Arthritis & Ayurved Treatment संधिवात आणि आयुर्वेद उपचार….!
Dr Saurabh B Kadam. B.A.M.S, M.D.(Ayurveda)
गुढघे – कोपरा – मनगट – घोटा – मनका – हाता पायाच्या बोटांचे सांधे इत्यादी शरीराच्या सांध्याचे दुखणे चालू झाले की बोली भाषेत, संधिवात झाला असे म्हणले जाते.
आयुर्वेद शास्त्रानुसार,
संधिवाताचा आजार होण्याची प्रत्येक व्यक्ती मधली कारणे वेगळी आसु शकतात…
कुणामध्ये शरीराची झीज होऊन होईल तर कुणाला आति खाऊन होईल।
कुणाला चुकीचं खाऊन होईल तर कुणाला अपघातात मार लागून होईल।।
संधिवात होण्याचे कारण वेगवेगळे असेल, तसेच त्या व्यक्तीची प्रकृती – विकृती, त्याचे काम – खाण पानाच्या सवयी यातही वेगळेपण असतो. त्यानुसार त्यामध्ये असनारी वेदना – आजाराची लक्षणे ही वेगळी असू शकतात।।
या वेगळेपणानुसार त्याची ट्रीटमेंट देखील वेगवेगळी करावी लागते।।।
यासाठी,
आयुर्वेदाच्या तज्ञ व्यक्तीकडून,
आमवात (Rheumatoid arthritis)
वातरक्त (Gaut)
क्षयात्मक संधिवात ( हाडांची -सांध्याची झीज होऊन झालेला संधिवात – oste arthritis)
अवरोधात्मक संधिवात – सांध्याच्या ठिकाणी असलेल्या, सांध्यांचे पोषण करणाऱ्या वाहिन्यांमध्ये वात – पित्त – कफ दोष अडकल्याने सांध्याच्या अपुऱ्या पोषणाने झालेला संधिवात…
असे वेगवेगळे निदान केले जाते.
याचा उपचार करताना, व्याधींचा हेतू, व्यक्तीच्या प्रकृती – विकृती, देश , काल, वयाची अवस्था, व्याधी अवस्था यांचा विचार करून त्यानुसार योग्य ती treatment आयुर्वेदात केली जाते….!
व्यवहारात मात्र, सांधेदुखी चालू झाली की फुकटचे सल्लागार खुप मिळतात आपल्याकडे….,
लिंबू पाणी प्या।। गरम पाण्यात मध टाकून प्या ।। ह्याचा रस प्या।। त्याचा काढा प्या।। बटाटा उकडून लावा।। ह्याला हा फरक पडला। त्याला तो फरक पडला।।
पण उगाच आंधळी बॅटिंग करून चौकार मारायचा प्रयत्न करू नये।।
ह्याचे ऐकून – त्याचे ऐकून काहीही घरगुती उपाय करू नये…
याने फायदा कमी आणि तोटा ज्यास्त होण्याची शक्यता असते… कारण आजाराचे निदान न होता इथे अंदाधुंद उपचार चालू असतात…!
कोण काहीही सांगतं….
पण हे शरीर आपलं आहे आणि काहीही चुकीचे उपाय करून, त्याला होणारा आजार आपल्यालाच सोसायचा आहे हे लक्षात असावे…!
नाहीतर दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबं पिळून तांब्या तांब्या पाणी पिऊन सांधेदुखी चालू केलेले नेहमीच येत असतात O.P.D.ला..!
योग्य निदान व वेळेत आयुर्वेद उपचार केले तर सांधेदुखी आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून *बाये हात का खेल है…!*
हे लक्षात घ्या…!
जानूबस्ती, कटीबस्ती, मण्याबस्ती, ग्रीवा बस्ती, तैलधारा, पत्रपोट्टली, लेप, उपनाह, रक्तमोक्षण, विद्धकर्म, अग्निकर्म या स्थानिक उपचारा सोबत वमन, विरेचन, बस्ती आदी संपूर्ण शरीरशुद्धी करणारे पंचकर्म उपचार ही आयुर्वेद शास्त्राची मोठी अस्त्रे आहेत.
पंचकर्म उपचार आणि अभ्यंतर औषधीला रुग्णाने पथ्यापथ्याची जोड दिली की रुग्ण बरा होउ लागतो..!
बाकी आपणच आपल्या आरोग्याचे आणि आजाराचे शिल्पकार आहात…!
painkiller खाऊन वेळ घालवून आजार मोठा करायचा की योग्य ते आयुर्वेद उपचार घेऊन बरं व्हायचे हे आपल्याच हातात आहे…!
– कळावे …. सादर…!!!
– *Vd Saurabh B. Kadam*
*M.D. (Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म तज्ञ*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking