December 2, 2025 *अळीव – हिवाळ्यातील सर्वोत्तम सुपरफूड!**पौष्टिक, शक्तिवर्धक आणि शरीराला उब देणारी खीर*हिवाळा सुरू झाला की आपल्या शरीराला विशेष उब, ताकद आणि रक्तवाढीची गरज असते. अशा वेळी एकदम नैसर्गिक, परंपरागत आणि विज्ञानानेही मान्य केलेलं सुपरफूड म्हणजे अळीव (Garden Cress Seeds).अळीवला आयुर्वेदात बल्य (शक्तिवर्धक) आणि रक्तवर्धक मानले जाते. हिमोग्लोबिन वाढवणे, केसगळती कमी करणे, सांधे-कंबरदुखी दूर करणे यासाठी हे उत्तम आहे. पूर्वी बाळंतीणीला गर्भिणी अवस्थेत आणि डिलिव्हरी मध्ये झालेली झीज भरून काढण्यासाठी ही खीर दिली जायची…. आजही अनेक ठिकाणी दिली जाते.डिलिव्हरी नंतर जर सेक शेकोटी करायची राहून गेली असेल आणि त्यामुळे न खाता अंग फुगत असेल… हाडं सांध्याच्या तक्रारी उद्भवत असतील……तर आम्ही आमच्या रुग्णांना औषधी पंचकर्म सोबत ही खीर ही खायचा सल्ला देत असतो.उंची कमी असणाऱ्या मुलांमध्ये ही ही खीर चांगलीच कामी येते.फक्त उष्ण असल्याने, हिवाळ्यातच घ्यावी किंवा इतर वेळी घेताना आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा…!अळीवची खीर म्हणजे हिवाळ्यातलं घराघरातलं अमृत!आज जाणून घेऊया अशीच मऊ, रसरशीत, सुगंधी आणि शक्तिवर्धक अळीव खीर कशी तयार करायची.—🍲 अळीव खीर – ४ जणांसाठी (पौष्टिक, स्वादिष्ट आणि शरीराला उब देणारी!)साहित्य: अळीव / हळवा बी – २ टेबलस्पूनदूध – ½ लिटरसाजूक तूप – १ टीस्पूनगूळ – ¼ कप (चवीनुसार)वेलची पूड – ¼ टीस्पूनकिसलेला नारळ – १ टेबलस्पून (ऐच्छिक)बदाम/काजू – १ टेबलस्पून (बारीक चिरलेले)👩🏻🍳 कृती1️⃣ अळीव फुलवणे – खीर पचायला हलकी करणारा महत्वाचा टप्पाअळीव कोमट पाण्यात १ तास भिजवून ठेवा.ते फुलून मऊसर होते आणि पचायला अत्यंत हलके होते.2️⃣ खीरचा बेस तयार करणेकढईत तूप गरम करून भिजवलेला अळीव हलकेसे परता.आता त्यात दूध घालून उकळी येऊ द्या.५–६ मिनिटं सतत ढवळत शिजवा—अळीव दूधात मिसळल्यावर खीर नैसर्गिकरित्या घट्ट होते.3️⃣ गुळाचा गोडवा आणि वेलचीचा सुगंधगूळ घालून पूर्ण वितळू द्या.नंतर वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून २ मिनिटं शिजवा. तयार झालेली सुगंधी, उबदार, पोषक अळीव खीर गॅस बंद करून ५ मिनिटं झाकून ठेवा.खीर बसली की अजून मऊ आणि स्वादिष्ट होते.गरम किंवा कोमट — दोन्ही प्रकारे अप्रतिम!💪 अळीवचे विशेष आरोग्य फायदे (Extra Add-on Information)✔ हिमोग्लोबिन वाढवतेअळीवमध्ये नैसर्गिक आयर्न, फोलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन C असते—रक्तवाढीसाठी परफेक्ट संयोजन!✔ केसगळती कमी करते आणि केस मजबूत करते , ओमेगा-३, प्रोटीन्स आणि मिनरल्समुळे केसांची मुळे मजबूत होतात.✔ हाडे व सांधे मजबूत करते. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि नैसर्गिक “वॉर्मिंग प्रॉपर्टीज” मुळे हिवाळ्यातील सांधेदुखीवर उपयोगी.✔ नवीन मातांसाठी (Postpartum) अत्यंत फायदेशीर आहे. अळीव पारंपरिकरित्या प्रसूतीनंतर शक्ती वाढवण्यासाठी दिले जाते.✔ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्समुळे शरीराची इम्युनिटी नैसर्गिकरीत्या सुधारते.अळीव खीर म्हणजे हिवाळ्यातील एक परफेक्ट पौष्टिक बेत! चव, उब, ताकद + आरोग्य + हिमोग्लोबिन + सांधे + केस अशी पूर्ण काळजी!हिवाळ्यात प्रत्येक घरात दर 7- 8 दिवसांनी ही खीर जरूर बनवा.Dr Shalaka Bhakare – KadamB.A.M.S, C.C.G.(गर्भसंस्कार)आप्तश्री आयुर्वेद, पुणे Cont.738 779 3189 Uncategorized by shriayurvedic01@gmail.com 0 Comments arthritis, ayurved, Ayurved Treatment, ayurvedic, rheumatoid, rheumatology READ MORE
March 29, 2023 Arthritis & Ayurved Treatment संधिवात आणि आयुर्वेद उपचार….! Healthy Life With Ayurveda, Panchakaram, आयुर्वेद सर्वांसाठी, आयुस्पर्श AyuSparsh by shriayurvedic01@gmail.com 0 Comments arthritis, Ayurved Treatment, Good way to eat, how to eat food, Hybrid food, rheumatoid, rheumatology Dr Saurabh B Kadam. B.A.M.S, M.D.(Ayurveda) गुढघे - कोपरा - मनगट - घोटा - मनका - हाता पायाच्या बोटांचे सांधे इत्यादी शरीराच्या सांध्याचे दुखणे चालू झाले की बोली भाषेत, संधिवात झाला READ MORE