Tooth Care as Per Ayurveda
काळजी दातांची…!
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
तुमच्या खान पान व त्यानंतर तुम्ही ठेवत असलेली तुमच्या दातांची स्वच्छता यावर तुमच्या दातांचे आरोग्य अवलंबून असतं ।। आणि तुमच्या दातांच्या मजबुती वरून तुमचं आरोग्य अवलंबून असतं।।
आज ही गावाकडे नवीन गुरं खरेदी करताना त्यांच्या दातांची संख्या – त्याची ठेवण याचा विचार जुनी लोकं करतात।।
आरोग्यशिवाय सौंदर्याच्या दृष्टीनेही दातांना ज्यास्तीचं महत्व असल्याने खुप संशोधनं झाली दातांवर…
एवढी की .. दातांच्या नावे डेंटिस्ट नावाची वेगळे डॉक्टरच आहेत…! तरीही आमच्या दातांच्या समस्या काही संपत नाहीत।।।
आयुर्वेदातही दातांच्या आजारांविषयी सविस्तर वर्णन पाहायला मिळतं।। सविस्तर औषधोपचार दिले आहेत।। पण सर्वात आधी दातांची निघा कशी राखावी याचं सविस्तर वर्णन आहे।। दंतधावन – गंडुष – कवळ – नस्य हे दिनचर्येतील गोष्टी दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने खुप महत्वाच्या आहेत।।
मात्र याच दातांच्या उपचारांचा संदर्भ देऊन, आयुर्वेदाच्या नावाचा वापर करून बक्कळ पैसे कमावले ह्या दातांच्या पेस्ट वाल्यांनी।।
पण दातांचं आरोग्य काय सुधारलं नाही।।
उलट वाढत गेलं।।
जर लहान पणापासूनच आयुर्वेदाच्या साहाय्याने आपण आपल्या दातांची काळजी घेत राहिलो तर आज च्या दातांच्या 80% समस्या कमी होतील।।
आज आपण त्याबद्दल सविस्तर पाहू…
दातांच्या आरोग्यासाठी काही उपयुक्त द्रव्ये आणि माहिती आज देतो।।।
आयुर्वेदिक दंतमंजन व त्यातील द्रव्यांकडून होणारे काम-
लवंग-
देवकुसुम असं काहीतरी नाव आहे।।
असली उष्ण तर गुणाने शीत आहे।।।
आपल्या आविपत्तीकर मध्ये आहेच।
लवङ्गं देवकुसुमं श्रीसंज्ञंश्रीप्रसूनकम् |
लवङ्गं कटुकं तिक्तं लघु नेत्रहितं हिमम् ||
दीपनं पाचनं रुच्यं कफपित्तास्रनाशकृत् |
तृष्णां छर्दिं तथाध्मानं शूलमाशुविनाशयेत् |
कासं श्वासञ्च हिक्काञ्च क्षयं क्षययतिध्रुवम् ||
दंत शुलात उत्तम।।
दंतशूल कृमी नाशक।।।
आकार हि दंत – दाढे प्रमाणेच।।
नेत्र हितकर पण आहे..
म्हनजे दररोज जर हे द्रव्य,
दंतधावन – गंडुष- कवल या मार्गे गेले तर
दातांची हेल्थ हि उत्तम राहील
दिपन पाचन होईल
नेत्राला हितकर होईल
अग्नी कृत पण आहेच।।।
कफ आणि पित्त दृष्टी वर चालणारे द्रव्य ।। साम पित्तात आपण आविपत्तीकर चूर्णाच्या रूपाने वापरतोच आहे।।।
तिक्त रसात्मक द्रव्य-
करंज
निंब
कंठकारी
कृमिहर द्रव्य: विडंग
दंतदाढयकर- म्हणजे दंत मुळाला बल देणारे दृढ करणारी व प्राधान्याने कषाय रस प्रधान द्रव्ये-
बकुळ- अर्जुन- खदीर- बाभळ ।।।
खदीर- मुखगत व्याधींसाठी उत्तम
याने त्वचेचा आतील leyer ची (mucous- sub mucous)उत्तम काळजी घेतली जाते।।
इरिमेदादि तैलात मध्ये आहेच खादीर ।
यांचा वापर हि व्हावा।
तर
*उत्तम दान्तधावणार्थ combination*…
*1)कृमी व शूल हरणार्थ,*
लवंग – (2 भाग)
विडंग-करंज -निंब (प्रत्येकी 1 भाग)
2)कंठकारी (1भाग) – *गलगत दोष हरनार्थ*
3)खदिर(1भाग)- *मुख दोषहर*
4) *दंतमूल दृढ होण्यासाठी व दंताची अभ्यान्तर मजबुतीसाठी*
बकुळ -आभा (बाभूळ)- अर्जुन
(प्रत्येकी 1 भाग)
सर्व सूक्ष्म चूर्ण (बारीक पावडर) स्वरूपात एकत्र करून दिवसातून दोन वेळा दात घासण्यासाठी याचा वापर करा।।
*दंतधावन असं असावं जे दंतांबरोबर संपूर्ण मुख -गल यांची काळजी घेतली जावी।।*
पंचेंद्रियांवरील दोषावरन दूर करून त्यांना बल देणार असावं।।
पेस्ट च्या स्वरूपात असेल, तर तो फेस या द्रव्यांच्या कार्यात नक्कीच अडथळा आणेल।।
म्हणून ते पावडर/ चूर्ण स्वरूपात असावं।।
याच द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तैलाचा कवल धारण (म्हणजे काहीकाळ तोंडात धरून ठेवणे) हि आठवड्यातून एक ते दोन वेळा करावं।।
दातांची व दांतमुळांची मजबूती वाढवण्यासाठी होतो।।
बघा पटतंय का??
नायतर टूथपेस्टवाल्यांचं मीठ घालणं- मीठ काढणं-मधेच कडुनिंबाचा रस किंवा लवंग टाकणं आणि डेंटिस्ट च्या गळ्यात स्टेथो टाकून दुनिया का नंबर वन टूथ पेस्ट म्हणून प्रचार करणं, असले प्रकार चालूच असतात।।।
विकसित देशात टूथपेस्ट ट्युब वर “मूल सहा वर्षाच होई पर्यंत त्याला टूथपेस्ट देऊ नका” असं लिहिलेलं असतंय म्हणे।।
अन आमची लेकरं चाटून चाटून चवीनं खातात ती पेस्ट।।
एका नवीन Reseach नुसार ह्या टूथपेस्ट मधील फेस निर्माण करणारा घटक कॅन्सर चे कारण ठरू शकतो म्हणे।।
– Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking