Skin Diseases Treatment
त्वचारोगांचा माहोल!!🌼
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
त्वचारोगांचा माहोल सध्या जरा ज्यास्तीच आहे…! त्वचाविकाराचे भरपुर रुग्ण आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात ।।। लेप्रसी सारखे आजार कमी झाले मात्र पिंपल्स, फंगल इन्फेक्शन, चाई पडणे आदी आजार मात्र खूपच अधिक प्रमाणात वाढलेत।। मागच्या 2 दशकात सोरिआसिसने पण मोठा कहर केलाय।।।
स्टेरॉइड – Antifangal औषधींचा 5 – 6 महिन्याचा कोर्स करून, वेगवेळ्या क्रीम लावून पहिल्या पेक्षा भरपूर वाढवून रुग्ण येतात आमच्याकडे..! मग आम्हाला सगळं मुळापासून चालू करावं लागतं..!
आयुर्वेदानुसार त्वचारोग उत्पन्न होण्याची प्रमुख तीन कारणे सांगितली आहेत,
1) विरुद्ध आहार – विहार: विरुध्द गुणांचे आहारीय पदार्थ एकत्र खाणे आदी.
2) मलसंचिती: शरीरातून बाहेर पडणारा मल – मुत्र – स्वेद (घाम) – कान नाकातला मल – पाळीचा स्त्राव – पित्ताशयातील पित्त आदी मलांचा शरीरातून निचरा न होता किंवा ते शरीरातून बाहेर न पडता शरीरातच साचून राहणे.
3) पुर्वजन्मकृत पापकर्म व त्याने मोह – माया – स्वार्थ – लोभ – ईर्ष्या – मत्सर – क्रोध आदी भावांनी विकृत झालेले मन
सोरिआसिस – कुष्ठ सारखे खुप दिवस राहणारे चिवट असे अधिकतम त्वचारोग पूर्वजन्मपाप कृत आहेत असं जरी आयुर्वेद शास्त्र म्हणत असले, तरी या जन्माची पापे पण काही कमी नाहीत हो आपली।।
स्वार्थीवृत्तीच्या बुद्धिमान🧠 मनुष्यप्राण्याकडून स्वतः च्या फायद्यासाठी नवनवीन अचाट उद्योग राबवले जातात।। निसर्गाच्या प्राकृत कार्यात गोंधळ घडवला जातो।*
ह्याची फांदी त्याच्या खोडाला,त्याची फांदी याच्या खोडाला करून वेगळीच जमात निर्माण केली जाते।। मागे सिताफळ अन रामफळ यांचं ग्राफटींग करून नवीनच फळ उत्पन्न केलं।। अन हे किडे करणार्याने त्याला नाव पण “हनुमानफळ🍑” असं दिलं ।।। त्या देवाला पण सोडले नाहीत इथं या अचाट बुद्धीच्या प्राण्याने ।।।
याशिवाय एका प्रजातीच्या प्राण्याचं बीज दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्यांच्या गर्भात सोडलं आणि नवीनच प्राणी जन्माला घातले🐄🐮।।तसेच प्राण्यांमधलं नैसर्गिक रत बंद करून कृत्रिम injection द्वारे गर्भाधान करवलं जातंय।।
*निसर्गाच्या प्राकृत कर्मात अडथळा निर्माण करून, मुक्या जिवांवर केलेले नानाप्रकारे, नैसर्गिक चक्र बिघडवन्याचे हे विविध प्रयोग ..! ही फारमोठी पापंच आहेत मनुष्याची।।*
या पापांचे भोग मात्र, याच पापकृत्यातून बनलेल्या उत्पन्नाचे भोग घेणाऱ्याला ज्यास्त भोगावे लागतात, हीच गोष्ट इथं थोडी वेगळी आहे ।।।
*वनस्पतीमध्ये हायब्रीडीकरण केल्यानं नुसतंच Quantity ने वाढलेलं आणि Quality च्या बाबतीत बऱ्या पैकी निकृष्ट असे, अति नाजूक व कमकुवत त्वचेचे, भरपूर रासायनिक खत – फवारणी युक्त अन्नधान्य खाऊन आपल्या त्वचेचं पोषण म्हणावं तसं होत नाही।।।* त्यामुळं तिच्या ठिकाणी थोडं वैगुण्य निर्माण झालेले असते. त्या अन्न पदार्थांना शाईन देणारं – चमक आणणारं – पिकवणारी – टिकवून ठेवणारी रासायनिक द्रव्य भरघोस प्रमाणातील वापर आपल्याकडून चालू असतो।।
त्यामुळे असे *कमकुवत त्वचा (साल- कवच) असलेली अन्न धान्ये खाऊन आपली त्वचाही त्याच पद्धतीची कमकुवत बनू लागते।।। रक्तवाहिन्याच्या अवरणासहित इतरही सर्व शरीरभाव पदार्थांची आवरणं कमकुवत बनतात।। थोड्या थोड्या बदलाला बळी पडतात।।* हवेतील प्रदुषण – वातावरणातील वाढती उष्णता – अल्पकाळात त्वचेवर होणार उष्णशीत असा व्यत्यासातील मारा आदी कारणे त्वचा विकृतीस आज प्रामुख्याने कारणीभुत आहेत।।।
या शिवाय विरुद्ध गुणांच्या काही अन्न पदार्थांचे एकत्रित सेवन करणे उदा.
