Infertility Couse According to Ayurveda
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
!! बिजशुद्धी – सुप्रजाजनन !!
हायब्रीड संशोधनाची कमाल म्हणून,कमी उंचीच्या झाडाला फळं लागाय लागली अन ती खाऊन आमच्या लेकरांची उंची पण घटाय लागली।।।
त्यातूनच “उंची वाढवुन मिळेल” या Tital खाली उंची वाढवायच्या औषधांचे वर्षावर्षांचे कोर्स चालू झालेत।।
संशोधनात बदलाचं फळ म्हणून झाडाला 3-4 वय वर्षानंतर होणारी फळधारणा एक वर्षातच होऊ लागली।।।
तसाच बदल आमच्यात ही झाला।। 15 -16 व्या वर्षी येणारं तारुण्य 11 -12 व्या वर्षीच दिसाय लागलंय।।। अन साठीतंल म्हातारपण, पस्तीस-चाळीशीतच याय लागलंय।।
सर्रास केस काळे केले जातात आणि दहातले चार टकले दिसतातच।।
खरंतर, जशी 36 गुणांची परीक्षा चालु झालीय😜, तसे अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष जाऊ लागलंय।।।कुल-उपकुल-गोत्र-देवाक-वंश आदी काय काय…!!!
जरा खोलवर जाऊन पाहिलं तर नवीन सुदृढ पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या बिजाचं मिलन करावं हे आपल्या पूर्वजांनी खुप खोलवर अभ्यासलं आहे हे सर्व।।। बिजाला दिलेलं महत्त्व खुप महत्वपूर्ण आहेत यात।।।।।।👌👌👌
आयुर्वेदातही, ऋतू – क्षेत्र – अंबु – बिज या चार गोष्टी सुप्रजाजननासाठी महत्वपूर्ण सांगितल्या असून बिजाला विशेष महत्व आहे।।। म्हणूनच शुद्धीबीजाचे सविस्तर वर्णन आयुर्वेद ग्रंथात केले आहे।।
संत तुकोबारायांनी म्हंटलच आहे,
*”शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी।।”*बी चांगलं तर फळ चांगलं।।।
आपल्यासाठी फळ म्हणजे सुप्रजनन आणि निरोगी – निरामय – उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असलेलं शरीर।।
आज आरोग्यावर बोलताना जोरदार चघळले जाणारे विषय म्हणजे, सेंद्रिय की रासायनिक?? पण सेंद्रिय किंवा रासायनिक हे संस्कार आहेत।। पोषण आहे।।हे संस्कार – पोषण तर महत्वाचे आहेतच।। पण त्या आधी अस्सल कुलवाण देशीवानांच बी हवाय।।।
आयुर्वेदातील सामान्य-विशेष सिद्धांतानुसार,आपण ज्या प्रतीचं अन्न खातो, त्या प्रतीचं आपलं शरीर बनतं।।
हायब्रीड संशोधनामध्ये घडवून आणलेला बदल त्या हायब्रीड वनस्पतीला तिची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करतो. परंतु हा बदल त्यापासून उत्पन्न झालेल्या बिया पासून नवनिर्माण करण्याची क्षमता – प्रजननाची क्षमता मात्र कमकुवत करून टाकतो।।
म्हणूनच तर हायब्रीड पिकाचं बी लावलं असता त्याच गुणवत्तेचं उत्पन्न मिळत नाही।।। अपंगत्व आल्याप्रमाणे पीक येतं।।। कधी किडकं-मिडकं फळ लागतं, कधी तेही लागत नाही।।। कधी नुसतंच झाड वाढतं अन कधी तेवढही वाढत नाही।।।
अशी स्वतःची प्रजनन क्षमता अतिशय निकृष्ठ असलेलं बीज (धान्य-फळे) खाऊन आपलं जे शरीर पोसलं जातंय सध्या।।।
आमच्या शरीरावर व बिजावरही त्याचा खोलवर परिणाम होतोय…!!आज वाढलेले आजारांचे प्रमाण यामुळेच आहे।।
प्रजनन क्षमता निकृष्ठ असलेलं अन्नापासून पोसलेले आपलं मनुष्याचं स्त्रीबीज किंवा शुक्रबीज कसं ताकदीचं बनेल???
त्यातुनच वंध्यत्व व त्या संबंधिच्या तक्रारी वाढत आहेत।।पाहायचं असेल तर वंध्यत्व निवारण केंद्रातील – स्त्रीरोग तज्ञांच्या पुढची वाढलेली गर्दी पहा।।। येईल ध्यानात।।।
देशी वान म्हणजे, असं अन्न धान्य ज्याने सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजतागायत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे।।सृष्टीच्या प्रत्येक बदलाला तोंड दिलं आहे।। सृष्टीच्या बदलानुसार स्वतःला अनुकुलीत केलं आहे।।
देशी वाणाच्या प्रजातीमध्येच चांगली प्रजनन क्षमता आहे। पुढचा जीव निर्माण करण्याची ताकद आहे।। निसर्गाच्या बदलात तग धरून राहण्याची क्षमता आहे।। जी हायब्रीड फळ – धान्य यांच्यात नाही।। त्यामुळं रासायनिक की सेंद्रिय हे नंतर बघता येईल।।। आधी शुद्ध देशी बीज आणि त्यापासून बनणारं अन्न धान्य आहारात घेणं महत्वाचं आहे।। देशी वाणाचा पुरस्कार करणं आजची मोठी गरज आहे।।
“पेट्रोल Speed चं टाकायचं की साधं” हा विचार करणाऱ्या आपण, आपल्या शरीराचं व शरीरातील सप्तधातूंचं पोषण कशाने उत्तम होईल याचाही व्यवस्थित विचार केला पाहिजे।।।
आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हजारो वर्षांपासून स्वतःच अस्तित्व टिकवून असलेल्या देशीवानांचा आपण अवलंब अवर्जुन केला पाहिजे।।।वंध्यत्वावर Test tube Baby वगैरे संशोधनांतून अनेक चिकित्सा आल्यात
पण नैसर्गिकपणे आयुर्वेदिक उपचाराने जन्मास आलेली संतती शारीरिक व मानसिक दृष्ट्या निश्चितच सदृढ असते। उत्तम संतती जन्मास घालण्यासाठी शरीरशुद्धी – बिजशुद्धी- गर्भाधान- गर्भसंस्कार- सुतिकापरिचर्या- बालक परिचर्या या आयुर्वेदातील चिकित्सा आज वंध्यत्व व इतर गर्भधारणेच्या संदर्भाने असणाऱ्या तक्रारीवर प्रभावी ठरत आहेत।।।
निसर्गातील उपलब्ध औषधींनी शरीराला कार्यक्षम करून गर्भाशयाचं बल वाढवून गर्भधारण क्षमता वाढवण्याचं काम या चिकित्सेद्वारे होतं। पुरुषबीज व स्त्रीबीज यांची आयुर्वेदिक औषधी व चिकित्सेद्वारे शुद्धी केली जाते।। बल वाढवलं जातं।।
तसेच आरोग्य टिकवण्यासाठी पंचकर्माद्वारे केली जाणारी शरीरशुद्धी – रसायन चिकित्सा – आचार रसायन या चिकित्सा हायब्रीड अन प्रदूषणाच्या युगात संजिवनी प्रमाणे नवजीवन देणाऱ्या आहे।।
Dr Saurabh B. Kadam
M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500
🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in
Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018
आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व Blog ला जरूर भेट द्या…
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking