पाश्चिमात्यांचं अनुकरण।।
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
प्रत्यक्षम अल्पम।। अप्रत्यक्षम बहुल:||
या संपुर्ण विश्वात,
प्रत्यक्षपणे समजणाऱ्या गोष्टी फारच कमी आहेत।। पूर्वीच्या जुन्या साहित्यावरून आणि अनुमानाने जाणून घ्याव्या लागणाऱ्या गोष्टी भरपूर आहे।।
काळाच्या महिम्या मुळे आपण सर्व काही प्रत्येक्ष पाहू, त्याचं संपूर्ण ज्ञान नाही घेऊ शकत।।। त्याचं ज्ञान आपल्याला आप्तांकडून घ्यावयचं असतं।।
आप्त म्हणजे असे महात्मा की ज्याचं वचन हे अंतिम सत्य असतं।।
त्यांचं वचन म्हणजे अभ्यासांती काढलेला सिद्धांत असतो।।
मध्यंतरी ती कोण कुठली ऑस्ट्रेलियन नारी ।।।
आमची संस्कृती – कुंभमेळे -नागा साधू आदी विषयांवरून तिने आम्हा भारतीयांना येड्यात काढते।।। प्रसार माध्यमांना पण चघळायला विषय मिळाला। फिरवून फिरवरून तेच ते दाखवत होते चार दिवस।।
त्यानंतर आमचीच काही अर्ध्या डोक्याची जमात काहीही न जानता आपल्याच गोष्टींना – परंपराना नावे ठेवत फिरु लागली।।
परदेशी लोकं म्हणजे लै शहाणी अशी आमच्यातल्याच काहींची विचारधारा।।।
त्यांनी काहीही सांगितलं, की ते आम्ही प्रमाण मानून प्रचाराला लागतो।।
आपली हजारो वर्षांचा अभ्यास करून बनलेली शास्त्रे पुराणातली वांगी समजतो।।।
दीड – दोनशे वर्षापूर्वी पासून त्या गोऱ्यांनी आम्हाला येडे म्हणाय चालू केलं।।।पुन्हा आमच्या संस्कृतीला ओल्ड फॅशन म्हणवून हिनवलं।। परदेशी माल इथे उपलब्ध करत आमचे सुतार – शिंपी – चांभार आदी उद्योग भिकेला लावायला चालू केलं। ।।
पुढं आमची वर्षानुवर्षे अनुभवाने सिद्ध झालेली आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीवर बंदी आणून त्यांची आधुनिक चिकित्सा पद्धत आमच्यावर लादली।।
हे सगळं करत असताना, “आम्हाला सुधरवतोय..!!!” असा मोठा आव आणला..!
एखाद्या चांगल्या माणसाला “तु वेढा आहेस..!” असं वारंवार म्हणत राहिल्यावर ते शहाणं कसं येड्यागत करतं..!
तसंच काहीसं आम्हा भारतीयांवर झालं।।
हिंदुस्थानी दिल सोडलं तर सगळं पाश्चिमात्य ते उत्तम म्हणून स्वीकारायला आम्ही चालू केलं।।
आमच्या चाली – रिती – परंपरा -संस्कृती बरोबरच आम्ही आमची शास्त्रे ही पुराणात जमा करायला चालू केली।।
खुप मोठी चुक करत गेलो आपण..!
कारण आज हेच आम्हाला येड्यात काढणारे आमच्या परंपरा संस्कृतीतील गोष्टींवर वेगवेगळी संशोधने करून त्याचं महत्व सांगत आहे।।
आपली शास्त्रे आधी अभ्यासा।। त्यांचं ज्ञान गुरूंकडुन करून घ्या ।। आणि मग सापडले तर त्यातले दोष सांगा।।
काही प्रॉब्लेम नाही।।
अर्ध्या हळकुंडावर नाचू नका।।
English येत नाही म्हणून इंग्लिश ला नावं ठेवत फिरणं योग्य आहे का??
नाही ना..!!
तसंच, ज्या शास्त्राचं पूर्ण ज्ञान आपल्याला नाही त्या बद्दल आपण बोलूच नये।।
“त्या गावची गाडीच पकडू नये…!”
हे परदेशी लोक, वर वर पाहणार आमच्या संस्कृतीला।। आणि ह्यांच्या आकली नुसार आम्हाला येड्याच्या काढनार।।। काय हे???
भारतीय शास्त्रे समजणे ह्यांच्या आकलीच्या बाहेर आहे।।।। हे आधी समजून घ्या।।
जुन्या खगोलशास्त्रात – ज्योतिष शास्त्रात ग्रह ताऱ्यांचं तंतोतंत वर्णन आढळतं।।
शरीर फाडून आत काय काय आहे हे यांनी आता मागं दीड दोन हजार वर्षांपूर्वी पाहिलंय।।
आमच्या महाभारत कालीन सुश्रुत संहितेत हे शरीर ज्ञान अत्यंत तंतोतंत आहे।।
50 वर्षा पूर्वी कुणी म्हणला असता की दोन इंचाच्या कांडीवरून (मोबाईलवरून) हजारो km वर बोलू शकतो, ऐकू शकतो, पाहू शकतो तर येड्यात काढलं असतं आपण।।
पण आज शक्य आहे हे।।।
तश्या अनेक गोष्टी आज होऊ शकत नाही पण पूर्वी अध्यात्मिक शक्तीच्या बळावर करता येऊ शकत होत्या।।।
तसेच बर्याचश्या गोष्टी या निरंतर अभ्यासाने अन प्रबळ इच्छा शक्तीने साध्य होतात।। त्यासाठी शरीराच्या मर्यादेवर पर्याय शोधले जातात।।
असचं खुप साऱ्या गोष्टी हे नागा साधू करतात।।।
कित्येक काळ ध्यानात असतात।।दिवस – महिने।।
काहीही न खाता।। एकाच स्थितीत।।।
आध्यात्मिक उन्नतीसाठी , त्या ज्ञान प्राप्तीसाठी।।।
शरीराला त्या प्रमाणे ते बनवतात।।।
गांज्या भांग ही नशेची साधने आहेत।।
पण विशिष्ठ प्रकारे त्यांचं सेवन केल्यास शरीराला विशिष्ठ स्थितित एवढ्या प्रदीर्घ काळ ठेवण्याचा स्टॅमिना ते देतात।।
कॉफी- चहा पिऊन रात्र रात्र जागून आपण अभ्यास करतोच की।।।
स्टॅमिना वाढतोच की त्याने।।
सिगार फुकुन आणि गुटखा- तंबाखू खाऊन जागरण करणारी – Night Duty करणारी लोकं पण आहेत ।😄😄
अगदी तसाच गांजा – भांग यांचा वापर हे साधू लोक आपली साधना करण्यासाठी करतात।।
आपल्या साधनेत शरीराच्या मर्यादा,
तहान- भूक- निद्रा – काम आदी गोष्टींचा अडथळा येऊ नये म्हणून या गांजा भांग वापरतात।।निरंतर साधना करतात।।
( इथं गांजा भांग यांचा व्यसनी वापर करण्यास मी पुरस्कार करत नाही, हे स्पष्टपणे समजून घ्या।।)
त्यांच्याकडे असे ज्ञान आहे जे तुम्हा आम्हाला मिळवण्यासाठी 2 -4 जन्म घालावे लागतील।।
महिनो महिनो पारा नावाच्या धातूवर क्रिया करून त्या पाऱ्यापासून सोन्या सारखे उच्च प्रतीचे धातू बनवतात।।
द्रव पाऱ्यापासून घट्ट शिवलिंग निर्माण करतात।।
तसंच आमच्या आयुर्वेदाच्या काही ग्रंथात याचं वर्णन मिळतं,
“रसशास्त्रात” याच बरंचस् वर्णन आहे।।
हे रसशास्त्र – म्हणजे आयुर्वेदाची अशी शाखा ज्यामध्ये विविध खनिज व रासायनिक पदार्थांवर विशिष्ठ प्रक्रिया करून त्या रासायनिक पदार्थांमधील विषाक्तता काढून शुद्धी केली जाते व त्या पदार्थावर मारण प्रक्रिया करून त्या पदार्थाला शरीरधातूंना उपकारक व औषधी गुणयुक्त केले जाते. यानंतर हे पदार्थ औषधात वापरले जातात।।
आपलं भारतीय ज्ञान,
आपल्या पर्यंत पोहचलेच नाही।।।
आपण फक्त *नावं ठेवण्यात* धन्यता मानलीय।।
खुप मोठा ज्ञानाचा खजिना आहे।। घ्यायचा प्रयत्न करा।।।त्या अस्सल ज्ञानाने ज्ञानी व्हा।।🙏🙏🙏😄
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking