Good way to eat Tag

Dr Saurabh B. Kadam*
     *M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*

ज्वारी नंतर लांब शेंगदाणा हे आमच्या सोलापूर जिल्यातील पूर्वी प्रमुख पीक होतं।।

घरो घरी पिकवल जात होतं।।
शेंगांच्या पोत्याच्या थाप्या आम्हा शेतकऱ्यांच्या घरात असायचा।।

आणि याच शेंगदाण्याची उखळात कुटलेली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी जगप्रसिद्ध होती।।
आता ही आहे म्हणा।।

त्यावेळी भाजक्या शेंगदाण्याची वाटी प्रत्येकाच्या जेवणाच्या पंगतीला असायची।।।

चव ही त्याची तशीच खमंग।।
शेंगदाण्याच्या उकळात कुटलेल्या कुटा शिवाय आम्हा सोलापुरकरांना भाजीच चविष्ठ लागत नव्हुती

पुढं साखर उद्योग आला। द्राक्ष - डाळिंब आली, बागायती झाली सगळीकडे।।
सर्वत्र ऊस- द्राक्ष - डाळिंब पसरलं।।
लांब देशी शेंगदाणा जाऊन तिथं हायब्रीड घुंगरी शेंगदाणा आला।। उत्पन्नात भरमसाठ वाढ झाली।।

पण आताचे ते, चार घुंगरी शेंगदाणे खाल्ले, तरी डोकं धरतं।।
आणि शेंगदाण्याच्या चटणीलापण ती चव राहिली नाही।।।
शेंगदाण्याच्या तेलाची जागा आता सोयाबीन - सरकी - सुर्यफूल तैलाने घेतली।।।

Quantity वाढली, पण Quality गेली हो...!!! पोट भरतंय पण भुक मिटल्याची तृप्ती नाही मिळत।।
खरंय ना..? लक्षात येतंय ना तुमच्या, मी काय म्हणतोय ते?

नमस्कार...!!
मी डॉ सौरभ बाजीराव कदम, एम.डी. (आयुर्वेद), मी शेतकरी कुटुंबातील असुन, गेले 10 -12 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात आहे. आयुर्वेद शास्त्रच्या सहाय्याने आरोग्यदानाचे काम करत आहे..!!

आज ही घरी असलो की, गुरांमागचं शेण काढायला, अन फावड़ा घेउन दारं धरायला कधी मागे नाही सरत.

मुळात 12 वी नंतर,  "शेतीच करणार, डॉक्टरकी नको ..!"

हा बालहट्ट धरून बसलेलो मी, मग मला डॉक्टरकीला घालण्यासाठी संपूर्ण घरांने, विशेषतः आमच्या पांडूमामांनी खुप मोठी मनधरणी केली माझी..!
तेव्हा कुठे मी तयार झालो डॉक्टरकी साठी।।।
पुढं आयुर्वेदाला आल्यावर आयुर्वेदातील औषधी वनस्पतींच सखोल ज्ञान पाहून मनापासून खुश झालो।।

आणि हळुहळु आयुर्वेद माझी Passion  बनला।।

सगळीकडे आयुर्वेदच दिसू लागला।।
दोस्त मंडळी येड्यात काढतात यावरून ।। पण आमचं सौऱ्या आयुर्वेदात लै भारी म्हणून कित्ता पण गिरवतात अभिमानानं।।
तर जन्माने शेतकरी, शेतीमध्ये असलेली आवड आणि त्यात आयुर्वेदाचा पक्का उपासक असल्याने आमच्या शेतात माझ मन खुपच रमतं.

रानात फिरावं, रानमेवा खावा, विहिरीच पाणी प्याव, पाण्यात पाय टाकुन बसावं, चिखलात खेळावं, मनाला वाटेल तीथ अंग टाकाव, अशीच दिनचर्या गावी असते माझी..!

आयुर्वेदात ही याच स्वच्छन्दी जीवनशैलीचा पुरस्कार केला आहे।।
आयुर्वेद हे जीवनाचं शास्त्र तर आहेच पण त्याबरोबर निसर्गाचं शास्त्रही आहे।। निसर्गातील उपलब्ध वनस्पती -खनिज औषधींवर आयुर्वेदीक उपचार होतात आणि आयुर्वेदात वर्णिलेल्या आचार रसायनाने, करावयाच्या सद्वृत्त पालनाने निसर्गाचे नियम पाळले जातात।।

त्यामुळे आयुर्वेद शिकताना आणि हे आजचं आधुनिक जीवनशैलीचं धावपळीचं जीवन जगताना, "पूर्वी आपण किती छान जीवन जगत होतो..!" याची अनुभूती पदोपदी येते.
तीच उत्तम जीवनशैली पुन्हा जगन्याचा मी प्रयत्नही आज करतो आहे.

