Blog

Piles Ayurved Treatment

(Hemorrhoids /मुळव्याध / बवासीर)

Ayurveda Health Group - Join Free

सहनही होत नाही अन सांगताही येत नाही ! असा आजार म्हणजे हा मूळव्याध…!

चालण्याचा ढंग, चेहऱ्यावरचे भाव आणि रुग्णाच्या त्या विशिष्ट चिडखोरपणावरून त्याचा तो आजार न सांगता आम्हाला बऱ्याचदा कळत असतो।।  एवढा तर हे दुखणं त्रासदायक असतं।। शरीरात तर बोचतंच असतं पण मनालाही बोचत असतं ।।

सामान्यतः संडासाच्या जागेचा कोणताही आजार झाला की, “मूळव्याध झालं असं आपण म्हणत असतो।। पण तसं नाही हं ते।।”

सामान्यतः गुदप्रदेशात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजे,

1) मुळव्याध (Hemorrhoids/ Piles):
संडासाच्या जागेत कोंब आल्याप्रमाणे मासांकुर येणे।

रक्त पडणारे व कोरडे असे दोन प्रकारचे मुळव्याध असतात….!

2) Fissure : गुदद्वारात जखमा होणं, संडासाची जागा फाटने ।

3) भगंदर (Fistula):  गुदद्वाराच्या भोवताल च्या भागात एखादी पुरळ/ फोड येऊन तिचे दुसरे तोंड आत गुडद्वारात आतमध्ये उघडणे। त्यातून पूय – घाण रक्त येत राहणे।

आयुर्वेदिक औषधींनी मुळव्याध – फिशर 100% बरा होऊ शकतो

यातले  मुळव्याध व फिशर यांचे आयुर्वेद तज्ञांकडून वातज – पित्तज – कफज आदी योग्य निदान होऊन, त्यानुसार औषधी गेली आणि त्या रूग्णांने वैद्यांवर विश्वास ठेऊन त्यांनी सांगितलेली पथ्ये पाळली की सहजतेने बरे होतात।। चौथ्या टप्यातला मुळव्याध असेल तरच तो ही
फारच क्वचित शास्त्रक्रिया करायची गरज पडते हा आजवरचा अनुभव….!

भगंदर मात्र शस्त्र साध्यच आहे।। याला सर्जरी करून आतली घाण काढून ती जखम भरून येईपर्यंत नियमित ड्रेसिंग करत राहणे तीच त्याची चिकित्सा।। याशिवाय भगंदर परत उद्भवू नये, म्हणून शस्त्रक्रिया झाल्या नंतर काहीकाळ रक्त व मांसधातूवर काम करणारी आयुर्वेद उपचार घेणे अतिशय जरूरीचे असते।

हे जर नाही केले तर भगंदर परत परत उद्भवतो..!

Suvarnaprash

मुळव्याध  – फिशर होण्याची कारणे:
1) गुदद्वारावर ताण (Pressure) आणणारी कामे करणे –  जसे की
–  एका जागेवर ज्यास्तवेळ बसनारे
– ड्रायव्हर लोक किंवा अधिक प्रवास करणारे
– वजन उचलणारे
– पोट साफ होत नाही म्हणून तसंन तास टॉयलेट मध्ये बसणारे
– पोट साफ होण्यासाठी गुदावर भरपूर प्रेशर देणारे
– मुळातच ज्याचे शरीर कमकुवत आहे असे लोक स्वतःच्या ताकतीपेक्षा अधिक ताकतीचे काम करणे
– अधिक काळ खोकला असलेले

2) पचनशक्तीचा विचार न करता खाणारे
– पचायला जड पदार्थ, अधिक मांसाहार, तिखट – चमचमीत – बेकरी – शिळे – आंबवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाणे,
चुकीच्या पद्धतीने आहार घेणे,
रात्री जागरण करणे।। दिवसा झोपणे आदी कारणे वारंवार घडत राहिली की
मुळव्याधीला पोषक वातावरण शरीरात तयार व्हायला लागते…!

आणि मग कधीतरी सणासुदीला – कार्यक्रमात खाण्या पिण्यात जरा ज्यास्ती बिघाड झाला की हे मुळव्याध  फिशर उद्भवाय लागतात..!!

Ayurveda Health Group - Join Free

मूळव्याधीची लक्षणे:

– संडासाच्या जागेला जडपणा वाटणे, दुखणे, आग पडणे, जळजळ होणे – तिथे मांस वाढल्यासारखे कोंब लागणे – संडासची जागा छोटी होऊन सौच्यास त्रास होणे – संडासाच्या जागेतून रक्त पडणे

यापैकी कोणतेही एक लक्षण असेल तरी मूळव्याध असू शकतो. किंवा त्याची सुरुवात असू शकते.

मी स्वतः वर्ष 2014 पासून यावर काम करत असून आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, पुणे च्या माध्यमातून 2007 पासून यावर काम चालू आहे.

