Title Image

Blog

CONSTIPATION

नियमित पोट साफ होत नाही??

Ayurveda Health Group - Join Free

मलावष्टंभ आणि आयुर्वेद चिकित्सा ।।

पन्नाशीनंतर वृद्धापकाळाकडे शरीर झुकू लागलं की निसर्गतः शरीरात कोरडेपणा वाढू लागतो.

कोलेस्ट्रोल वाढू नये म्हणून ऐकीव सल्याने तेल – तुप – लोणी – दुध खाणं आपण चाळिशी नंतर केव्हाच सोडलेलं असतं..! त्यातून आजुन कोरडेपणा वाढीस लागतो…! त्वचा कोरडी – खर होणं – पांढरट त्वचा निघणं, केसांची चमक जाणं ही लक्षणे दिसू लागतात,
अन रुक्ष गुण वाढल्याने शरीरात अजूनच वात वाढू लागतो।।

पोटात वाढलेला वात आतड्याला कोरडं करतो।।। मलाला सुकवतो ।। गॅसेस वाढवतो।। त्यामुळं आतला मल (संडास) सहजतेनं पुढं सरकत नाही।। आलेल्या कोरडेपणामुळं आतडयातला मल सहजतेने सटकून बाहेर येत नाही।।
यातून निर्माण होतो वृद्धावस्थेतला *मलावष्टंभ*.

WHO (World Health Organization) च्या सर्वेक्षणानुसार  आज जगातला सर्वात मोठा आजार “मलावष्टंभ” हा आहे म्हणे.!!

छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत हा सर्रास आढळतो।।

याची कारणे ही अनेक आहेत…!
● सर्वात पाहिलं कारण म्हणजे चुकीचा आहार अन अपचन।
● त्यानंतर कोरडया पदार्थांचे अतिसेवन ।
  स्नेह द्रव्यांना आहारातून वेगळं करणं
● वृद्धावस्थेत वाढलेला कोरडेपणा
● कुपोषण, अति उपवास
● आलेला मल वेग आडवणे (संडासाला अडवून ठेवणे) किंवा 
मल वेग आला नसताना *सकाळीच माझं पोट साफ झालं पाहिजे* हा शरीराकडे राजहट्ट करून जोर लावून मलत्याग करणे!! यांनं सारी शिष्टीम बिघडून जाते।

आम्ही आयुर्वेदाचे शिक्षण घेत असताना, शिकाऊ डॉक्टर म्हणून रुग्णचिकित्सेचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या वैद्यांकडे – डॉक्टरांकडे नियमित जायचो।।।असंच एकदा एका मोठया हॉस्पिटलमध्ये जाणं चालू होतं।।

तिथं 27 -28 वयाची एक रुग्णा तिच्या 3-4 कुटुंबियांसह जोरजोरात ओरडत रडत पोट धरून आली।।

तिच्या ओरडण्यावरून तर तिचं दुखणं आम्हाला पोटाचं वाटत होतं।। पण निघालं हे..!

कुणाच्या तरी सांगण्यावरून, गेल्या 20 -25 दिवस जाडी कमी करण्यासाठी केवळ packing मधले ज्युस पीत होती ती।। त्यानं नवीन मल(संडास) निर्मिती न होता आहे तो मल दगडासारखा झाला ।। आणि तो बाहेर पडताना भयंकर त्रास करत होता।।।
प्रसूतीवेळच्या कळाच आठवल्या त्या रूग्णेला।। मग पुढचे 3 -4 तास तिच्यावर वेगवेगळे उपक्रम चालू होते। तेव्हाकुठं तिची त्यातून सुटका झाली।।

मलावष्टंभ इतकं भयानक होऊ शकतं हे तेव्हा आम्हाला कळलं।।

मलावष्टंभाच्या  तक्रारींमध्ये सर्वात महत्वाचा असतो सकस, पौष्ठीक आणि नैसर्गीक पद्धतीचा आहार …!