शेतकरी जीवनाचा आणि निसर्गाचा खुप जवळचा संबंध आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्द अनेक औषधींची ओळख शेतकऱ्यांना असते।
अर्थात त्यामुळेच शेतकऱ्याच्या जीवन शैलीत आयुर्वेद चांगलाच मुरला आहे।।

घराच्या दिवळीत ठेवलेली "बिब्बा लसून आदी टाकून बनवलेल्या घायतेलाची वाटी" कसल्याही किरकोळ जखमा एकाच दिवसात भरुन काढते।।

देवघरात ठेवलेला दवणा (आम्ही आयुर्वेदात त्याला दमनक म्हणतो) कसल्याही नव्या तापाला कमी करतो।।

घरामागच्या सांडपाण्यावर आलेला तोंडलं - बोण्डल्याचं फळ आलेलं तोंड (Mouth ulcer) घालवतं।।

शेळीच्या दुधात मिरे - हळद टाकून केलेला काढा बिघडलेला घसा दुसऱ्याच दिवशी बरा करतो।।

शेवग्याची साल, साराट्याचा काटा आदी औषधी अन हुळग्याचं माडगं मुतखडे पाडून टाकतं।।

आजीने नाकात सोडलेलं शेवग्याचं औषध अर्धशिशी बरं करतं।।

आप्पांनी पायाचा काढलेला मुडपा - पायावर फिरवलेलं जातं कितीतरी दिवसाचं अवघडलेलं दुखणं जादू सारखं बरं होतं।।

ढोरगुंजेची मुळी दुधातून खाल्ली की भूक वाढते।।।

नदीच्या माशांची आमटी वरपली की अंगमोडून आलेली कणकण अशीच पळून जाते।।।

लाल मिरच्या अन मोठं मीठ घेऊन आईने काढलेली नजर नव्या दमाने काम करायला बळ देते।।

मालकपूरचा पुडा मोडलेली हाडं जोडायला मदत करतो।।

कडुनिंबावर वाढलेली गुळवेल खाल्ली की  कावीळ बरी होते ।

असे अनेक आयुवेदिक उपाय आम्हा शेतकऱ्यांच्या अंगवळणी असतात।

पण मधल्या काळात झालं असं,
हरितक्रांतीचं अन दुग्धक्रांतीच वारं वाहू लागलं।।
सुधारणा।||  डेव्हलपमेन्ट।।। धावपळीचे जग..|| मॉडर्न जग ।। पाश्चिमात्य संस्कृती।।। जग चंद्रावर ।।

या गोंडस गोंडस शब्दांनी आम्हा शेतकऱ्यांच्या भोळ्या लेकरांना भुरळ घातली।।

आजा पंज्याचे म्हणणे न ऐकता आम्ही हे नैसर्गिक उपाय सोडून आधुनिक वैद्यकाच्या मागे धावत सुटलो।।

कंबरेत टोचून घेतल्याशिवाय तापच बरा होऊ शकत नाही।। ही गोष्ट आमच्यावर बिंबवली गेली।।।

त्यात पुढं जाऊन, TV वरच्या जाहिरातींनी पाक डोक्याचा फफुटा केला।।  विचार शक्तीच गहाण ठेवली आपण या जाहिराती बघून।।।

ती तोंडाची Cream शिवाय गोरं होत नाही।। आणि साबणाशिवाय जंतू मरत नाहीत।। अशा अनेक भाभडया कल्पना आमच्या डोक्यात भरवल्या जाऊ लागल्या।।।

त्यामुळं नैसर्गिक वस्तूंनी जे काम व्हायचं ते केमिकलच्या वस्तूंनी होऊ लागलं।।
आणि आम्ही कुणावरतरी अश्रित होऊ लागलो।

आता त्या फेसकूट आणणाऱ्या पेस्ट शिवाय आमचे दात पण स्वच्छ होत नाहीत।। आणि लिंबाची पावर असलेल्या साबणाशिवाय आमची भांडी पण चमकत नाहीत।।।

बघल तिथं केमिकचा वापर चालु केला आणि निसर्गाची वाट तर लागलीच पण आम्ही आमचं आरोग्य पण बिघडून टाकलं।।।

https://shriayurvedic.in/piles-ayurved-treatment/

हरितक्रांतीच्या नावाखाली नुसतं उत्पन्न वाढवायचं ही आस धरल्यामुळं आपल्याकडून निसर्गाचे नुकसान तर झालेच पण आपलं स्वतः आरोग्यही धोक्यात आणलंय आपण।।।

पूर्वी एखादं पिक घेतलं की त्याचा वाण पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी ठेवायचो आपण।। पण आता हे हायब्रीड वाण बी म्हणून लावले, तर येतच नाहीत।। आले तर चांगली फळधारणा होत नाही।। किडकी-मिडकी-वाकडी-तिकडी फळं लागतात।।

आणि दुसरं म्हणजे ह्या हायब्रीड जाती रासायनिक खते टाकल्या शिवाय वाढत पण नाहीत।। भरमसाठ खते वापरून जमिनींचा पोत गेलाय।। शेतं खारपट झालीत।। पाणी रसायने युक्त बनलंय।

तेच रसायनयुक्त खाऊन पिऊन, इंजेक्शनावरच्या कोंबड्या अन त्यांची हाडे खाऊन आमचं आरोग्य कधी बिघडलं आम्हालाच कळलं नाही।।।

आजा आजून सुपारी फोडतोय, अन नातू दाताला क्लीपा मारतोय।।। अशी अवस्था झालीय।।

लाईटीवर उबवलेल्या कोंबडीच्या पिल्या सारखी दिसतात ती नवी बाळं।।
त्याच्या नाकातला शेम्बुडच हाटत नाही।।

आणि टीव्ही वरच्या जाहिराती बघुन बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून तीन टाइम डेटॉल टाकून घराची सफाई चालू असते।। तरीही ह्यांचा साबून स्लोच।।

ह्यांचं नकटं शेम्बडं ते शेम्बडंच।।

चारी बोटं तुपात घालून पुरणपोळी वरपणारे आम्ही ।। आता कोलेस्टेरॉला भितोय।।

16 पायलीचं पोतं कच्च्यात उचलायचे आमचे आजे पंजे।। आता आम्हाला चार पायलीचं दळण आणणं जड होतंय।।

रासायनावर पिकलेल्या कमी गुणवत्तेचं अन्न धान्य खाऊन आमची हाडं - मांस पण बॉयलर कोंबडीसारखं कुजकी बनाय लागलीत।। चलत चलत फ्रँकचर होताहेत।।।

असं का झालं???
का ही परिस्थिती उद्भवली???

त्याचं कारण म्हणजे निसर्गाच्या कामात आपण केलेली ढवळा ढवळ..!!!
वाढवलेले रसायनांचा वापर..!!

फक्त उत्पन्न वाढविणे।। गुणवत्ता नाही ।।
हा आपला ध्यास।।
म्हणूनच हे सर्व झालंय।।।

ह्यात आपली शेतकऱ्यांचीच फक्त चूक आहे असं म्हणत नाही मी।। कारण आम्हाला विज्ञानाच्या नावाखाली शिकवलंच तसं।।
आणि त्याचं ओघानं निसर्गाच्या सानिध्यात निरोगी असणारा शेतकरी आज बी पी -  शुगर च्या गोळ्यांचा खुराक खातो।।

मग प्रश्न पडतो, ह्या हायब्रीड अन्नधान्यामूळे प्रकृतीच्या अन आरोग्याच्या होणाऱ्या हानीला जबाबदार कुणाला धरायचे????

हरितक्रांती येण्यापूर्वीच्या काळात लाकडी नांगर सोडून लोखंडचा नांगर वापरायला घाबरणार्या आडाणी शेतकऱ्यांना???

की सुधारणावादी किर्लोस्कराना???
ज्यांनी पारंपरिक पद्धतीतून आधुनिक शेती करण्यास शेतकऱ्यांना शिकवले।।।
लोखंडाचे नांगर चालवायला शिकवले।।।
पाणी उपसणारी इंजिने आणली।।।

त्यातून पुढे शेतकऱ्याने पारंपरिक शेती सोडून नवीन तंत्रज्ञान व विज्ञान  आत्मसात करायला सुरुवात केली।।

पुढं हे बदलाचे वारं वाहू लागले।।
यात हरितक्रांती अन Hybridization चा शोध लागला।।

हा बदल विकासाची आस असलेल्या राज्यकर्त्यांनी मोठमोठ्या योजना राबवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या।।
जागृती केली।।। अनुदाने दिली।।
तसा फायदा ही झाला।।

उत्पन्न वाढले।।। भरमसाठ वाढलेल्या लोकसंख्येची पोटं भरू लागली।।।  भूक भागू लागली।। उपासमार कमी झाली।।

https://youtu.be/SfZFTAg1Gmc

ही हरितक्रांती त्यावेळची, त्या काळाची गरज असेलही कदाचित।।
ह्या क्रांतीच श्रेय त्या काळच्या लोकांना राज्यकर्त्यांना - शोध करत्यांना दिलं गेलं।।
पण ह्याचे परिणाम काय होतील हे त्यांनाच काय कुणालाच माहीत नहुते।।

या वाढलेल्या अन्नाने पोटं भरली ।। भूक भागली।।  पण तृप्ती कधीच नाही मिळाली।।।

आणि काळानुसार त्याचे वाईट परिणाम पण आपल्याला आता दिसू लागले आहेत।। जेवण कमी औषध ज्यास्त झालीत।।

मग यात कुणाला कसं जबाबदार धरायचं???
शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांना?
हे  Applied करायला लावणार्या राज्यकर्त्यांना??
की उत्पन्न वाढीच ज्ञान देऊन ज्ञानी केलेल्या शेतकरी वर्गाला???
樂樂

याला जबादार कुणालाच म्हणता येणार नाही।।

त्या वेळच्या परिस्थितीनुसार हरितक्रांतीच्या लोभी पडले सर्व।।।।
जसे आपण आज मोबाईल सारख्या गोष्टींच्या आहारी पडतोय।।। याचे परिणाम आपल्याला काही वर्षांनी नक्कीच दिसतील।।

पण मोबाइल टाळनं अवघड झालेलं असेल त्या वेळी।।।

तसेच या हरित क्रांतीच्या आणि Hybridizetion च्या विळख्यात शेतकरी व सारा समाज अडकला आहे सध्या।।।

शेतकऱ्याने देशी पिकवायच ठरवलं तरी त्याला भाव मिळत नाही।।
डोळ्यात देखणं दिसणारं अन चमकणारं चांगलं म्हणायची सवय लागलीय आम्हाला...!!

कारण आपली आणि ग्राहकाचीही मनस्थितीच आता तशी बनली आहे।।।

ह्यामुळे याला जबाबदार काळच आहे।।।
बाकी कुणाला जबाबदार धरता येणार नाही।।।

मग आता शेतकऱ्यांनी हायब्रीड अन्न पिकवन सोडावं का??
पण तेही सोडून चालत नाही।।।

निकस झालेल्या जमिनी देशी वाणाला उत्पन्न देतच नाहीत।।।
मी स्वतः जवळून पाहिलं आहे ।।।

यात हळू हळू सुधारणा करावी लागणार आहे.

गावखत - सेंद्रिय खत वापर वाढवणे।। त्यातून जमीनीचा कस वाढवणे।। याच बरोबर देशी वाण जपणे।(अजूनही आदिवासी लोकांनी हे वाण जपले आहेत।।)त्याचं महत्व लोकांना सांगून देशी वाणाविषयी जागृती करणे, त्याची मागणी वाढवणे।।।  तरच कुठे मार्ग निघेल।।।

पण सध्याच्या घडीला आपण शेतकऱ्यांनी कमीत कमी स्वतः साठी तरी Quality चं खाल्लं पाहिले।।। आणि मजबूत राहिलं पाहीजे।।

यासाठीच मी शिकलेल्या आणि मला थोड्या फार समजलेल्या आयुर्वेदातील ज्ञानाच्या आधारे, माझ्या सर्व शेतकरी बांधवान्ना आरोग्य टिकवण्यासाठी खुप महत्वाचा कानमन्त्र देत आहे....!!
या कानमंत्रात सांगितलेल्या सोप्या सोप्या गोष्टी कराल तर आपले आरोग्य उत्तम राहिल...! निरोगी आयुष्य लाभेल..!!

1) बाजारात काहिहि विका, पण घरी खाण्यासाठी देशीवानाचेच पिक घ्या.

