रस: !! ही तरुण ज्वराची चिकित्सा रामबाण आहे।।।
तर सामता नसताना किंवा कफ उत्क्लेश नसताना लंघनापासून चिकित्सा चालू करावी लागते।। लघु व अल्पोपहार, सिद्ध जल उपयुक्त ठरतं ।।
अजून एक महत्वाची गोष्ट जाणवते, ती म्हणजे कोविड चिकित्सेसाठी आयुर्वेदाकडे आलेला बराचसा वर्ग हा आयुर्वेदावर अर्धा विश्वास ठेवून आलेला असतो।। राजाश्रय असलेल्या आधुनिक शास्त्राची ढिगभर औषधे त्याला चालू असतात।। या स्थितीमध्ये मॉडर्नशास्त्रातील Secondary Infection होऊ नये म्हणून देण्यात येणाऱ्या Antibiotics, व्हिटॅमिन C, Zink आदी तसेच कफ बाहेर काढण्यासाठी असलेल्या Expectorant औषधी द्यायला मला हरकत वाटत नाही।।
पण त्याबरोबर देण्यात येणाऱ्या मॉडर्न औषधी मधल्या, पॅरासिटीमोल, cetrizine , Levocetrizin, montac LC, Pan 40 /Rablet 20/ Ondem/ Omez सारखी ही स्तंभक औषधं कोष्ठगत दोषांना धातूगत घेऊन जातात आणि धातूगत झालेल्या दोषांना अजून अजून लिन करतात।। या आधुनिक स्तंभक औषधिंनी स्रोतोमुखे अजूनच अवरोधित होतात।। याने शाखेत गेलेले दोष सुटून कोष्टगत व्हायला अडचन येते।। 4 दिवसात बरा होणारा आजार आजून वेळ घ्यायला लागतो।।सुटणारा कफ अजूनच बांधला जातो।। आत फुफ्फुसातच रुक्ष होऊन चीटकून बसलेला जाणवतो।।
धातुमध्ये अधिक अधिक लिन झालेले हे दोष पुढे जीर्ण ज्वराचे रूप घेऊन कृशत्व – वैवर्ण्य – दौबल्य ही लक्षणे उत्पन्न करतात ।। त्यात भरपूर steroid मारलं जात असेल तर अजूनच दोष धातूंगत होतात।। धातुमध्ये लिन झालेले दोष व आयुर्वेद शास्त्रानुसार गुणाने विषसमान असलेली उपरोक्त मॉडर्न औषधी ही आयुर्वेदाच्या विचारानुसार दुषीविष ठरून पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनला कारण ठरताना दिसतात ।। म्हणून ही स्तंभक औषधं अगत्याने टाळली पाहिजेत।।। ज्वर मुक्तीसाठी महासुदर्शन – रसादी पाचके आदी ज्वराची अवस्था विचारात घेऊन ज्वराचे योग आपण वापरू शकतो।।
आधुनिक शास्त्रातली Febi – रेमडी औषधं किती लावू पडतात हे त्यांनाच माहीत।। कारण फेबि – रेमडीची आधी उपयुक्तता सांगणाऱ्या त्यांनीच दुसऱ्या लाटेनंतर कोविड साठी उपयुक्त औषधींच्या यादीतून फेबी रेमडीला बाद केलंय।। ते उपयुक नाही असेही सांगितलंय त्यांनीच ।।।त्यामुळे त्याविषयी आपण न बोललेलं बरं।।
रुग्ण आत्यायिक अवस्थेत असेल तर O2 Support, बायप्यॅप आदी अत्यायिक चिकित्सा वेळोवेळी घेणं गरजेचं पडतं।। तसेच D Dimmer – Sr Ferretine आदी report बघून रक्ताला पातळ करणारी औषधी ही गरजेनुसार चालू करावी लागतात।।
कोविडची चिकित्सा करताना अजून एक गोष्ट प्रकर्षाने दिसते ती म्हणजे, ज्याला उलटी होते – ज्याला जुलाब होतात तो लौकर बरा होतो।। त्याला covid नंतरही ज्यास्त उपद्रव होत नाहीत ।। मात्र ज्याला हे दोन्ही होत नाही त्याला Post Covid Complication ज्यास्त दिसतात।।
म्हणजे ज्याचे शरीरदोष स्तंभित आहेत त्यांच्यातील कोविड कष्टसाध्य आहे ।। तर ज्याच्यातील दोष स्तंभित नाहीत त्याचा कोविड साध्य किंवा सहज साध्य आहे।।
म्हणून चिकित्सा करताना दोष मोकळे करणारी चिकित्सा करणं महत्वाचं आहे।। फुफ्फुसात रुक्ष होऊन चिटकून बसलेला कफ वेगळा करण्यासाठी लवणं युक्त स्नेहाने छाती – पाठीला स्नेहन करणं हे मोठी जादू करतं ।। चिकटलेला कफ सहज सुटाय लागतो।।
औषधी योजना करताना कुणाला त्रिभुवनकीर्ती मस्त वाटते तर कुणाला श्वासकास चिंतामणी।।
श्वासकुठार, कफकुठार, जयमंगल रस, साधासुत – सुवर्णसुत, लक्ष्मीविलास – महालक्ष्मी विलास, वसंतकल्प, विविध सुवर्णकल्प, सितोपलादी – तालिसादि, महासुदर्शन चुर्ण, रस- रक्तादी पाचके, शंखवटी , हिंगवाष्टक, कनकासव, अश्वगंधारीष्ठ, अमृतोत्तर, पारिजातक घन, गुडूची घन, संशमनी – संजीवनी आदी असे भरपूर पर्याय आपल्यापुढे आहेत। ते आपण अवस्थेनुसार वापरू शकतो।।
औषध ठरवताना, व्यक्तीची प्रकृती – विकृती – देश – काळ – सत्व – सात्म्य – वय – बल, औषधांची सहज व वेळेत उपलब्धता यांचा विचार अधिक महत्वपूर्ण ठरतो।।
अशा प्रकारे शरीरबल चांगलं असताना अग्नीची अवस्था – दोष अवस्था, दोषांचा उत्क्लेश आदी लक्षणानुरूप आपण औषध योजना करुन आपण कोविडवर जय मिळवता येतो।।
कोविड उपद्रवांची (Post Covid Complication) चिकित्सा करताना कोंडलेला वात अन क्लेद मोकळा करणं हे उद्दिष्ट असावं।। रुक्षत्वाने वाढलेल्या वाताला बाह्य स्नेहन स्वेदनाने जिंकावं।। क्षीण झालेल्या कोष्ठाग्नीला व धात्वाग्नीला लघु तर्पणाने बळ द्यावं।। जल ही सिद्ध करून द्यावं।। या अवस्थेला राजयक्षम्या प्रमाणे हाताळावं।। चांगलं बल आल्यानंतर यापन बस्तीने स्रोतसं मोकळी करवून घ्यावी।।
लसीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आजून तरी आपल्याला पूर्णतः पटलेलं नाही।।त्याचं प्रमुख कारण म्हणजे या लस उत्पादक व संशोधक लोकांची सारखी बदलणारी स्टेटमेंट।।। यावरून याचा अभ्यास अजूनही चांगलाच कच्चा वाटतो।।
तसंच एखादा – दुसरा डोस घेऊन बी पि शुगर नसलेले अनेक रुग्ण चांगलेच क्रिटिकल झालेली उदाहरणे समोर आहेत।। त्यामूळेही अजून संभ्रम निर्माण होतो।।
म्हणून तर कुणी लसीकरणाबद्दल विचारतं त्यावेळी मी अजून ही तटस्थ भूमिका घेतोय।।आणि मी घेतलं नाही आणि घेण्याचा विचारही नाही हेही मात्र आवर्जून सांगतोय।।
पण त्याच बरोबर लसीकरणाची चांगली गोष्ट जाणवतेय ती म्हणजे, दोन्ही डोस लसीकरण करून शुगर – बी पि च्या अनेक रुग्णामध्ये HRCT Score खुप कमी राहिलेले व सहज बरे झालेले भरपूर रुग्ण पण पाहण्यात आहेत।।
त्यामुळे लस घेणं आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं वाटत नसलं तरी मधुमेही – वृद्ध – जुनाट आजाराने ग्रथित आदी लोकांना लसीकरण गरजेचं वाटतंय।। कारण त्यांच्या शरीरधातूंमधली विकृती…! त्यांच्या शरीर बलाची अल्पता …!!