आपली भारतीय आहारापद्धतीचे पालन करत असाल, जीवांन्न खात असाल, सणावाराला पुरणपोळी खिर तुपाच्या धारेबरोबर वरपट असाल, व्यवस्थित चाऊन अन भुकेचा मान राखुन खात असाल, तहानेनुसार पाणी पीत असाल,  तर हा आजार क्वचितच होतो।।

Ayurveda Health Group - Join Free

पण जर आधुनिक जीवनशैलीवाले असला,ब्रेड – बेकरी – पिझ्झा – बर्गर – पंकिंग मधले वेगवेगळे पदार्थ – सुक्या भाज्या – सुकं व शिळे मांसमासे  यांवर जगत असाल, कमोड वापरात असाल तर तुम्ही मलावष्टंभा बरोबर जगणं शिकलेले असणार।।।।

फायबर वाले पदार्थ खाऊन जबरदस्तीने पोट साफ करणं तुमच्या अंगवळणी नक्की असेल।। एनिमा पॉट सहित वेगवेळ्या पोट साफ़ करणाऱ्या औषधींचे भांडार ही असेल।।।

पण ते योग्य नाही।।।कारण ही नैसर्गिक क्रिया नैसर्गिकपणेच व्हायला हवी।।
मलावष्टंभाच्या दीर्घकाल तक्रार राहण्याने ग्रहणी, अर्श (मूळव्याध), फिशर, भगंदर, गुदभागाचा कॅन्सर असे एक ना अनेक आजार उद्भवतात।।

मलावष्टंभाच्या तक्रारी चालू झाली की एक वेगळीच अस्वस्थता वाटू लागते।।
आणि ते चेहऱ्यावरचे भाव व्यवस्थित व्यक्त होऊ लागतात।।

मग सखा – सखीच्या जवळ ही महाकठीण समस्या हलक्या स्वरात व्यक्त होते।।। आणि घरगुती उपाय चालू होतात।।

कुणीतरी सल्ले बहाद्दर सल्ला देतात पाणी भरपूर प्या..! पुढे घरात बाटल्या भरून मोजून पाणी पिण्याचे उद्योग चालू होतो।।। आणि तिथंच आपण चुकतो..!!

*पाणी पचनासाठी हि पचन शक्ती लागते।।* असं आमचा आयुर्वेद सांगतो।। हे ध्यानी ठेऊन प्रमाणात पाणी प्यावं लागतं।। पचेल अश्या स्वरूपात पाणी प्यावं लागतं।।

लोकं पोट साफ होण्यासाठी पाणी ज्यास्त पितात।।। 4 लिटर पासून पुढे 5-6 लिटर पर्यंत।।।🌊🌊 का ?  तर त्याच्या शिवाय फोर्सच येतं नाय म्हणे।।।

चांगलाय ।। तू वाडीव फोर्स।।।🤣😝🤣

आरे वेढ्यानो, हि काय घरातली मोरी आहे काय…?

वरुन ज्यादा पाणी टाकलं कि खालुन अडकलेला गाळ बाहेर यायला।।।

पाणी पचन संस्थेच्या वरच्या भागातच शोषले जाते।।

शरीरात पाणी तेवढंच काम करतं,जेवढं काम घरातल्या मोरीतली घाण वाहून ड्रेनेजमध्ये नेण्यासाठी होतं!!

पण हे काम शरीरातल्या धातूंमधील (पेशींमधील) टाकाऊ भाग धमन्यातून वाहून नेऊन किडनीद्वारे बाहेर नेणं एवढंच होतं।। आतड्यातला मल वाहून नेण्यासाठी नाही होत।।

आतड्यातला मल नेण्याचं काम आतड्यातील वेगवेगळे स्नेहयुक्त स्राव व आतड्याची हालचालीची गती यांवर अवलंबून असतं।।

आहारातून स्नेहांश कमी जात असेल तर आतड्यात कोरडेपणा येऊन मलावष्टंभ होतो।। स्निग्धपणा नसल्यामुळे पाण्यानं आतड्यातला तो कोरडेपणा कमी नाही होऊ शकत।।

हा कोरडेपणा वाताला अजून वाढवतो।। त्यातून वाढलेला वात, 

पक्वाशय – कटीसक्थी – श्रोत्र -अस्थि – स्पर्शनेंद्रिय या वाताच्या स्थानांचे आजार निर्माण करतो…!