– दूध व मांसाहार ( अंडी -मटण – चिकन – मासे यापैकी काहीही) एकत्र खाणे,
– पिकलेल्या आंब्याशिवाय इतर फळे दुधाबरोबर खाणे,
– दुध सडवुन बनवलेलं पनीर
– रात्रीचे शिळे अन्न विशेषतः रात्रीचा शिळा भात गरम करुन खाणं
– रात्री दही खाणं, दही उडीद आदी- तिखट उष्ण अशा संयोगास अयोग्य पदार्थाबरोबर संयोग करून खाणं,
– चहा कॉफीचा मारा, सॉफ्टड्रिंक्स वगैरे
– ब्रेड बिस्कीट केक आदी बेकरी पदार्थ,
– अति तिखट – उष्ण – मसालेदार – खरपाकि – तीक्ष्ण पदार्थ आती व नियमित खाणे इत्यादी.
*चुकीच्या सवयी व पद्धतीने खाल्लेलं अन्न चांगलं पचत नाही।। पचलच तर विकृत अन्न विकृत पद्धतीनेच पोषण करतं।।।* त्वचा,रक्त,मांस आदी शरीरावयवात विकृती उत्पन्न करतं।
अति खाणं, चुकीचा संयोग करून खाणं आदी गोष्टींमुळे अयोग्य पचन झाल्याने पोट साफ होत नाही।।मल बाहेर टाकला जात नाही।। त्याशिवाय इतर मलायतना मधील मल (शरीर मल बाहेर टाकण्याचे अवयवा मधील मल म्हणजे लघवी – घाम – कानातला मल – नाकातील मल इत्यादी) योग्य प्रकारे बाहेर पडत नाही आणि त्यामुळे तिथेच संडास व इतर मल साचून कुजून त्यातून विषारे बनतात।। त्यातून त्वचा रोग बनतात।।
या मलात पुढे जंत (कृमी) ही बनने चालू होते ।। जंताचा मल रक्तात मिसळून तो ही त्वचा रोगाला बळ देत राहतो।। म्हणून या त्वचा रोगांना बरे करताना शरीरात संचित असलेला मल बाहेर काढन्या बरोबर जंतावर ही चिकित्सा करावी लागते।।
*जंत जरी काढले तरी त्याजंतांची अंडी बरेच महिने शरीरात टिकून असतात।।त्यांची विषारे शरीरात टिकुन असतात।। ती बाहेर पडेपर्यंत त्यावरची औषधी घेणे गरजेचे राहते।।*
खरं तर यात,
पंचकर्म मधील स्नेहपान करवून, स्नेहन – स्वेदन – रेचन (जुलाब) व शेवटी संसर्जन क्रमासहित 11 ते 14 दिवसात केलं जाणारं उत्तम विरेचन करवून कोठा साफ करवून घेणे ही मूळ चिकित्सा आहे.
अशी शुद्धी वारंवार करावी लागते. त्याच बरोबर दुषित रक्तासाठी रक्तमोक्षण, कफ संसर्ग असेल तर वमन आणि वात संचिती असेल तर बस्ती यांची गरजे नुसार जोड देऊन शरीरशुद्धी केली जाते।।
*शरीरशुद्धी नंतर त्या शरीराला बल देणारी – शरीरधातू चांगले निर्माण करण्यास मदत करणारी औषधी, तसेच यकृतासारख्या अवयवाला बल देणे- रक्तशुद्धी करणारी, रक्तधातूची उत्तम निर्माण करणारी, मांसधातुमधील त्वचारोगाला पोषक असणारा चिकटपणा घालवणारी, त्वचेचे पोषण करणारी रसायन औषध (आयुष्य वाढवणारी औषधं) योजना करून चिकित्सा केली जाते.
त्याच बरोबर मानसभाव परिक्षणानंतर, त्याला मनोवह: स्रोतासाच्या चिकित्सेद्वारे अध्यात्माचे बळ देऊन आयुर्वेद चिकित्सेने त्वचारोगातून उत्तम प्रकारे मुक्ती मिळताना दिसते ।।।
यात रुग्णाच्या आहार -विहाराच्या पथ्यापथ्य पालनाच्या तपश्चर्यची जोड मिळणेही महत्वपूर्ण असते.
– Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
खाली दिलेल्या comment box मध्ये आपली महत्त्वपुर्ण प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking
Emmanuel
Great initiative Dr
Awarness of ayurveda very important
Thanks serving the sosciety