प्राचीन आयुर्वेद ग्रंथात सांगितलेल्या वनस्पती स्वतः गोळा करून ती शुद्ध करून त्याची औषधं बनवली जातात व त्याद्वारे उपचार केले जातात.

आजची जीवनशैली, लोकांच्या सवयी यांचा विचारकरून, वेळोवेळी आलेल्या अनुभवानुसार औषधींमध्ये बदलही केले आहेत.

मुळव्याध हा पचन संस्थेचा आजार असल्याने औषधी बरोबर रुग्णांचे आहार विहाराची पथ्ये पाळणं हे अधिक गरजेचं असतं।।

मुळव्याध – फिशरच्या जागी करायचे काही स्थानिक उपचार आणि पथ्य पाळत पोटातून घेतलेली औषधी रुग्णाला आजारातून सहज बाहेर काढतात. पंचकर्म उपचारातला घरी घेण्यास सहज शक्य असा मात्रा बस्तीची चिकित्साही गरजेनुसार दिली जाते.

यासाठीच रुग्णाला  “पथ्य पाळणार असाल तरच औषधं घ्या..!” अशी अट घालून आम्ही औषधी देत असतो..!

Piles ayurveda treatment

मूळव्याधी प्रामुख्याने चार ग्रेड (Grede – टप्यात) मध्ये असते.

Grede I – कोंब बाहेर न येता आतल्या आतच असून ते मल (संडास) बाहेर येण्यास अडथळा करतात. संडासची जागा जड वाटते, दुखते , कडक संडास झाल्यास रक्तस्त्राव होतो.

Grede II – मल विसर्जन करताना कोंब बाहेर येतात आणि स्वतः हुन आत जातात ही।। मल (संडास) बाहेर येण्यास अडथळा करतात. संडासची जागा जड वाटते, अधिक दुखते , कडक संडास झाल्यास थोडा ज्यास्त रक्तस्त्राव होतो. दाह करते।।

या Grade I आणि Grade II चा मूळव्याध एक ते 2 महिने नियमित औषधी घेतली व पुढे 6 महिने पथ्य पालन केले की पूर्णतः कमी होतो.

Grede III –  मल विसर्जन करताना कोंब बाहेर येतात आणि  स्वतः हुन आत जात नाहीत, त्यांना हाताने आत ढकलावे लागते।। मल बाहेर येण्यास अडथळा करतात. संडासची जागा अधिक जड वाटते, अधिक दुखते , कडक संडास झाल्यास अधिक रक्तस्त्राव होतो. दाह करते।। हातापायाच्या पोटऱ्या दुखतात, अशक्तपणा वाटतो, कामात लक्ष लागत नाही। बऱ्याचदा रक्तही कमी होते।

या Grade III चा मूळव्याध 3 ते 4 महिने नियमित औषधी घेतली व पुढे 6 महिने पथ्य पालन केले की पूर्णतः कमी होतो. या टप्यात उपचार करताना पंचकर्म मधल्या स्थानिक उपचाराचीही गरज पडू शकते।। गुदद्वारात औषध सोडून मूळव्याधीचा उपचार करावा लागतो।।

Grede IV –  बाहेर आलेले कोंब बाहेरच राहतात, हाताने ढकलूनही आत जात नाहीत, भयंकर वेदना असतात।। संडास बाहेर येण्यास अडथळा करतात. संडासची जागा अधिक दुखते , चालताना – बसताना त्रास होतो, व्यवस्थित बसता येत नाही, रक्तस्त्राव होतो किंवा नाही. दाह करते।। हातापायाच्या पोटऱ्या दुखतात, अशक्तपणा, कामात लक्ष लागत नाही। बऱ्याचदा रक्तही कमी होते।

या Grade IV चा मूळव्याध 3 ते 4 महिने नियमित औषधी, गरजेनुसार पंचकर्म उपचार व पुढे 6 महिने ते 1 वर्ष पथ्य पालन केले तर बरा होऊ शकतो. या टप्यात उपचार करताना पंचकर्म मधल्या स्थानिक उपचाराची वारंवार गरज पडते।। गुदद्वारात औषध सोडून मूळव्याधीचा उपचार करावा लागतो।।

तिसऱ्या आणि चौथ्या टप्यातील (Grede) मधील मूळव्याधीला आयुर्वेदातला अर्शोघन बस्ती चांगला उपयोगी पडतो।

मुळव्याध होण्याचे आयुर्वेदानुसार कारण शोधून तिथला दोष संबध विचारात घेऊन त्याला औषध गेलं आणि त्याला पथ्यापथ्य पाळणाची जोड मिळालाय की रुग्ण बरा होतोच..! 

हा आजवरचा अनुभव आहे आणि हीच तर ताकत आहे आयुर्वेदाची…!!

–  *Dr Saurabh B. Kadam*
     *M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*

Piles Fissure Ayurveda Treatment

*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*





Click here for sharing blog link on your social media

Comments

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!