पोट फुगणे, अपचन, गॅसेस, कंबर दुखी, हाडांचे दुखणे, कानामध्ये आवाज येणे, बधिर्य, हाडे-सांधे दुखणे, त्वचेचे खवले निघणे आदी आजार निर्माण होऊ लागतात…!!

मग हाडांचे डॉक्टर वेगळे, पोटाचे वेगळे, कानाचे वेगळे, BP – शुगर असेल तर त्याचे वेगळे असं होऊन बसतं।।

मुळ वात सोडून सगळीकडे गोळ्या मारायला चालू असतं ।। अन्नापेक्षा  औषधावरचं पोट भरू लागतं।।

एकटा वात एवढे बिघाड करू शकतो।।।

या प्रकारच्या आतड्याच्या कोरडेपानांतून उत्पन्न झालेल्या वाताला स्नेह गुणांनी शांत करण गरजेचं असतं।। 

या रुक्ष वाताची अन त्यातून उत्पन्न झालेल्या मलावष्टंभाची चिकित्सा करण्यासाठी लागतं चांगलं आणि *Refind  न केलेलं तेल अन घरात दुधापासून साय -दही-ताक -लोणी या क्रमाने पुढे लोणी कढवून बनलेलं अस्सल साजूक तूप …!*

हो ।। असच तेल अन असच तुप खावं लागतं।। त्याच्या स्नेह अंशाने आतड्यातिल कोरडेपणा नाहीसा होऊन मलनिर्हरन उत्तम होतं।।

येडे नहुते हो आमचे आजे – पंजे ।।
तुप तेल खायला।। अंगाला मालिश अन महीन्या – पंधरवाड्यातून एरंडेल घ्यायला।।।

जेवनात अन जगण्यात “स्नेह” खुप महत्वाचा असतो हो।।। आणि तो गुणवत्तेचा असावा लागतो।।तरच त्याने अन्नाचं अन मनातल्या भावनांचं पाचन व उत्सर्जन चांगलं होतं।।

मलावष्टंभापासून सुटका मिळवण्यासाठी त्याचं कारण शोधणं गरजेचं असतं।। आणि त्या नंतर त्याची योग्य ती चिकित्सा।।।

     आयुर्वेद चिकित्सा शास्त्रानुसार निदान अन चिकित्सा केली तर खुप खुप सोप्पा आजार आहे हा।। सहजासहजी ठीक होतो।।

पण त्यासाठी मलावष्टंभाच्या कारणांचं पक्क निदान होणं अत्यावश्यक असतं।।
आणि निदान होऊन त्याला योग्य ते आयुर्वेदिक औषध जाणं गरजेचं असतं।।
आहार विहार पथ्यापथ्य पालन गरजेचं असतं।।

पंचकर्मातील बस्ती उपचार यासाठी मोठी जादू आहे।।। जणु आतड्याची मलावष्टंभाची (Constpation) सवय मोडून काढणारं आमचं इंजेक्शनच ते…!

तसंच प्रकृती व लक्षण यानुसार वापरलेली अनुलोमन तेल, हिंगुत्रिगुण तैल, सुंठी सिद्ध एरंड तेल ही पलटण खुप मस्त उपशन देतात।।

म्हणून ऐकीव गोष्टींच्या नादी न लागता योग्य त्या आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घ्या।।।
आजाराला सांभाळत बसु नका।।

  Dr Saurabh B. Kadam

      M.D.(Ayurved), Pune

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व  Blog ला जरूर भेट द्या…

https://shriayurvedic.in



Click here for sharing blog link on your social media

Comments

  • January 11, 2023
    reply
    बाळू बऱ्हे

    धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • January 11, 2023
    reply
    बाळू बऱ्हे

    धन्यवाद सर तुम्ही खुप छान माहीती दिली

  • Ayurveda Health Group - Join Free

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!