आपण म्हणाल असं का ???
असे चुकीचे सल्ले का शेतकरी लोकांना देता।।

पाहिलं कारण म्हणजे, आताच्या घडीला हे देशीवानाचे बी टिकवून ठेवणं ही आताची पहिली गरज आहे।। एकदा का देशी वाणाचे बी टिकलं की पुन्हा वाढत्या मागणीला आपण ते सहज पुरवू शकू।।

आणि दुसरं कारण म्हणजे *या लुकलुकत्या जगाला किंमत नाही करता येत हो आपल्या देशी वाणाची..!*

मातीमोलाने देशी वाण बाजारात विकत घेतला जातो।।। तो विक्रीसाठी पिकवल्यास काहीही केल्या, कसाच परवडत नाही शेतकऱ्याला।।

देशी वाणाकडे
*"सवतीच्या लेकराकडे बघितल्यागत नजर टाकली जाते हो बाजारात...!"*

भाव पाडून माल मागितला जातो...!

काळ्या मनुक्या निकृष्ट म्हणून बेदाणे मार्केटला सौदयात सर्वात स्वस्त खरेदी होते आमच्या कडून ।।
अगदी 20-30रुपये किलो पासून 100पर्यंत ।।

अन मार्केट मध्ये लोहयुक्त आहे म्हणून किमान 300- 400रु किलोने विक्री होते।।

*"या देशी वाणाचं मोल अन त्याची चव खाणाऱ्यालाच कळणार।।।"*

घरी खाण्यासाठी पिकविन्यात येणारे पिक सेंद्रिय पद्धतिनेच पिकावा. गावखत, शेणखत, गांडूळ खत यांचाच वापर करा. उदा - देशी लसुन, भुइमुग , हरभरा, वाळूक (काकडी), दोडका, गावर , भेंडी, शेवगा इत्यादींचे गावरान अन देशी वाणच वापरा.

2) दूध व्यावसाय करण्यासाठी कुठले ही जनावर पाळा. पण घरी दूधासाठी देशी खिलारच किंवा शेळी पाळा.

आणि तिला नैसर्गिक पद्धतींने आलेला आहारच दया.
दुध वाढवन्यासाठी प्रोटीनयुक्त पेंढ भूसा देऊ नका. त्याऐवजी शतावरी, धान्याची तुसे - भरडा यांचा वापर करा.
जिचे दूध पिता, त्या गोमातेला प्रेमाने आणि नैसर्गिक पद्धतीने जपा. तिच्या वासराची प्रेमाने देखभाल करा. कारण आईला जर आपल्या बाळाबद्दल वात्सल्य - प्रेम नसेल तर बाळाचे भरण पोषण चांगल्या प्रकारे होत नाही.

3)ज्य़ा भागात जे पिकते, त्या धान्याला त्या भागात आहार म्हणून आधी प्राधान्य दया.उदा- सोलापुरला ज्वारी
कोकणात भात इत्यादी.
ज्या हंगामात जे पिकते ते त्याच हंगामात खा.
उदा- कलिंगड उन्हाळयात

अनेकदा सांगीतल जात की,
"एक सफरचंद खा आणि निरोगी रहा..!"
अरे, हे सारे मार्केटिंग चे फंडे आहेत हे सुज्ञ लोकहो समजुन घ्या..!
आमचे आज्जे - पंजे काय सफ़रचंदावरच होते काय..???
किंवा फ्रिज मधील सफरचंद कधीच संपत नाही आशा कुटुंबात लोक आजारीच पडायला नको आहे, मग तस का होत नाही..??

4) भूक लागल्यावर खाव..
तहान लागल्यावर पाणी प्याव...
जेवढी तृष्णा (तहान) आहे त्यानुसार पाणी प्या.
मग कुणी कितीही सांगू दे ,की भरपूर पाणी प्या..5-6लिटिर पर्यंत...ते ही दिवसाला..?? काही गरज नाही..!
पाणी जरी जीवन असले, तरी पाण्यात बुडाल्यावर जिवही घेते ही गोष्ट ध्यानात घ्या.
चार दिवस पिके पाण्यात राहिली तर पिवळी होतात..,
पाटाने दिलेल्या आधिक पाण्यापेक्षा ठिबक ने दिलेल्या प्रमाणबद्ध पाण्यावर पीके उत्तम येतात ना..!
मग, आपल्या शरीराला देखिल आधिक पाणी काय उपयोगाचे...!

5)कष्टाची कामे किंवा व्यायामा यापूर्वी व नंतर कमीत कमी पाऊण तास (45 Min) कहिहि खाऊ पिऊ नये. पाणी प्यायचे असल्यास अल्प मात्रेत थांबुन थांबुन प्यावे. तसेच जेवनापूर्वी आणि जेवनानंतर कमीत कमी पाऊण तास (45 Min) कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कष्टाची, ज्यास्त हालचालीची कामे करू नये. तसेच झोपू ही नये.
जेवानानंतर केली जाणारी 'शतपावली' ही शत पावलेच असावी आणि आणि खुप हळूवार असावी.
प्राण्यांना कधी अन्न खाऊन शतपावली किंवा खाल्लेल पाचन होण्यासाठी जेवनानंतर व्यायाम करताना पाहिलंय कुणी?
का खाल्लेला उंदीर पचावा म्हणून खाल्याखाल्या लगेच आपल्या रानातल 'नागोबा' ला शतपावली करताना पाहिलंय?
आपण ही प्राणीच आहोत.आपले पाचन इतर प्राण्यांप्रमाणेच आहे. ही गोष्ट लक्षात असू दया.

6) घराशेजारचं 5 -10 गुंठे रोजच्या भाजीपाल्याची - कांदा लसूण आदी साठी ठेवा।।
थोड्या थोड्या भाज्या सगळ्या लावा।।

मात्र अट एकच, " देशी वाणच लावा।।"

त्यात एक शेवगा, एक हादग्याचं झाड लावा।।  एक लिंबाचं आणि एक कढीपत्त्याच झाड पण लावा।।कुठंतरी कोपऱ्यात भोपळ्याचे बी टोचा।।।।   
कुठं कारल्याचं ।। तर कुठं दोडक्या चं बी टोचा ।।

ओल असेल तिथं चिघळची भाजी लावा।। धपाटी लै मस्त लागतात तिची।।

थोडी जागा हळदीला पण ठेवा।। एवढी औषधी गुणांची हळद।। पण आम्हाला तिचा अर्क काढून पुन्हा पावडर केलेली हळद खायला येते।।। भेळ मिसळ पण असते।।
त्या हळदीच्याच शेजारी आलं पण येईल जोमानं।।

कडवंचीचे एक दोन गड्डे लावून ठेवा।। पावसाळ्यात बरोबर फुटतील।। मिळेल तेव्हा कडवंची खायला।।

बांधाला एखादी देशी - शेम्बडी गोड बोर राहू द्या।।
जमेल तिथं शेताच्या बांधला चिंच-पेरू-जांभळ-चिकू -अंजीर - आवळा-आंबा - नारळ लावा।।

इडलिंबू-कवठ-बेल हे त्रिकुट पण खुप कामाचं आहे औषधात।।
घराशेजारी शो च्या झाडाचा पसारा करण्यापेक्षा ही झाडं लावली तर निसर्ग पण राखतील आणि आरोग्य पण देतील।।

किचनच्या सांडपाण्यावर आळूचे गड्डे लावून ठेवा।। त्याच्याच थोडं पुढं देशी वेलची केळीची चार सोटं लावा।। चवीची केळी खाल। पुढे वर्षानुवर्षे ।।

जमेल तिथं अडुळसा, गुळवेल, कडूचिरायत, वेखंड, कोरफड, तुळस, अश्वगंधा आदी औषधी आवर्जून लावा।। आजीबाई च्या बटव्यातल्या मोलाच्या गोष्टी आहेत या।।

या सर्वांना रासायनिक खंत आजिबात टाकू नका।। गावखत टाका, गुरा मागचं शेण स्लरी बनवून पेला पेला झाडाच्या बुडात देता येतं।।

शेतकरी असल्याचा फायदा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहता येत. सध्याच्या वातावरणातील प्रदुषणाच्या अन मनाच्या प्रदूषणाच्या युगात निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास सारख उत्तम काही नाही. या आपल्या प्लस पॉइंटचा फायदा प्रत्येक शेतकाऱ्याने केला पाहिजे.
निसर्गचक्राप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आवती भवति असलेल्या निसर्गाचे अनुकरण केले पाहिजे.
- नैसर्गिक पद्धतिने पिकवलेले आहार
- नैसर्गिक सुख साधने
- योग - पोहने आदि बल वाढवणारे प्राकृत व्यायाम करा।
निसर्गाबरोबर चला ...!

निसर्गाच्या विरोधात जाणाऱ्या आधुनिकतेला कमीत कमी आरोग्यच्या बाबतीत तरी थोड दूर ठेवा....!! आणि आरोग्याने समृद्ध व्हा ।।

लेख कसा वाटला त्याबद्दलची आपली महत्वपुर्ण comment जरूर द्या।।

-  *Dr Saurabh B. Kadam*
     *M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी - पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*

*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*

[edgtf_button size="" type="" text="Click Here To Read Our Blog" custom_class="" icon_pack="font_awesome" fa_icon="" link="https://shriayurvedic.in/blog/" target="_self" color="" hover_color="" background_color="#FFA500" hover_background_color="#008000" border_color="" hover_border_color="" font_size="" font_weight="" margin=""]
[edgtf_button size="" type="" text="Online Consultation Booking" custom_class="" icon_pack="font_awesome" fa_icon="" link="https://shriayurvedic.in/book-appointment/" target="_self" color="" hover_color="" background_color="#FFA500" hover_background_color="#008000" border_color="" hover_border_color="" font_size="" font_weight="" margin=""]
[edgtf_button size="" type="" text="Clinic Consultation Booking" custom_class=""]

डॉ सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद) " सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पिणे त्यानंतर मोठा कप भरून चहा वगैरे आदी पिऊन भूक मारणं किंवा पोहे,इडली डोस वडा हे बाहेरील पदार्थ - खारी,बिस्कीट, टोस्ट यासारखा बेकरी पदार्थ , रात्रीचा परतलेला भात किंवा

*Dr Saurabh B. Kadam*     *M.D.(Ayurved), Pune*   कालियुगाचा असर चांगलाच वाढलाय सध्या।। आपला खप वाढवन्यासाठी, लोकांनमध्ये चांगलं काय? आणि वाईट काय ? यात भ्रम निर्माण करणाऱ्या टोळ्या चांगल्याच सक्रिय झाल्यात

सुवर्णबिंदूप्राशन Dr Saurabh B. Kadam     M.D.(Ayurved), Pune     आयुर्वेद शास्त्रानुसार, बाल्यावस्था ही वयाच्या 16 वर्ष पर्यंत असते।। म्हणजे प्रामुख्याने वयाच्या सोळा वर्षापर्यंत बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्वाची असतात।। या काळात बालकाचे शारीरिक व मानसिक पोषणाकडे विशेष लक्ष देणे, त्याच्या शरीरावर -

नियमित पोट साफ होत नाही?? मलावष्टंभ आणि आयुर्वेद चिकित्सा ।। पन्नाशीनंतर वृद्धापकाळाकडे शरीर झुकू लागलं की निसर्गतः शरीरात कोरडेपणा वाढू लागतो. कोलेस्ट्रोल वाढू नये म्हणून ऐकीव सल्याने तेल - तुप - लोणी - दुध खाणं आपण चाळिशी नंतर केव्हाच सोडलेलं असतं..! त्यातून आजुन

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune Desi ghee गुगल बुवा म्हणजे आयुर्वेदोक्त शास्त्रशुद्ध माहिती नाही।।। हे ह्या परसेंट % मध्ये बोलणाऱ्या गुगल शिष्यांना कधी कळायचं देव जाणे।।।गूगल वरचे research वाचून स्वतःच्या शरीरावर प्रयोग करतात..!! बघा ना

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune  "कसंतरी होतंय"  ह्या नावाचा आजार आम्ही शाळेत असताना फारच फोफावलेला होता

खरजूरादी मंथ - The Energy Drink Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune Ayurvedic Drink     मंथ म्हणजे विशिष्ट औषधी ठराविक काळापर्यंत पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्याचे रवीने मंथन (Churning) करून तयार होणारे पेय म्हणजे मंथ. आयुर्वेदातील वेगवेगळ्या ग्रंथात मंथ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत.  तृष्णा,

  टेकू - शरीराच्या रोगप्रतिकाराला..! Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune धावत्या युगात आधुनिकतेकडे जाताना, पश्चिमात्यांचे अनुकरण करताना आम्ही भारतीयांनी 10,000 किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षाच्या अभ्यासातून बनलेलं   आपलं आरोग्यशास्त्र -  आयुर्वेदशास्त्र बाजूला ठेऊन Modern Medical Science ला जवळ केलं।।एवढं जवळ केलं की,

error: Content is protected !!