परंतु त्यांनाही लस देन्यापुर्वी त्यांच्यातला धात्वाग्नी चांगला करून त्यानंतर लस देणे अधिक उत्तम वाटतेय।।
लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीने किमान एक आठवडा तरी आयसोलेट राहून चांगली विश्रांती घेणं हे महत्त्वाचं आहे।।
पण तरीही न राहून लसीकरणापेक्षा आहार – निद्रा – ब्रह्मचर्या या त्रिस्तंभाचे पालन, ऋतूंचर्या – दिनचर्या पालन, वार्षिक शरीरशुद्धी आणि नियमित रसायन औषध सेवन हेच सर्वांसाठी बलवान वाटतात।।। हेच डेल्टा बेल्टा व्हेरिएन्टचे उत्तर वाटतात।।
या विषाणूंचा प्रसार रोखन्यासाठी सोशल डिस्टस्टिंगच्या पथ्या बरोबर धुपन या आयुर्वेदिक अस्त्राचा मारा उत्तम काम करताना दिसतो।।
आम्ही क्लिनिक मध्ये नियमित धुपन करतो। औषधी निर्माण करतेवेळी काढा बनवून शिल्लक राहिलेल्या चोथा, तेल – घृत सिद्ध झाल्यावर खाली राहिलेल्या कल्क यांचा धुपणासाठी वापर करतोय।।
त्यासाठी दररोज निखारे वगैरे करणं प्रॅक्टिकली शक्य नसल्याने एखाद्या भांड्यात वरची धुपन द्रव्य घेऊन ते तसेच गॅसवर ठेऊन दररोज धुपन केलं जातं।। चांगला गरगरीत धूर केला जातो।।
महत्वाचं म्हणजे, मे 2020 पासून कोविड रुग्णांना औषधं देणं चालू आहे।।
Covid Infected भरपूर रुग्ण क्लिनिकला येऊन जातात ।।
जुन 2020 पासून आजपर्यंत सर्व ती काळजी घेऊन रूग्णांना पंचकर्म चिकित्सा ही चालू आहे…!
पण सद्गुरूंच्या कृपेने आजून आम्हाला कुणाला कसलंचं Infection नाही झालं।। ( होऊन गेलं असेल तर माहीत नाही)
सोबत वार्षिक शरीरशोधन (पंचकर्म) अन एखादं रसायन औषध आठवलं तसं चालू असत।। त्यात कधी पंचतिक्तचा क्षीरपाक, कधी स्वतः बनवलेला च्यवनप्राश, कधी रसायन चुर्ण,
नाळ काढून बनवलेला शतावरी कल्प चालू असतो।। नियमित अमृतधारा जवळ बाळगली जाते।। पंचकर्म रुग्णांनाही दिली जाते।। या सर्वांनी रोगप्रतिकारक शक्तीला चांगलं बळ मिळतंय।।
कोविड चिकित्सा घेणाऱ्या रुग्णांना पण घरात उपलब्ध असलेल्या जिरे – ओवा – धने – तांदूळ – शेणीचे चुर्ण – निर्गुंडी कडूनिंब आदी उपलब्ध त्या गोष्टींचे उपरोक्त पद्धतीने धुपन करायला बजावून सांगतोय।।
आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास करताना, अमृतज्ञानाच्या या अथांग सागरातले काही अमृतथेंब मला उमगले…..! त्या थोड्याफार अमृतथेंबाच्या साह्याने अल्पमतिला जे अकलन झाले, त्यानुसार समजून घेतलेला कोविड इथे मांडायचा प्रयत्न केलाय…!
जय आयुर्वेद ।। जय आचार्य चरक ।।
*Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Samadhan Shingte
खूप महत्त्वपूर्ण माहिती…👍
Vandana Mulay
खूप छान अभ्यास पूर्ण लेख
सगळे मुद्दे पटले.